Submitted by सायु on 27 November, 2017 - 06:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. मोड आलेले मेथी दाणे = १ वाटी
२. कीसमीस = पाव वाटी
३. एक कांदा, उभा चिरलेला
४. लसुण ५,६ पाकळ्या, बारिक चिरलेल्या
५. तेल २ ते ३ चमचे
६. बारिक चिरलेली कोथोंबीर
६. मोहरी,तिखट, हळद, मिठ अंदाजे
क्रमवार पाककृती:
कढईत दोन चमचे तेल तापवुन ,मोहरी घाला, मोहरी तडतडली की कांदा आणि लसुण घाला.. गुलाबीसर परतुन घ्या.. मग किसमीस घालुन पाच सात मिनटे पुन्हा परतायचे.. हळद, तिखट घालायचे, मग मेथ्या घालुन पुन्हा परतायचे.. मिठ घालुन एक वाफ काढुन घ्या..
बारिक कोथींबीर घालुन सर्व्ह करा.
हिवाळ्यात मेथी खाल्ली की कंबर दुखणे, हात पाय दुखणे अशा तक्रारी येत नाहीत. म्हणुन ही भाजी / उसळ आठवड्यातुन एकदा तरी होतेच..
पौष्टीक आणि जरा वेगळ्या चवीची आहे त्यामुळे एकदा करुन पहा.
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना पुरेशी आहे.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायु, मला या मेथीच्या रेसिपीज
सायु, मला या मेथीच्या रेसिपीज अगदी नवीन आहेत, सगळे पदार्थ करुन बघायला नक्कीच आवडतील.
Pages