आज डॉक्टरकडून निघालो आणि केमिस्टच्या दुकानात शिरलो. रात्रीचे साडेदहा उलटून गेल्याने वर्दळ अशी नव्हतीच. मोजून दोन गिर्हाईक. मी आत शिरताच त्यातील एक बाहेर पडले. आता फक्त एक बाई तेवढी होती. सोबत तिचा चारपाच वर्षांचा मुलगा. आणि दुकानातील पोरे.
बाईच्या हातात औषधांची मोठी लिस्ट होती आणि त्या छोट्याची काहीतरी चुळबूळ चालू होती. काही विशेष नाही. आजूबाजूच्या काचेच्या कपाटांमधील वस्तू कुतूहलाने बघत होता. त्याने आपल्याजवळच राहावे म्हणून बाई सारखी ओरडत होती. डाफरल्यासारखेच ओरडत होती. मला तो सूर जास्त भावला नाही. पण नवल म्हणजे दिसायला ती बाई ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टॉप घातलेली एक मॉडर्न मम्मा असली तरी शुद्ध मराठीमध्ये बोलत होती. खरे तर हे एक अत्यंत दुर्मिळ चित्र बघून मला थोडेसे बरेही वाटत होते. पण तिचे ते ओरडणे... ते थोडेसे इरीटेट करत होते.
दुकानातील पोरं त्या छोट्याची मजा एंजॉय करत होती. तसा काही विशेष मस्ती करत नव्हता पण ते एक असते ना, लहान मुल म्हटले की आपण जरा कौतुकाने बघतो. त्यातला प्रकार होता. लहान मुलांनाही अश्यावेळी त्या कौतुकाच्या नजरा झेलायला आणि सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनायला आवडते. त्याची मम्मा त्याला पुन्हा पुन्हा जवळ खेचत होती आणि हा पुन्हा पुन्हा त्या काचेच्या कपाटांजवळ जात होता. "आरोह, जाऊ नकोस तिकडे. एकदा सांगितलेले समजत नाही का. ईकडे ये. मार खाशील नाहीतर..." बाईचे ओरडणे चालूच होते.
एकदाची त्या बाईची खरेदी आटपली आणि जाण्याआधी ती मुलाला जवळ घेत स्वेटर कम जॅकेट घालायचा प्रयत्न करू लागली. मुलगा काही कारणामुळे नकार देऊ लागला. तसे तिची सटकली आणि तिने खाडकन त्याच्या एक मुस्कटात मारली. "मगाशी तुला हे घालायचे होते ना, आता का नाटकं करत आहेस?" पुन्हा ओरडली. मुस्कटात मारलेल्या चापटीचा(?) आवाज खणखणीत आला होता. मी स्वत: या बाबतीत मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर बाळगून असल्याने मलाच उगाचच जास्त मारलेले वाटले की काय म्हणून मी दुकानातल्या पोरांचे भाव पाहिले. ते सुद्धा बावरले होते. मगाशी जे हसत त्या मुलाकडे बघत होते ते नजर चोरू लागले. मुलगा रडला नाही, पण हिरमुसला. त्याला या अपमानाची सवय असावी. पण तो देखील आता आमच्यापासून नजर चोरू लागला. बहुतेक त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला होता. वाईट वाटले. जास्त वाईट याचे वाटले की या प्रकारात आपण काही करू शकत नाही किंवा काय करावे हे आपल्याला समजत नाही.
लहान मुलांना मारावे की नाही हा वेगळा विषय झाला. त्यावर कुठे कुठे चर्चा झालीही असेल. त्याबाबत माझे मत जरी मारू नये असे असले तरी ठिक आहे, ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचा त्याचा दृष्टीकोण. शेवटी आईबाप आहेत, पोरांच्या भल्याचाच विचार करणार. पण हे शिस्त आणि संस्कार लावण्यासाठीचे मारणे घराच्या चार भिंती आड नाही का करता येणार? असे चारचौघात मारल्याने लहान मुलांचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जात नसेल का? की लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट असा काही नसतोच??
आज काय करायचे हे मला पटकन सुचले नाही. पण पुढच्यावेळी मात्र मी अश्या आईबापांना नक्की झापणार....
चूभूदेघे,
ऋन्मेष
मी माझ्या आईचाही मार
मी माझ्या आईचाही मार खाल्लाय आणि मी माझ्या मुलालाही मारलाय व्यवस्थित . जिथे मारायला पाहिजे तिथे मारायलाच पाहिजे . माझा हि सेल्फ रिस्पेकट दुखावला गेला नाही कारण आई जी काही मारत होती ती योग्य कारणाकरताच मारत होती हे मलाही कळत होत आणि माझ्या मुलालाही . बर मार देणं हि प्रतिक्षिप्त क्रिया असते . प्रत्यक्ष मार देताना पालक विचार करत बसत नाहीत कि मी धपाटा देऊ का मुस्कटात मारू ? . त्यामुळे सेल्फ रिस्पेकट ची निदान आई- मुलांच्या ( किव्वा पालक मुलांच्या म्हणूया हवं तर ) नात्यात अजिबात जरुरी नाही
या बाबतीत लहान पणी आईकडूनच ऐकलेली कथा आठवते . एका मुलाला चोरीच्या कारणाने शिक्षा होते . त्याला कोर्टात विचारल जात तुम्हाला काही बोलायचं आहे का ? मुलगा म्हणतो हो बोलायचं आहे ना पण माझ्या आईशी . माझ्या आईला जरा माझ्याजवळ बोलावता का ? . आईला मुलाजवळ जाऊन मुलगा काय सांगतो ते ऐकण्याची परमिशन दिली जाते . मुलगा आईला जवळ बोलावतो आणि तिच्या कानाजवळ तोंड नेऊन तिच्या कानाच्या पाळीचा कडकडीत चावा घेतो . आई विव्हळते / किंचाळते . मुलाला त्याच्या कृतीच कारण विचारलं जात तेव्हा तो म्हणतो." . लहान पणी मी जेव्हा पहिल्यांदी चोरी केली आणि आईला जेव्हा कळलं तेव्हाच तिने मला सणसणीत मारलं नाही म्हणून हि तिला शिक्षा "
२-३ वर्षाच्या मुलांना असतो.
२-३ वर्षाच्या मुलांना असतो. त्यांच्या मनाविरुद्ध काही सांगितले किंवा करू नको म्हंटले तर त्यांचा अपमान झाल्यासारखा त्यांना वाटतो. पण ते लहान, काय करणार, मग आरडाओरडा, भोकाड पसरणे इ. मार्गांनी ते व्यक्त करतात.
मोठ्या माणसांचे ठीक आहे, त्यांना बरेच शब्द माहित असतात, इतर बरेच मार्ग माहित असतात ज्यातून ते दर्शवून देतील की त्यांचा स्वाभिमान (सेल्फ रिस्पेक्ट) दुखावला गेला आहे की सुखावला गेला आहे.
माझ्या भाच्याचे (व.व ६ )आणि
माझ्या भाच्याचे (व.व ६ )आणि मोठ्या भावाचे किरकोळ कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी तो घर सोडुन जायला निघाला. रागारागाने घरापासुन थोडे अंतर गेला. आणि परत दरवाज्यात येऊन बसला. जवळजवळ २ तास हा वाद चालु होता. शेवटी मोठ्या भावाला सॊरी म्हणावे लागले. तेव्हा तो आत आला. सेल्फ रिस्पेक्ट
अजुन एक असाच नमुना २-३ वर्षाचा असेल कोणी ओरडले की मान भिंतिकडे वळवुन बसतो. ज्याने ओरडलेय त्यानेच जाऊन मनवायचे.
शेफारलेल्या, ऑल्मोस्ट
शेफारलेल्या, ऑल्मोस्ट अँटीसोशल वागणार्या दिवट्यांना अधूनमधून मुस्कटात दिलीच पाहिजे असे माझे सरळ मत आहे.
>>>>>>>
कोणत्या आईबापाला आपला पोरगा शेफारलेला दिवटा वाटत असेल
एक निरीक्षण : जेव्हा एखादं
एक निरीक्षण : जेव्हा एखादं मूल असं खरंच शेफारलेलं , अँटिसोशल वागत असतं, त्यावेळी त्याच्या पालकांना त्याबद्दल काहीही वाटत नसतं. (हा विषय याआधीही चर्चिला गेला आहे, पण अगदीच अप्रस्तुत नाही म्हणून लिहिलं).
लहान मूल शेफरलेले असू शकते
लहान मूल शेफरलेले असू शकते किंवा वागू शकते.
पण अँटी सोशल कसे असते ?
कोणत्या आईबापाला आपला पोरगा
कोणत्या आईबापाला आपला पोरगा शेफारलेला दिवटा वाटत असेल>>>>
आपल्याला पूर्ण पार्श्वभूमी माहित नसतात आपण जे धपाटा घालणारे, मुस्कटात ठेउन देणारे आई-वडिल बघतो (इथे आपल्याला मारणारी व्यक्ती आई किंवा वडिल आहे हे माहित आहे हे गृहीत धरलेय) त्यातिल बर्याच जणांना वाटत असेल, अथवा असे न करता आपलं मूल भलत्याचे दिशेने जात आहे हे बघुन समुपदेशकांची मदत घेतात त्यांनाही वाटत असेल.
मुलगा किती शेफारतो हे तुम्ही
मुलगा किती शेफारतो हे तुम्ही त्याला मारता की ओरडता यावर नाही ठरत तर तुम्ही त्याचे फाजील लाड किती करता यावर ते ठरते.
यात लाड आणि फाजील लाड यातील फरक प्रत्येकाने समजून घ्यायला हवा. ढोबळमानाने सांगायचे झाल्यास जे लाड तुमच्यावर त्याला मारायची वेळ आणू शकतात ते फाजील लाड झाले.
मात्र बालसुलभ हरकतींवर प्रतिबंध आणने किंवा कुतूहल आणि उत्सुकतेची मुस्कटदाबी करणे चूकच. त्यासाठी मारणे हे आणखी चूक.
अश्या चर्चात बरेचदा टोकाची उदाहरणे देऊन यासाठी मारावेच लागते असे युक्तीवाद होतात. पण चर्चा त्यासाठी नसतेच.
<<पण अँटी सोशल कसे असते ?>>
<<पण अँटी सोशल कसे असते ?>>
म्हणजे घरी आलेल्या मित्र मैत्रिणींबरोबर न खेळणे, आपली खेळणी, पुस्तके शेअर न करणे, सरळ उठून आपल्या खोलीत जाऊन बसणे व त्यांना येऊ न देणे वगैरे.
अगदी लहानपणा पासूनच मुलांना नीट सवयी लावाव्या लागतात - अगदी एक वर्षाच्या मुलांना सुद्धा खूप अक्कल असते. आई बाबांनी सांगितलेले समजते.
पण अजून लहान आहे, मोठा झाल्यावर सुधारेल असे म्हणणारे आजी आजोबा जवळ असतील तर ते कठीण होते. कारण त्यांच्या दृष्टीने २५ वर्षाचा नातू सुद्धा अजून लहान आहे, लग्न झाल्यावर, मूल झाल्यावर आपोआप अक्कल येईल त्याला.
सुदैवाने आमच्या घरी आमची मुलगी स्पष्ट शब्दात सांगते, डॅडी, आई, तुम्ही बोलू नका - मी आई आहे तिची, मी करते काय करायचे ते.
मी काल माझ्या ४४ वर्षाच्या मुलाला सुद्धा ओरडलो, अरे जेवून उठलास नि ताट कुणि उचलायचे? जा उचलून ये. मग त्याची आई मधे पडली!!
कशी शिस्त लागावी या मुलाला? लहानपणापासून आईचा लाडका!
अहो लहान आहे तो, समजावून
अहो लहान आहे तो, समजावून सांगा, कळेल त्याला,
मी काल माझ्या ४४ वर्षाच्या
मी काल माझ्या ४४ वर्षाच्या मुलाला सुद्धा ओरडलो.. .>>>>>
44 वर्षांचा मुलगा सोबत आहे हे आजच्या काळात एक भाग्यच
विषयांतराबद्दल क्षमस्व.
असो,
एक आजचा लेटेस्ट किस्सा ऐका..
बिल्डींगमध्ये मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या भावाला पाच सहा महिन्यांपूर्वी मुलगा झालेला. त्याची आई त्याला चमचा वाटीतून दूध पाजत होती. तो तोंडातून फुर्र फुर्र करत बाहेर काढत होता. त्याची आई लाडात लटक्या रागात दम देत होती. मी हसतच म्हटलं, वहिनी दोन थोबाडात द्या त्याच्या. वहिनी म्हणाल्या, ए गाढवा ये तुझ्याच देते दोन थोबाडीत. एवढ्याश्या पिल्लाला मारायचे का. त्याला काय कळतेय...
पाचसहा वर्षाच्या मुलाला काहीच कळत नाही हे लोकांना चटकन समजते. पण पाच सहा वर्षाच्या मुलालाही काही गोष्टी समजत नसतील हे चटकन मान्य होत नाही.
शेफारलेल्या, ऑल्मोस्ट
शेफारलेल्या, ऑल्मोस्ट अँटीसोशल वागणार्या दिवट्यांना अधूनमधून मुस्कटात दिलीच पाहिजे असे माझे सरळ मत आहे.
>>>>>>>
कोणत्या आईबापाला आपला पोरगा शेफारलेला दिवटा वाटत असेल Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2017 - 02:04
<<
तुमच्या मूळ धाग्यातील (काल्पनिक) गोष्टीतल्या मातेला. कारण तिने तुमच्या फडतूस रिअॅक्शनची पर्वा न करता आपल्या लाडकुल्याला खणकवली.
तुमची आयडी कशासाठी अन कशी बनवलेली आहे ते मी समजतो,
आता, त्या लहनुल्या गोड्डुल्या मुलाला आईने माल्लं म्हणून भोकाड पसरलंय ना? तसंच, आपल्या मेट्रो मुम्बईत, किती मुलं दहवी अक्रावी पर्यंत मारिज्युआना ओढून चुकतात, अन ७वी ८वीतली किती मुले-मुली "गम्मत" करून चुकलेल्या असतात, याबद्दल एक सेंटी धागा पाडा पाहू?
किमान माझ्या कॉमेंट्सवर असली फडतूस सेंटी उत्तरे देऊ नयेत ही नम्र विनंती. 'वाजवायची' माझी सवय जुनी आहे. तिला हवा प्लीजच देऊ नका
धन्यच वाद!
अन हो. कडक डेटा आहे
अन हो. कडक डेटा आहे माझ्यापाशी. हवेतून सत्यसाईबाबा अंगठ्या काढत तसे अॅनेक्डोटल एविडन्सेस द्यायचे नाहीत. नैतर बाकी कामं धंदे सोडून काही दिवस फक्त मिसन रुन्मेस म्हणून माबोमाबो खेळेन परत.
इथे मायबोलीवर, मी माझा मुद्दा
इथे मायबोलीवर, मी माझा मुद्दा मांड्ताना वस्स्कन अंगावर आल्यासारखा मांडतो, असा आक्षेप माझ्यावर नेहेमी घेतला जातो.
ही माझी रिअॅक्शन असते, अन अती झाल्याशिवाय मी खेकसत नाही, असे माझे मत आहे, हे सर्वात आधी नोंदवितो, अन मग आता या धाग्यावरच्या माझ्या सगळ्या प्रतिसादांचे कारण अन चाइल्ड सायकॉलॉजी, विथ देसी कॉण्टेक्स्ट माझे मत नक्की काय ते इथे विस्तृतपणे नोंदवितो.
>>
पण पुढच्यावेळी मात्र मी अश्या आईबापांना नक्की झापणार....
चूभूदेघे,
<<
↑ हे मूळ धाग्यातून. इथेच स्पष्ट होते, की धागा काढतानाच त्या बाई/आईला आधीच गुन्हेगार ठरवून धागा काढला आहे, कारण, यांच्या कानात, बाळाला मारलेल्या हलक्या "चापटीचा" आवाज,
>> " मुस्कटात मारलेल्या चापटीचा(?) आवाज खणखणीत आला होता." <<
माझी सर्वांना मनःपूर्वक विनंती आहे, की एक बाहुली घ्या अन तिच्या मुस्कटीत मारून कितीक खणखणीत आवाज येतो ते जरा पहा. पोकळ बांबूचा आवाज येतो, नीट मारलं, तर आवाज येतच नाही, असे माझे निरिक्षण.
असो.
तर मुद्दा हा, की मूळ धागा, अन त्यातील नॅरेटिव्ह बायस्ड आहे.
वर्णन केलेला धाग्यातला तो प्रसंग मुळातच मनगढंत आहे, असे माझे म्हणणे आहे, ते अलाहिदा.
****
व्हॉट्सॅप युनिवर्सिटीतून पॅरेंटिंग एक्स्परट झालेल्या, होऊ पहाणार्या सर्व तरुण आईबापांना नम्र विनंती, जर तुम्हाला खरंच पुस्तक वाचून मुलं मोठी करायची असतील, तर जरा चाईल्ड सायकॉलॉजीची अधिकृत, पियर रिव्ह्यूड, चांगली पुस्तके वाचा.
अन्यथा, "मुलांना समजवून सांगतांना गुडघ्यावर बसणे" असली अमेरिकन कल्पना डोक्यात बसते.
आपल्या देसी काँटेक्स्टमधे मुलांइतकं लहान होऊन गुडघ्यावर बसत नाहीत. त्या मुलाला उचलून कडेवर घेतात, मग समजवतात. अन त्यात कुणाला वावगं वाटत नाही, वाटायलाही नको, पण त्या 'तिकडे' मुलाला टिचरने 'हग' दिली तरी पेडोफिलियाची केस होते, मुला/मुलीला कडेवर उचलून घ्यायची हिम्मत यांच्यात उरलेली नाही.. इतका भयंकर पॅरानोईया या जगात आहे, हेही एक वास्तव आहे.
मुद्दा हा, की आपल्याकडे मुलांना मोठं करायची पद्धत वेगळी आहे. आपल्यात मुलांना आपल्या उंचीवर आणून मग समजवण्याची पद्धत आहे. ट्रीट देम अॅज अॅन अॅडल्ट/फ्यूचर अॅडल्ट.
****
आता मुद्दा क्र. २
तुमची मुलं, कशी वागताहेत, त्यांची वागणूक बरोबर, की चूक, याची जर जाणीव तुम्हाला होत नसेल, तर तुमची पालक्/आई/बाप बनायची लायकी नाही.
आपल्याकडे (पुन्हा भारतीय्/देसी संदर्भ) मुलं वाढवताना आईबाप्/आजीआजोबा, असे दोन लेव्हलचे "पालक" असत. आईबापांची बेसिक तक्रार असे/अस्ते, की आजीआजोबा पोरांना फार लाडावून ठेवतात.
एक बेसिक, आजोबा वयातून सांगतो. तुम्हा पोरांना वाढवताना जो हार्शनेस होता, तो आता या वयात कमी झालेला आहे. म्हणून आजी/आजोबा पोरांचे लाड करतात, अन तुम्ही...
तेव्हा, मुलांचे लाड कधी करायचे, कधी कानाखाली काढायची, याची डिसीजन, त्या आईबापाला घेऊ द्या. त्यांच्या कोर्टात ते आईबाप जज आहेत. तुम्ही त्यांना जज करायच्या फंदात पडू नका. नाही तर तिकडे नेदरलँडात मुलं हिसकवून नेल्याची केस झालेली, तशी होईल.
हायब्रीड पॅरेंटिंग करू नका. समजून उमजून करा. सेल्फ रिस्पेक्ट, प्राय्वसी, पर्सनल स्पेस असल्या संकल्पना एतद्देशिय संदर्भांत निरुपयोगी/इर्रिलेव्हंट आहेत, अन त्यांचे अर्थ, संदर्भ ४०० स्क्वेअरफुटात ३ पिढ्यांतली ६ लोकं नांदण्याच्या आपल्या आयुष्यात वेगळेच आहेत.
लिहिण्यासारखं भरपूर आहे, पण ते एक असो.
अती बडबडल्याबद्दल क्षमस्व. अन वाचल्याबद्दल धन्यवाद!
शुभरात्री.
लहान मूल शेफरलेले असू शकते
लहान मूल शेफरलेले असू शकते किंवा वागू शकते.
पण अँटी सोशल कसे असते ?
<<
अतरंगी,
उदाहरणार्थ,
मी माझ्या राजकुमाराला पब्लिक पार्कमधे घेऊन गेलो.
तिथे एक घसरगुंडी आहे.
आमचे राजकुमार घसरगुंडी खेळत आहेत.
सोशल-सोसायटि-समाज-याचे मेंबर असलेले माझ्यासारखे इतर राजे आपापल्या राजकुमार/राजकन्येला तिथे घेऊन आलेले आहेत.
तेही आपापल्या परिने त्या घसरगुंडी नामक वस्तूचा उपभोग घेण्याचा यत्न करीत आहेत.
घसरगुंडीचा खेळ कुणी किती वेळ खेळावा याची जाणीव असणे, नसणे, ती वापरण्यासाठी आलेल्या इतर राजकुमार्/कन्येशी या सार्वभौम राजकुमारांनी युद्ध पुकारून त्याला/तिला शिडीवरून ढकलून देणे, या उदाहरणास "अँटीसोशल" बिहेवियर म्हणतात. Refusal to share communal property with the community.
उदाहरण जमले असेल अशी आशा करतो.
ईथे मुलाला पार्कमध्ये नेऊन
ईथे मुलाला पार्कमध्ये नेऊन ईतर मुलांसमोर मारण्याऐवजी असा वागलास तर पार्कमध्ये नेणारच नाही असा पवित्रा नाही का घेता येणार?
हल्लीचे बरेच आईबाप मी बघतो, लहान मुलांसोबत शेअरींग शेअरींग करत असतात. बहुधा बालवाडीपासूनच शाळेतही हे शिकवले जाते. तर ही कन्सेप्ट त्यांच्यात रुजायला हरकत नाही.
येस्स, काही मूलं स्वभावत:च मुजोर असतात. त्यांना समजूतीचे शब्द पुरेसे ठरत नाहीत हे मान्य. मात्र फटकावल्याने देखील ते सुधारत नाहीत तर फक्त "त्या वेळी" कंट्रोलमध्ये राहतात ईतकेच. आणि एक पालक म्हणून आपण मुलांना सार्वजनिक जागेत धुडगुस घालण्यापासून रोखला या (खोट्या?) समाधानात राहतो.
शेवटी तुम्हाला झटपट तात्पुरते सोल्युशन काढायचे आहे की वेळ घेऊन पर्मनंट हे ज्याचे त्याने ठरवावे.
बाकी वर मी म्ह्टलेच आहे. मी स्वत: लहान मुलांना मारू नये या मताचा असलो तरी मी मारण्याच्या अगदी विरोधात नाहीये. किंवा कोणी आपल्या मुलांना मारतो म्हणून मी त्यांना लगेच गुन्हेगार ठरवणार नाही. आई रिपीट, सेल्फ रिस्पेक्ट टोटली वेगळा विषय आहे. त्याचा मारणे न मारण्याशी संबंध नाही. मला त्या बाईने आपल्या मुलाला मारले याचा राग आला नव्हता. बालपण चाळीत गेलेय माझे. मित्रांच्या बापाला त्यांना पट्ट्याने फोडताना पाहिलेय. पण् मला त्या बाईची मुलाशी वागायची पद्धत खटकली. अगदी त्या ओरडण्याच्या सूरापासून ते सटकन तोंडात मारण्यापर्यंत... आणि त्यानंतर त्या मुलाची मनोवस्था बघून वाईट वाटले.
सेल्फ रिस्पेक्ट हि कन्सेप्ट अमेरीकन आहे की रशियन ? आई जस्ट डोन्ट क्नो ! मी आयुष्यात उल्हासनगरच्या पुढे मोजून चार वेळा गेलो असेन, त्यामुळे माझे विचार, माझे फंडे स्वत:चे ओरिजिनल असतात.
असो,
लहान मुलांना कडेवर घेऊन "समजावणे" हे मात्र आपले पटले आणि आवडले
एक अवांतर - पोस्टची लांबी किती आहे यावर मी पोस्टची वॅल्यू ठरवत नाही. मग ती पोस्ट माझी असो वा ईतर कोणाची. त्यामुळे मोठी पोस्ट लिहिणारयाचे मी कौतुक करत नाही, ना छोटी पोस्ट लिहिणारयाची टिंगल.. पोस्ट आवडली तर आवडली आणि पटली तर पटली एवढा स्प्राईट क्लीअर हिशोब असतो. चला, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
आरारा,
आरारा,
अँटी सोशल हा शब्द इंग्रजीत नक्की कशा संदर्भाने आणि कुठे वापरतात याची खात्री नाही. एखादे खेळणे खूप वेळ अडवून बसणे, दुसऱ्याला खेळायला येऊ न देणे असं करणारी मुले हट्टी, स्वार्थी(?) वगैरे म्हणू शकतो. पण इथेही मूल असे वागत असेल तर त्याला तिथे मारण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा त्याचे लक्ष दुसरीकडे वेधणे, त्याला घरातूनच सांगून नेणे वगैरे पर्याय वापरून पाहायला हवेत.
कोणाला शिडी वरून ढकलून देणे, मारणे, चावणे असे प्रकार केले तर एखादा धपाटा बसायला हवा.
तात्पर्य, तुमचा अँटी सोशल बिहेवीअरचा मुद्दा कळलेला आहे.
लहान मुलगा ॲंटीसोशल आहे की
लहान मुलगा ॲंटीसोशल आहे की नाही हे तपासता येते.त्याचा resting heart rate मोजायचा.जर तो ६०पेक्षा कमी असेल तर कारटं सुधारणार नाही.असामाजिक व्यक्तींचा पल्स रेट नॉर्मल लोकांपेक्षा कमी असतो असे आढळुण आले आहे.antisocial tendencies and heart rate असे सर्च देऊन बघा.
लहान मुलगा ॲंटीसोशल आहे की
लहान मुलगा ॲंटीसोशल आहे की नाही हे तपासता येते.त्याचा resting heart rate मोजायचा.जर तो ६०पेक्षा कमी असेल तर कारटं सुधारणार नाही.असामाजिक व्यक्तींचा पल्स रेट नॉर्मल लोकांपेक्षा कमी असतो असे आढळुण आले आहे.antisocial tendencies and heart rate असे सर्च देऊन बघा.
सिंजी फाजील लाड Vs ॲंटिसोशल
सिंजी फाजील लाड Vs ॲंटिसोशल ॲक्टिव्हीटी अशी काहीशी लिंक नाही का?
नसल्यास आम्ही जोडु लिॅक लौकरच.
अर्रे हे तर भलतंच सोप्पंय!
अर्रे हे तर भलतंच सोप्पंय!
resting heart rate चेक करायचा. कमी असेल तर एकेक सणकन् ठेऊन द्यायची.. मग तर सुधरतील ना लहान पोरं???
"प्रेमानं जग जिंकता येतं! ही तर लहान मुलं आहेत. आईबाबांनी समजावून सांगितल्यास समजून घेतातच."
चाईल्ड सायकॉलॉजीची अधिकृत,
चाईल्ड सायकॉलॉजीची अधिकृत, पियर रिव्ह्यूड, चांगली पुस्तके वाचा.>>>>डॉक्टर तुम्हाला अजून काही माहीत असलेली पुस्तके रेफर करा प्लीज. आगाऊ धन्यवाद.
आरारांनी कोणती पीअर रिव्ह्यूड
आरारांनी कोणती पीअर रिव्ह्यूड पुस्तकं वाचली आहेत याची मला उत्सुकता लागली आहे


मी पॅरेंट झाले ते भारतात असताना. मग अमेरिकेत आले आणि इथेच पुढचे पॅरेंटिंग शिकले(?!) पण अमेरिकेत गुडघ्यावर(च )बसावे(च) आणि भारतात कडेवर(च) घ्यावे(च) हे दोन्ही माझ्या कुठल्याच हँडबुकात लिहून आले नसल्याने मी फारच काहीतरी मिस केले असे वाटू लागले आहे
तसेच टीचर ने हग केली तर लग्गेच पेडोफिलियाची केस(च) करायची(च) असते(च) हेही न कळल्याने कोतबो! फील आला आहे.
'तिकडे' मुलाला टिचरने 'हग'
'तिकडे' मुलाला टिचरने 'हग' दिली तरी पेडोफिलियाची केस होते>>>
हसून हसून फुप्फुसं दुखली.
तसेच टीचर ने हग केली तर
तसेच टीचर ने हग केली तर लग्गेच पेडोफिलियाची केस(च) करायची(च) असते(च) हेही न कळल्याने कोतबो! फील आला आहे.
नवीन Submitted by maitreyee on 26 November, 2017 - 20:57
>>
तिकडे जाऊन इकडचही तिकडे न्यायची सवय लागली आहे.अमेरीकेत असाल तर गुढग्यावर बसून बोलायचि सवय लावून घ्या,मुस्काटात मारायच्या फंदात पडलात तर ९११ ला कॉल लावेल कुणी शेजारचा आणि चाईल्ड् ॲब्युजखाली मस्त शिक्षा होईल.
(आरारांची मापे काढणार्यांसाठी आहे हे खास)
जे अमेरीकेत नियम म्हणून पाळले
जे अमेरीकेत नियम म्हणून पाळले जाते त्यापैकी ज्या गोष्टीत तथ्य असेल ते ईथे स्वेच्छेने पाळायला काय हरकत आहे?
हे म्हणजे असे झाले, आपल्याकडे मुलांना मारल्यावर कायदा काही करत नाही म्हणून घ्या बिनधास्त हात साफ करून..
अमेरीकेच्या पालकांचे हात बांधले आहेत त्यामुळे जिथे गरज आहे तिथेही त्यांना मारता येत नाही हे त्यांचे दुर्दैव समजूया,
पण आपल्या ईथल्या पालकांचे हात मोकळे आहेत हे आपल्या ईथल्या मुलांचे दुर्दैव्य बनवायचे का?
गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा
गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा मी मध्य अमेरिकेत एका छोट्याश्या गावात कामाला होतो. गावात दोन महाराष्ट्रीयन कुटुंबे बाजूबाजूला राहायची.. इंडिपेंडेंट house मध्ये.
त्यापैकी एका कुटुंबाला 11 वर्षाची मुलगी होती( US born and raised). तिचे बाबा काही कामानिमित्त इंडिया गेले होते. तिला एक अमेरिकन मित्र होता 14 वर्षाचा. त्यांचे भेटणे तिच्या आईला आवडायचे नाही.. कितीही सांगून मुलगी ऐकत नाही महणून तिने शेजाऱ्याला बोलावले की ही माझे ऐकत नाही तुम्ही समजावा.. त्या मुलीला त्याने आईसमोर रागावले की त्या मुलाला भेटत जाऊ नकोस. पुढं काय झाले असेल तुम्हाला कल्पना आली असेलच. दुसऱ्या तासाला पोलीस शेजाऱ्याच्या घरी होते.. इमोशनल bullying ची केस घेऊन.
आरारांनी कोणती पीअर रिव्ह्यूड
आरारांनी कोणती पीअर रिव्ह्यूड पुस्तकं वाचली आहेत याची मला उत्सुकता लागली आहे
<<
भारतातला किमान एमबीबीएस पदवी साठीचा अधिकृत अभ्यासक्रम अन त्यात शिफारस केलेली मानसोपचाराची पुस्तके कोणती, हे जरा गुगलणार का?
"अॅलोपथिक" वैद्यकिय पाठ्यपुस्तकांचा अन जर्नल्स/(नियतकालिक??)चा एक मोठा लोचा असतो. ती आंतर्जाल्/इंटरनेटवर फुकट उपलब्ध नसतात. हवे तितके सारांश रूपाचे चाइल्ड सायकॉलॉजी उतारे मात्र उपलब्ध आहेत पण बेसिक ट्रेनिंग नसल्यास त्याचे इंटरप्रिटेशन्/आकलन मुश्किल असते.
हां. प्रताधिकारयुक्त अशा पायरेटेड पुस्तकांच्या साईट्स मला ठाऊक आहेत, अन ती पुस्तके पीडीएफ स्वरूपात कशी उतरवून घ्यावीत, हे तुम्हांस खास बाब (स्पेशल केस्) म्हणून खासगीत सांगायची तयारी आहे. हे ज्ञानही गूगलून मिळूच शकते, पण ते (गूगल करण्याचे
महत्वाचे)स्किल ट्रान्स्फर करायला आवडेल.
बाकी अमेरिका हा एक वेगळा ग्रह, आरारा सारख्यांना अॅक्सेसिबल नाही, त्या ग्रहावर आरारांचे कुणीही रियलटाईम सगेसोयरे नाहीत, किंवा आरारा सारख्यांना अमेरिकेत यायची परवानगीच नसल्याने (मोदींसारखे पर्सोना नॉन ग्रॅटा) ते कधी इकडे फिरकलेलेच नाहीत, इत्यादी अॅसम्प्शन्स्/पूर्वग्रह असलेत, तर .. जौद्या.
मी पॅरेंट झाले ते भारतात
मी पॅरेंट झाले ते भारतात असताना. मग अमेरिकेत आले आणि इथेच पुढचे पॅरेंटिंग शिकले(?!) पण अमेरिकेत गुडघ्यावर(च )बसावे(च) आणि भारतात कडेवर(च) घ्यावे(च) हे दोन्ही माझ्या कुठल्याच हँडबुकात लिहून आले नसल्याने मी फारच काहीतरी मिस केले असे वाटू लागले आहे Wink
तसेच टीचर ने हग केली तर लग्गेच पेडोफिलियाची केस(च) करायची(च) असते(च) हेही न कळल्याने कोतबो! फील आला आहे.
<<
बास(च) का?
परत जिप्सीचा गणपतीतला फोटोवाला धागा अन त्यातल्या लहान मुलांच्या फोटोजबद्दलचे वाहत्या पानावरचे रेफरन्सेस(च) आठवून(च) द्यायला(च) हवेत(च) का?
आपण तिथे नव्हतात वाट्टं? नै, वयोमानाने स्मृतीभ्रंश झाल्यासार्खं वाट्टंय म्हणून म्हटलं..
आ.रा.रा.
आ.रा.रा.
तुम्ही एक वेगळा धागा काढून नवा लेख लिहिलात तर सर्वांच्या फायद्याचे ठरेल.
Pages