गैर कानूनी अचाट आणि अतर्क्य सिनेमांच्या वाटेतला महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक दशकाची अचाटपणाची आपली वेगळी स्टाईल आहे आणि क्वचितच एखाद्या चित्रपटात एकापेक्षा जास्त स्टाईल्स बघायला मिळतात. गैर कानूनी तो चित्रपट आहे. या विशेषतेमुळे ही अचाट आणि अतर्क्य लेखकांची कार्यशाळा आहे असे म्हणणे योग्य ठरेल. ऐलान-ए-जंगप्रमाणेच हा रिव्यू क्राऊडसोर्स करत आहे. यात तुम्हाला हवी तशी भर घाला.
१) अमूर्त कल्पना आणि मूर्त कथा
अचाट लेखन करताना एक मुख्य अडचण असते की अनेकदा कथेमागची संकल्पना आणि तिचे मूर्त स्वरुप यांचे गुणोत्तर काय असावे? याच्यावर अनेक दिग्गजांनी वेगवेगळी उत्तरे शोधली आहेत पण कोणीही याचे उत्तर १:१ देत नाही. १:क्ष (क्ष > ०) गुणोत्तराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रामसेपट! गैर कानूनी मध्ये सुरुवातीच्या श्रेयनामावलीमध्ये स्टोरी आयडिया श्रीमती पुष्पा राज आणि स्टोरी प्रयाग राज अशी दोन वेगवेगळी नावे वाचून द्वित्त्ववादी कथानक असल्याचे कळते आणि त्यानुसार गुणोत्तर १:१ आहे. थोडक्यात एकही सीन वाया घालवलेला नाही, प्रत्येक सीन कथेला पुढे आणि पुढेच नेण्याकरता वापरला आहे. अचाट कथानक आणि पटकथा हे दोन स्वतंत्र पैलू असल्याचा दिग्दर्शकाचा द्वित्ववादी समज आहे.
२) नात्यांचा ग्राफ कनेक्टेड हवा
ग्राफ थिअरीमध्ये कनेक्टेड ग्राफ अशी एक संकल्पना आहे. कनेक्टेड ग्राफमध्ये कोणत्याही नोडपासून सुरुवात करून कोणत्याही नोडपर्यंत पोचता आले पाहिजे. अशा कनेक्टेड ग्राफचे सर्वोत्तम उदाहरण आपल्याला राज तिलक मध्ये बघायला मिळते पण गैर कानूनीही कमी नाही.
दलाल जूतावाला (कादर खान) आणि रॉबर्ट डिकॉस्टा (रणजीत) एकमेकांचे कम-दुश्मन (हे नंतर समजावले जाईल) आहेत. दलाल नावाप्रमाणेच चपला-बूटांमार्फत गैरकानूनी धंदा करतो आणि डिकॉस्टा गैरकानूनी पद्धतीने कंपाऊंडरचा डॉक्टर झाला आहे. जूतावालाची बायको (आशालता) नुकतीच प्रसूत झाली असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यावर जूतावाला चिडलेला पाहून नर्सला आश्चर्य वाटते. जूतावालाच्या सासर्यांनी अट घातलेली असते की जर दलालला मुलगा झाला तरच त्याला इस्टेट मिळेल. आता इथे पहिले अपत्यच मुलगा पाहिजे अशी अट नाही पण जूतावालाचा बहुधा आशालतावर भरवसा नसावा, कदाचित हे ठसवण्यासाठीच तिला प्रसूत झाल्या झाल्या स्ट्रेचरवर कुठे तरी नेले जाते. मग जूतावाला डिकॉस्टाच्या मदतीने मुलांची अदलाबदली करवतो आणि मदत करणार्या त्या नर्सला मारतो. बदललेला मुलगा असतो इन्स्पेक्टर कपिल खन्नाचा (शशी कपूर). कपिल खन्नाने आपल्या मुलाला पाहिलेले असते त्यामुळे नर्सच्या चुकून गडबड झाली या बहाण्यावर तो विश्वास ठेवत नाही. पण त्याची बायको (रोहिणी हट्टंगडी) हाय खाऊन वर जाते. हा मुलगा कादर खानकडे ओम नारायण नावाने वाढतो आणि त्याचा गोविंदा होतो.
इकडे कपिलने हार मानलेली नसते. तो डिकॉस्टाविरुद्ध पिंचू कपूर न्यायाधीश असलेल्या कोर्टात जातो. पण सबूत नसल्याने डिकॉस्टा सुटतो. कपिल मग सबूत गोळा करण्यासाठी आझम खान (रजनीकांत) ला जेलमधून बाहेर काढतो. आझम खान तिजोर्या उघडण्यात भलताच तरबेज असतो. सबूत घेऊन तो पळणार एवढ्यात दलाल आणि डिकॉस्टा त्याला मारतात. त्याचा मुलगा अकबर खान मोठा होऊन इतर काही होणे शक्य नसल्याने रजनीकांत होतो आणि त्याच्यावर डिकॉस्टाच्या मुलीचा, रिटाचा (किमी काटकर) जीव जडतो.
इथे जूतावालाच्या मुलीचे काय करावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. मग पिंचू कपूर तिला सांभाळण्याची जबाबदारी बंतोवर (अरुणा इराणी) टाकतो आणि त्या बदल्यात कपिलने तिला ₹५००/महिना द्यावे असे सांगतो. बंतोचा नवरा नथुलाल (सत्येन कप्पू) आझम खानच्या खुनाचा आळ स्वतःवर घेतो, त्या बदल्यात त्याला जूतावाला ₹१०००० आगाऊ आणि ₹१०००० सुटल्यानंतर द्यावेत असे ठरते. त्यासोबतच बंतोला ₹५०० ची लॉटरी पण लागते. जिच्यामुळे आपल्याला इतका धनलाभ झाले तिचे नाव लक्ष्मी ठेवावे असा विचार करून ती जूतावालाच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवते. काही अनाकलनीय कारणाने म्हणा वा दैवी हस्तक्षेपामुळे म्हणा, कादर खान व आशालताची मुलगी असूनही मोठी झाल्यावर ती श्रीदेवी होते आणि गोविंदासोबत गाणी म्हणते.
३) रजनीकांतचे सीन्स कसे लिहावेत?
अशा सिनेमात काही हुकमी एक्के असतात. या सिनेमाचा हुकमी एक्का रजनीकांत आहे. बरं एक सोडून दोन रजनीकांत आहेत. पण प्रि-बाबा रजनी असल्याने तो अभेद्य नाही त्यामुळे याचे सीन्स जपून लिहिणे गरजेचे आहे. उदा.
आझम खानची एंट्री
डिकॉस्टा कपिलच्या तोंडावर फिदी फिदी हसून निघून जातो. कपिल आझम खानकडे मदत मागायला जाईल अशी शंका जूतावाला उपस्थित करतो. यावर डिकॉस्टा त्याला सांगतो की आझम खान जेलमध्ये आहे. कट टू जेल. आझम कोठडीच्या आत बसल्या बसल्या कोठडीचे दार उघडून कपिलला आत येण्याची परवानगी देतो.
अकबर खानची एंट्री
जूतावाला आणि डिकॉस्टात झालेल्या किरकोळ वादावादीचे पर्यवसन जूतावालाने डॉ. रिटा डिकॉस्टा (बाप नकली असला तरी पोरगी अस्सल डॉक्टर झालेली दाखवली आहे) च्या मागे गुंड पाठवतो. किमी काटकर नेहमीप्रमाणेच काटकसरी पेहराव करून चाललेली असते जेव्हा ते गुंड तिला गाठतात. तिला धरल्यानंतर हा संवाद
गुंड : घबराओ मत रानी, अरे हम तो तुम्हारे आशिक है
रिटा : तुम मेरे आशिक नही तुम मेरे गुलाम हो
गुंड : गुलाम?
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : गुलाम
किल्वरचा गुलाम हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो आणि गोल चक्कर मारून परत रजनीकांतकडे येतो.
गुंड : गुलाम नही रानी हम तो तुम्हारे बादशहा हैं
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : बादशहा
बदामचा बादशहा हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो आणि गोल चक्कर मारून परत रजनीकांतकडे येतो.
(रजनीकांत ऑफ स्क्रीन) : और बादशहा के उपर एक्का होता है
इस्पिकचा एक्का हेलिकॉप्टरचा आवाज करत भिरभिरत जातो, रजनीकांत खदाखदा हसतो.
गुंड : कौन है? बाहर निकल!
एक्का रजनीच्या हातात परत येतो.
रजनीकांत - ये से इक्का और ये से अकबर खान, अभी आता हूं मेरी जान
पुढची धुलाई याची देही याची डोळा बघण्याची गोष्ट आहे - https://youtu.be/lJvOeoF8xro?t=43m41s
इथे माझा अल्पविराम, पुढचा रिव्यू प्रतिसादांत लिहितो
कादर खानच्या किडनी फेल्युअर
कादर खानच्या किडनी फेल्युअर चे निदान x ray पाहून होते >> हे अतर्क्य नाही आहे. अॅब्डोमिनल पेन असेल तर कधी कधी तिथला एक्स रे काढतात. याचा उपयोग ऑर्गन असेसमेंटसाठी सुद्धा केला जाऊ शकतो - https://www.hopkinsmedicine.org/healthlibrary/test_procedures/urology/ki...
एकंदरीतच हा सगळा चित्रपट ५
एकंदरीतच हा सगळा चित्रपट ५ चौरस मैलात घडतो, कोणतीही व्यक्ती कुठेही भेटू शकते. >>> सिम्बा
आत्ता फक्त इतकेच हे वरवर चाळताना दिसलेले अॅक्नॉलेज करतोय. मागची २ पाने अजून बॅकलॉग मधेच आहेत
आफ्रिकन राजकन्येला भारतीय
आफ्रिकन राजकन्येला भारतीय नवरा हवा असतो? ऐतेन!
उरलेले दोन जोड
उरलेले दोन जोड
१०) अॅनाटॉमी ऑफ अ फाईट
नक्की फाईट कशाला म्हणावे हा थोडा संभ्रमात पाडणारा प्रश्न आहे. अचाट सिनेमात सर्वसाधारणपणे दोन विरोधी मतांची लोकं शारिरिक बलाचा वापर करून वाद घालतात अशा परिस्थितीस फाईट म्हणतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे की तुरळक अपवाद वगळता या परिस्थितीचे फलस्वरुप दोन्ही पार्ट्या जखमी होणे आवश्यक आहे. गैर कानूनी शैलींमध्ये प्रयोग करत असल्याने इथे वेगळे फल निघणारी एक फाईट आहे पण तिच्यात इतर सर्व वैशिष्ट्ये दिसत असल्याने आपण ती अभ्यासणार आहोत - रजनीकांत वि. शशी कपूर
अ) कार्टून सेटअप हवा
गाण्यांप्रमाणेच फाईट्सना देखील सेटअप लागतो पण इथे सेटअप कोणत्या प्रकारचा असावा यावर मर्यादा आहेत. गाणी सहसा एखादा नवा मुद्दा उपस्थित करण्यासाठी किंवा जुन्या मुद्द्याला पुढे नेण्यासाठी वापरली जातात तर फाईट्स विषय बंद करण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे फाईट्सचा सेटअप अधिक बंदिस्त हवा. अशावेळी लेखकांनी टॉम अँड जेरी किंवा रोड रनरसारख्या कार्टून्सचा अभ्यास करणे फायद्याचे ठरते. या मालिकांप्रमाणेच एका पार्टीला दुसर्या पार्टीला पकडण्याचा/मारण्याचा/तिचा बंदोबस्त करण्याचा मोटिफ द्यावा. याने पहिली पार्टी दुसर्या पार्टीला सामोरे जाण्याच्या प्रसंगाची सोय होते. आपल्या उदाहरणात रजनीकांत बापाचा बदला म्हणून सत्येन कप्पूला धमकावून आला आहे आणि त्याचे पुढचे लक्ष जूतावाला असणार आहे. कानून का रक्षक या नात्याने शशी असले धंदे चालू देऊ शकत नाही. मग त्याने रजनीकांतला पकडण्याचा प्रयत्न करणे ओघानेच आले.
ब) कोरिओग्राफी
गाण्यांमध्ये संपूर्ण अंग हालणे एवढीच माफक अपेक्षा असते. फाईट्समध्ये तसे चालत नाही. इथे केवळ हात आणि पाय हालले तरी चालते पण ते लयीत झाले पाहिजे. तसेच फाईट्समध्ये नमनाचे डायलॉग होणे गरजेचे असते, ज्यांना फाईटचाच एक हिस्सा समजले जाते. हे आता सोदाहरण पाहूयात.
रजनीकांत पावसात भिजत आपल्या घरी परतला आहे. बाहेर पोलिसाची जीप उभी असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करत तो बिनदिक्कतपणे सिगारेटचे झुरके घेत घरात प्रवेश करतो. इथे त्याचे पाय, ४ बीट र्हिदम फॉलो करतात आणि हात समेवर सिगारेटचे झुरके घेतात. दुसर्या चक्राच्या समेवर दरवाजा उघडल्या उघडल्या रजनीकांतच्या तोंडावर कोणीतरी टॉर्च मारतं. हा हिचकॉकसारखा दिसणारा माणूस कोण याचे उत्तर आपल्याला लवकरच शशी कपूर देतो. ओव्हरकोट आणि हॅट घातलेला शशी कपूर लाथ मारतो (बीट १), कट रजनी बॅक फ्लिप मारायला सुरुवात करतो (बीट २), हा कट संपूर्ण बीट कव्हर करायला लांबवून मग रजनीचे हात जमिनीला स्पर्श करतात (बीट ३), मग रजनीचे पाय टेकून तो पालथा पडतो (बीट ४), बीट पूर्ण झाल्यावर तो समेवर उठून उभा राहतो (यासाठी पुन्हा बरोबर ४ बीट्सचे एक सायकल घेतो).
क) फाईटमध्ये काहीतरी गिमिक हवे
जर तुमची फाईट केवळ लाथा आणि ठोसे मारून संपत असेल तर तुम्ही फाईट सीनमध्ये असलेल्या पोटेन्शिअलचा पूर्ण वापर करत नाही आहात. काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडल्याशिवाय तुमच्या फाईटमध्ये तो अॅडिशनल एक्स फॅक्टर येत नाही. हेही लक्षात ठेवावे की दर वेळी न्यूटनला फेफरे आणणारे पराक्रम करायची गरज नसते आणि नेमकी हीच चूक सध्याचे अचाट दिग्दर्शक करतात आणि फाईटचा आत्मा हरवून बसतात.
गिमिक १ : नमनाचे डायलॉग झाल्यावर शशी कपूर रजनीकांतला स्वतःबरोबर येण्याची सूचना करतो. रजनी लाथेने त्याची टॉर्च हवेत उडवतो ती हवेतच ४ बीट उडत राहते आणि तालचक्र पूर्ण करून मग रजनीच्या हातात येते. इथे मधले २ बीट ती क्लिअरली हवेत स्थिर झाल्याचे लक्षात येते.
गिमिक २ : शशी रिव्हॉल्व्हर काढून रजनीवर रोखतो. दोन गोळ्या रजनीकांत चुकवतो आणि मग त्याच्याकडे टॉर्च शशीकडे रिव्हॉल्व्हर असा विषम सामना चालू असल्याची नोंद घेतो. यावर शशी कपूर मोठ्या ऐटीत अदलाबदली करतो. रजनी गोळीने टॉर्च फोडतो ज्यावर शशी अतिशय प्रसन्न मुद्रेने रजनीकडे बघत राहतो. यावर एक डायलॉग मारून रजनीकांत उरलेल्या तीन गोळ्या हवेत झाडतो.
गिमिक ३ : थोड्या कोलांट्या उड्या (अर्थात रजनीच्या, शशी कपूर वाढलेल्या पोटामुळे मुख्यत्वे हातच हलवू शकत असतो) झाल्यावर अचानक दोघेही खदाखदा हसायला लागतात. पुढच्या कटमध्ये लक्षात येते की शशी कपूरने चलाखी दाखवत रजनीच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. मग रजनीकांतला कार्टव्हीलिंग करायला लावत तो जीपकडे नेतो. यावर रजनीकांत शांतपणे बेड्यांची चावी दाखवतो आणि मागून आलेल्या इन्स्पेक्टरला चावी देऊन आत्मसमर्पण करतो.
(https://youtu.be/lJvOeoF8xro?t=1h14m53s इथून पुढची तीन मिनिटे ही फाईट आहे)
११) मेलोड्रामा
मेलोड्रामा हा अचाट कथेचा लिहायला सर्वात सोपा भाग आहे. यामध्ये तुम्हाला फुल रिटार्ड जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे गो ऑल आऊट, ग्लिसरीनचे कॅनच्या कॅन संपू दे आणि सुस्थितीतील कॅरॅक्टर्सना जखमेवर मीठ चोळायला लावायला विसरू नका. नियम एकच - परिणाम उद्ध्वस्त करणारा हवा. गैर कानूनीतले उदाहरण
श्रीदेवी कादर खानकडे गोविंदाशी लग्न करण्याची परवानगी घ्यायला जाते. कादर खान तिला दुसर्यांदा नाकारतो (एकदा बेटी म्हणून एकदा बेटी जैसी बहू म्हणून). मग मेलोड्रामा सुरू होतो. आधी त्याच्या फॅक्टरीला आग लागते. पैशांची चणचण असताना, हे संकट कोसळले असताना, आशालताला "मेरी जान तुम्हारी हैं" म्हणण्याची हुक्की येते. मग तो विम्याच्या १० लाखांसाठी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करतो. वेळेवर गोविंदा येऊन तिला वाचवतो आणि "रिश्ता खत्म" म्हणून निघून जातो. कादर खान ज्यांचे देणे लागत असतात ते येऊन त्याची सगळी मालमत्ता जप्त करतात आणि कादर खानवर फूटपाथवर बूट पॉलिशचे दुकान उघडण्याची वेळ येते. इथे लेखकाची प्रतिभा बघावी - फूटपाथवर आल्यानंतरही जूतावाला जूतावालाच राहतो. यावर श्रीदेवी त्याच्याकडे येऊन त्याला बूट पॉलिश करायला लावते आणि जखमेवर मीठ चोळते. मग त्याला अचानक किडनीचा त्रास पुन्हा सुरू होतो.
हॉस्पिटलात त्याला किमी सांगते की तुझी किडनी बदलावी लागेल. त्यासाठी तुझ्या मुलाचीच किडनी लागेल. आता गोविंदा त्याचा मुलगा नसल्याने ती मुलगी शोधणे आले. मग अरुणा इराणी सांगते की श्रीदेवीच तुझी मुलगी आहे (जखमेवर मीठ). श्रीदेवीकडे गेल्यावर ती म्हणते तू गोविंदाची किंमत १० लाख हुंडा सांगितली होती, तर माझ्या किडनीची किंमत १५ लाख आहे (जखमेवर मीठ). यावर निरुपाय होऊन तो कम-दुश्मन रणजीतकडे जातो. यावर रणजीत त्याला धक्के मारून बाहेर काढतो (पूर्णतया उद्ध्वस्त!).
असे सर्व पैलू झाल्यानंतर केवळ क्लायमॅक्सचा अभ्यास उरतो. तो शेवटच्या सेक्शनमध्ये करूयात.
पायस...
पायस...
इथे लेखकाची प्रतिभा बघावी , कम-दुश्मन , फाईटमध्ये काहीतरी गिमिक हवे...वगैरे अशक्य हसविणारी वाक्यं!
त्या व्हिडिओ मधे तर धमाल आहे. पाऊस अगदी ओतत असलेला...खोटा खोटा..... आणि ह्यांचे स्टंट्स. शशी कपूर चे कौतुकाने पाहणे व रजनीच्या कोलांट उड्या! डायरेक्टर ला लाज नसेल का वाटत असे करा म्हणून सांगताना? म्हणजे मला तरी आपले कल्पना दारिद्र्य असे दाखवायला लाज वाटली असतीच.
तसेही हल्ली ती हवेत तरंगणारी फाईट दृष्यं (उदा सिंघम) पाहून डोळे अगदी निवले आहेत !
काय ते अचाट साहसी हिरो व त्यांचे पराक्रम......! गाड्याच्या गाड्या उलथून लावणारी त्यांची असामान्य क्षमता व बाहुबल! भारत खरेच एक विश्व शक्ती म्हणून उदयाला येत आहे!
पायस ग्रेट वर्क
पायस ग्रेट वर्क
काही अनाकलनीय कारणाने म्हणा
काही अनाकलनीय कारणाने म्हणा वा दैवी हस्तक्षेपामुळे म्हणा, कादर खान व आशालताची मुलगी असूनही मोठी झाल्यावर ती श्रीदेवी होते >>>
यावरून दस्तुरखुद्द आशालताबाईंनी सांगितलेला किस्सा आठवला.
एका चित्रपटात तिला मिथुन चक्रवर्ती चिडवत होता.
तुम मां बाप सत्येन तो मै कैसे तुम्हारा बेटा हुआ. बता तुने क्या किया....
१२) क्लायमॅक्स
१२) क्लायमॅक्स
एवढे सगळे धागे विणल्यानंतर ते एकत्र यायला हवे आणि ते आणण्याची जागा म्हणजे क्लायमॅक्स! हा एकच सीन असतो ही समजूत साफ चुकीची आहे. जेव्हा नवीन मुद्दे उपस्थित होणे बंद होतील तेव्हा क्लायमॅक्स सुरू झाला असे समजावे. यात सर्वसाधारणपणे पुढील गोष्टी घडायला हव्यात.
अ) व्हिलनच्या लोकांनी कोणाला तरी किडनॅप केले पाहिजे.
इथे हिरोची माँ हा सर्वोत्तम पर्याय असतो. बेसिकली व्हिलन आणि हिरो एके ठिकाणी जमा व्हायला पाहिजेत. सामान्यतः हिरो हा धुलाईमास्टर असल्याने व्हिलनची बाजू संतुलित करण्याकरिता अशी एखादी बार्गेनिंग चिप असणे गरजेचे आहे. गैर कानूनीमध्ये कोणत्याच हिरोला सख्खी आई नसल्याने आणि एकंदरीत सगळेच गैर कानूनी असल्याने त्यातल्या त्यात शशी कपूरच काय तो चांगला असतो. त्यामुळे अॅव्हांत-गार्दे शैली वापरावी लागते.
कादर खान आधी किमी काटकरला किडनॅप करून रणजीतकडे पैसे मागतो. रणजीत थोडा वेळ मागून घेतो आणि सुपुत्र टोनीला श्रीदेवीला किडनॅप करायला पाठवतो - कारण तिने वेळीच हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे जूतावाला जगला. तो पोलिसाचा वेष धरून तिला किडनॅप करतो. मध्येच शशी कपूर येऊन हिला कुठे घेऊन चाललात असे विचारतो. त्यावर टोनी त्याला गोळी घालून पळतो. श्रीदेवीला उचलल्याची बातमी गोविंदाला आशालताकडून कळते.
ब) हिरोच्या बाजूचे कोणीतरी मेले पाहिजे
हे क्लायमॅक्सच्या दृश्यातच घडावे अशी अट नाही पण तसे झाले तर अधिक परिणामकारक! सामान्य क्लायमॅक्समध्ये काही किरकोळ कॅरॅक्टर्स जसे हिरोचे मानलेले लोक - आई/बहीण/रहीम चाचा/मौसी/काटकुळा मित्र/लाईन देणारी मैत्रीण इ. लोक मरतात. पण अॅव्हांत गार्दे शैली असल्याने दिग्दर्शक काहीतरी अचाट करतो.
कादर खान किमीला घेऊन रणजीतच्या अड्ड्यावर येतो. तिथे श्रीदेवी त्याची निर्भत्सना करते. त्यावर रणजीत ती कादर खानची खरी मुलगी असल्याचे रहस्य उघड करतो. कादर खान मीसुद्धा काही कमी नाही, अशा आवेशात किमीला तुझा बाप गैर कानूनी धंदे करत असल्याचे सांगतो. यावर किमीला भलताच राग येतो आणि ती मी सगळं पोलिसांना सांगायला जात आहे असे म्हणून तरातरा चालायला लागते. यावर टोनी बापाला "हिला गोळी घालू का?" असे विचारतो. यावर रणजीत तो मान आपला असल्याचे दाखवून किमीला बिनदिक्कत गोळी घालतो.
तिकडे श्रीदेवीला वाचवायला निघालेला गोविंदा आणि जेलमधून सुटलेला रजनीकांत समोरासमोर येतात. त्यांची मारामारी चालू होते. दोघे एकमेकांचा जीव घेणार इतक्यात पळालेली किमी त्यांच्या मध्ये तडमडते आणि सगळी रहस्ये दोघांना सांगून मरते.
क) हिरोच्या लोकांपैकी एकाने तरी डोके चालवायलाच हवे
तर होते असे की किमी पळाल्यानंतर तिकडे अचानक शशी कपूर पोलिस घेऊन येतो. रणजीत त्याला पाच लाख देऊ करतो. शशी कपूर ते स्वीकारल्याचे दाखवून त्याच्या हाताखालच्या इन्स्पेक्टरला क्राईम ब्रांचमधल्या मुस्तफा जमालला निरोप दे असे म्हणतो. मुस्तफा जमाल म्हणे "गुनाहों का बादशहा" असतो आणि त्याच्याकडे खूप हेलिकॉप्टर्स आणि विमाने आहेत. नंतर कळते की प्रत्यक्षात मुस्तफा जमाल आयजीपी असतो आणि शशीने त्याच्या मार्फत आणखी पोलिस मागवलेले असतात. तसे बघावे तर शशी कपूरकडे ऑलरेडी पुरेसे पोलिस असतात तरी व्हिलन कसा चालू घडामोडींवर लक्ष ठेवत नाही ("ये मुस्तफा जमाल कौन हैं?") आणि कसा आम्ही त्याचा फायदा घेतला हे शशीला सिद्ध करायचे असावे.
ड) हाणामारीचे पर्यवसन व्हिलन मरण्यात किंवा त्याच्या अटकेत झालेच पाहिजे.
बाकी तुम्हाला हवी तशी हाणामारी करायला मुभा आहे. यात काही मार्गदर्शक सूत्रे आहेत. जसे की हिरोईनला मारामारीची संधी देण्यासाठी व्हिलनच्या पार्टीत काही बायका असाव्यात. तशा रणजीतकडे टाईट स्विमसूट घातलेल्या नर्स असतात. त्या श्रीदेवीची किडनी काढायला जातात तर श्रीदेवी त्यांना मारते.
रजनीकांत रेकॉर्ड वेळात किमीचा अंत्यविधी करून रणजीत आणि कादर खानसाठी कफन घेऊन येतो. तिकडे रणजीतलाही शशीचा डाव लक्षात आलेला असतो. तोपर्यंत गोविंदाही तिथे पोचलेला असतो आणि त्याला आपले जन्मरहस्य कळलेले असते. मग अखेरची मारामारी सुरू होते. मध्ये कुठेतरी टोनीच्या हातात एक रिव्हॉल्व्हर येते आणि तो कादर खानवर गोळी चालवतो. श्रीदेवी मुलीचा धर्म म्हणून ती गोळी हाताने अडवायला जाते. प्रत्यक्षात ती गोळी कोणालाच लागत नाही आणि कादर खान उगाचच तिला धक्का मारून जवळच्या टेबलावर उकळत असलेली रसायन भरलेल्या चंचूपात्रांवर जाऊन आदळतो. ही रसायने ज्वलनशील असावीत कारण काच फुटताच आग लागते आणि कादर खान जळून मरतो. टोनी फारसा महत्त्वाचा व्हिलन नसल्याने त्याला ऑफ स्क्रीन अटक होते.
रणजीत या सर्वांना चकवून गाडीतून पळतो. रजनीकांत मोठ्या ऐटीत मोटरसायकलने त्याच्या पुढे जाऊन थांबतो. इथे रणजीत डोके चालवून त्याला गाडीने उडवतो आणि मग त्याच्या पायांवरून गाडी नेतो. मग गोविंदा येतो आणि तो रणजीतची धुलाई करतो. हे चालू असते त्या ठिकाणी एक क्रेनसदृश वाहन असते. रणजीत त्याच्या टपावर चढून रजनीकांत आणि गोविंदाला गोळी घालतो, ती मध्ये आलेल्या गोविंदाच्या खांद्याला चाटून जाते. आता इथे एक इनइक्वालिटी आहे - (दोस्तने चालवलेली गोळी)*२ > (रणजीतसारख्या कमिन्याने चालवलेली गोळी)*५०. यामुळे गोविंदा मरणे शक्य नसते. रजनीकांत मग मोटरसायकलची नंबर प्लेट फेकून मारतो. आधी शशी बरोबरच्या फाईटमध्ये त्याने सेट केलेल्या ग्राऊंडरुल्सनुसार त्याला हे करून रणजीतची बंदूक हिसकावणे शक्य असते व तसेच घडते. पण त्याच्या गोळ्यांचा रणजीतवर काहीही परिणाम होत नाही कारण रणजीतने बुलेटप्रुफ जॅकेट चढवलेले असते. मग रजनीकांत विजेची एक तार तोडतो, टपावर चढतो आणि रणजीतला तिचा शॉक देतो. एकदाचा मग रणजीत मरतो.
स्पेशल ईस्टर एग - काटकसरी ताई ढगात गेल्यामुळे रजनीकांतलासुद्धा मरणे भाग आहे. त्याप्रमाणे तो गोविंदाला इमोशनल डायलॉग मारून, मुस्लिम असल्याने कलमा म्हणून मरतो. पण त्यासोबत एक कमाल शॉट आहे. जेव्हा रजनीकांत किमीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो स्वतःला इस्पिकचा एक्का असाईन करतो (ये से इक्का, ये से अकबर खान) तर तिला बदामची राणी असाईन करतो (र से रिटा, र से रानी). मरताना खिशातून तो दोन पत्ते बाहेर काढून ते हातात धरून मरतो - अर्थातच इस्पिकचा एक्का आणि बदामची राणी!
अशा रीतिने गैर कानूनीची कहाणी इथे संपते. या मार्गदर्शनपर नियमांचा वापर करून कोणी अचाट व अतर्क्य कथा लिहिली तर त्याची जबाबदारी धागाकर्त्याची नाही. त्या कथेची यथासांग चिरफाड करण्याची जबाबदारी मात्र मोठ्या आनंदाने स्वीकारली जाईल.
भारी धम्माल आली.
भारी धम्माल आली.
पायस, अशक्य धमाल लिहीलं आहे.
पायस, अशक्य धमाल लिहीलं आहे.
अॅव्हांत-गार्दे शैली --फारच मस्त. टोनी नावाचा कुणी एक बदमाष तर मस्ट आहे अशा सिनेमांमधे. टोनी म्हटल्यावर पट्ट्यापट्ट्यांची जर्सी घातलेला, लांब केस, गालफडं बसलेली, उग्र डोळे, गळ्यात लाल रुमाल किंवा मग डोळ्यांवर स्वस्तातला गॉगल असे चित्र येते.
कॅरेक्टर्स ची नावं -हाही एक धाग्याचा विषय होऊ शकेल इतकी प्रेडिक्टेबल असतात हिंदी सिनेमांमधे. (उदा - व्हिलनचे चमचे असले की टोनी, मॅक्स, माँटी वगैरे...आणि व्हिलन - डिसूझा, लाला भगतराम , बलबीर , धनराज .. हिरो नेहमीच राज, राहुल, किशन, दीपक, विजय, रवी.
तिथे श्रीदेवी त्याची निर्भत्सना करते- हे वाचून एकदम द्रौपदी ने वस्त्र हरणाच्या वेळी कौरवांची वगैरे केली तसली निर्भत्सना आठवली!! किती कमाल शब्द!
मुस्तफा जमाल, टाईट स्विमसूट घातलेल्या नर्स (?!) --हेही मस्तच!
तुमची लेखन शैली भारी आहे...आणि निरीक्षण तर सुपर भारी! थँक्यू फॉर मेकिंग अवर डे
खतरनाक आहे हे! हा पूर्ण
खतरनाक आहे हे! हा पूर्ण पाहायचा राहूनच जातोय.
काटकसरी ताईंना ढगात का पाठवलं पण? हा 'ए से अन्याय' आहे.
एक नंबर पायस!!
एक नंबर पायस!!
काटकसरी ताईंना ढगात का पाठवलं
काटकसरी ताईंना ढगात का पाठवलं पण? हा 'ए से अन्याय' आहे. >>> अर्रर्र स्पॉइलर. मला अजून दोन तीन पाने वाचायची आहेत व लिहीण्याकरता होमवर्क बाकी आहे
Don't worry fa,
Don't worry fa,
पायस ने फक्त सिनोप्सीस दिले आहे,
डिटेल रिसर्च पेपर लिहिले बाकी आहे.
खूप खूप दिवसांनी एवढी खळखळून
खूप खूप दिवसांनी एवढी खळखळून हसले! कॅरी ऑन पायस
सिंबा, तुमच्याही पोस्ट हहपुवा!
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
काटकसरी ताईंना ढगात का पाठवलं पण? हा 'ए से अन्याय' आहे. >> अॅक्चुअली! माझ्यामते जगावेगळा अचाटपणा करण्याच्या नादात काही मूलभूत नियमभंग केल्यामुळे जी कथा पोटेन्शिअली महाग्रेट व्हायची ती नुसतीच ग्रेट झाली आहे. मी क्लायमॅक्स असा सेट केला असता.
अरुणा इराणीला पैशांचे आमिष देऊन रणजीत तिच्याकरवी आशालताला किडनॅप करतो. टोनी श्रीदेवीला घेऊन आलाच आहे. मग कादर खान जेव्हा काटकसरी ताईंना घेऊन येईल तेव्हा त्याने कादर खानला मारावे कारण तसेही रजनीकांतचा मुख्य बदला रणजीतशी आहे. रहस्योद्घाटन झाल्यावर कादर खानचा तसाही काही रोल उरत नाही. मग अरुणा इराणीने पैसे मागितल्यावर तिला गोळी घालावी. इथे सत्येन कप्पू आपले बलिदान देऊन तिला पळण्याची संधी उपलब्ध करून देईल. मग ती जाऊन गोविंदा रजनीकांतची फाईट थांबवेल आणि सगळं सांगून, पश्चत्ताप व्यक्त करून, मरण्यापूर्वी अखेर एक चांगले कृत्य केल्याने कृतकृत्य होऊन इंद्राच्या दरबारात चहा प्यायला जाईल. मग शशी कपूरच्या मदतीने ते जातील रणजीतच्या अड्ड्यावर. तिकडे श्रीदेवी-काटकसरी ताईंना मारण्याची धमकी देऊन रजनीकांत आणि गोविंदाची फाईट करावी. अथवा त्या दोघांना बंधक बनवून त्या दोघींचे एक गाणे टाकावे. या दोन्हींची परिणीती हिरोंनी हिरोईन्सची किंवा हिरोईन्सनी हिरोंची बंधने तोडण्यात व्हावी. मग शशी कपूर आयत्यावेळी बरोबर चारों तरफ से घेर लिया हैं वगैरे सांगेल आणि फायनल फाईट करायला हे लोक मोकळे.
अर्रर्र स्पॉइलर. मला अजून दोन तीन पाने वाचायची आहेत व लिहीण्याकरता होमवर्क बाकी आहे >> फा मायकल जॅक्सन कन्व्हेन्शनवरच्या तुझ्या टिप्पणीची वाट बघतोय.
रिव्ह्यू आणि प्रतिक्रियांमधली
रिव्ह्यू आणि प्रतिक्रियांमधली चीरफाड पण भन्नाट !
BTW ते धाग्याचं शीर्षक वाचताच फुटलो होतो कारण 'गैर कानूनी' म्हणताच तो पठाणाचा जोक आठवतो.. पण जाऊ दे
काटकसरी ताईंना ढगात का पाठवलं
काटकसरी ताईंना ढगात का पाठवलं पण? हा 'ए से अन्याय' आहे. >>> +१ त्यामुळे रजनीकांतला पण मरावं लागलं हा तर फारच अन्याय झाला.
टाईट स्विमसूट घातलेल्या नर्स
इस्पिकचा एक्का आणि बदामची राणी >>>>
पायस, सिम्बा - भन्नाट लिहीले
पायस, सिम्बा - भन्नाट लिहीले आहेत
आत्ता कॅच अप करत आहे.
५) कॅरेक्टरचे आपले गाणे असावे >>> हे महान आहे. तो सीनच अफाट आहे. रोजच्या पुजार्याला देवीची मुर्ती नेहमीच्या जागेपेक्षा दोन फुट पुढे आली आहे, थोडी वेगळी दिसत आहे हे समजत नाही. एकवेळ ते ही सोडून दिले, तरी या मुर्तीला नेहमीच्या मुर्तीला असलेल्या चार हातांऐवजी मर्त्य मानवांसारखे दोनच हात आहेत हे ही लक्षात येत नाही.
विजू खोटेला मुर्ती बोटे हलवत आहे हे समजत नाही हे या कथेतील एकूणच पोलिस, चोर व जज यांच्या कोर्टातून सिद्ध झालेल्या हुशारीच्या लेव्हल मुळे समजू शकतो.
श्रीदेवीला न ओळखून त्याने इथे एक जुना नियम तोडला आहे. भूमितीय त्रिकोणामधे जसे साम्य ठरवण्याची पॉश्च्युलेट्स असतात तशी हिन्दी चित्रपटांमधे व्यक्ती ओळखण्याची असतात. त्यात फक्त चेहरा पुन्हा दिसणे पुरेसे नाही. चेहरा + जुनी वस्तू, चेहरा + जुने गाणे असे काहीतरी जमले की व्यक्ती ओळखता आलीच पाहिजे. इथे श्रीदेवीचाच चेहरा व ते लक्ष्मी चे गाणे दोन्ही एकत्र आल्यावर खरे म्हणजे त्याने ओळखायला हवे.
पण पुन्हा तीच (लॅक ऑफ) हुशारी मार खाते. आता मंदिरात तो इन्स्पेक्टर की हैसियतसे नसेल गेला बुवा. पण जत्रेत फिरताना तरी? आपल्या हातात लाल कापडा ऐवजी पिवळे कापड दिले व जाताना श्रीदेवी लाल कापडवाले गाठोडे घेउन गेली तरी त्याला समजत नाही. तसेच तशीच दिसणारी आणखी एक पोलिस इन्स्पेक्टर आली (इथे ही चेहरा + गाणे पॉश्च्युलेट लागू व्हायला हवे होते) तरी त्याला समजत नाही. इतकेच नव्हे तर ती हायर रॅन्क ची आहे याचे कसलेही चिन्ह नसताना तिला तो सॅल्यूटही करून मोकळा होतो.
पायस ते फोर्थ वॉल बद्दल. तू लिहीलेले तर आहेच. पण चाणाक्ष लोकांना हे ही लक्षात येइल की वॉल तर पाचवी सुद्धा ब्रेक केली आहे. श्रीदेवी तिचे नाव तर घेतेच, पण तिला "हरीभरी" म्हणून "फरिश्ते" मधल्या तिच्या कॅरेक्टरचेही घेते. काही लोकांना मागच्या जन्मातले आठवते तसे ९०ज मधे कॅरेक्टर्सना त्या कलाकाराच्या आधीच्या कॅरेक्टर्स मधले आठवत असावे.
* त्या वरच्या लिन्कमधल्या वर्णनांशी प्रस्तुत पोस्टकार सहमत आहे की नाही याने काही फरक पडत नाही. मात्र वेबसाइटच्या नावाशी सहमत असेलच असे नाही.
अरे, काय हे!! आज वाचून काढलं
अरे, काय हे!! आज वाचून काढलं सगळं
ए से अन्याय (`हम' मध्येही त्याचा डायलॉग आहे ना - तीन से भले दो, दो से भला येक )
श्रीदेवी तिचे नाव तर घेतेच,
श्रीदेवी तिचे नाव तर घेतेच, पण तिला "हरीभरी" म्हणून "फरिश्ते" मधल्या तिच्या कॅरेक्टरचेही घेते.<<<<<
नाही. फक्त ५० टक्के साम्य आहे. त्यात तिचे नाव 'रसभरी' होते.
यू आर द म्हणिंग राइट श्र.
यू आर द म्हणिंग राइट श्र. रसभरी. म्हणजे ब्लर आठवणी येत असतील. हा जर मराठी पिक्चर असता तर इथे माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे किंवा तत्सम वर्गशिक्षिकातुल्य गायिकांचे "आठवणी दाटतात धुके जसे पसरावे, जे घडले ते सगळे सांग कसे विसराssssवे' हे गाणे फिट्ट बसले असते श्रीदेवीला.
Pages