स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4

Submitted by पुरंदरे शशांक on 13 May, 2017 - 00:56

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4

sketch-1494651107303.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"स्केच"/sketch नावाचे अॅप वापरुन केलंय हे डिजिटल स्केच.
ज्या कोणी हे स्केच नावाचे अॅप तयार केलेले आहे त्याच्या कल्पकतेला सलामच !! फारच भारी डिजाईन केलेले आहे हे अॅप.
मोबाईलचा स्क्रीन हा आपला कॅनवास किंवा कागद व आपले फिंगरटिप हे ब्रश/ स्केच पेन/ खोडरबर वगैरे सर्व...

"य" काँबिनेशन्स करता येतील - हे अॅप व आपली कल्पनाशक्ती वापरुन...

सर्वांना मनापासून धन्यवाद !

मला नुसतं sketch app nahi दिसलं.
Sketch book किंवा तत्सम काही दिसली.
Exact नाव सांगाल तर बरं पडेल.

साधारण दहा वर्षापूर्वी माझ्या parent कंपनी मधुन Sony mobile मध्ये काम करण्याचा योग आला. तेव्हा ज्या ग्रुपमध्ये होतो त्या ग्रुप मधल्या सहा स्वीडिश developers नी मिळुन हे अफलातून ॲप बनवलं. स्वतःच्याच क्रिएटिव्ह ideas लावून साधारण सहा सात महिन्यात हे ॲपच पाहिलं व्हर्जन बनलं. अल्पावधितच प्रचंड लोकप्रिय झालं हे ॲप. पण सोनी मूळची हार्डवेअर कंपनी असल्यामुळे काही वर्षांनी त्यांनी हे ॲप बंद करायचा निर्णय घेतला. म्हणुन सध्या हे playstore वर available नाही.
त्या developers सोबत काम करता करता या ॲप वरचे छोटे मोठे bugs ही solve केलेत. तेवढाच आपला खारीचा वाटा.
असो, आज ही पोस्ट वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या.

नवीन Submitted by सन्ग्राम on 21 December, 2023 - 12:27>>>>

मस्त! अभिनंदन तुमचं!

हे नाही पण दुसर ॲप वापरताना माझ्या हेही मनात आलेलं, प्रोग्रामर स नी हे कसं कसं केला असेल वगैरे..

कधीतरी एकदम बेसिक paintbrausn च प्रोग्राम लिहिलेला त्यामुळे ती कॉम्प्लेक्स ॲप वापरताना कुठेतरी कसं लिहिलं असेल असा एक धागा ही डोक्यात होता. पण मोबाईल ॲप मध्ये येवढं कॉम्प्लेक्स लॉजिक ,
tools असतात कौतुक वाटत.

@सन्ग्राम >>> अगदी बरोबर सांगितलंत तुम्ही. माझ्याकडे सगळ्यात पहिला स्मार्ट फोन "सोनी" कंपनीचा होता...2015 साल असावे. त्यामधे हे अॅप बिल्ट इन होते.
हे अॅप करणारे खरोखरच "जिनियस" कॅटेगरीतले आहेत. कमालीचे क्रिएटिव अॅप आहे हे. तुमचाही यात वाटा आहे हे वाचून खूप अभिमान वाटला. तुमचे हार्दिक अभिनंदन.

सध्या हे अॅप मिळत नाही हे ऐकून सखेद आश्चर्य वाटले....