रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

रा ने मानसी यात नाही हे कसं कंफर्म केलं? >>> ती स्वतः हून तिला विवेक आणि राव च्या अपरोक्ष माहीती देते महत्वाची म्हणून, असं रागिणीच म्हणाली. मला तर अजूनही वाटतं मानसी असेल.

रागिणी सगळे स्वतःच ठरवते.

रागिणी एका अनाथालयात जाते तिथे तिला मानसी व विवेक एकत्र भेटतात. ते दोघेही दत्तक मुलांसंबंधी कामानिमित्त आलेले असतात. मानसीला काही मुले हरवतात हे माहीत आहे, रावने जे स्पष्टीकरण रागिणीला दिले तेच तिलाही देऊन गप्प केले असावे. तरीही जर विवेक दोषी आहे तर मानसीही तेवढीच दोषी आहे, फक्त रागिणीचा मूड नव्हता तिला संपवायचा इतकेच. Happy

अगदीच खोलात जाऊन बघायचे म्हटले तर तिने फक्त मानसीला पेनड्राइव्ह सापडला हे म्हटलेले, बाकी दोघांना सापडणार आहे एवढेच म्हटलेले. तरीही पुढच्या दृश्यात किरण पेनड्राइव्ह सापडला कसा म्हणतो.

कोणीतरी मागच्या धाग्यावर लिहिलं होत क्राइम पेट्रोल च्या भागात धुरत होता इन्स्पेक्टर च्या भूमिकेत ,कोणत्या तारखेचा होता तो एपिसोड?? काही सांगता येईल का? धुरत साठी मागचे भाग बघावे लागतील आता Sad

किक परत आवडायला लागलाय .
जाम सुजलेला वगैरे दिसतो , पण मखिजासाठी ते एक्दम सुट होतयं . Happy
एक्दम कॉम्प्लेक्स , सणकी कॅरेक्टर .

त्याची पहिली सिरियल आठवली अचानक .
दिनमान की काहीतरी नाव होतं . तो पूर्ण सिरियल मध्ये व्हील चेअर वर दाखवलाय बहुतेक .
मी फार फार लहान असताना लागायची .

दिनमान >>> मी बहुतेक दहावी किंवा जुनियर कॉलेजला होते तेव्हा. प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे होत्या. हो तो व्हील चेअर वर दाखवलाय.

दिनमान ही सर्वात पहिली सिरीयल कि क ची, त्याने हल्लीच रुद्रम सुरू झाल्यावर मुलाखत होती त्याची तेव्हा सांगितलं मग दामिनी.

आजचा एपिसोड एक्सलंट.

आऊटडोअर्स हेच लिहायला आले होते. रा च्या डोक्यात एकदाचा प्रकाश पडला.
आता ऊरलेल्या ४ दिवसात कि.क.व तिचा सामना रंगणार व कि.क.चा खातमा. कदाचित तिचाहि.

आता ती परस्पर काटा काढायला बघणार, स्वतः फ्रेममध्ये नाही येणार. नशीब आज click झालं तिला. मला वाटलं होतं last epi ला होईल.

आता चला हवा येऊ द्या पण बंद होणार .. रुद्रम खूपच छान ... एका लग्नाची दुसरी गोष्ट नंतर आवडलेली मालिका .. सतीश राजवाडे ने अजून एखादा चांगला प्रोजेक्ट हाती घ्यावा ..

पुढचं लिहू नका म्हणतात ना बरेच जण.

मागे कि क मुक्ताला सांगतो तो ड्रींक घेत नाही, आणि हातात तर ग्लास होता. अर्थात त्याने तो फक्त हातात ठेवला आणि एक सिपही घेतला नाही, मुक्ताकडून माहीती घ्यायला कंपनी देतोय असं नाटक करत होता बहुतेक.

हा प्रोजेक्ट राजवाडेचा नाहीय तर भीमराव मुडे याचे दिग्दर्शक आहेत.

राजवाडे दिग्दर्शक नाहीय हे नशीब. तो आयत्या वेळी माती खातो.

नेमके मी डायलॉग मिसले ज्यामुळे तिला क्लिक झालं. ओझी वर ऐकत्ये आज परत. तिला क्लिक झाल्यावर ती फोन कोणाला करते निघते आहे असा ? सर म्हणजे माखिजा का ?

ती जर ओळखत नाही फार तर त्याला येऊन सांगण्याचं कारण काय ?

ती जर ओळखत नाही फार तर त्याला येऊन सांगण्याचं कारण काय ?>>>>> माणसाला कुठेतरी मन मोकळं करावंसं वाटतच नां? ती त्याला हे सांगतेही कालच्या भागात. की ती आईशी हे बोलू शकत नाहीये आता. आणि तिला कि क बद्दल वाटत असतंच ना तसंही.

आज आता डोकं लावून परस्पर काटा काढेल. यात दोन गोष्टी होतील. तिला स्वतःला काही करायची गरज नाही लागणार आणि तिच्या संशयाला बळकटी मिळेल.

आता चला हवा येऊ द्या पण बंद होणार >> थोड्या महिन्यांसाठी . परदेशात गेले आहेत ना ते . म्हणून . त्या काळात सारेगामा सुरु करत आहेत आणि ४-५ महिन्यात संपवतील आणि परत हवा येऊ द्या सुरु होईल Happy

तिला सध्या शोभा आणि सरपोतदार यांच्या बद्दल कळलं आहे. आजच्या भागात कोण?? परदेशी बद्दल जगताप ला काही माहिती नसते का ? लास्ट ला , रागिणी रेकॉर्डिंग कोणकडे देणार? मंदार, चॅनेल कि शेजारी मित्र?

काल कि क ने बोलताना केलेली चूक फारच टिपीकल होती,इतकं सहज रागिणीला समजेल असं वाटत नव्हतं.

शिवाय आपले सगळे लॅपटॉप कनेक्टेड आहेत,हे सांगून त्याने अजून एक चूक केलीय

Pages

Back to top