Submitted by राहुल बावणकुळे on 11 November, 2017 - 09:56
आम्ही गावाला गेलो असताना, साजूक तुपाला मुंग्या लागल्या आहेत. थोडथोडक तूप नसून ८००-९०० ग्राम तरी असावे, त्यामुळे फेकण्याची मुळीच इच्छा नाही. तर, तुपाला पुन्हा वापरण्यासाठी कुठले संस्कार करता येतील का? कृपया जाणकारांनी आपला सल्ला द्यावा. उत्तराच्या अपेक्षेत व तसदीबद्दल क्षमस्व!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही व्हेज असाल तर फेकून
तुम्ही व्हेज असाल तर फेकून द्या..
तुम्ही व्हेज असाल तर फेकून
तुम्ही व्हेज असाल तर फेकून द्या..
>>>>
काय संबंध?
शाकाहारी जेवण जे बनवतात त्यांचा हात त्या जेवणाला लागतोच. उदाहरणार्थ पीठ मळणे, लाडू वळणे या कृतींना जास्तच हात लागतो. मग ते अन्न खाणारे या हिशोबाने नरभक्षक झाले का?
मुंग्या त्यात मिसळल्या नाहीयेत जे पोटात जातील. त्यांना बाजूला सारून तूप कसे वापरता येईल याबद्दल ते सल्ला विचारत आहेत.
अवांतर - मुंग्या खाणे डोळ्यांना चांगले असते अशी माझी आज्जी बोलायची. ते खरे की खोटे माहीत नाही. कदाचित मुंग्या लागलेले अन्न कोणी फेकून नासाडी करू नये म्हणूनही असे म्हणत असावेत.
तुमच्या घरातल्या मुंग्या
तुमच्या घरातल्या मुंग्या श्रीमंती थाटाच्या आहे वाटते. बहुदा दिवाळीचा फराळ करायला घेऊन जात असतील.
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
तुप गरम करुन गाळुन घ्या.
तुप गरम करुन गाळुन घ्या.
मुंग्या लागलेले तूप
मुंग्या लागलेले तूप बाजूबाजूने काढून टाका.बाकीचे वापरा.
तुम्ही व्हेज असाल तर फेकून
तुम्ही व्हेज असाल तर फेकून द्या..
<<
तूप हे नॉनव्हेज आहे. It's basically beef fat.
That apart,
तुम्हाला तूप खाण्यासाठी वापरायचे असेल तर थोडे गरम करून गाळून घ्या. फार गरम करू नका.
तूप हे नॉनव्हेज आहे. It's
तूप हे नॉनव्हेज आहे. It's basically beef fat.>>>
तूप हे नॉनव्हेज आहे
तूप हे नॉनव्हेज आहे
मुंग्या नॉनवेज खातात?
तुम्ही मेलेल्या किड्याला घेऊन
तुम्ही मेलेल्या किड्याला घेऊन जणाऱ्या मुंग्या पहिल्या नाहीत का? मुंग्या नॉन व्हेज असतात च..
नेताना पाहिलेय. खाताना नाही.
नेताना पाहिलेय. खाताना नाही.
माझ्या माहितीप्रमाणे मुंग्या त्या किड्याच्या अंगातील रक्तातील साखर शोषून त्यांना सोडून देतात.
गुगल करा.. पहिलीच माहिती ही
गुगल करा.. पहिलीच माहिती ही आहे -
It has been said that ants eat more meat than lions wolves and tigers combined (ants: natures secret power). They are common pests in agricultural areas where they can quickly devour crops. Ants feed on a large range of foods, from engine oil at the side of a road, to other ant species.
यातून काही अर्थबोध होत नाहीये
यातून काही अर्थबोध होत नाहीये.
तुप गरम करुन गाळुन घ्या.>>+1.
तुप गरम करुन गाळुन घ्या.>>+1. पण गाळणी प्लास्टीकची वापरू नका. स्टीलची वापरा.
अवांतर - मुंग्या खाणे डोळ्यांना चांगले असते अशी माझी आज्जी बोलायची. >> हायला, ऋ. माझी पण आज्जी सांगायची, मुंग्या खाल्यावर डोळे येत नाहीत म्हणून. (डोळे येण्याचा आजार होत नाही. ) बहुतेक कोकणातला समज असावा.
तुप थोडेसे गरम करून गाळून
तुप थोडेसे गरम करून गाळून घ्यावे. जर तुम्ही देवासमोर तुपाचा दिवा लावत असाल तर, त्यासाठी वापर करता येईल. ( तुम्हाला ते तुप खायला योग्य वाटत नसेल तर....)
जनरली तुपाला मुंग्या लागत्
जनरली तुपाला मुंग्या लागत् नाहीत.
पण मुंग्यांच्या लहरीचे काही सांगताही येत नाही.
कडकडीत उन्हात १ दुपार ठेवल्यास त्या काही काळ काठावर्/बाहेर येतील, मग त्या हाताने हलकेच काढून बाकी तूप परत गाळून वापरता येईल.
फार फार तर उपासाला नाय वापरायचे
हिमोग्लोबिनचा धागा वाचा.
हिमोग्लोबिनचा धागा वाचा.
मुंग्यांसकट तूप खाल्यास प्रथिनांसोबत लोहसुद्धा मिळेल.
जर तुम्ही देवासमोर तुपाचा
जर तुम्ही देवासमोर तुपाचा दिवा लावत असाल तर, त्यासाठी वापर करता येईल. >> योग्य पर्याय
हायला, ऋ. माझी पण आज्जी
हायला, ऋ. माझी पण आज्जी सांगायची, मुंग्या खाल्यावर डोळे येत नाहीत म्हणून. (डोळे येण्याचा आजार होत नाही. Happy ) बहुतेक कोकणातला समज असावा. >>> माझी आज्ज्जी पण हेच म्हणायची , पण बहुतेक उपरोधिक असावं . म्हणजे खाताना तुम्हाला दिसल्या नाहीत ना मुंग्या , म्हणे आता खाउन डोळे चांगले होतील .
काही अपवाद सोडून सर्वांचे
काही अपवाद सोडून सर्वांचे आभार. मला वाटतय साजूक तूपात भेसळ असावी, त्याशिवाय मुंग्या लागणे शक्य नाही. मी संपूर्ण तूप कढवले आणि चहागाळणीने गाळले. उपवास सोडून एरवी वरणभात व खिचडीसह खायला सुरूवात केलीये.
म्हणजे खाताना तुम्हाला
म्हणजे खाताना तुम्हाला दिसल्या नाहीत ना मुंग्या , म्हणे आता खाउन डोळे चांगले होतील . >>>> पण जेव्हा खाणार्याला दिसतात तेव्हाच तर हा प्रश्न उपस्थित होतो ना.. मला वाटते एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नासाडी होऊ नये असा यामागे विचार असावा. किंवा काय माहीत, होतही असतील खरोखर डोळे चांगले. तसेही डोळ्यांना "ए विटामिन" चांगले असते. कदाचित मुंग्यांमध्ये ते पूरेपूर असावे.. कदाचित म्हणूनच त्यांना ए फॉर अँन्ट बोलत असावेत.. जेवढे स्कूलमध्ये सायन्स वायन्स ईंग्लिश विंग्लिश शिकलोय त्यावरून हा अंदाज
जर तुम्ही देवासमोर तुपाचा
जर तुम्ही देवासमोर तुपाचा दिवा लावत असाल तर, त्यासाठी वापर करता येईल. >> योग्य पर्याय
>>>>
अंशत: असहमत.
म्हणजे जो दिवा तेलाने पेटू शकतो त्यासाठी कोणी तूप वापरत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती देवाची बडदास्त ठेवणारी असावी. त्यामुळे अशी व्यक्ती मुंग्या लागून पावित्र्य भंग झालेले तूप देवाला वापरायचा पर्याय निवडणे अंमळ अवघड आहे.
किंबहुना मग त्यापेक्षा मुंग्यांसह दान करणे हा पर्याय उत्तम. ते देवाला योग्य प्रकारे पोहोचेल.
>>म्हणजे जो दिवा तेलाने पेटू
>>म्हणजे जो दिवा तेलाने पेटू शकतो त्यासाठी कोणी तूप वापरत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती देवाची बडदास्त ठेवणारी असावी.
अहो, आरती करताना निरांजन लावतो ते तूपाचंच असतं ना, ते तेलाचं कसं असेल? बडदास्त काय ठेवायची आहे त्यात.
म्हणजे जो दिवा तेलाने पेटू
म्हणजे जो दिवा तेलाने पेटू शकतो त्यासाठी कोणी तूप वापरत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती देवाची बडदास्त ठेवणारी असावी. >>> बरेच जण सकाळी पुजा करताना तुपाचे निरांजन लावतात आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावतात ज्याला सांजवात म्हणतात.
मी संपूर्ण तूप कढवले आणि
मी संपूर्ण तूप कढवले आणि चहागाळणीने गाळले. उपवास सोडून एरवी वरणभात व खिचडीसह खायला सुरूवात केलीये. >>> चांगलं केलंत.
तूपाला मुंग्या प्रथमच एकले.
तूपाला मुंग्या प्रथमच एकले. नक्कीच भेसळ आहे.
मी तरी दिव्याला वापरले असते.
कोणत्या ब्रँडचे तुप वापरता?
कोणत्या ब्रँडचे तुप वापरता?