Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45
पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू
रुद्रम भाग -१ इथे बघा
https://www.maayboli.com/node/63408?page=63
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मानसी ला काही केलं नाही का?
मानसी ला काही केलं नाही का? मला आजचा भाग म्युत करून बघावा लागला. त्यामुळे फार काही कळलं नाही. इतर दोघांना अपंग केलं म्हणजे काय केलं नक्की?
अपंग होणारेत ते फक्त? मरणार
अपंग होणारेत ते फक्त? मरणार नाहीत?
हि सगळी माहिती का नाही काढुन घेत समोरच्या कडुन? आधी खुनाचच बघते. राव ला तुझ्यावर अजुन कोण आहे ते विचारु शकली असती ना?
राव किती फालतू समर्थन करतो,
राव किती फालतू समर्थन करतो, स्वतःच्या अशा वागण्याचं. काटा आला अंगावर. मुलींचा बळी देऊन समाजकार्य. अशीच शिक्षा हवी. बरोबर केलं रागिणीने.
रावला फार माहीती नसेल. किरणशी संपर्क असणार. परदेशीशी असेल आता. परदेशीचं नाव मुक्ताला माहीती नाहीये अजून. तिने फार काही विचारलंही नाही.
कि क आहे शेवटीच कळेल एकदम.
कि क आहे शेवटीच कळेल एकदम. त्याला तर जबरदस्त भयानक शिक्षा द्यायला हवी रागिणीने.
हो ना .. मला पण वाटलं आता ही
हो ना .. मला पण वाटलं आता ही माहिती काढून घेणार पण तस काही नाही केल
तिच्या डोक्यात आता फक्त बदला घेण्याचं आहे..पुढे काय
होईल ते होउदे
@पियू
@पियू
मानसी ची काही चूक नाही हे रा ला माहीत असल्याने तिने तिला बोलावलं नव्हत. पण त्या मोठ्ठे डोळे वाल्याने(या क्षणी अज्जिबात नाव आठवत नाहीये.पूर्ण ब्लॅंक) तिला फोन करून बोलावलं.रागिणी ने परत मा ला येऊ नको असं सांगितलं फोन करून .पण तरी ती आली. तिच्या समोर त्या दोघांना dart मधून एक स्नायूंना अपंग करायचं विष देते.(तिला त्यांना easy मरण द्यायचं नव्हतं. सो असा विष ज्याने त्याना वेदना होतील पण हालचाल करता येणार नाही तडफड होईल पण काही करता येणार नाही असा अपंग)
आणि मा ला तू काही केलेलं नाहीस हे मला माहीत आहे मी तुला काही करणार नाही.माझा विचार बदलायच्या आधी इथून निघून जा असं सांगते.
असं डार्टने ईंजेक्शन देता
असं डार्टने ईंजेक्शन देता येतं का. त्या बंदुका तर खेळण्यातल्या वाटत होत्या. बोलता बोलता भावूक होण्याचा अभिनय फार छान करते मुक्ता. कोणाचं काय तर कोणाचं काय, आशिष माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकतो म्हणून मानसी रडायला लागते रा मोरेचं ऐकून का घेत नाही. व्हाॅट्सअॅप वगैरे वापरत नाहीत का ही मंडळी. सरपोतदारालाही अशीच भयंकर शिक्षा केली पाहिजे राने.
सरपोतदारालाही अशीच भयंकर
सरपोतदारालाही अशीच भयंकर शिक्षा केली पाहिजे राने. >>> अगदी अगदी.
कि क ला पण मारल्यावर रागिणीने
कि क ला पण मारल्यावर रागिणीने त्याच्याच चॅनेलवर पुर्ण स्टोरी सांगायला यायला हवं पब्लिकला.
सरपोतदार, शोभा माकन, परदेशी आणि कि क सर्वांना जबरदस्त हाल करून मारायला हवं. त्यांची लायकी तीच आहे.
मला उगाच मानसी पण सामील आहे
मला उगाच मानसी पण सामील आहे असं वाटत होतं.. पण predictable च होतं राव आणि विवेकचं सामील असणं
बहुधा रागिणीला यांच्यावर कुणीतरी बॉस असेल हेच क्लिक होत नाहीये..
आता रागिणी मोरेंचं ऐकून
आता रागिणी मोरेंचं ऐकून जगताप ला भेटायला जाईल . तो सरपोतदारानांबद्दल सगळं सांगेल . रागिणी एक दिवशी सरपोतदारांकडे जाईल पण आयत्या वेळी परदेशी त्यांचा गेम करेल रागिणीला काही करावं लागणार नाही पण किक बद्दल पण तिला समजेल . किक ला ती एका रेस्टारंट मध्ये बोलावेल (त्याच्याच रेस्टारंट मध्ये ). त्याच्या बरोबर परदेशी पण असेल . डावाचा मनुष्य ( डावाच्या माणसाने तिचा गेम करायला ज्याला पैसे दिले आहेत तो ) तिच्या मागावर आहे तो पण त्या रेस्टारंट मध्ये येईल . संधी साधून तो तिला मारायला म्हणून गोळी झाडेल पण रागिणी त्याच वेळी खाली होईल आणि गोळी माखिजाला बसेल त्याला गोळी मारली आहे असं बघून परदेशी त्याच्या वर गोळी झाडायला बघेल तर तो डावाचा मनुष्य त्याचा पण खातमा करेल आणि शेवटी रागिणीला न मारता हे भलतेच खून करून बाहेर पडेल . परत रागिणीला काहीच करावं लागणार नाही . ती किकची बातमी त्याच्याच चॅनल वरून देईल . बाकी स्टोरी मध्ये जे सपोर्टींग कॅरेक्टर्स उभे केले आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षा मिळेलच . ते सगळं काही ते दाखवत बसणार नाहीत . ते आपण समजून घ्यायचं
पण समन्वय चेतना मधली मानसी पोलिसांकडे कम्प्लेंट करेल आणि रागिणीला पण शिक्षा होईलच.
तिच्या आईची तिने आयुष्यभराकरता त्या नर्सिंग होम मध्ये सोय केलेली असल्याने रागिणीला आईची काळजी रहाणार नाही . आणि तो डॉकटर सायकियाट्रीस तिचं आणि माखिजाच बोलणं जे त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलाय त्यावर पुस्तक लिहिलं
सुजा
सुजा
आजचा भाग पण छानच. रागिणी
आजचा भाग पण छानच. रागिणी डायरेक्ट मारायचच बघते. कुणाच्या सांगण्यावरून हे केलं याची माहिती काढत नाही..
मानसी समोर हे सगळं करते.. स्वतः चं काय होईल याची अजिबात काळजी नाही.. फक्त बदला घ्यायचा..
तिला वाटत असेल तिचा बदला पूर्ण झाला कारण अभय सातवच्या वर कुणी असेल याची कल्पना नाहीये तिला.. अभय, राव, विवेक.. यांना मारून आणि ड्रग्स चं रॅकेट उध्वस्त करून तिचा बदला पूर्ण झाला..!
जगताप कडून तिला पुढची नावं कळतील.. ह्या सगळ्यात सदा तिच्या सोबत असता तर जास्त छान वाटलं असतं..
सुजा, मस्त...
सुजा, मस्त...
सदा जेव्हा अभयच्या खूनाची
सदा जेव्हा अभयच्या खूनाची चौकशी करत असतो तेव्हा मॅनेजर ला अल्बम दाखवतो त्यात आशिष चा फोटो तो ओळखतो. आणि म्हणतो याचं भांडण झालं होतं अभय बरोबर.. मॅनेजर ची स्मरणशक्ती भारीच आहे की.!
कालचा भाग छान झाला पण रागिणी
कालचा भाग छान झाला पण रागिणी दरवेळी स्वतःला आता पुढे काय या बिंदूवर का आणून ठेवते कळत नाही. मारायचे प्लॅनिंग बरोबर करते मग मारण्याआधी तुमच्या वर कोण ते का नाही विचारत? नोटरीला समन्वय मधले कोण तुला सामील आहेत हे विचारते. विवेक व राव सामील असावेत हे तिने आशिषच्या नोट्समध्ये आधीच ऐकलेले असते, मग नोटरीकडे जायचा प्रश्न येतच नाही. तसेही नोटरी थेट कारणीभूत नाहीय आशिष्च्या मृत्यूला. त्याला उगीच उडवले.
राव व विवेक फोन करून कोणाला बोलवू शकले असते, त्यांच्याकडे 15 मिनिटे वेळ होता इंजेक्शनचा प्रभाव पडायला , त्यातली फक्त 5 मिनिटे रागिणी घेते. आणि त्यानंतरही लगेच मृत्यू आला नसता.
आता तिला फक्त तिच्यावर नजर ठेवणाऱ्याचा सहारा उरलाय. त्याला पकडून विचारू शकते. पण तेही त्याला घाईत आधीच उडवले नाही तरच.
मला तर वाटतेय मखिजाच तिला स्वतः सांगेल तोच सूत्रधार आहे म्हणून. त्याचा दृष्टीने ती वाघीण आहे पण त्याच्या पिंजऱ्यातली.
ते भांडण झालेले तेव्हा
ते भांडण झालेले तेव्हा दाखवलेले का? परत बघायला हवा तो भाग. करण आता जे दाखवले ते बारच्या दारात झाले, बारचा मॅनेजर कुठेही दाखवला नाहीय. तो तिथे असता तर हॉटेलात इतके वेटर व तो स्वतः तिथे असताना आपला बॉस स्वतः दारात डिलिव्हरी घ्यायला का गेला हा प्रश्न त्याला नक्कीच पडला असता.
परत बार मालकाशी बोलून वाद घातल्याचे आशिषने लिहिले नाहीय.
करण आता जे दाखवले ते बारच्या
करण आता जे दाखवले ते बारच्या दारात झाले हो ना म्हणूनच म्ह्ट्लं..मॅनेजर ची स्मरणशक्ती भारीच आहे
पण समन्वय चेतना मधली मानसी
पण समन्वय चेतना मधली मानसी पोलिसांकडे कम्प्लेंट करेल>>>>
एव्हाना मानसी ठाणे सोडून पळाली असणार, रागिणीच्या डोळ्यात तिने खून बघितलाय
राव किती फालतू समर्थन करतो,
राव किती फालतू समर्थन करतो, स्वतःच्या अशा वागण्याचं. काटा आला अंगावर. मुलींचा बळी देऊन समाजकार्य. अशीच शिक्षा हवी. बरोबर केलं रागिणीने.>>>>>>
हे असे ऐकायला भयाण वाटते पण प्रत्यक्ष समाजकार्य करणाऱ्या संस्थांना कुठून पैसा येतो याचा विचार आपण करतो का कधी? देवळात जाऊन देवीला ओटी, नारळ, हुंडीत पैसे टाकताना श्रद्धेने उचंबळून येणारा आपला समाज त्याच तडफेने समाज कार्य करणार्यांना दान देतो का? हा पैसा कोणीतरी खाणार याची आपल्याला खात्री असते पण देवळात टाकलेला पैसा कुठे जातो हा विचारही आपण करत नाही? कित्येक अनाथालयातून अशा गोष्टी बाहेर येतात, त्याच अनाथालयातून त्या आधी कित्येकांचे पुनर्वसनही झालेले असते. रावने जे समर्थन दिले ते चीड येण्यास्पद जरी असले तरी ते वास्तवाला धरून आहे हे नाकारण्यात अर्थ नाही.
आता रागिणीने आपल्याकडचा पैसा देऊन समन्वयला जिवंत ठेवावे, नाहीतर त्यावर अवलंबून असलेले अनाथ उघडे पडतील. आणि रागिणीकडचा पैसाही शेवटी अनैतिक उद्योगातून कमावलेला आहे. तरीही त्याच्या आधारे अनाथालय चालवणे अनैतिक ठरणार नाही.
हो बरोबर आहे साधना, पण फार
हो बरोबर आहे साधना, पण फार ऐकवलं नाही ते काल कारण मुलींची पार वाट लागलेली दाखवलेली आहे रुद्रम मध्ये आणि वर दारूण शेवट.
आता रागिणीने आपल्याकडचा पैसा देऊन समन्वयला जिवंत ठेवावे, नाहीतर त्यावर अवलंबून असलेले अनाथ उघडे पडतील. आणि रागिणीकडचा पैसाही शेवटी अनैतिक उद्योगातून कमावलेला आहे. तरीही त्याच्या आधारे अनाथालय चालवणे अनैतिक ठरणार नाही. >>> तसंच करेल ती बहुतेक.
आपण समाज म्हणून आपल्या एरियात आपल्या परीने मदत करू शकतो अशा संस्थाना विविध प्रकारे, कबूल आहे ती अपुरी असते पण खारीचा वाटा बऱ्याच जणांनी दिला तर थेंबे थेंबे तळे साचे असं होतं. अर्थात करतात बरेच जण.
धुरत हवा होता अगदी शेवटपर्यंत
धुरत हवा होता अगदी शेवटपर्यंत.
हो, त्याला खूप मिस करतेय.
हो, त्याला खूप मिस करतेय. त्याचे व्यवस्थित प्लॅन असायचे, कसलाही व्यक्तिगत फायदा/तोटा नसतानाही गुन्हेगारांचे निर्दालन ही त्याची पॅशन होती, रागिणीचा व्यक्तिगत लढा आहे.
अंजु, खूप चांगले काम करत आहात तुम्ही. कम्युनिटी सर्बिस हा प्रकार अजूनही फारसा नाहीय आपल्याकडे. आपण आपल्यापासून सुरवात करायला हवीय.
धन्यवाद साधना. मी पोस्ट एडीट
धन्यवाद साधना. मी पोस्ट एडीट करते, फार अल्प प्रमाणात होतंय माझ्याकडून, विशेष नाही.
मस्तच आता सोमवारच्या भागाची
मस्तच आता सोमवारच्या भागाची वाट बघते आहे. यांच्यानंतर कुठली मालिका बघावी असा प्रश्न पडेल . मुक्ता खूपच चांगले काम करत आहे .
सारेगमप बघा नवीन सिझन चालू
सारेगमप बघा नवीन सिझन चालू होतोय
मध्ये मध्ये backlog भरुन
मध्ये मध्ये backlog भरुन काढतेय. रा ने नविन घरी पैसे कुठे ठेवले असतील.? ती नर्स तिला ओळखणार का.? फार घाई चालू आहे आता असं वाटतय.
तसेही नोटरी थेट कारणीभूत
तसेही नोटरी थेट कारणीभूत नाहीय आशिष्च्या मृत्यूला. त्याला उगीच उडवले. तो ड्रग्स च्या डिस्ट्रीब्यूशन मध्ये सामील होता म्हणून मारले त्याला.. खरं तर बंदुकीचा धाक दाखवून ती माहीती विचारत असते पण तो तिला ढकलतो आणि हल्ला करायचा प्रयत्न करतो.. मग काय.. रागिणी लगेच त्याला उडवते..!
हो, नोटरी हल्ला करतो म्हणून
हो, नोटरी हल्ला करतो म्हणून त्याला उडवावे लागते हे खरे असले तरी त्याला उडवल्यानंतर ती स्वतःच ठरवते की विवेक व राव दोषी आहेत. ते दोषी होतेच हे नंतर सिद्ध जरी झाले तरी आशिषच्या नोटमध्ये त्यांच्यावर संशय असल्याचे समजताच तिने सरळ त्यांनाच गाठणे अपेक्षित होते. नोट्रिकडे जाऊन फारतर कन्फर्म झाले असते की हो, तेच अपराधी आहेत म्हणून. असो. रागिणी इतका विचार कुठे करून राहिलीय.
जुन्या घरात 2 निळ्या बॅगा गॅलरीत लटकावून ठेवलेल्या त्याचे प्रयोजन कळले का? आणि इतकी मोठी घरे ती का भाड्याने घेतेय कळले नाही. शेजाऱ्यांनी भोचकपणा करू नये ही अपेक्षा असावी.
आशिषच्या नेेोट्स मधे राव
आशिषच्या नेेोट्स मधे राव,विवेक व मानसी वरहि संशय दाखवलाय. रा ने मानसी यात नाही हे कसं कंफर्म केलं?
Pages