रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

सुहास गुप्त एजंट असेल कदाचित >> +१११
मला पण असं वाटलं काल त्याचे डोळे बघुन...असो

माझा काल जरा टाईमलाईन चा गोंधळ झाला...आषिश ला किरण ने धमकी दिली त्या रात्री च आग लागते समन्वय चेतना ला आणि मूर्ती पळुन जातो...आणि त्याच्या दुसर्या दिवशीच आषिश चा कार आपघात होतो ना..मग आषिश ने सगळं मोबाईल रेकॉर्डींग केलं कधी...? .की मूर्ती पळुन गेल्यावर पण मद्धे काही दिवस जातात...?

वरील बऱ्याच मतांशी सहमत .

की मूर्ती पळुन गेल्यावर पण मद्धे काही दिवस जातात...>> बहुतेक जातात मध्ये काही दिवस

माखिजा त्याच डॉक कडे गेला असेल पण त्याने स्वतःच खरं नाव सांगितलं असेल का ? किंवा माखिजा हेच त्याच खरं नाव असेल का ?पण आता मालिका संपायला आलीये सो अजून काही गहन ट्विस्ट्स नसावेत असं वाटतंय. आता जगताप कडून खरं कळल्यावर किंवा आशिष च्या फ्लॅश ड्राईव्ह मधल्या details मधून रा माखिजा पर्यंत कशी पोहोचते एवढंच राहिलंय .शिवाय त्यातून समन्वय चेतना मधले कोण इन्व्हॉल्व्हड आहेत हे पण कळेल , बाकी मिबा, जगताप ,रा ची आई ,सुहास आणि सुहास चे बाबा ,अनुराधा यांचं अजून जास्त पुढे काही दाखवणार नाहीत बहुतेक .. किंवा सूचक वाक्यातून /सीनमधून दाखवतील ओझरतं. फक्त संदीप पाठक चा अजून काय रोल असेल ? त्याने त्या जुन्या किरण चे फोटो काढलेत त्याचा खरंच काही उपयोग तो करून घेतोय का? का उगाच त्याची ती सवय दाखवलीय ते नाही उलगडत आहे.

मखिजा ला बहुतेक स्टॉकहोम सिन्ड्रोम झालाय. त्याला माहित आहे कि रा.ला जरी कळले तरी ती काहिच करु शकणार नाही, त्यामुळे त्याने खेळवायचे ठरवले पण आता ती त्याला 'त्याच्या सारखीच' सायको वाटतीये. त्यामुळे तो खरेच प्रपोज करत असावा असे वाटतेय.
अनेकांनी म्हणले तसे, शेवट नीट करावा.

सुहास सिक्रेट एजंट असेल तर त्याचे बाबा दारू पितात वगैरे सर्व नाटक असेल.

बाबांना अनुराधा मध्ये पिताना काही सुगावा लागला असेल का मग त्यांनी लेकाला बोलावून घेतलं असेल तो या फिल्ड मध्ये आहे म्हणून.

सुहास मला पहिल्यापासूनच सीक्रेट एजंट वाटतोय
आता त्या पाळत ठेवणाऱ्या माणसाचं काय करेल रागिणी ते बघायचं..

डायरेक्ट परदेशी नाही पळत ठेवते त्याच्या हाताखालचा कोणीतरी दुसरा शाम्या/चम्या
परदेशी ला खिश्यात घालणं खूप सोपं असेल असं वाटत नाहीये

ही नेहमी थेट गोळी मारून समोरच्याचा खेळ लगेच खल्लास का करते? आधी जायबंदी करून , माहिती मिळवून मग त्याला मारायचं ना !

ही नेहमी थेट गोळी मारून समोरच्याचा खेळ लगेच खल्लास का करते? >> अगदी अगदी हाच विचार माझ्या डोक्यात आला. लेखक आणि पटकथाकार सैरभर ला आहे का ? त्याला प्रतिकार करण्याचीही गरज दाखवायची नाही. तिने पिस्तूल रोखल्यावर तो घडा घडा सगळं सांगतो असं का नाही दाखवलं ?. नाहीतरी संपतच आली आहे ना मालिका ? Sad

मीनाक्षी +१. दिसला माणुस की कर खुन हे काय चालवलय !!??
आता ऊद्या डायरेक्ट राव ला जाऊन भिडणार. राव, विवेक व मानसी तिघांच्या expressions वरुन कळत नाहीये नक्की कोण असेल? विवेक चिडला होता, मानसी लपुन ऐकत होती व राव हतबल वाटत होते.

तो पोटात गोळी लागलेला नोटरी जिवंत असेल, तर पुढची माहीती मिळेल नाहीतर कशी मिळणार, van वाल्याला पकडायला लागेल तिला. राव मानसी किंवा विवेक सहजासहजी माहीती नाही देणार.

हा पाठलाग करणाराही चम्या निघाला. एवढे मुर्ख नस्तील प्रत्यक्ष असे काम करणारे. आत्ताच तीन तारखेचा भाग बघितला, कुणी नोटीस केलं का, एका बाईकडून खून झाला म्हणून जास्त दुखावली आहेत डावाची माणसं. रांधा वाढा लिहीणा-या बाई बघत नाहीत वाटतं ही मालिका Happy राला घरं छान छान मिळतात. आधीच्या घरातलं बंद खोलीचं रहस्य तसंच राहिलं. वकिल मेला नसेल असं वाटतं, अजून एखादी गोळी घालून संपवूनच टाकायचं ना. पासवर्ड मूर्तीने नाही आशिषने टाकला आहे हे राला माहिती असतं का. डावाच्या माणसांन्नी कधी काढला राचा फोटो.

<<हो मला पण ते जाणवल कि हत्याराने माणसाचे तुकडे करताना रक्ताचा पाट वाहील खरं तर... >> माणूस जिवंत असताना जखम झाल्यावर रक्त वहातं मेल्यावर नाही.

डावाच्या दुकानात सीसीटीव्ही असणार ना त्यात आला असेल रा चा फोटो इतक्या वेळा आली होती तर.

2 वर्ष काय जास्तच झाल्येत , नोटरी त्याच जागी आहे समजू शकतो पण व्हॅनवाला ट्रॅक करणं जरा अवघड आहे ना ? त्यांनी धंदा करण्याची पद्धतही बदललेली असू शकते आता.

त्यांची धंदा करण्याची पद्धत फक्त आशीषच्या लक्षात आली होती आणि त्यांनी त्याचा खून केला..
शिवाय police च सामील आहेत म्हटल्यावर त्यांना पद्धत बदलण्याची गरज वाटत नसेल. तसं पण स्कूल व्हॅनवर संशय घेत नाही कोणी त्यामुळे ही पद्धत त्यांना safe वाटत असेल

भारीच वेगात चाललीये मालिका. रागिणी काय पटापट खून करत चाललीये.. पण अॅटलिस्ट त्या माणसाकडून काहीतरी माहिती मिळायला हवी होती..
रागिणी मस्त बाहेर पडते माॅल मधून आणि तो माणूस माॅलच्या बाहेरच वाट पाहतोय. Happy

वेषांतर, खून, बॉडीची विल्हेवाट, सिम कार्ड बदलणं, घरं बदलणं, प्रत्येक वेळी सहीसलामत बाहेर पडणं, पटापट पुढचे प्लॅन सुचणार.... टिपीकल गुन्हेगार झालीये रागिणी.!!

ओझीच्या कृपेने 1 नोव्हेंबर पासूनचे भाग काल पाहून घेतले. छोट्या मोठ्या चुका जसे भिंतीवर खिडकीतून येणारे ऊन दाखवलेय व त्याचयाच बाजूला दुर्बिणीमुळे होणारे कवडसे दाखवले, माणसाला घरात कापले पण कुठेही थेंबभर रक्त नाही वगैरे सोडून देऊ. तासाभरात बॉडीतले रक्त आटत नाही.

पण मुलांकरवी वाटलेले ड्रग प्रकरण हास्यास्पद वाटले. अगदी दुधाचा रतीब टाकावा तसे काम चाललेले, लपवणे सोडा, मुद्दाम संशय येईल असे सुरू होते. मुलगा गाडीतून उतरून भर रस्त्यात उभा राहतो, बारच्या दारात जाऊन उभा राहतो व कुणि येऊन त्याच्या पाठीची पिशवी स्वतःच उघडून बॉक्स काढून दुधाची बाटली जपून घेऊन जावी तसा तो नेतो हे कैच्याकै. त्या ऍलो गाडीतून कोणी बॉक्स नेला असता तरी काहीही बिघडले नसते.

जगतापला अजूनही कच्च्या कैदेत जिवंत ठेवलाय? सरपोतदार व परदेशी इतके मूर्ख? तयाने आत्महत्या केली हे सहज दाखवता आले असते. त्याने योग्य ठिकाणी तोंड उघडले तर सरपोतदार जेलमध्ये जाईल.

रागिणीचा नवराही तिच्या सारखा मूर्ख निघाला, आजूबाजूचेही तितकेच मूर्ख. त्या नॉटरीच्या दुकानासमोर सिंगल लेन रस्ता आहे, तिथे भली मोठी गाडी घेऊन, काच पूर्ण खाली करून आशिष चार दिवस उभा राहतो व विडिओ न फोटो काढतोय आणि संशयास्पद धंदे करणसर्या नोटरीला ते कळत सुद्धा नाही?

दुधाची बाटली जपुन हातातून घरात नेणाऱ्या गृहिणीइतक्या सात्विकतेने ड्रग आत नेणाऱ्या सातवशी भांडणार्या आशीषला बघून हसू आले. त्याला न भांडता पर्दाफाश करता आला असता, भांडून स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला.

ह्या असल्या फुटकळपणे चालणाऱ्या धंद्यासाठी सातवचा अल्बम भरेल इतकी माणसे मारणे जरा जास्तच वाटले.

हो ना, इतक्या छान चाललेल्या मालिकेचा शेवट इतका फुसका नको.

सध्या रा बंगल्यात राहत्ये का ?

काल त्या नोटरी समोर ती ज्या प्रकारे बंदूक धरत होती मला वाटलचं की हा सहज पाडू शकेल. समन्वय चेतना मधे सगळेच असतील का इंव्हॉल्व्ह ?

ते खिडकीतून येणारं उन अशासाठी होतं का - की क्लिप बघता बघता रा ला रडू येतं आणि झोप लागते, ते डायरेक्ट सकाळी जाग येते ? ते कवडसे वेगळ्या खोलीत येत होते ना ?

आशिषने भांडायला नको होते. ते सकाळ झालीये हे छान दाखवलं. राने मस्त चकवलं त्या माणसाला. कुणी कोणाच्या भानगडीत पडत नाही आणि त्या लहान मुलांनाही पढवून ठेवत असतील कुणी विचारलं तर काय सांगायचं ते. तो रस्ताही तसा सुनसान आहे अनुराधा बारचा. त्या मुलांना नंतर आंधळं करून माखिजाच्या हाॅटेलात कामाला ठेवत असतील.

रांधा वाढा लिहीणा-या बाई बघत नाहीत वाटतं ही मालिका Happy >> हे इथे लिहिण्याचं कारण समजलं नाही. टीका करायची असेल तर त्यांच्या धाग्यावर जाऊन स्पष्टपणे लिहा. उगाचच कळ केल्यासारखे कोणत्याही धाग्यावर त्याबद्दल लिहिणे योग्य नाही.

साधना +1. आशिषचा तपास अगदीच हास्यास्पद. सातव आणि त्याच्यामधलं भांडण पण लुटूपुटूचंच वाटलं. खून्नस वगैरे काहीच नाही. आशिषला राग आलाय असंही कुठे वाटलं नाही. तो अभिनय सतिश राजवाडेला जमलाच नाहीये. त्याचं निवेदन मात्र चांगलं वाटलं.

रागिणी डावाच्या माणसाला कापते तेव्हा ती खाली मोठा काळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा कागद अंथरते. मग रक्ताचे पाट वाहिले तरी त्या कागदामुळे ते घरभर किंवा फरशीवर तर पसरलेच नसणार. त्या कागदावरच राहिलं असेल ते रक्त. त्याला मारते तेव्हाचे थोडेफार रक्ताचे डाग तिने पुसले असावेत असं समजून घेऊया. Happy
पण तिच्या ड्रेसवर अजिबातच रक्त लागलं नाही आणि ती त्याचं कपड्यांवर सगळीकडे फिरत होती हे पटतंच नाहीये. Happy

थोडेफार रक्ताचे डाग तिने पुसले असावेत असं समजून घेऊया. Happy
पण तिच्या ड्रेसवर अजिबातच रक्त लागलं नाही आणि ती त्याचं कपड्यांवर सगळीकडे फिरत होती हे पटतंच नाहीये >>>
प्रत्येक बारिक सारिक डिटेल प्रत्येक वेळेस दाखवत बसतील तर मालिका वर्षानुवर्षे चालेल. काहि गोष्टी जमेत धरायला हरकत नाहि.

राहुलका, मालिका जमेतच धरलीय की. जे शक्य आहे ते मान्य केलंय मी. पण तिने एक अख्खा माणूस कापला आणि तिच्या कपड्यांवर रक्ताचे डागच नाहीयेत हे शक्यच नाहीये. (आपण एक मासा कापला तरी आपल्या अंगावर रक्त उडतं. ) त्यातून तो ड्रेस पांढरा-काळा होता म्हणजे डाग पडलेयत पण दिसले नाहीत असंही होऊ शकतं नाही. मला वाटतं, ती बाहेर पडली तेव्हा ड्रेस बदललेला दाखवायला मालिका वर्षभर चालवायची गरज नसावी. Happy

Pages