Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45
पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू
रुद्रम भाग -१ इथे बघा
https://www.maayboli.com/node/63408?page=63
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
न्यूज चॅनल मध्ये मोठ्या पदाची
न्यूज चॅनल मध्ये मोठ्या पदाची ऑफर करायची होती का प्रपोज करायचं होत विषय तर प्रपोज चाच होता..ती म्हणते माझ्यापेक्शा तुम्हाला कितीतरी चांगल्या बायका भेटतील..तो ही म्हणतो.. हो पण..
कि क सारखीच आहे त्यामुळे
कि क सारखीच आहे त्यामुळे त्याला आवडत असेल ती कदाचित.अजून एक गेस - कि क चे डॉ पन मोहन आगाशे च असतील का ? तो म्हणतो ना मी ट्रीट्मेंट घेत होतो.
धुरत का मारला गेला ह्याचा विचार ती का करेल, शेवटी तो पोलिस होता, त्यातून प्रामाणिक, त्याचे अनेक शत्रू असणार.
त्या पेन ड्राईव्ह मधे कि क नाव का असेल ? समन्वय चेतना मधे किरणचा संबंध यायचा. तो कशाला रिव्हिल करेल बॉस कोण आहे ? तसं तर शोभाला तरी माहीत असेल का कोण बॉस आहे ?
रागिणी फक्त परदेशी किंवा
रागिणी फक्त परदेशी किंवा संदीप पाठक तर्फे पोहोचू शकते माखिजापर्यंत. कारण फक्त त्या दोघांनाच मेन बाॅस माखिजा आहे हे माहितेय.
कदाचित फ्लॅश ड्राइव्ह मध्ये त्यांच्या धंद्याच्या इतर ठिकाणांची माहिती असू शकते असं वाटत होतं पण तो फ्लॅश ड्राइव्ह मूर्तीने लपवलाय. त्याने फक्त विवेकच्या काॅम्प्यूटरचा बॅकअप घेतलाय. त्यात अशा कोणत्याही जागांची माहिती असणे शक्य वाटत नाही. कारण मूर्तीलाच यातलं काहीच माहित नाही.
आणि फक्त मुलं दत्तक दिल्याची यादी मिळून काही उपयोग नाही. कारण त्यातली नाव आणि पत्ते दोन्ही फेक आहेत. मग पुढे शोध घेणंच शक्य नाहीये.
Hi all...Rudram malahi aavdte
Hi all...Rudram malahi aavdte. Muktachya ghari to manus ghusto aani tila paishyanchi don paiki ek bag magato. Ya nantar kay zal koni sangu shakel ka? Maze magche kahi episode miss zalet.
@ मधुरा कुलकर्णी रुद्रम भाग
@ मधुरा कुलकर्णी रुद्रम भाग १ मध्ये दक्षिणा ने त्या भागाची संपूर्ण गोष्ट लिहिली आहे
लिंक इथे आहे
https://www.maayboli.com/node/63408?page=63
@सुजा या धाग्यात जुन्याची लिंक टाकता येतेय का बघा जरा
मला पण कालचा भाग थोडा अनपेक्षित होता . जरा धीर नाही हिला .. मनॊबल ढासळलं तर चालली लगेच खुनाची कबुली द्यायला .
मला ते एक नाही कळलं कि तिने (जेव्हा तिला तो पोलीस फोन करत असतो ) २ मोठ्या बॅग्स बाहेरून घरात आणल्या ,मग फोन वर तुसड्यासारखं बोलली , आणि बॅग्स परत खोलीबाहेर नेल्या !!! मग आतमध्ये आणल्याचं कशाला एवढ्या जड ?आपल्याला दाखवायला का ?कि ती त्या बॅग्स घेऊन चाललीये अनुराधाकडे ? मला वाटलं पैसे परत करणार कि काय हि आता .. पण हि बसली सगळी कथा सांगत !!
फ्लॅश ड्राईव्ह बऱ्यापैकी भरला आहे असा सुहास मागच्या वेळी सांगतो (फक्त ४-५ gb/ किंवा असच काहीतरी ६४ gb पैकी )जागाच शिल्लक आहे का मला वाटतंय ?
म्हणजे खूप माहिती असणार .. may be fotos videos वगैरे ??
मला ते एक नाही कळलं कि तिने
मला ते एक नाही कळलं कि तिने (जेव्हा तिला तो पोलीस फोन करत असतो ) २ मोठ्या बॅग्स बाहेरून घरात आणल्या ,मग फोन वर तुसड्यासारखं बोलली , आणि बॅग्स परत खोलीबाहेर नेल्या !! >>> तिची मनःस्थिती असंतुलित आहे हे दाखवायला असेल
ती पैसे अनुराधाचे आहेत म्हणून तिला देऊन टाकणार की काय ? आता कशाला लागणार असा विचार करून ?
कालच्या भागात जरा वेळ काढला आठवणी दाखवून.
कि क चे डॉ पन मोहन आगाशे च
कि क चे डॉ पन मोहन आगाशे च असतील का ? तो म्हणतो ना मी ट्रीट्मेंट घेत होतो. >>> हो असू शकेल हे कनेक्शन. त्याला कदाचित माहीतीही असेल की ही इथे घेते ट्रीटमेंट.
बरोबर माखिजा चे डॉकटर पण
बरोबर माखिजा चे डॉकटर पण मोहन आगाशेच असू शकतील. मागे ते एका एपिसोड मध्ये बोलले पण होते "रागिणी काही तरी लपवतेय काय ते शोधून काढायला पाहिजे " असं काहीतरी . त्याचा संदर्भ उरलेल्या एपिसोड्स मध्ये येईलच अशी आशा
Aaajkaal ti bag khandyala
Aaajkaal ti bag khandyala laun nighali ki ch kalajat dhadaki bharate
आजच्या एपिसोड मध्ये सातव ची
आजच्या एपिसोड मध्ये सातव ची बायको बहुतेक माफ करून टाकेल रागिणीला
बरोबर माखिजा चे डॉकटर पण मोहन आगाशेच असू शकतील. मागे ते एका एपिसोड मध्ये बोलले पण होते "रागिणी काही तरी लपवतेय काय ते शोधून काढायला पाहिजे " असं काहीतरी . त्याचा संदर्भ उरलेल्या एपिसोड्स मध्ये येईलच अशी आशा >>>हो आता माखीजा बद्दल परदेशी आणि सं पा सोडून दुसरी लिंक असेल तर एकतर हे डॉक्टर किंवा समन्वय चेतना मधलं कुणीतरी असेल
काल रा मखिजा शी बोलताना परत
काल रा मखिजा शी बोलताना परत एकदा बोलुन गेली की त्यांच्या एका भेटीच्या वेळेस मला धुरतांचा फोन आलेला शोभा माकन वर धाड टाकण्यासंदर्भात म्हणून मला जावं लागलं आणि आपलं बोलणं अर्धवट राहिलं..
शोभा माकन वर धाड टाकणार आहे हे आपण कोणाकोणाला सांगितलं होतं ते ती एकदा आठवत होती तेव्हा तिला की क ला पण सांगितलय हे आठवलं नव्हतं...काल मला परत वाटलं की आता हिला आठवतय की काय..आणि शोभा माकन ला टीप कशी मिळाली ते लक्षात येतं की काय..पण छे नव्हेच...
आज ड्राईव्ह ओपन झालाय...बघु त्यात काय मिळतय....आता देव करो आणि रा हे जाउन परत की क ला न सांगो. तसही रा च्या मागे की क ची लोकं आहेत. ती जाउन सुहास ला भेटली हे त्याला सहज समजेल.आणि सुहास चा जीव धोक्यात...
हो नाsss मला पण वाटलं अगं
हो नाsss मला पण वाटलं अगं बाई आता तरी तुला क्लिक होऊदेत कि तू माखिजा ला सांगितलं होतास शोभा बद्दल .. पण श्या ss ! ती वेगळ्याच मनस्थितीत होती .. (तोंड वाकड करणारी बाहुली )
रा ने थोडं धीराने घेतलं
रा ने थोडं धीराने घेतलं पाहिजे. अती घाई केली तर संकटात जाईल बिचारी.
सातव च्या बायकोला खूनाची कबूली दिली ते चांगलं केलं की वाईट मला काय कळलंच नाही.
आता नसती माहिती इतरांना देऊन राला काय मिळेल? ती फक्त आपल्या डोक्यावरचं ओझं कमी करतेय बहुधा.
या मालिकेचा शेवट उगिच फिल्मी किंवा मेलोड्रामाटिक नको दाखवायला म्हणजे मिळवलं.
की अचानक वंगु ची तब्येत सुधारली, सुहास च्या वडलांनी दारू सोडली. डावाची माणसे चांगल्या मार्गाला लागली.. मखिजा ने काळे धंदे सोडून देऊन रागिणीबरोबर संसार थाटला वगैरे
झी ने फार छळलं एक
झी ने फार छळलं एक नोव्हेंबरपासूनचे भाग ( संदीप डावाच्या माणसाला मारते तिथपासून ) ओझीवर अपलोड न करुन !! काहीतरी जबरदस्त झालंय असं सांगतासांगता एकीला थोपवलं होतं निग्रहाने इथली कुठलीही चर्चा वाचली नाही आणि प्रत्यक्षही कुणाला काही सांगू दिलं नाही. पहिल्यापासून लाईव्ह न बघता ओझीवर बघत असल्याने धुरतच्या मृत्यूबद्दल आधीच कळून रसभंग झाला होता म्हणून एक्स्ट्रा प्रिकॉशन घेतली.
पण काल संयम संपून कालचा भाग रेकॉर्डिंगला लावला आणि आज अपलोड झाले नसतील तर रुद्रमचा धागा वाचून आधीचे अपडेट्स घ्यायचे आणि कालचा भाग आज बघायचा असं ठरवलं होतं पण आज ओझीवर अचानक तीन नोव्हेंबर पर्यंतचे भाग आलेले दिसतायंत. ते पाहिले,कालचा रेकॉर्डेड पाहिला आणि बॅगलॉग भरला एकदाचा :हुश्शः !!
आजपासून रोज रेकॉर्डिंगला लावणार !
गुंडाळण्याची जरा घाई जाणवते मधूनच.
संदीप डावाच्या माणसाची विल्हेवाट लावताना किती राडा झाला असेल आजूबाजूला. ते साफ करायला वेळही लागेल आणि ती तोच ड्रेस घालून नंतर सगळीकडे वावरतेय हे कठीण वाटलं पचायला.
त्या माणसाचं वजन किमान साठ किलो तरी असेल. साधी इंटरनॅशनल बॅग तीस किलो झाली तरी किती जड होते. साठ किलोची बॅग उचलताना पोलीस ऑफिसरला काहीच वेगळं वाटत नाही हेही नाही पटलं.
त्यानंतर ती आईबरोबर राहिलेली दाखवलीय आणि दुसर्या दिवशी सकाळी/ दुपारी लगेच मूव्ह झालेली दाखवलीय. घर साफ करणं आणि ताबडतोब मूव्हर्सनी सगळ्या घरातलं सामान पॅक करुन दुसरीकडे हलवणं शक्य होणं हेही नाही पटलं.
रागिणीला मारण्याऐवजी जेलमध्ये गेलेलं दाखवावं ( कदाचित मानसिक स्थितीचा फायदा मिळेल. ) पण कठीण वाटतंय. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचीच आहुती पडणार ह्या यज्ञात बहुतेक.
हो मला पण ते जाणवल कि
हो मला पण ते जाणवल कि हत्याराने माणसाचे तुकडे करताना रक्ताचा पाट वाहील खरं तर... तिने बॅग जाळली त्यानंतर मला वाटलं कि अक्खी रात्र ती घर पुसण्यात घालवतेय अस दाखवतील .. पण ती आपली आई कडे जाऊन चक्क झोपली !!!
बंदुकीने माणूस मारणे आणि त्याची अश्या प्रकारे विल्हेवाट लावणे या नंतर झोप येऊच कशी शकते !! असे मला वाटले ..
पण कथानकाची गरज म्हणून मी ते समजून घेतले कि चला आता यांनी हे गुंडाळायला चालू केले
कालच्या भागात जरा वेळ काढला
कालच्या भागात जरा वेळ काढला आठवणी दाखवून. >>> मला वाटतं तो सॉर्ट ऑफ रिकॅप होता. आता मलिका संपत आली आहे म्हणून धागे जोडून घेण्याकरता.
विल्हेवाट लावणे या नंतर झोप
विल्हेवाट लावणे या नंतर झोप येऊच कशी शकते >> ती आता पूर्ण तयार झालीये यात त्यामुळे उलट तिला एकप्रकारचे समाधान मिळून शांत झोप आली असेल. एक टेन्शन संपले.
ज्यांचे १-२ नोव्हें चे भाग
ज्यांचे १-२ नोव्हें चे भाग मिसले आहेत त्यांच्यासाठी खुषखबर! आपलीमराठीने लोड केलेत ते भाग...
कदाचित फ्लॅश ड्राइव्ह मध्ये
कदाचित फ्लॅश ड्राइव्ह मध्ये त्यांच्या धंद्याच्या इतर ठिकाणांची माहिती असू शकते असं वाटत होतं पण तो फ्लॅश ड्राइव्ह मूर्तीने लपवलाय. त्याने फक्त विवेकच्या काॅम्प्यूटरचा बॅकअप घेतलाय. त्यात अशा कोणत्याही जागांची माहिती असणे शक्य वाटत नाही. कारण मूर्तीलाच यातलं काहीच माहित नाही.>>> तेच तर ना... तो ड्राईव्ह मूर्तीने लपवलेला दाखवलाय व त्या नारदाच्या पीसीच्या डेटाचा बॅकप आहे ना...तरी सुहास परवा म्हणतो की अवघड पासवर्ड ठेवलाय तिच्या नवर्याने. म्हणजे मूर्तीने आबामध्ये ठेवलेला ड्राईव्ह काढून, त्यात नवीन डेटा भरून, पासवर्ड सेट करून स रा पुन्हा तो आबा मध्ये ठेवतो? हे दाखवलंय का दाखवायचंय अजून?
@अजब चालू आहे दाखवणे.
@अजब चालू आहे दाखवणे.
आज दाखवलं. आशिष चं बोलणं झालं
आज दाखवलं. आशिष चं बोलणं झालं मुर्ती शी आणि त्याने फ्लॅश ड्राईव्ह आबामधून काढून परत त्यात बराच डेटा भरून पासवर्ड देऊन पुन्हा ठेवला असेल आबा मध्ये.
सध्या रागिणी तो ड्राईव्ह वाचतेय.
सातवच्या बायकोचा आणी राचा
सातवच्या बायकोचा आणी राचा सवान्द परफेक्ट! गरज होती की नव्हती हे मात्र कळत नाहि , राने जगतापला भेटायला जायला हव होत. आजचा भाग अॅबरप्ट्लीच सन्पला, राला सुहासने सान्गितल वेळ लागेल फ्लॅश ड्राइव्ह ओपन व्हाय्ला जरा दम धरावा की..
डाव्याच्या माणसाची विल्हेवाट ते घर बदलणे फार फास्ट दाखवलय पण त्याच्या डिटीलेनिग मधे जाण्याने स्टोरिला काहीच इनपुट नाही त्यामुळे चल्ता है ,
मुक्ता मिताली सीन मस्त झाला.
मुक्ता मिताली सीन मस्त झाला. मितालीने फार सुंदर काम केलं. स्टोरीने वेग घेतला आज परत.
हुश्श , दिनांक 7 पर्यंत सगळे
हुश्श , दिनांक 7 पर्यंत सगळे एपिसोड ozee वर झालेत अपलोड.झी युवाच्या facebook अकाउंट वर मेसेज केला होता ,त्यांनी रिप्लाय केला
अगदी अंजूताई! भारतीय सिनेमा,
अगदी अंजूताई! भारतीय सिनेमा, सीरियल्समध्ये फार कमी वेळा असं माफी प्रकरण दाखवतात, अगदी नॅचरल वाटलं ते.
मला वाटलं होतं त्या शामरावचे
मला वाटलं होतं त्या शामरावचे तुकडे ज्या बॅगेत भरलेत त्या बॅगेतून रक्त वगैरे बाहेर येईल आणि पोलिसाला कळेल बॅगमध्ये काय आहे ते. आशिष किती जवळून फोटो काढत होता पण कुणालाच संशय येत नाही. मालिका परत वेगवान झाली आहे. परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते. अनुराधाचं शेवटचं वाक्य, सदासारखा पोलिस शोधावा लागेल, अगदी सत्य आहे. मला वाटलं सायली आतून ऐकत असेल. सुहासचं हास्यही वेगळंच वाटलं की मला ऊगीचच त्याचा संशय येतोय.
आशिष किती जवळून फोटो काढत
आशिष किती जवळून फोटो काढत होता पण कुणालाच संशय येत नाही>> नही तो रस्त्याच्या पलिकडुन काढत होता , कॅमेरा मुळे वाटत होत तस
सातवच्या मुलीचं पण कौतुक
सातवच्या मुलीचं पण कौतुक वाटतं, लाडाकोडात, ऐषोआरामात वाढलेली पण नवीन कनिष्ठ मध्यमवर्गीय लाईफस्टाईल सहज स्वीकारली तिने. खूप matured दाखवली आहे. काल नव्हती पण मागे एक सीन दाखवला होता. आई आणि ती नवीन ठिकाणी राहायला येतात तो, तेव्हा जाणवलं.
आता रागिणी माखिजा च्या
आता रागिणी माखिजा च्या ट्रीटमेंटचा धांडोळा घेईल एक तर किक ला फोन करून विचारेल तुझे हेच डॉकटर का ? किव्वा डॉकटर ला विचारेल तुमच्या कडे माखिजा हा पेशंट ट्रीटमेंटला येतो का ? मग तिला डॉ च बोलणं पण आठवेल "मी माझं आणि पेशंटच बोलणं रेकॉर्डिंग करून ठेवतो " . एकदा का किक त्याच डॉ कडे ट्रीटमेंट घेत आहे हे कन्फर्म झालं कि डॉ ने जे जे रेकॉर्डिंग करून ठेवलंय ते ती तपासेल ले त्यात किक आणि डॉ च जे जे बोलणं झालंय / किक ने डॉ कडे काय काय कबुल केलय ते सगळं बोलणं ती तिच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून ठेवेल
दुसऱ्या बाजूने जगताप ला हि भेटेल म्हणजे सरपोतदार आणि परदेशी बद्दल कळेल. आणि नवऱ्याच्या रेकॉर्डिंग मधून समन्वय चेतनातल्या इन्व्हॉव्ह झालेल्या लोकांचे डिटेल्स कळतील म्हणजे झाली कि तिची केस सॉल्व्ह . मग काय ती कोर्टात पुरावे देऊ शकते. ती पण पकडली जाईलच पण या मोठ्या रॅकेटचे सगळे धंदे तिने उघडकीस आणले म्हणून तिची शिक्षा कमी होऊ शकते किव्वा तीच स्वतःवर गोळी झाडून घेईल. हे आपले सगळे अंदाज
सुहास गुप्त एजंट असेल कदाचित
सुहास गुप्त एजंट असेल कदाचित ज्याची तिला मदत च होईल.
त्या मुलींना वाईट धंद्याला लावणे ह्याशिवाय अजून काही असावं, लहान मुलांना involve करून ड्रग ट्रॅफिकिंग वगैरे.
Pages