रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

येत्या 10 दिवसात 2000 पोस्टी पडणार का >> २००० नाहीच पडणार नक्की . पण बऱ्याच पोस्टी पडतील हे नक्की .
पहिल्याची लिमिट संपलेली आहे म्हणून दुसरा धागा.बघूया किती पडतात ते Wink Happy

पहिल्याची लिमिट संपलेली आहे म्हणून दुसरा धागा.बघूया किती पडतात ते Wink Happy >>>> हो हो, मला म्हणायचं होतं मालिका इतकी उत्कंठावर्धक होईल का \ इतके धक्के बसतील का की २००० पोस्टी पडतील Happy , फोनवरून लिहित होते म्हणून एकच वाक्य लिहिलं Happy

तीन महिन्यातच मालिकेचा दुसरा धागा काढावा लागतोय यातच मालिकेचं यश दडलेल आहे. नाहीतर बरेच वेळा एक एक वर्ष जातंय दुसरा धागा निघायला Wink Happy

शेवटी ट्विस्ट, अनपेक्षित तर हवाच. नाहीतर एवढ्या सटासट् खुन पडऩ्याला, तिचं गृहिणी ते गुन्हेगार ह्या transformation ला काही अर्थ नाही.

तीन महिन्यातच मालिकेचा दुसरा धागा काढावा लागतोय यातच मालिकेचं यश दडलेल आहे. नाहीतर बरेच वेळा एक एक वर्ष जातंय दुसरा धागा निघायला Wink Happy >> सुजा मालिका 'आदरवाईज' मनोरंजक असली तरी भराभर धागे भरतात की गं. उदा. होसुमियाघ.

@दक्षे मालिकांचे धागे भरपूर निघाले. भराभर भरले पण. "होणार सून मी"चे तर टोटल ४ धागे काढले आपण . पण एक वर्षांनी /१० महिन्यांनी किंवा सव्वा वर्षांनी असे . रुद्रम चा मात्र तीन महिन्यातच दुसरा म्हणून मी तस म्हटलं . त्यातून होणार सून जवळ जवळ अडीच वर्ष म्हणजे ३० महिने चालली. म्हणजे सरासरी ७ महिन्यांनी एक एक धागा . मायबोलीवर जर मालिकांचा टीआरपी कॅलक्युलेशन करून काढला तर हि मालिका नंबर वन वर असेल कदाचित . असो . आता बघायची आहे मला २५ मिनिटात Wink Happy

रागिणी सामान्य लोकांसारखे कपडे रिपीट करते, चप्पल रोज एकच वापरते ते चांगले वाटते बघायला.. तो तिचा पिच कलर चा लाँग टॉप त्यावर काळा स्कार्फ बाजारात येईल बहुतेक रागिणी फेम कुर्ता Proud

कि क परदेशीला कसलं घाण वागवतोय... तो पण एक हिरो ताटली घेऊन आला लगेच खायला... काय ते भयंकर कुत्सित हास्य... ते मांजरी डोळे.... लय बेक्कार.

काय ते भयंकर कुत्सित हास्य... ते मांजरी डोळे.... लय बेक्कार.>> डावाचा तिने त्याच्याच अड्ड्यावर जावून गेम केला ते ऐकून त्याचे एक्स्प्रेशन्स बघण्यासारखे होते..त्याचा चेहरा तो कधिही बेरकी वाटावा असाच आहे.

तीन महिन्यातच मालिकेचा दुसरा धागा काढावा लागतोय यातच मालिकेचं यश दडलेल आहे. नाहीतर बरेच वेळा एक एक वर्ष जातंय दुसरा धागा निघायला - अगदी खरं, मुक्ता बर्वे भेटली पाहिजे एकदा, धन्यवाद द्यायचेत तिला आणि टीम ला एवढ्या सुंदर मालिकेसाठी.
Btw किक अजून तिच्या मागे लागलाय, नक्की काय हवंय त्याला, खरोखरच आवडली की काय त्याला????

आवडली नाहीये, आता एक अजून सिक्रेट त्याच्यासमोर उघड केलं तिने Sad

सर्व बातम्या आपसूकच मिळतात त्याला.

आता एक अजून सिक्रेट त्याच्यासमोर उघड केलं तिने ... हो ना!
आवडली नसेल च खरं तर, पण त्याचे एकंदर हावभाव पाहून तो चांगलाच निराश झालेला दिसला, आडाखे चुकले म्हणूनही असेल कदाचित.
Anywayउद्या flash drive चं सत्य तरी कळेल, शेवटच्या आठवड्यात बरेच धक्के बसणार असं दिसतंय!

आवडली नाहीये, आता एक अजून सिक्रेट त्याच्यासमोर उघड केलं तिने >>> काय केलं आता अजून... बावळटपणाचा कहरंच करतेय ही बाई. ते पार्लरवरच्या छाप्यावेळीही शोभा माकनचे नाव पण त्याला सांगते. त्या कि क ला अशी किती जवळून ओळखते ही सगळं सांगायला.. का सर पे कफन बांधलेल्या या बयेला लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट झालंय.. Angry

आपला आजार, ट्रीटमेंट सर्व सांगितलं आणि सिक्रेट सांगत नाही, काही जणांचं बघायचं आहेना, पण आपण नको भेटायला एकमेकांना असं म्हणाली कि क ला. पण नको ती गोष्ट सांगितल्याने ते मिशन अडचणीत आहे.

आज रागिणीला सातवच्या बायकोशी बोलताना बघून अख्खा आठवडा फ्लॅशबॅक आणि confessions मध्ये घालवतायत की काय असं वाटलं..

आज रागिणीला सातवच्या बायकोशी बोलताना बघून अख्खा आठवडा फ्लॅशबॅक आणि confessions मध्ये घालवतायत की काय असं वाटलं..>>> होना! आजचा एपिसोड एक्दम स्लो, रागिणी मधेच घाइ का करते ते कळल तिच्या डिप्रेशन आणी मानसिक आजाराने ती हायपर होत असणार.. तरी तिच्याकडे फ्लॅश ड्राइव्ह आहे आणि तो ओपन होत नाहिये हे माखिजाला कळलच
माखिजाला रागिणी ज्या कुठल्या कारणानी आवडत असेल पण तिला बघतल की त्याच्या डोळ्यात चमक येते हे किक ने छान दाखवलय

पासवर्ड क्रॅक झालेला आहे. आता रागिणीला सगळी मुलींबद्दल माहिती कळेल. समन्वय चेतना मधल कोण कोण आहे या केस मध्ये ते सगळं समजेल . समन्वय चेतना मधल्या त्या व्यक्तीकडून सरपोतदार आणि किक च नाव पण समजेल.

किक ला खर तर तिच्या कडून माहिती काढून घ्यायची होती तिला बोलण्यात गुंतवून ( कि तिचा सध्या काय चाललंय ) का तिला न्यूज चॅनल मध्ये मोठ्या पदाची ऑफर करायची होती का प्रपोज करायचं होत . नक्की त्याला काय सांगायचं होत ते मात्र प्रेक्षकांना समजलंच नाही . पण रागिणी समजत होती आणि तसच प्रेक्षकही समजत असतील तर रागिणी कडून नकार दिला गेला आहेच . पासवर्ड क्रॅक होत नसल्याने रागिणीचा या केस मधला इंटरेस्ट च संपून गेला होता म्हणून ती अभय सातव च्या बायकोला सगळं सांगायचं निर्णय घेते सांगते आणि इकडे पासवर्ड क्रॅक होतो.
आता परत रागिणीची धडपड Happy

ती मोरेचे ऐकूनही घेत नाही अजिबातच.>> अगदी अगदी ! इतकी चिड्चिड झाली , ३-४ वेळा एखादी व्यक्ती उगाच फोन करेल का? कुठलीही गोष्ट शान्तपणे एकुन जरा विचार करुन पुढे जातच नाही ही, कळली माहिती की निघाली मोहिमेवर ..

कशावरून कि क तिला प्रपोज करणार हे नक्की असं तिला वाटलं. त्याचं बोलणं ती ऐकूनच घेत नाही, मागे हाॅटेलमध्येही तिने असंच केलं होतं. करतोय तर करू देना प्रपोज, नाही तर ती अशीही म्हणणारच आहे. मुळात सदाचा खून का झाला याची तिला काही पडलेलीच नाहीये. ते शोधायचंं सोडून नको ती माहीती नको त्या लोकांन्ना पुरवत फिरतेय. कि क असाही बेरकीच वाटतो, राला तो साधा सरळ कसा वाटतो काय माहित, म्हणजेे एवढे ट्रेनिंग तिने घेतले त्यानंतर तिने कोणावरच विश्वास ठेवायला नको, सातवच्या बायकोवरही. डावाची माणसं म्हणाली त्या बाईला जिवंत जाळायला पाहिजे, भयंकर. मला वाटलेलं आता डावाची गादी कोण चालवणार यावरून त्यांच्यात भांडणं होतील, त्यांना कशाला घ्यायचाय बदला, डावा काय सरळ माणूस थोडीच होता. सगळे पैसे दिले की काय तिने अनुराधाला, ती घेणार नाही पण तरी.

चांगला वेग आलाय, धुरतचा खुन, रा ची सातवच्या बायकोला कबुली, डावा चा खुन वगैरे वेगळे टर्न होते , अपेक्षित नव्हते म्हणुन मजा येत आहे पाह्यला.

ते शोधायचंं सोडून नको ती माहीती नको त्या लोकांन्ना पुरवत फिरतेय. >> नाही हो. कि क बद्दल आपल्याला जे माहितीये त्यातलं काहीच रा ला माहित नाहीये हे लक्षात घ्या. तिच्यासाथी तो तिचा बॉस आहे, जो अंधांसाठी वगैरे कनवाळू आहे. तेव्हा ती त्याच्या बरोबर जे वागतेयतत्यात मला तरी गैर वाटत नाही.

, ३-४ वेळा एखादी व्यक्ती उगाच फोन करेल का? कुठलीही गोष्ट शान्तपणे एकुन जरा विचार करुन पुढे जातच नाही ही, कळली माहिती की निघाली मोहिमेवर .. >> असहमत. कुठलीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसताना ३ निर्घॄण खून केल्याचं ओझं बाळगते आहे रा. केवढी स्ट्रेस्ड असेल याची कल्पना देखील करवत नाही.

ती कुणाचचं एकून घेत नाही..जे तिच्या डोकयात विचार चालु अस्तील त्या शिवाय दुसरं त्यावेळी तिला काहीही सुचत नाही..
आशिष च पण नव्ह्ती एकत्, माखिजा काय सांगतोय, हवालदार वारंवार का फोन करतोय हे ती एकून घेत नाही. हा तिचा स्व्भाव दाखवलाय..!

Pages