पतंग

Submitted by सुर्वेप्रतीक on 30 October, 2017 - 05:29

162199.gif
पतंग आकाशात किती मस्त मजेत उडतात. कधी जवळ येतात तर कधी लांब जातात. पण जेव्हा दोन पतंग हवेत जास्त वेळ उडतात तेव्हा एक नेहमी कट होऊन खाली पडते .कारण त्यांची दोर कुना दुसऱ्याच्याच हातात असते .
एक पल्लवी नावाची मुलगी होती .साधी सरळ थोडी खट्याळ .पण स्वभावाने गोड होती . तिचा कॉलेज मध्ये एक ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये मनोहर नावाचा नवीन मुलगा आला..स्वभावाने शांत . त्याला कविता करायला खूप आवडायच्या. कॉलेज मध्ये एका स्पर्धेत त्यांनी आपली कविता सादर केली आणि तो जिंकला सुद्धा..तिला सुद्धा त्याच्या कविता आवडायला लागल्या ..ती सुद्धा नवीन नवीन कविता वाचायला लागली..त्याच्या कविता ऐकू लागली ..ग्रुप मध्ये तो नवीन नवीन कविता करू लागला..अशा प्रकारे तिची आणि त्याची खूप छान मैत्री झाली
कॉलेज संपल्या नंतर ती त्याला कॉल किंवा sms करू लागली ..जर तिने त्याला एक दिवस तरी कॉल व sms केला नाही तर तिला खप अस्वस्थ वाटे. त्याच्या कविता ऐकण्या साठी नेहमी आतुर असायची . कधी त्याच्याशी बोलतेय ..असं तिला व्हायचं .त्याच्या सुद्धा मनात असाच व्हायचं .ग्रुप मध्ये नेहमी दोघे एकमेकांशीच बोलायचे. सगळे नुसते बघत बसायचे .म्हणायचे चांगले जमतंय दोघांचं ..असा बोलून त्याना चिडवायचे.दिवसेन दिवस त्या दोघांचं बोलणं वाढू लागल. ते दोघे एकटे असले कि एक मेकांच्या विचारात गुंतायचे.कॉलेज मध्ये त्यांना सगळे लव्ह बर्डस म्हणून चिडवू लागले ..कितीही दुर्लक्ष केलं तरी ते अधिकच एकमेकांन मध्ये गुंतत जात होते .ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहे हे त्यांना काळलच नाही .
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
हळू हळू दोघं बाहेर फिरू लागले .एकमेकांन बरोबर वेळ घालवू लागेल .दोघे एकमेकांचे स्वभाव ओळखू लागले .ती खूप खट्याळ होती त्याला खूप चिडवायची .ते दोघे एकत्र असले कि हीच जास्त बोलायची .तो नेहमी शांत असायचा जे काही बोलायचा ते कविता मधून बोलायचा ..हळू हळू दोघे सुद्धा समजू लागले कि आपण एकमेकांसाठी बनलो आहोत..पण हे एकमेकांना सांगणार कस..शेवटी तिनेच पुढाकार घेतला. ती ने सुद्धा त्याला propose त्याचाच भाषेत केला .ती ने त्याला एका coffe shop मध्ये बोलावले..बोलता बोलता ती ने सहजच त्याला एक कविता त्याला म्हणून दाखवली
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तो चक्क तिच्याकडे बघतच बसला. ती सरळ त्याला I LOve U बोली .पण हा काहीच बोला नाही ..शेवटी तीच त्याला बोली कि अरे मी काही तरी बोलीय तुला .मला तुझं उत्तर हवे आहे ..तो बोला उत्तर द्यायलाच हवं का ..ती बोली हो .आपल्याला खूप उशीर झाला आहे आपण निघूया आता..असं बोलून तिला टाळलं. तेवढ्यात त्याच्या mobile वर एक call आला..तो न घेताच तो तिथून उठला .जाताना तिला बोला ..आपण भेटू उद्या कॉलेज मध्ये.आपण बोलू उद्या ह्या विषयावर . एवढं बोलून तो coffe shop मधून बाहेर पडला . ती त्याच्याकडे फक्त बघतच बसली.नंतर त्याला call केला sms केला . पण त्याने काही रिप्लाय दिला नाही..घरी जाऊन ती स्वतःलाच मनाली ..काय असेल नक्की ह्याच्या मनात ..हा आज असा का वागला..phone आल्यावर लगेच निघून का गेला...मी त्याला अडवायला पाहिजे होते का...पण मला जबरदस्ती करून त्याच प्रेम नको आहे..आता फक्त ती फक्त उद्याची वाट बघत होती.

पुढचा भाग २

162199.gif

नमस्कार .हि कथा काल्पनिक आहे ...जस मला सुचल तस मी लिहीत गेलो .काही चूक झाली असेल तर क्षमा करा . जर तुम्हला भाग १ आवडला तर मला कळवा ..मी पुढचा भाग लवकरच लिहिलं ..धन्यवाद .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! लिहित आहात ही चांगली गोष्ट आहे. फक्त काही टायपो आणि शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्याकडे जरा लक्ष द्यावं. उदा. बोला- बोलला, बोली- बोलली.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
शुभेच्छा!

धन्यवाद राहुल ..पहिल्यांदाच लिहीत आहे ...चुका सांगितल्याबद्दल आभार .पुढच्यावेळी चूक होणार नाही . प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद .