"पहिल्या प्रेमाची कबुली"
तो फोनवर बोलत बोलत पूर्ण हॉल मध्ये फिरत होता.
"भीती वाटतेय,तुला काय वाटतं,मी जे करतोय ते बरोबर आहे ना?"
"हो,आणि सर्व काही होणार ठीक.पण ती आहे कुठे?"
"येतच असेल आता."
तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली.
"ती आली, मी तुला नंतर करतो कॉल ,
बाय,काळजी घे."
एवढ बोलून त्याने कॉल ठेवला आणि दरवाजा उघडला.
"काय रे,इतका वेळ लागतो का दरवाजा उघडायला?
आणि तुला कॉल करत होती तर ,
तू कोणासोबत तरी बोलण्यात गुंग.
कोणासोबत बोलत होता एवढा?"
हातातल्या पिशव्या सांभाळत हसतच ती बोलली.
"अग,मेघा सोबत बोलत होतो,
तू आत तर ये.दे त्या पिशव्या इथे."
तिच्या हातातील पिशव्या घेत तो बोलला.
"अच्छा,मेघासोबत बोलत होता."
"हा,हे घे पाणी."
"हम,अरे
मी ना मस्त घड्याळ घेतलय तुझ्यासाठी.त्या पिशवीत आहे.
थांब मीच काढून दाखवते."
पाण्याचा ग्लास टेबल वर ठेवून सोफ्यावरून उठत ती बोलली.
"वेदिका,एक मिनिट बस इथे..
मला काहीतरी महत्त्वाच बोलायचं आहे."
तो तिला पुन्हा सोफ्यावर बसवत बोलला.
"मानव,सर्व ठिक आहे ना?
आल्यापासून बघतेय तू जरा टेंशन मध्ये दिसतोय.
मेघा सोबत भांडला की काय??
तू पण ना.."
"अग,भांडण वगैरे काही झाल नाही.
तू तिला मध्ये आणू नको.
मला आपल्या बद्दल बोलायच आहे..
म्हणजे विचारायचं आहे."
"नक्की ठरव,बोलायच आहे की विचारायच आहे?"
"तू बस इथेच,मी आलो."
एवढ बोलून तो बेडरूम मध्ये गेला.
आणि दोन मिनिटांतच हातात मागे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत करत वेदिकाच्या जवळ आला.
"काय लपवतोय?
आणि काय महत्त्वाच बोलायच आहे, बोल."
"वेदिका,
आय लव्ह यू..
आयुष्यभर साथ देशील का?"
"मानव,काय बोलतोय तू?
पागल तर झाला नाही ना?
अरे मेघाला समजलं तर तिला काय वाटेल?"
"तू तिचा विचार नको करू..
सांग ..आयुष्यभर सोबत राहणार का?"
मागे लपवलेली रिंग
तिच्यासमोर धरत त्याने विचारलं.
"मानव,अरे काय चालू आहे हे..
मेघाला समजल तर ती काय विचार करेल."
"तिनेच रिंग निवडायला मदत केली.
नाहीतर शॉपिंग करताना मी तर कनफ्यूज झालेलो.
तिला कॉल केला होता गेल्या आठवड्यात मग तिला फोटो पाठवले आणि तिने देखील वेळ काढून मदत केली."
"तुला नाही वाटतं तू प्रपोज करायला जरा उशीर केला."
"हा,जास्त नाही,
फक्त तीस वर्ष वाट बघायला लावली तुला हा क्षण दाखवण्यासाठी."
"साहेबा, तीस वर्षाआधीच आपल्या डोक्यावर अक्षता पडल्या होत्या.
विसरलात का?"
"लक्षात आहे,तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात आहे ग.
कॉलेजमध्ये फक्त अभ्यास एके अभ्यास केला, करियर घडवण्याच्या मागे होतो.तेव्हा कोणाच्या प्रेमात पडलोच नाही.
आपल लग्न आपल्या आईवडिलांनी ठरवलं ,
त्यामुळे तेव्हा प्रपोज करायचा प्रश्नच नव्हता.मेघाच्या जन्मानंतर आपण दोघ पण तिचा सांभाळ करण्यात लागलो. मेघाच्या जन्मानंतर तू जॉब सोडला.
मी ऑफिस मध्ये तर ,तू घरी
दोघे पण कर्तव्य पूर्ण करण्याच्या मागे.
आता मेघा तिच्या नवर्यासोबत तिथे खूष आहे आणि आपण इथे.
कसलीच कमतरता नाही.
आणि तू,आता या वयात पण तुझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला जाते."
"राहूदे हा,तुला पण या वयात हे प्रपोजच खूळ सुचलं.
मी तर तेव्हाच तुझ्या प्रेमात पडली जेव्हा तू लग्नानंतर सुध्दा मला शिकण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यावेळी पण तुला एकेरी नावानेच आवाज द्यायचा अधिकार दिला.
या प्रपोजलची गरज नव्हती रे.
काहीवेळा प्रेम अस शब्दात व्यक्त करण गरजेचे नसतं,
पण एक बोलू..
आय लव्ह यू टू..
काळजी नको करू तू , आयुष्यभर सोबत राहिन आणि असच शॉपिंग करत करत तुझा खिसा कापेन."
ती हसत बोलली.
त्याने अलगदच रिंग तिच्या बोटात घातली.ती त्याच्या मिठीत विसावली.
आज त्याला त्याच्या पहिल्या वहिल्या प्रपोजच उत्तर मिळालं होतं.तिने आणि त्याने दोघांनी लग्नाच्या इतक्या वर्षानंतर का होईना पण त्यांच्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली होती.
लेखिका-कविता नाईक
व्वा कऊ, शॉर्ट पण क्लास!
व्वा कऊ, शॉर्ट पण क्लास!
आवडली...
Short but sweet..
Short but sweet..
धन्यवाद राहुल आणि sneha1
धन्यवाद राहुल आणि sneha1
Waah... खूप ओघवता फ्लो...
Waah... खूप ओघवता फ्लो... जियो...
Cute वाटली कथा..
Cute वाटली कथा..
छान!.
पू. ले. शु.
धन्यवाद च्रप्स आणि दिपक
धन्यवाद च्रप्स आणि दिपक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानम आवडली
छानम आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आवडली.
मस्तच आवडली.
छान लिहिली आहे
छान लिहिली आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋ,पाफा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋ,पाफा आणि राजसीजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे की.
छान आहे की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा !!!!! छान....
अरे वा !!!!! छान....
मस्त
मस्त
वा कऊ मस्त पु.ले.शु.
वा कऊ मस्त
पु.ले.शु.
खूप खूप Cute :))
खूप खूप Cute :))
धन्यवाद निरूजी,samarthi,VB दी
धन्यवाद निरूजी,samarthi,VB दी,dabbu ji![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह मस्त लिहलय पु.ले.शु
वाह मस्त लिहलय पु.ले.शु
धन्यवाद अक्षय
धन्यवाद अक्षय
छान. Short n sweet
छान. Short n sweet![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
धन्यवाद
छान लिहिले आहे शुभेच्छा
छान लिहिले आहे
शुभेच्छा
धन्यवाद
धन्यवाद
मस्त!
मस्त!
संशोधक बर्याच दिवसांनी???
संशोधक बर्याच दिवसांनी???
धन्यवाद
मस्तच
मस्तच
धन्यवाद
धन्यवाद
छोटीशी आणि गोड़ आहे...
छोटीशी आणि गोड़ आहे...
तू कथेला कुठला काळ द्यायच ठरवलं आहेस का? कारण, जर हि कथा आजच्या तारखेला घडत असेल तर, आई-वडिलांची नावं, मानव आणि वेदिका नककीच नसतील. कारण, जर त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे, तर आई-वडिलांचं वय कमीत-कमी पन्नाशीच्या आस-पास असायला हरकत नाही... आई-वडिलांची नावं, सुनील, वीणा, वृंदा किंवा सुहास पैकी किंवा तत्सम असती तर अजून संयुक्तिक ठरल असत... अर्थात, हे फक्त माझं मत आहे, कुठीलीही टीका नाही.
बाकी कथेची सहज मांडणी व ओघ मस्तच! Happy writing !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू कथेला कुठला काळ द्यायच
तू कथेला कुठला काळ द्यायच ठरवलं आहेस का? कारण, जर हि कथा आजच्या तारखेला घडत असेल तर, आई-वडिलांची नावं, मानव आणि वेदिका नककीच नसतील. कारण, जर त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे, तर आई-वडिलांचं वय कमीत-कमी पन्नाशीच्या आस-पास असायला हरकत नाही..>>>
ओके..
हा विचार मी केला नव्हता.
धन्यवाद
छान लिहिली आहे कथा
छान लिहिली आहे कथा
Soo cute. Uumma
Soo cute. Uumma
Pages