दिवाळी अंक २०१७

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 16 October, 2017 - 05:40

हा धागा यावर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आहे.

कुठले दिवाळी अंक आपण वाचले, त्यातील कुठलं साहित्य वाचलं, काय आवडलं, काय नाही आवडलं इत्यादी समग्र गोष्टींबाबत आपली मतं इथे मांडता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळी अंक खरेदी अजून केली नाही. त्यामुळे
त्यातील साहित्याबद्दल तूर्तास no comments.
एक जनरल निरीक्षण :

बऱ्याच अंकांच्या किमती यावेळी वाढलेल्या आहेत. (कदाचित GST मुळे किमती वाढल्या असाव्यात.)

युनिक फिचर्सचे अंक, सामना, जत्रा, माहेर वगैरे अंकांच्या किमती रिझनेबल आहेत.

तारकाचा अंक हातात आलाय. परिसंवाद चांगले आहेत. कथा पण छान आहेत.
बाकी अंक मिळतील तसे लिहीनच.

bookganga

तिथे पाहिले पण रुपयांमधे किमती दिसत आहेत. मला न्यू जर्सी मधे मागवायचे आहेत. मायबोलीवरून मागवले होते २-३ वर्षापुर्वी ती सोय आहे का आता?

धनंजय बराच वाचला. चांगल्या कथा आहेत. काळा मंबा ही १९४७ साली मौज मध्ये छापून आलेली भयकथा धनंजय मध्ये आहे. उत्तम भयगुढ कथा.
बाकी भयगुढ कथा ठीक आहेत.

स्पंदनांवर पडली धाड ही शिरीष नाडकर्णींची, बीरबलची डीचखी ही रविंद्र भयवाल यांची अन पॉइंग ही निलेश मालवणकर यांची ह्या तीन विज्ञानकथा आवडल्या.

बाकी कथाप्रकार वाचत आहे.

सायली राजाध्यक्ष यांचा डि जिटल दिवाळी अंक चांगला आहे. मुंबई वरचा भाग उत्तम आहे. भारतातून अमेरिकेत गेलेल्या लेखकांचे लेख अ‍ॅव्हरेज आहेत. नवे काही नाही. पण वाचायला मजा येते. रशिया वरचा लेख चांगला आहे. एक बाई कोणत्या तरी रँडम माणसाबरोबर युरोप फिरायला जातात केवळ सोबत हवी म्हणून. हे मला फार डेअरिंग वाटले.

तिथे पाहिले पण रुपयांमधे किमती दिसत आहेत. मला न्यू जर्सी मधे मागवायचे आहेत. मायबोलीवरून मागवले होते २-३ वर्षापुर्वी ती सोय आहे का आता?>>हो बाहेरचे माहिती नाही. मी भावाला कुरियर केलेत (तुम्ही त्याच्याकडून वाचायला घ्या जवळपास रहात असल्यास... Wink )

माझी खरेदी

माहेर
धनंजय
मेनका
महाराष्ट्र टाईम्स
मौज
हंस
नवल (सगळ्यात महाग चारशे रुपये)
कथाश्री
झी उत्सव नात्यांचा
श्री व सौ
साप्ताहिक सकाळ
उत्तम अनुवाद
कालनिर्णय
ग्रहसंकेत
शतायुषी

विनय,
ह्यावेळचा धनंजय चांगला आहे का? मागच्या दोनेक वर्षापासुन धनंजय काही खास वाटत नाहेये मला पुर्वीसारखा.

अजून मुमंग्रंसंत जाणे झालेले नाही.
चार दिवाळी अंक विकत घेतलेत.
आमच्या गावचा 'मुक्त शब्द' (किंमत २८० रु). यातला विशेष विभाग : भारतीय लोकशाहीची स्थित्यंतरे . नेहरू, इंदिरा, जनता, राजीव, नरसिंह राव, अटल, मनमोहन या पर्वांविषयी प्रकाश बाळ, कुमार केतकर, अरुणा पेंडसे, किशोर बेडकिहाळ, शैलेंद्र खरात इत्यादींनी लिहिलंय. केतकरांनी जनता पर्वाविषयी लिहिलंय. प्रकाश बाळ यांच्या लेखाचं शीर्षक आहे `इंदिराजींमुळेच मोदी पंतप्रधान!'
इतर लेखांत - मुंबई बहुरंगी, बहुढंगी की घेट्टोवादी - संध्या नरे पवार; मुंबई लोकलमधल्या स्त्रियांच्या डब्यातली वाचनसंस्कृती (शुभांगी थोरात), परीकथेतील राजकुमार्‍या (जीनत खान), लोकहितवादींचे संस्मरण (ज शं आपटे), (गांधींचे) हिंद स्वराज आणि आधुनिकता (विश्राम गुप्ते), डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित नेहरू (हेमंत देसाई)
संरचनावादी सामाजिक मानवशास्त्रातील(म्हणजे काय?) संशोधक क्लॉद लिवाय स्त्रौस यांच्या निबंधाचे संपादक हरिश्चंद्र थोरात यांनी केलेले आस्दिवालची गोष्ट हे भाषांतर प्रथम दृष्टिक्षेपात जडजंबाल वाटले.
अंकात मोजक्या कवींच्या प्रत्येकी ५-६ कविता आहेत.
उजवे पान पूर्ण व्यापणार्‍या जाहिराती एका हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच असाव्यात.
मुखपृष्ठाच्या मागेच शब्द मुंबई लिटरेचर फेस्टिव्हलची जाहिरात आहे. जयपूर फेस्टिव्हलच्या धर्तीवर १० दिवसांचा हा फेस्ट डिसेंबरमध्ये होणार आहे.

अक्षर (किंमत २०० रु) मधली विशेष लेखमाला निरनिराळ्या धर्मांत होणार्‍या स्त्रियांची घुसमटीवर आहे.
लेख : तस्लिमा ,रश्दी, हुसेन आणि आधुनिकता : विश्राम गुप्ते ; किशोरी अमोणकरांवर : आरती अंकलीकर; युसुफ शेख यांचा अमेरिकेतील मुस्लिमांवर लेख; शीतल साठे आणि सचिन माळी यांच्यावर - वैशाली रोडे; आपल्या लहानग्यांना खेळासाठी वेठीस धरणार्‍या हानीकारक बापूंवर - पार्थ एम एन ; पतंजली आणि बाबा रामदेव - अर्थविश्लेषक अजय वाळिंबे; गोविंद तळवलकर - हेमंत देसाई; मधुकर तोरडमल - विजय केंकरे ; नवी उमेद या उपक्रमाबद्दल - मेधा कुलकर्णी.

अंकात विजय खाडिलकर, प्रणव सखदेव आणि आसाराम लोमटे यांच्या कथा आणि सतीश तांबे, विवेक गोविलकर यांच्या दीर्घकथा आहेत.

ह्यावेळचा धनंजय चांगला आहे का?
>> हो. यावेळचा धनंजय चांगला वाटला गेल्या दोन वर्षींपेक्षा. चांगल्या कथांचे प्रमाण वाढलेले वाटले.

हसवंति नवलकथा अंक वाचला. दोनतीन कथा सोडल्यास बाकी कथा सामान्य व अवाचनीय आहेत.

माझी दिवाळी अंक खरेदी

* धनंजय (कथा/गूढ कथा)
* जत्रा (विनोदी)
* किशोर (बाल साहित्य)
* पासवर्ड (बाल साहित्य)
* भवताल (निसर्ग) - यंदा देवराई विशेषांक आहे आणि अंकासोबत झाडांच्या बिया आहेत
* मुशाफिरी (भ्रमंती)
* दुर्गाच्या देशातून (इतिहास/ट्रेकिंग) - ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक (वर्ष ५ वे)
* किल्ला (इतिहास/ट्रेकिंग) - यंदा अंकासोबत १२ ग्रॅम वजनाची तांब्यात घडवलेली "शिवराई" ची प्रतिकृती आहे

काही अंक मित्रांकडून वाचनास घेणार आहे

* दुर्ग (इतिहास/ट्रेकिंग)
* बा रायगडवारी - रायगड किल्ल्याशी निगडित विषय

किशोर पूर्ण वाचून झाला. अंक नेहमीप्रमाणे खूपच सुरेख झाला आहे. सत्यजित रे च्या लेखाचा अनुवाद, संदीप खरे, गुरु ठाकूर यांच्या कविता, काही इतर गोष्टी मस्त आहेत. एकुणात अंक वाचनीय आणि संग्रहात असावा असा आहे.

भवताल च्या अंकाचे हे दुसरे वर्ष आहे, गेल्या वर्षी अंक "दगडांच्या देशा" ह्या विषयावर होता आणि सोबत एका विशेष दगडाचे सॅम्पल होते. यंदा देवराई विशेषांक आहे. लेख, माहिती आणि फोटो सुरेख झाले आहे.

इतर अंकाचे वाचन सुरु आहे Happy

आवाज नुकताच हातात घेतला. कथाचित्रे, आतील अन बाहेरील चित्रखिडक्या भन्नाट आहेत. ( Artistic point of view )
पण त्यात शृंगारिकता पुरेपूर डोकावत आहे . जोडीला चावट व्यंगचित्रे अन विनोद.

कथा कशा वाटल्या वाचल्यावर टाकतो.

डिजिटल दिवाळी ऑनलाइन अंकात एका बाईंनी ग्रीसचे प्रवास वर्णन लिहीले आहे ते इतक्या स्वप्नाळू व जड शब्दप्रचुर भा षेत लिहीले आहे की आपण नक्की काय वाच्तो आहोत हे कळत नाही. साधे प्र्वास वर्णन लिही ना बहिण.
असे म्हणावॅ वाटते. गौरी देशपांडे ंच्या मुक्कामचा काही भाग विदाउट लव्ह स्टोरी वाचतो आहे असे वाट्ते.

:))

Pages