काॅलसेंटर (भयकथा) भाग पहीला..

Submitted by अजय चव्हाण on 16 October, 2017 - 00:23

सर्रर्सर..र्सररऽऽऽऽ कुणीतरी मला दुर घनदाट जंगलात फरफरट नेतय...माझ्या विवस्त्र शरीरावर कसलातरी लाल रंग फासलाय..मी ओरडतोय.. किंचाळतोय पण तो जो कुणी आहे त्याला मात्र ह्या सार्याच काहीच वाटत नसावं उलट ते माझ्या प्रत्येक किंचाळीबरोबर जोरजोरात विशिप्तपणे हसत होत आणि त्याच हेच हसण भयान शांततेला चिरत सार्या जंगलात कंप निर्माण करत होतं...एकाकी ते भलंमोठ धूड एका विशिष्ट जागी थांबलं माझ्या कपाळावर कसलीतरी भुट्टी लावत काहीतरी पुटपुटत होतं.."इदरासा कालदिंद्रये ममधुपट बली अर्पण मुक्तचलोपन चामुंडेही ...चांमुडेही...चांमुडेहीऽऽऽऽऽ" त्याचे ते शब्द मला एखाद्या लावारसारखे तप्त भासत होते..
त्याच्या प्रत्येक श्वासातली उर्जा मला जाणवत होती काहीतरी विपरीत घडतय हे मला कळत होत इतक्यातच त्या धुडाने मला काही कळायच्या आतच लाल पिवळ्या पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवलं माझी मान तो जोरात पकडून बुडवतोय..बुडबुड...बुडबुड.. मला आत सारं तपकिरी धुसर दिसत होतं..डोळ्याच्या बाहुलीत मला जळजळ जाणवत होती...श्वास गुदमरून त्याची गती हळूहळू मंदावत चालली होती...माझे हातपाय मी सार्या ताकदीने झटकू पाहतोय..

इतक्यातच आऽऽई गऽऽऽ असं ओरडून अंथरूणातून मी उठून बसलो..काय भयंकर स्वप्न होतं..कपाळावर आलेला घाम पुसत मी जवळच असलेल्या बाॅटलमधले घटाघट पाणी प्यायलो..
नेमका त्याचवेळी ट्रींर्ग.. ट्रीर्ग..ट्रींर्ग ट्रींर्ग माझ्या मोबाईलमधला अलार्म वाजला.... कसला दचकलो मी त्या धक्क्याने हातातली पाण्याची बाॅटलही टडटडाट करत जमिनीवर पडून घरंगळत गेली..मी रागाने मोबाईल स्क्रीनवर जोराची बोट आपटत अलार्म बंद केला..घड्याळात रात्रीचे नऊ वाजले होते.. ऑफिसला जाण्याची वेळ होत आली होती..
भराभर आवरून फ्रेश होऊन निघालोच मी..

तसं मी काही खुप मोठ्या कंपनीत कामाला होतो अशातला काही भाग नव्हता मी एका छोट्याशा काॅलसेंटरला कामाला होतो आणि माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता..मी एका खेड्यातुन ह्या शहरात कामाला आलो होतो..आणि ह्या कंपनीकडूनच राहण्याची सोयही होती म्म्हणुनच हे काॅल सेंटर मी जाॅईन केलं होतं.. मी आणि चिन्मय (माझा सिनियर आणि रूममेट)आम्ही तिथे रूम शेयर करून राहत होतो. गेल्या सहा महिन्यापासून माझी नाईट शिफ्ट सुरू होती खरंतरं मीच ती मागून घेतली होती कारण सकाळच्या वेळात मी पार्ट टाईम दुसरा जाॅब करत होतो..... तसं माझ्या काॅल सेंटरमध्ये खुप प्रोसेस होत्या त्यातल्या त्यात मी एका फडतूस एसी प्राॅडक्ट असलेल्या कंपनीच्या कस्टमर केअरसाठी काम करत होतो..
असो, आमच काॅलसेंटर म्हणजे एक आदर्श व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना होता प्रत्येक प्रोसेससाठी सप्रेट फ्लोर अलोकेट केले गेले होते आणि त्यातल्या त्यात त्याला लाॅक असलेले दरवाजेही लावले गेले होते त्यामुळे फक्त ठराविक अक्सेस असलेल्या आयडीनेच ते ऊघडले जात आणि हे असले आयडी हे प्रत्येक प्रोसेसप्रमाणे तिथल्या कर्मचार्याना दिले होते...

तर अशा ह्या ऑफिसमध्ये एकदाच पोहचलो मी..आमची प्रोसेस खुप लहान असल्याने फार जास्त लोकांची आवश्यकता नव्हतीच मुळी त्यामुळे नाईट शिफ्टमध्ये आम्ही फक्त तिघेच काम करत असू त्यातल्या त्यात एकाची (सुशिलची) आज सुट्टी होती उरलो फक्त मी आणि जाॅन ..मी भराभर लाॅगिन करून काॅल घ्यायला सुरूवात केली काॅल घेता घेता एक तास झाला तरी जाॅन येण्याची काही चिन्हे दिसेना म्हणून मी ब्रेक टाकून त्याला काॅल केला तेव्हा तो येणार नाही असं कळलं...

800 स्केवर फीट असलेल्या फ्लोरवर 5 डझन र्निर्जीव संगणक सोडले तर मी एकटाच सजीव तिथे कार्यरत होतो..आवश्यकता नव्हती म्हणून सार्या लाईटस ऑफ करून मी माझं काम करत होतो..बहुतेक रात्र पौर्णिमेची होती त्यामुळेच की, काय काही फुटांच्याच अंतरावर असलेल्या काचेच्या भिंतीतून चांदण्याचा प्रकाश आत शिरू पाहत होता..दिवस थंडीचे असल्याने तसा काॅलफ्लो खुप कमी होता....एव्हाना रात्रीचे दिड वाजले होते आणि काॅलही येण आता जवळपास बंद झाले होते...
बसल्या बसल्या माझा डोळा लागला..मी तसाच हेडफोन लावून झोपी गेलो..माहीत नाही किती वेळ झाला माझा डोळा लागून पण कानात "इनबाऊंड काॅल" ( काॅल आल्याची लेडी वाॅईस रिंगटोन) वाजली तशी मी दचकून जागा होत भराभर काॅल रिसीव्ह करून ओपनिंग दिली...

" very good evening...Welcome to ××××× services my name is Joseph how may I assist you.."

मी ओपनिंग तर दिली होती पण पलीकडुन कोणताच रिस्पॉन्स येत नव्हता फक्त खरखर ..खरखरर आवाज मात्र ऐकू येत होता...

मी वार्निंग द्यायला सुरूवात केली..

If there is no response from yourside then call will be get disconnected..

If there is no response from yourside then call will be get disconnected.

If there is no response from yourside then call will be get disconnected...

Thank you for calling ×××××× services..
Have a good day ahead..

काॅल मी संपवला आणि काॅल हिस्टरी चेक केली आणि ते बघून मला तर धक्काच बसला..
कारण काॅल हा तेलगू भाषिक होता..
आणि त्याचबरोबर एक मॅसेजही पाॅपअपबरोबर वारंवार येत होता..
माझ्या आयडीवर फक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या लाईन्स कनेक्ट होत्या मग हा तेलगू काॅल आला तरी कसा??

मी पटापट सिस्टम इश्यू टाकून मेन पीसीवरून माझ्या अलोकेटेड सर्विस चेक करू लागलो..पण छे इथे तर सर्व काही आलबेल होतं..कदाचित काहीतरी लाईन इश्यू असेल असं समजून मी पुन्हा आपल्या डेस्कवर जाऊन बसलो...

थोडा वेळ शांततेत गेल्यावर पुन्हा तोच काॅल मी परत ऑपनिंग देऊन रिसीव्ह केला..

ह्यावेळी कुठलीतरी मुलगी तेलगू भाषेत बोलत होती..
तिचा आवाज कुठुनतरी लांबून आणि खोल येत असावा असं वाटत होतं ती काहीतरी बोलली आणि फोन कट झाला...

काय बोलली बरे ती?? मी नोटपॅड उघडून लिहून घेतलं होतं..

Nenu ninnu vadhla
Naku nyayam kavali
Ettiparsisthiti lo naina thisukone unta...

काय असावा याचा अर्थ ह्याचाच मी विचार करत होतो इतक्यातच परत तो काॅल आला..

मी घाबरून पीसी बंद केला तसा माझ्या बाजुलाच असलेल्या पीसीवर पुन्हा तोच काॅल..हळू हळू सर्व बंद असलेल्या पीसीवरून एकामागून एक निळा प्रकाश पडत होता आणि त्यापाठोपाठ तिच काॅल आल्याची लाऊड रिंगटोन..

माझी तर फुल टरकली होती..मी घाबरून पळून जाऊ लागलो ईनफॅक्ट मी पळता पळता डोअरपर्यत पोहचलोही होतो मी गळ्यातलं आयडी काढून फ्लॅश केलं पण छे दरवाजा काही केल्या उघडला जात नव्हता...मी दरवाजा जोरजोरात ठोठवतोय पण बाहेर तो आवाज बहुतेक जात नसावा....
मी आठवेल तितक्या देवांचा धावा करत होतो...

इतक्यातच मला काहीतरी आठवलं तसाच मागे पळत लॅन्डलाईन असलेल्या डेस्कवर गेलो.. तिथून मी रिसेप्शनला असलेल्या सिक्युरिटीना फोन लावला..ट्रींर्गऽऽऽ ट्रीर्गऽऽ दोन बेल वाजल्यानंतर फोन उचलला गेला...मी पटकन काही बोलणार इतक्यातच कुणीतरी जोरजोरात श्वास घेतेय..त्या श्वासोच्छवासचा आवाज माझ्या कानात घुमत होता...आणि अचानच पुन्हा तोच आवाज आणि तेच शब्द माझ्या कानी ऐकू आले..

Nenu...ninnu.. vadhla....
Naku ....nyayam.... kavali...
Ettiparsisthiti.... lo... naina... thisukone unta

मी घाबरून फोन तिथेच टाकून पळत सुटलो..मला जाणवत होतं तेच शब्द तोच श्वासोच्छवासचा आवाज माझा पाठलाग करतोय..
इतक्यातच एक एक करत सर्व पीसीचा स्फोट होऊ लागला एखाद्या बाॅम्बस्फोटांपेक्षा खुप भयंकर आवाज होता तो..
माझ्या घशाला कोरड पडली होती...
कानामागून घर्मबिंदू घरंगळत जात होते...

मी परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो...
आता तर लाईटसही चालू बंद होऊ लागल्या होत्या. .

झपकन एक निळा उजेड सगळीकडे पसरला आणि क्षणात ती आकृती माझ्यासमोर आली
केस मोकळे सोडलेले...
पुर्ण चेहर्यातुन पिवळा पु आणि त्याचबरोबर रक्त वाहत होतं..
तिच्या डोळ्याची बुब्बुळे नव्हती पांढरा असलेला भाग संपूर्ण लालेलाल होता..
माझ्या आयुष्यात पहिंल्यादाच मी इतकं काहीतरी भयानक पाहील होतं...

माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती ..आणि तिथेच मी चक्कर येऊन खाली कोसळलो...

(कथा इतरस्त पुर्वप्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रतिसादाबद्दल धन्यवाद भुत्याभाऊ,शायना,मेघा, रश्मी..

लवकरच पुढचा भाग टाकण्यात येईल..
तुर्तास क्षमा असावी...