https://www.maayboli.com/node/64167 भाग 2
दंगल चित्रपटाच्या निमित्ताने एका ग्रुपवर चर्चा झाली, ‘मुलांना त्यांच्या मर्जी विरुद्ध एखाद्या गोष्टी साठी पुश कराव का ?’ त्यावर माझं म्हणन होत ,”हो, सुरवातीला कराव लागतच, त्यानंतर जर नाहीच लागली आवड तर द्याव सोडून “ यात अनन्याच उदाहरण आलं नी सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या
अनन्या जन्मत:च हायपर ऍक्टिव्ह मुलगी , प्रचंड एनर्जी होती तिच्यात ,ती दमून झोपावी यासाठी काय काय नाही करायचो पण जोवर आई बाप बेशुद्ध पडले याची खात्री व्हायची नाही तोवर ती झोपायची नाही , अगदी आमच्या पापण्या उघडून पण लास्ट ट्राय मारायची ...
शाळेत घातल्यावर वाटल आता दमेल, प्रवास बराच होता तसंच शाळेत फिजिकल ऍक्टिव्हिटी ही बर्याच होत्या पण कसल काय ... शाळा सुरु झाली नाही तोवर शाळेतून रीतसर बोलावणे आले ...
“तुमची मुलगी शाळेत आल्या आल्या सगळ्यात उंच हॉरीझोनटल बार वर चढते नी उलटी लटकते” टीचर घाबरून सांगत होत्या ,”उतरवताना खूप पंचाईत होते “ घरात रोप लॅडर असल्याने अनन्याला सवय होती पण टीचरना अशी वटवाघूळ मुलगी बघायची सवय नव्हती त्याच काय करणार ?
दोन्ही पार्टीना समजवायचं काम केल , कुणी किती समजावून घेतल हे काय बघायला गेलो नाही
पण तिथली दोन वर्ष अनन्याने मजेत उलट लटकूनच घालवली हे निरोप समारंभात टीचर नी आवर्जून सांगितल
अशा उलटा खोपडी मुलीला गुंतवायला स्पोर्ट हवाच न तो ही चांगलाच थकवणारा म्हणून म्हटल कराटेला टाकू नी केल भर्ती पण जिथे पाठवत होते ते ट्रेनिंग सेंटर दुसऱ्या मजल्यावर होत ,शिकवताना दारे खिडक्या बंद ... हे मला पटेना.
खुली हवा ,मैदान मिळायलाच हवं मुलांना असं माझ मत त्यामुळे आठ दिवसातच आम्ही त्याला बाय बाय केलं. त्या दरम्यान एका मैत्रिणीचा फोन आला की तिने तिच्या लेकीला एके ठिकाणी “तायक्वांदो”ला टाकलंय ... हे काय असत नेमक ? कराटे सारखच असत म्हणे ... जाऊ दे ना... बाकीच्या अटी फुलफील होताहेत ना ? मग झालं ... मी ही नेवून अनन्याला भर्ती केलं
मैदानात एक छोटा हॉल होता , कधी आत तर कधी बाहेर यांची प्रॅक्टिस चालायची .... सुरवातीचे काही दिवस आम्ही दोघी मैत्रिणी जाऊन बसायचो तिथे , कशी घेतात प्रॅक्टिस ? वातावरण कस आहे? हे बघायला ... वार्मअप मग मैदानाला राऊंडस त्यानंतर खरी सुरवात.
आठ दिवसात अनन्याचा युनिफॉर्म आला ... पांढरा शुभ्र , मस्त वाटल तिला तो घालून पाठवताना पण तो आनंद काही जास्त टिकला नाही ... आली तेंव्हा त्याचा रंग ब्राऊन होता.
अरे देवा ! आता ह्याला साफ करण्यासाठी स्पेशल हत्यारं घेण आलं, अजून काय काय एक्स्ट्रा येणार होत त्यामागून याची तेंव्हा कल्पनाच नव्हती, असती तर कदाचित इथून पण आम्ही ८ दिवसात पळालो असतो.
व्हाईट बेल्ट ते यलो बेल्ट ट्रांझिशन तस स्मूथ होत... फक्त आठवड्यातून तीन दिवस शाळेतून आल्या आल्या चेंज करून निघायला लागायचं तेंव्हा थोडी रडारड व्हायची ... माझ पोट दुखतय ... मला काही खायला नकोय , मग आज्जीलोक मध्ये पडणार ,’आजचा दिवस नको’... तरी मी न्यायचेच.
‘दुष्ट आई’ हे बिरूद त्या काळातच मला मिळालं ... जरा म्हणून पोरीची दया नाही ...सख्खी आई आहे ना? मग पोरीचा जीव कसा कळत नाही हिला’ हे नी असं बरचस कानावर यायचं ,कुजबुज व्हायची ... विचारायचं असेल तर समोर या ... मागून बोलणाऱ्यांना मी कधीच भिक घातली नाही ...
लेकी समोर ही अवास्तव चॅलेंजेस ठेवली नाहीत. त्या काळात फक्त फिजिकल फिटनेस नी एनर्जीच कन्स्ट्रकटिव्ह वे ने चॅनलायझेशन इतकाच उद्देश होता ... आता ही मोटो तोच आहे पण लेकीचे गोल बदललेत ही गोष्ट वेगळी .
इथवर येईपर्यंत इतक कळल होत ,'तायक्वांदो' हा कोरीयन मार्शल आर्ट फॉर्म आहे...यात हातांचा वापर नगण्य आहे ... फाईटमध्ये किक्सचाच उपयोग केला जातो . किक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत हॅमर, अपतोलो, स्पिन अपतोलो , बॅक किक नी बऱ्याच ...
आमच्या नशिबाने अनन्याला कोच अत्यंत अनुभवी नी खेळाच्या प्रती डेडिकेटेड मिळाले. भास्कर करकेरा, उंच धिप्पाड माणूस पण बोलायला इतका नम्र की त्यांचा मोठेपणा कळायला आम्हाला वेळ लागला. हळूहळू त्यांच्या बद्दल एक एक गोष्टी कळू लागल्या. ते महाराष्ट्रात काय भारतात तायक्वांदो रुजवणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक आहेत, छत्रपती पुरस्कार विजेते आहेत. ह्या क्षेत्रात त्यांना ओळखत नाही असं कुणीच नाही. भास्कर सरांचे शिष्य म्हटल की समोरच्याची नजरच बदलते. त्यांनी कित्येक नॅशनल, इंटर नॅशनल प्लेयर घडवलेत पण सर अजून ही रमतात लहान व्हाईट ,यलो बेल्टमध्ये ...मुलांना शिस्त लावतात, खडतर ट्रेनिंग देतात पण त्यांच्यावर प्रेम ही तितकच करतात. त्यामुळेच मुल जेवढी त्यांना घाबरतात तेवढ प्रेम, आदर ही करतात.
सरांना फीच काही ही पडलेलं नसत मग पालकच स्वत:ची तसच आपल्या सोबतच्याना आठवण करून त्याची फी एकत्र करतात नी सरांना नेवून देतात.
मुलांच्या प्रॅक्टिससाठी गार्डस घ्यायचे म्हणून त्यांनी मिटिंग घेवून पालकांना विनंती केली की ज्यांना शक्य असेल त्यांनी १२ महिन्यांची फी एकत्र भरा व २ दोन महिन्यांच्या फी चा डिस्काऊंट जाहीर केला ,सगळे पालक एकमताने तयार झाले नी डिस्काऊंट ही नाकारला पण सरंच ते ,त्यांनी शब्द म्हणजे शब्द म्हणत डिस्काऊंट घ्यायला लावला. सरांची अकॅडमी म्हणजे कुटुंब आहे. पालक पुढे येवून जमेल तशी मदत करतात मॅच इत्यादी इव्हेंटमध्ये.
हा विश्वास ,आदर सरांनी कमावला आहे त्यांच्या इतक्या वर्षाच्या मेहतीने.त्यांच्या अकॅडमीच वातावरणच वेगळ आहे.सिनिअर्स आपल्या ज्युनिअर्सना शिकवतात प्रॅक्टिस संपली की प्रत्येक ज्युनिअर ,सिनियरला बो करणार (कमरेत झुकून अभिवादन ) ज्युनिअर्स कायम सिनियर्सना सर नाहीतर मॅडम म्हणणार , ही सिनीयारीटी ठरते बेल्ट नुसार त्यामुळे कित्येक मोठी मोठी मुल , छोट्या मुलांना सर नाही तर मॅडम म्हणत असतात.त्यात त्यांना काही वाटत नाही , आपण ऐकणाऱ्यालाच वाटत रहात.
एकदा स्टेट मॅच साठी साताऱ्याला गेलो होतो. अनन्या असेल आठ एक वर्षांची ... संपूर्ण दिवसाच्या दगदगीने अगदी दमून मी हॉलच्या एका कोपऱ्यात मांडी घालून शांत बसले होते, लेक माझ्या मांडीवर झोपली होती. इतक्यात एक कॉलेजमध्ये असेल इतका मोठा मुलगा समोर आला नी म्हणाला ,”मॅडम किकिंगच पॅड मिळत नाही आहे, तुम्ही कुठे ठेवलंय का ?” मी म्हणणार की," बाबा, मला का विचारतोयस ,मी का ठेवणार ?" इतक्यात माझ्या मांडीवरून आवाज आला , “ग्रीन बॅगमध्ये आहे बघ जा , मी आले प्रॅक्टिस घ्यायला “ मी शॉक , माझ्या मांडीवर तुमच्या मॅडम हायत होय ...
अजून एक नियम आहे सरांचा , जो मला खूप जास्त आवडतो. ‘पायात चप्पल असताना, युनिफॉर्मवर बेल्ट बांधायचा नाही’ ... सुरवातीला वाटायचं हा काय नियम ? उगीच काहीही करायला लावतात सर पण हळू हळू ह्या नियमाच महत्व पटायला लागलं, यामुळे मुलांना बाहेर आपल्या बेल्ट चा शो ऑफ करता येत नाही. इतकंच काय , ह्या मुलांनी स्वताच्या ताकदीच फुकट प्रदर्शन कुठे केलं, मारामारीत इनव्होल्व झाली नी सरांना समजलं की लागलीच पोरांची वाट. सरांची मुंबईच्या प्रत्येक शाळेत ओळख असल्याने , शाळेत काही झालं तर सराना फोन येतोच न इतर वेळेसाठी पालक आहेतच ,तेही येवून सरांना सांगून टाकतात. त्यामुळे सरांचे शिष्य अफाट ताकदीचे मालक असले तरी अत्यंत नम्र आहेत. लांबून पहाताना हा खेळ अग्रेशनचा वाटतो पण जर एखाद अग्रेसीव्ह मुल शिकायला आलं की सर आधी त्याच्यातल अग्रेशन संपवतात मग थंड डोक्याने विचार करून कसं खेळायचं, हे शिकवायला सुरवात करतात. त्यामुळेच ही मुल रिंगमध्ये पूर्ण वेगळी असतात नी राऊंड संपल्याची शिट्टी वाजल्या नंतर पूर्ण वेगळी.
फाईट हा एक विलक्षण अनुभव असतो मुलांसाठी नी त्यापेक्षा आम्हा पालकांसाठी
क्रमश:
एक नंबर ! मस्त सुरुवात
एक नंबर !
मस्त सुरुवात
माझाही मुलगा जातो त्यामुळे
माझाही मुलगा जातो त्यामुळे कित्येक ठिकाणी अगदी अगदी झाले.
यलो ते ऑरेंज जाताना परीक्षा देण्यासाठी वार्षिक परीक्षेची तयारी करायला लावलेली
धन्यवाद ! हर्पेन , आशुचॅम्प
धन्यवाद ! हर्पेन , आशुचॅम्प _/\_
मस्त !!!!
मस्त !!!!
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
धन्यवाद !रुन्मेष ,अमितव .
धन्यवाद !रुन्मेष ,अमितव .
वॉव, फारच भारी..... लिखाण, तो
वॉव, फारच भारी..... लिखाण, तो क्रीडाप्रकार, भास्कर सर आणि अनन्याही.....
या शीर्षकाने मात्र माझा फार गोंधळ झाला...
पुढील भागाच्य प्रतिक्षेत
पुढील भागाच्य प्रतिक्षेत
भारीच !!!
भारीच !!!
मस्त लिहिलंय...तुम्ही अगदी
मस्त लिहिलंय...तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला मुलीच्या स्पोर्टबद्दल!
एक उत्सुकता- ती किती वर्षांची होती पहिल्यांदा जॉईन झाली तेव्हा?
धन्यवाद !
धन्यवाद !
अनन्या साधारण साडेपाच 6 वर्षांची होती जॉईन झाली तेंव्हा.
दुसरा भाग टाकला आहे
खूप म्हणजे खूपच आवडला लेख.
खूप म्हणजे खूपच आवडला लेख.