हा धागा मी एका सोशलसाईटवरच प्रकाशित करत असल्याने हा विषय येथील प्रत्येकाशी थेट संबंध राखून आहे असे मानायला हरकत नाही.
कधीतरी काहीतरी लिहिणे आणि त्यावर चर्चा घडणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असेलच. चर्चा म्हटली की मतभेद आलेच. आणि मतभेद म्हटले की त्याचे वाद हे झालेच. अगदी कुठल्याही सोशलसाईटवर हे सहज घडते. नव्हे कित्येक संकेतस्थळे केवळ यावरच तग धरून असतात.
पण ईथे झालेले मतभेद ईथेच ठेवणे आणि लॉग आऊट करताच जादूची कांडी फिरवल्यासारखे मूड चेंज करणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. एक असतो फुकटचा ताप आणि एक असते विकतची डोकेदुखी. बरेचदा आपण ईथून दोन्ही घेऊन जातो.
मुंबईच्या रस्त्यावर मी बघतो दोन लोकांचे साधेसे घाईगर्दीचा धक्का लागण्यामुळे भांडण होते. अरे ला कारे करता वाढत जाते. आजूबाजुला बघे जमा होतात. त्यांच्यासमोर आपली लाज जाऊ नये म्हणून कोणी मागे हटत नाही. मग त्यांच्यातल्याच कोणीतरी मध्यस्थी करून मिटवले तर ठिक, नाहीतर भांडण एकमेकांच्या पोटात सुरा खुपसण्याईतपत टोकाला जाऊ शकते.
बस्स, सोशलसाईटवर नेमके हेच होते. आपल्यात चाललेले वाद चार लोकं वाचत आहेत. ईतकेच नव्हे तर त्या वादाच्या पोस्ट या आंतरजालावर कायमस्वरूपी जतन होणार आहेत. तर आता माघार घेऊ शकत नाही अश्या मानसिकतेतून ईथे वाद पेटतात. आणि मध्ये कोणीतरी येऊन "जाने दो भाईसाब" बोलायची शक्यता कमी असल्याने तसेच चालू राहतात. किंवा तात्पुरते थांबले तरी आतल्या आत धुमसत राहतात.
आणि म्हणूनच सोशलसाईटवर येताना आणि ईथे वावरताना... कोणाशी काहीही आणि कितीही वाद झाले तरी.. एखाद्या दिवशी आपल्या मनासारखे काहीही झाले नाही तरी.. एखाद्या वादात आपली काहीही चूक नसताना मनस्ताप सहन करावा लागला तरीही.. आपले डोके शांत कसे ठेवावे याचे उपाय प्रत्येकाने आपापल्या परीने शोधायलाच हवेत. नव्हे कित्येक जण ते शोधतही असतील. तर अश्याच उपायांना संकलित करायला आणि त्यावर चर्चा करायला हा धागा.
ईथे प्रत्येकाने आपण काय करतो, कसे वागतो, हे आपापल्या परीने लिहावे. प्रत्येकाची आयडीया प्रत्येकालाच जमेल असे नाही. तसेच एकाचा उपाय दुसर्याला लागू होईलच असे नाही. पण तरीही ईथे संकलित झालेल्या उपायांमुळे धाग्याचा फायदा सर्वांनाच होईल. त्यामुळे धागा योग्य दिशेने जाईल हे सर्वांनीच बघावे
मी माझे फंडे लिहितो -
१) ईथे अहंकारलेस वावरावे - सोशलसाईटवर लॉगिन होताना आपला अहंकार बाहेर ठेवूनच प्रवेश करावा. प्रत्यक्ष जगात तुम्ही कितीही मोठे तीसमारखान असलात तरी सोशलसाईटवर फक्त एक आयडी असता, आणि ईथे प्रत्येक आयडीची तसेच त्याच्या मताची किंमत समसमान असते हे कायम लक्षात ठेवावे. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये. अन्यथा ज्या गोष्टीतले आपल्याला जास्त समजते तिथे आपण हिरीरीने मत मांडलेच पाहिजे आणि आपले ज्ञान प्रगट झालेच पाहिजे ही इर्ष्या वाढीस लागते. आणि ते साध्य न झाल्यास तीच आपल्याला नैराश्येचा खाईत नेते. कारण या जगात प्रत्येकाचा बाप हा असतोच. सोशलसाईटवर प्रत्येकाला तो भेटतोच. त्यामुळे आपण ईथे ज्ञान वाटायला नाही तर मिळवायला येतो हे मनाला सतत बजावावे. याऊपर आपल्या ज्ञानाचा कोणाला फायदा झाला तर ते चांगलेच आहे असे समजावे.
माझ्याबाबत बोलायचे झाल्यास माझ्याकडे मुळातच कमी ज्ञान असल्याने मला स्वत:तील अहंकाराला वेसण घालणे सोपे पडते.
२) बेसिक रूल ऑफ सोशलसाईट => लिहा __ विचार करा __ पोस्ट करा
एखाद्याशी प्रत्यक्ष वादसंवाद साधताना विचार न करताच काहीबाही बोलले जाण्याची शक्यता असते. पण ऑनलाईन संवादात पोस्ट लिहून झाल्यावर ती प्रकाशित करण्याआधी आपण हवा तितका वेळ घेऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून चर्चेदरम्यान एखादा प्रतिसाद टाईप केल्यावर क्षणभर थांबा. काय लिहिले आहे ते एकदा वाचून घ्या. पोस्ट मोठी असल्यास "प्रतिसाद तपासा" हा पर्याय वापरून ती वाचा. आणि मगच प्रकाशित करा. जर तुमचा मूड चांगला नसेल तर काहीही न टंकता निघून जा. ऑफलाईन जा किंवा दुसर्या धाग्यावर बागडायला जा. तुमच्याशी चर्चा करणारी समोरची व्यक्ती उतावीळ होत असेल तर तिला होऊ द्या. तो तिचा प्रश्न असतो. पण तुम्ही घाईघाईत काही लिहू नका.
३) सिंपल लिविंग सिंपल थिंकिंग - आपण इथे आनंद मिळवायला येतो. कोणाशी वादात जिंकायला वा हरायला नाही. ईथे वादात जिंकल्यावर काही प्रशस्तीपत्रक मिळत नाही. आणि मिळाले तरी ते प्रशस्तीपत्रक दाखवून कुठे नोकरी मिळणार नाही. त्यामुळे आपली ईथे पडणारी प्रत्येक पोस्ट भारीच असली पाहिजे अशी स्वत:कडून अपेक्षा ठेवू नका. जे काही साधेसुधे आपल्या स्वभावाला अनुसरून सुचेल ते बिनधास्त लिहा. उगाच आदर्शवादाचा बुरखा ओढण्याऐवजी स्वत:च्या विचारांशी प्रामाणिक असले की लोकांनी आपल्या विचारांचा काहीही अर्थ काढला तरी चीडचीड होत नाही.
४) आपण कसे आहोत, आणि अमुक तमुक बाबतीत आपला स्टॅंड कसा आहे हे ईथे कोणाला पटवून देत बसू नका - फार जुनाच रूल आहे. पण बरेचदा हा आपल्याकडून पाळला जात नाही.
५) प्रामाणिकपणा दाखवा - कोणालाही फसवायला (धोका द्यायला) वा कोणाचे नुकसान करायला लबाडी करू नका. एकदा तुम्ही ते केलेत की तुम्हाला स्वत:ला सारखे जस्टीफाय करावे लागते आणि मग हे विचार ऑफलाईन गेल्यावरही डोक्यात त्रास देत राहतात.
६) मित्र बनवा, पण कंपू बनवू नका - एखाद्याचे मत खोडताना वा एखाद्याच्या मताला दुजोरा देताना फक्त ते मत बघा. त्यामागचा आयडी बघू नका. हे जमले की अर्धे प्रश्न मिटले. अन्यथा केवळ मैत्रीखातर जे आपले स्वत:चे मत आहे त्याविरुद्ध मत मांडावे लागले तर तुमच्याही नकळत तुमचे मन:स्वास्थ्य बिघडते.
७) थप्पड से डर नही लगता साहबजी, प्यार से लगता है - लहानपणी मला सर्वात जास्त भिती माझ्या प्रेमळ आईच्या रागाची वाटायची. एक काकू फार रागीट होत्या पण त्यांच्या रागावर मी हसून रिअॅक्ट करायचो. याचे कारण म्हणजे माझी आई माझ्या भल्याचे विचार करून रागावायची. काकू मात्र उगाच दिसला पोरगा मस्ती करताना की दिला त्याला दम. हा फरक मला तेव्हाही समजायचा, आजही समजतो. सोशलसाईटवर तुम्हाला काही आई-मावशी भेटतील तर काही वर उल्लेखलेल्या काकूही भेटतील. कोणाला किती मनावर घ्यायचे आणि कोणाला हसून सोडून द्यायचे हे ईथे जमायला हवे.
८) स्वत:वर विनोद करायला शिका - जर स्वत:ला विनोद जमत नसतील तर तुमच्यावर ईतरांनी केलेले एंजॉय करा. पण हे तितकेही सोपे नसते. म्हणून हे महत्वाचे असूनही शेवटी लिहीले आहे.
अजून सुचेल तसे ईथेच भर घालेन, तवसर तुमचेही फंडे येऊद्यात
धन्यवाद
ऋन्मेष !
(No subject)
प्रामाणिक मते. फक्त ४नंबर न् धागाकर्ता...
असो.
ऋच्या सगळ्या मतांशी सहमत आहे.
उम्मा ऋ.
उम्मा ऋ.
छान लिहिलंयस. तुझं शांत राहणं कधीकधी अगदी अचंबीत करतं. भारी पण वाटतं पण कधी राग पण येतो की काय पिळतोय नुसता. पण असं शांत राहता आलं पाहिजे असं नक्की वाटतं.
असं करा. ह्या आठही नियमांची
असं करा. ह्या आठही नियमांची सुरळी करा आणि चुलीत घाला....
जालावर जसे वाटते तसे व्यक्त व्हा..... फोरम्स ही एकच गोष्ट अशी आहे जिथे तुम्ही मुक्तपणे व्यक्त होऊ शकता. अनुभवाने घडत जातं बाकीचं... वरचे आठही नियम फक्त फुकाची फिलासाफी आहे. ते पाळायचे ठरवले तर कोणी सर्टीफिकेट देणार नाहीच, मग का चिंता करा...!
(जालावर डोक्यात गेलेले दोन चार जण आहेत, त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर हिशोबात खर्चापानी देणार आहे. नावे नोंदवून ठेवलेली आहेत)
फोरम्स ही एकच गोष्ट अशी आहे
फोरम्स ही एकच गोष्ट अशी आहे जिथे तुम्ही मुक्तपणे व्यक्त होऊ शकता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>>
चूक !
बाथरूम ही अशी एकच जागा आहे जिथे तुम्ही मुक्तपणे व्यक्त होऊ शकता
सिरीअसली, भसाड्यातला भसाडा आवाजाचा माणूस सुद्धा तिथे स्वत:ला आतिफ अस्लम समजत सुरू होतो. कारण तुम्हाला तिथे नावे ठेवायला कोणी नसतो. सोशलसाईटवर नावे ठेवणारे असतात. त्यांचा विचार एकदा तुम्ही करू लागलात की ते मुक्तपणे व्यक्त होणे वगैरे खरेच नाही जमत, वा ती स्वत:ची फसवणूक असते.
_/\_ अखेर हा धागा उगवला.
_/\_ अखेर हा धागा उगवला.
मला वाटलेलेच कधी ना कधी या धाग्याला तू हात घालणार पण मला बोलून ठिणगी टाकायची नव्हती. लगे रहो स्थितप्रज्ञा.
ऋ, या तो घोडा बोलो या तो चतुर
ऋ, या तो घोडा बोलो या तो चतुर बोलो!
१. ईथे वादात जिंकल्यावर काही प्रशस्तीपत्रक मिळत नाही. आणि मिळाले तरी ते प्रशस्तीपत्रक दाखवून कुठे नोकरी मिळणार नाही. त्यामुळे आपली ईथे पडणारी प्रत्येक पोस्ट भारीच असली पाहिजे अशी स्वत:कडून अपेक्षा ठेवू नका.
२. . सोशलसाईटवर नावे ठेवणारे असतात. त्यांचा विचार एकदा तुम्ही करू लागलात की ते मुक्तपणे व्यक्त होणे वगैरे खरेच नाही जमत, वा ती स्वत:ची फसवणूक असते.
----------------------------
>>> मी म्हटले की नावे ठेवणार्यांची चिंता फाट्यावर मारा.... पाहिजे तसे व्यक्त व्हा.... तुम्हाला पाहिजे तसे. ज्याला इतकी नाव-इमेज जपायची असेल त्याने घाबरत घाबरत (जसे खर्या जगात जगतो) तसे लिहावे.
खरी आयडेंटिटी लपवा जर नाव
खरी आयडेंटिटी लपवा जर नाव इमेज जपायची भीती वाटत असेल तर.. हे ऍड कर
बाकी. असो.
बाकी. असो.
तू नेहमीप्रमाणे प्रतिसादांच्या गोल गोल जिलब्या टाकत आणि अर्थहिन काथ्याची दोरी विणत बसणार आहेस हे माहित असल्याने आपण इथून उडनछु होतोय.....
नानाकळा, आपण वर कोट केलेल्यात
नानाकळा, आपण वर कोट केलेल्यात,
पहिल्या क्रमांकात मी मुक्तपणे जगणे गरजेचे आहे हे सांगितले आहे.
दुसर्या क्रमांकात ईथे मुक्तपणे जगायला काय अडचणी येतात ते सांगितले आहे. मुक्तपणे जगू नका असे म्हटले नाहीये. अधिक माहितीसाठी बाथरूम सिंगर असे गूगल करू शकता.
आपण इथून उडनछु होतोय..... >>>> हे मात्र आपण फार वाईट केले. मी एस्टीमेशनमध्ये आपले वीस ते पंचवीस प्रतिसाद पकडले होते. आपण या विषयावर छान वाद-संवाद-प्रतिवाद साधू शकता असे मला वाटले होते. किंबहुना वाटतेच, आपल्या विचारांचा द्रुष्टीकोन आणि मांडणी छान असते, भले त्यातील प्रत्येक विचाराशी सहमत असो वा नसो.. असो आपली मर्जी, शुभरात्री![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद! अगर सब कुछ ठिक रहा,
धन्यवाद! अगर सब कुछ ठिक रहा, तो सोचेंगे!
नेहेमीसारखा फडतूस लेख. माबोवर
नेहेमीसारखा फडतूस लेख. माबोवर इतर काहीच नसल्याने उघडला. अन म्हणून प्रतिसाद लिहिला.
अजून एक भर -
अजून एक भर -
9) वाईटातून चांगले शोधावे - आपल्या लेखावर वा प्रतिसादावर वाईट प्रतिसाद आल्यास त्यात काही जमेची बाजू दिसते का हे चाचपडून बघावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उदाहरणार्थ,
प्रतिसाद - नेहेमीसारखा फडतूस लेख.
जमेची बाजू - प्रतिसाद देणारी व्यक्ती नेहमी आपला लेख वाचते
अजून एक भर -
अजून एक भर -
9) वाईटातून चांगले शोधावे - आपल्या लेखावर वा प्रतिसादावर वाईट प्रतिसाद आल्यास त्यात काही जमेची बाजू दिसते का हे चाचपडून बघावे.
उदाहरणार्थ,
प्रतिसाद - नेहेमीसारखा फडतूस लेख.
जमेची बाजू - प्रतिसाद देणारी व्यक्ती नेहमी आपला लेख वाचते
>>>>
कुछ भी कहो, बंदा/दी स्मार्ट है.
जमेची बाजू - प्रतिसाद देणारी
जमेची बाजू - प्रतिसाद देणारी व्यक्ती नेहमी आपला लेख वाचते Happy>>>> ॠ भाऊ कडक.!
यासाठी कोणत्या साधनेची अवश्यकता असते काय? असल्यास क्रूपया सांगावी.
>>(जालावर डोक्यात गेलेले दोन
>>(जालावर डोक्यात गेलेले दोन चार जण आहेत, त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर हिशोबात खर्चापानी देणार आहे. नावे नोंदवून ठेवलेली आहेत)<<
गंमतीत लिहिलं आहे असं गृहित धरतो. कारण समोरचा किती पाण्यात आहे हे आंतर्जालावर दिसुन येत नाहि, हा मैत्रित सल्ला...
ऋन्म्या, लगे रहो. सहि जा रहे हो...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
7)>>>>>ला काही आई-मावशी
7)>>>>>ला काही आई-मावशी भेटतील तर काही वर उल्लेखलेल्या काकूही भेटतील. कोणाला किती मनावर घ्यायचे आणि कोणाला>>≥![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हाला कळले कोणत्या काकूंबद्दल बोलत आहेस तू
लोकांचे इतके टोमणे ऐकूनसुद्धा डोके थंड ठेवायला बरीच साधना करावी लागत असेल तुला
सर्व मतांशी सहमत..
सर्व मतांशी सहमत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४,६,८ >>>> सो ट्का सच बात...
एक भर-
एक भर-![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नियम ७ अ)
काकू नसताना त्यांचा पाठिमागे नामोल्लेख वैगरे टाळावा, उगाच त्यांच्या नावानं बोभाटा करत इतरत्र हिंडू नये. काकूंचा फक्त प्रत्यक्ष विचारांतून समोरासमोर वाद-प्रतिवाद करावा. आपल्या जिभेवर साखर असू द्यावी.
लोकांचे इतके टोमणे ऐकूनसुद्धा
लोकांचे इतके टोमणे ऐकूनसुद्धा डोके थंड ठेवायला बरीच साधना करावी लागत असेल तुला Happy
नवीन Submitted by सिम्बा
>>>> टू गुड प्रतिसाद सिमबा... ☺️
अरे प्लीज, कोणत्याही ठराविक
अरे प्लीज, कोणत्याही ठराविक काकाकाकूंना डोळ्यासमोर आणू नका. किंवा तुम्ही ज्यांना डोळ्यासमोर आणत असाल त्यांना मी आईमावशीतही मोजत असेल.
आपण ईथे वृत्तीवर चर्चा करत आहोत व्यक्तींवर नाही. एकच व्यक्ती भिन्न परिस्थितीत वा भिन्न लोकांशी संवाद साधताना भिन्न वृत्ती दाखवू शकतेच.
बरेचदा एखादी व्यक्ती सर्वांशी एकसारखीच वागत नाही. प्रत्येकाचे आवडते नावडते असतात आणि नावडतीचे मीठही अळणी असते. त्याचबरोबर याचे व्हायसे वर्सा म्हणजे आवडत्याचे कारलेही गोड असते. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याशी कशी वागतेय त्यावरून ती व्यक्ती कशी आहे हे ठरवू नये.
नीट मॅरीनेट केले की कारले पण
नीट मॅरीनेट केले की कारले पण गोड होतंय हो
त्यामुळे एखादी व्यक्ती
त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याशी कशी वागतेय त्यावरून ती व्यक्ती कशी आहे हे ठरवू नये. >>> +१
परिस्थिती वर अवलंबून आहे सर्व... एखादी व्यक्ती ही एका xyz व्यक्तीसाठी वाईट असू शकते ..तसेच ती व्यक्ती abc साठी चांगली असते.. म्हणजेच कोणाशीही बोलल्याशिवाय त्या व्यक्तीबद्दल चांगल किंवा वाईट मत नाही बनू शकतं...
बर्याचदा आपण आपल्या दुसर्याच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीला ती चांगली किंवा वाईट आहे अस समजून मोकळे होते..तिच्याशी न बोलताच ..जे पुर्णपणे चुकीचं आहे...
उपाअय सोपा आहे
उपाअय सोपा आहे
फकास्स्त सोतच्य पोस्टि वाचायच्याअ
बाकिच्य पोस्टिवरुन उडी माराची
डोक लैच थणड रहातं
>> आपण ईथे ज्ञान वाटायला
>> आपण ईथे ज्ञान वाटायला नाही तर मिळवायला येतो हे मनाला सतत बजावावे.
हे आवडलं
>> ईथे वादात जिंकल्यावर काही प्रशस्तीपत्रक मिळत नाही.
जिंकल्यावर सोडा फक्त वाद घातल्याबद्दल गालगुच्चे मिळतात, आहात कुठे!!
>>५) प्रामाणिकपणा दाखवा
हाहाहा
हुहुहु
याला कोणीतरी आरसा दाखवा ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
होहोहो
>>स्वत:वर विनोद करायला शिका
हे पण आवडलं
चांगलं लिहिलंय ऋन्मेष. आवडलं.
चांगलं लिहिलंय ऋन्मेष. आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याशी कशी वागतेय त्यावरून ती व्यक्ती कशी आहे हे ठरवू नये. >>> वेल सेड.
कधी चुकुन असं काहीतरी बोलुन जातोस बघ तु
चांगला आहे लेख.
चांगला आहे लेख.
पण बरेच लोक आंतरजालावर स्वतःची भडास काढायला येतात. त्यांना हे कोणतेच नियम लागू होत नाही.
बरं सोनु म्हणजे आपल्या त्या
बरं सोनु म्हणजे आपल्या त्या ह्या आहेत का?
शक्यता नाकारता येत नाही.
शक्यता नाकारता येत नाही. कशाला नाकारावी नी कशाला होकार तरी द्यावा, नाही का! सोशल मिडियावर सगळे एक आयडी असतात. आयडीमागची व्यक्ती कोण नी कशी ते सांगता येईलच असं नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त लिहिलं आहेस ऋन्मेष!
मस्त लिहिलं आहेस ऋन्मेष!
डोळा मारल्यावर तर अजुनच
डोळा मारल्यावर तर अजुनच पुष्टी मिळतेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages