सोशलसाईटवरच्या चर्चेत / वादात आपले डोके शांत कसे ठेवावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2017 - 13:49

हा धागा मी एका सोशलसाईटवरच प्रकाशित करत असल्याने हा विषय येथील प्रत्येकाशी थेट संबंध राखून आहे असे मानायला हरकत नाही.

कधीतरी काहीतरी लिहिणे आणि त्यावर चर्चा घडणे हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असेलच. चर्चा म्हटली की मतभेद आलेच. आणि मतभेद म्हटले की त्याचे वाद हे झालेच. अगदी कुठल्याही सोशलसाईटवर हे सहज घडते. नव्हे कित्येक संकेतस्थळे केवळ यावरच तग धरून असतात.

पण ईथे झालेले मतभेद ईथेच ठेवणे आणि लॉग आऊट करताच जादूची कांडी फिरवल्यासारखे मूड चेंज करणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. एक असतो फुकटचा ताप आणि एक असते विकतची डोकेदुखी. बरेचदा आपण ईथून दोन्ही घेऊन जातो.

मुंबईच्या रस्त्यावर मी बघतो दोन लोकांचे साधेसे घाईगर्दीचा धक्का लागण्यामुळे भांडण होते. अरे ला कारे करता वाढत जाते. आजूबाजुला बघे जमा होतात. त्यांच्यासमोर आपली लाज जाऊ नये म्हणून कोणी मागे हटत नाही. मग त्यांच्यातल्याच कोणीतरी मध्यस्थी करून मिटवले तर ठिक, नाहीतर भांडण एकमेकांच्या पोटात सुरा खुपसण्याईतपत टोकाला जाऊ शकते.

बस्स, सोशलसाईटवर नेमके हेच होते. आपल्यात चाललेले वाद चार लोकं वाचत आहेत. ईतकेच नव्हे तर त्या वादाच्या पोस्ट या आंतरजालावर कायमस्वरूपी जतन होणार आहेत. तर आता माघार घेऊ शकत नाही अश्या मानसिकतेतून ईथे वाद पेटतात. आणि मध्ये कोणीतरी येऊन "जाने दो भाईसाब" बोलायची शक्यता कमी असल्याने तसेच चालू राहतात. किंवा तात्पुरते थांबले तरी आतल्या आत धुमसत राहतात.

आणि म्हणूनच सोशलसाईटवर येताना आणि ईथे वावरताना... कोणाशी काहीही आणि कितीही वाद झाले तरी.. एखाद्या दिवशी आपल्या मनासारखे काहीही झाले नाही तरी.. एखाद्या वादात आपली काहीही चूक नसताना मनस्ताप सहन करावा लागला तरीही.. आपले डोके शांत कसे ठेवावे याचे उपाय प्रत्येकाने आपापल्या परीने शोधायलाच हवेत. नव्हे कित्येक जण ते शोधतही असतील. तर अश्याच उपायांना संकलित करायला आणि त्यावर चर्चा करायला हा धागा.

ईथे प्रत्येकाने आपण काय करतो, कसे वागतो, हे आपापल्या परीने लिहावे. प्रत्येकाची आयडीया प्रत्येकालाच जमेल असे नाही. तसेच एकाचा उपाय दुसर्‍याला लागू होईलच असे नाही. पण तरीही ईथे संकलित झालेल्या उपायांमुळे धाग्याचा फायदा सर्वांनाच होईल. त्यामुळे धागा योग्य दिशेने जाईल हे सर्वांनीच बघावे Happy

मी माझे फंडे लिहितो -

१) ईथे अहंकारलेस वावरावे - सोशलसाईटवर लॉगिन होताना आपला अहंकार बाहेर ठेवूनच प्रवेश करावा. प्रत्यक्ष जगात तुम्ही कितीही मोठे तीसमारखान असलात तरी सोशलसाईटवर फक्त एक आयडी असता, आणि ईथे प्रत्येक आयडीची तसेच त्याच्या मताची किंमत समसमान असते हे कायम लक्षात ठेवावे. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये. अन्यथा ज्या गोष्टीतले आपल्याला जास्त समजते तिथे आपण हिरीरीने मत मांडलेच पाहिजे आणि आपले ज्ञान प्रगट झालेच पाहिजे ही इर्ष्या वाढीस लागते. आणि ते साध्य न झाल्यास तीच आपल्याला नैराश्येचा खाईत नेते. कारण या जगात प्रत्येकाचा बाप हा असतोच. सोशलसाईटवर प्रत्येकाला तो भेटतोच. त्यामुळे आपण ईथे ज्ञान वाटायला नाही तर मिळवायला येतो हे मनाला सतत बजावावे. याऊपर आपल्या ज्ञानाचा कोणाला फायदा झाला तर ते चांगलेच आहे असे समजावे.
माझ्याबाबत बोलायचे झाल्यास माझ्याकडे मुळातच कमी ज्ञान असल्याने मला स्वत:तील अहंकाराला वेसण घालणे सोपे पडते.

२) बेसिक रूल ऑफ सोशलसाईट => लिहा __ विचार करा __ पोस्ट करा
एखाद्याशी प्रत्यक्ष वादसंवाद साधताना विचार न करताच काहीबाही बोलले जाण्याची शक्यता असते. पण ऑनलाईन संवादात पोस्ट लिहून झाल्यावर ती प्रकाशित करण्याआधी आपण हवा तितका वेळ घेऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून चर्चेदरम्यान एखादा प्रतिसाद टाईप केल्यावर क्षणभर थांबा. काय लिहिले आहे ते एकदा वाचून घ्या. पोस्ट मोठी असल्यास "प्रतिसाद तपासा" हा पर्याय वापरून ती वाचा. आणि मगच प्रकाशित करा. जर तुमचा मूड चांगला नसेल तर काहीही न टंकता निघून जा. ऑफलाईन जा किंवा दुसर्‍या धाग्यावर बागडायला जा. तुमच्याशी चर्चा करणारी समोरची व्यक्ती उतावीळ होत असेल तर तिला होऊ द्या. तो तिचा प्रश्न असतो. पण तुम्ही घाईघाईत काही लिहू नका.

३) सिंपल लिविंग सिंपल थिंकिंग - आपण इथे आनंद मिळवायला येतो. कोणाशी वादात जिंकायला वा हरायला नाही. ईथे वादात जिंकल्यावर काही प्रशस्तीपत्रक मिळत नाही. आणि मिळाले तरी ते प्रशस्तीपत्रक दाखवून कुठे नोकरी मिळणार नाही. त्यामुळे आपली ईथे पडणारी प्रत्येक पोस्ट भारीच असली पाहिजे अशी स्वत:कडून अपेक्षा ठेवू नका. जे काही साधेसुधे आपल्या स्वभावाला अनुसरून सुचेल ते बिनधास्त लिहा. उगाच आदर्शवादाचा बुरखा ओढण्याऐवजी स्वत:च्या विचारांशी प्रामाणिक असले की लोकांनी आपल्या विचारांचा काहीही अर्थ काढला तरी चीडचीड होत नाही.

४) आपण कसे आहोत, आणि अमुक तमुक बाबतीत आपला स्टॅंड कसा आहे हे ईथे कोणाला पटवून देत बसू नका - फार जुनाच रूल आहे. पण बरेचदा हा आपल्याकडून पाळला जात नाही.

५) प्रामाणिकपणा दाखवा - कोणालाही फसवायला (धोका द्यायला) वा कोणाचे नुकसान करायला लबाडी करू नका. एकदा तुम्ही ते केलेत की तुम्हाला स्वत:ला सारखे जस्टीफाय करावे लागते आणि मग हे विचार ऑफलाईन गेल्यावरही डोक्यात त्रास देत राहतात.

६) मित्र बनवा, पण कंपू बनवू नका - एखाद्याचे मत खोडताना वा एखाद्याच्या मताला दुजोरा देताना फक्त ते मत बघा. त्यामागचा आयडी बघू नका. हे जमले की अर्धे प्रश्न मिटले. अन्यथा केवळ मैत्रीखातर जे आपले स्वत:चे मत आहे त्याविरुद्ध मत मांडावे लागले तर तुमच्याही नकळत तुमचे मन:स्वास्थ्य बिघडते.

७) थप्पड से डर नही लगता साहबजी, प्यार से लगता है - लहानपणी मला सर्वात जास्त भिती माझ्या प्रेमळ आईच्या रागाची वाटायची. एक काकू फार रागीट होत्या पण त्यांच्या रागावर मी हसून रिअ‍ॅक्ट करायचो. याचे कारण म्हणजे माझी आई माझ्या भल्याचे विचार करून रागावायची. काकू मात्र उगाच दिसला पोरगा मस्ती करताना की दिला त्याला दम. हा फरक मला तेव्हाही समजायचा, आजही समजतो. सोशलसाईटवर तुम्हाला काही आई-मावशी भेटतील तर काही वर उल्लेखलेल्या काकूही भेटतील. कोणाला किती मनावर घ्यायचे आणि कोणाला हसून सोडून द्यायचे हे ईथे जमायला हवे.

८) स्वत:वर विनोद करायला शिका - जर स्वत:ला विनोद जमत नसतील तर तुमच्यावर ईतरांनी केलेले एंजॉय करा. पण हे तितकेही सोपे नसते. म्हणून हे महत्वाचे असूनही शेवटी लिहीले आहे.

अजून सुचेल तसे ईथेच भर घालेन, तवसर तुमचेही फंडे येऊद्यात Happy
धन्यवाद
ऋन्मेष !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना,
त्या ह्या डायरेक्ट IQ काढायच्या,
या नास्तिकांचा IQ जास्त असतो असे म्हणून इंडायरेक्ट IQ काढतात Happy

गंमतीत लिहिलं आहे असं गृहित धरतो. कारण समोरचा किती पाण्यात आहे हे आंतर्जालावर दिसुन येत नाहि, हा मैत्रित सल्ला...

Submitted by राज on 29 September, 2017 - 04:48
>> त्याचं असं आहे राज, जितका माणूस खोल पाण्यात असतो तितका तो उथळपणा करण्यापासून दूर असतो. हे आमचेही मैत्रीत दिलेले ज्ञान. बाकी तुम्ही समजदार आहातच. !!! Happy

उन्मादाच्या भरात एखादे विधान केल्यास डोके शांत झाल्यावर दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली तर जरुर करा त्यानेही डोके शांत व्हायला मदत होते

असं करा. ह्या आठही नियमांची सुरळी करा आणि चुलीत घाला....
जालावर जसे वाटते तसे व्यक्त व्हा..... फोरम्स ही एकच गोष्ट अशी आहे जिथे तुम्ही मुक्तपणे व्यक्त होऊ शकता. अनुभवाने घडत जातं बाकीचं... वरचे आठही नियम फक्त फुकाची फिलासाफी आहे. ते पाळायचे ठरवले तर कोणी सर्टीफिकेट देणार नाहीच, मग का चिंता करा...!>>>>>नानांशी टोटल सहमत. अगदी +१११११११

असं करा. ह्या आठही नियमांची सुरळी करा आणि चुलीत घाला....
जालावर जसे वाटते तसे व्यक्त व्हा..... फोरम्स ही एकच गोष्ट अशी आहे जिथे तुम्ही मुक्तपणे व्यक्त होऊ शकता. अनुभवाने घडत जातं बाकीचं... वरचे आठही नियम फक्त फुकाची फिलासाफी आहे. ते पाळायचे ठरवले तर कोणी सर्टीफिकेट देणार नाहीच, मग का चिंता करा...!>>>> =+१११११११ सहमत
समोरचे जर सायको असतील तर वरिल फिलॊसॊफी चुलीत फेकावीशी वाटते.

समोरचे जर सायको असतील तर वरिल फिलॊसॊफी चुलीत फेकावीशी वाटते.
>>>>>>
सायको फार मोठा शब्द आहे. पण समोरचा तुमच्यामते जे काही असेल त्याच्याशी तुम्ही केवळ भाण्डण्यासाठी म्हणून त्याच्या पातळीवर जाल तर यातून तुम्हाला मनस्तापच मिळणार.

@ प्रशस्तीपत्र, ईथे एक गंमत उडालीय.
मी म्हणतोय कोणाशी वादात जिंकून प्रशस्तीपत्र मिळणार नाही.
तुम्ही म्हणत आहात कोणाशी संयमाने बोलून प्रशस्तीपत्र मिळणार नाही.
जर सर्टीफिकेट दोन्हींमध्ये मिळणार नसेल तर शेवटी आपल्यालाच ठरवायचे आहे आपल्यासाठी आपली मन:शाण्ती महत्वाची कि वादात जिंकणे महत्वाचे? Happy

ऋ. माझे मत सांगतो. मी नैसर्गिकतेवर विश्वास ठेवणारा प्राणी आहे. आजवरच्या आयुष्यातल्या अनुभवातून, निरिक्षणातून असे समजले की लोकांना हे मन:शान्तीचे नियम बियम फक्त दुसर्‍यांना सांगायला हवे असतात. स्वतः पाळणे लै अवघड असते. बरे ही फिलासाफी फुकट तोंडाचे वाफ आणि वेळ दवडण्यापलिकडे काही नसते. जेव्हा वागायचे असते तेव्हा जसा जो असतो तसाच तो वागतो. हमरीतुमरीवर आला की मातृभाषाच आठवते माणसाला.

नैसर्गिकता म्हणजे काय तर... तुम्हाला राग येतो, येऊ द्ये... चिडचिड होते होऊ द्ये.. जे जे व्हायचे ते ते होऊ द्ये.... आणि मग त्याचे परिणाम बघा.. अनुभवा... मग आपोआप जे मनापासून हवे असते ते मिळवण्यासाठी वागणूक नैसर्गिकपणे बदलते. भडास काढणारे भडास काढतात, पकवणारे प्कवत राहतात, बढाई मारणारे बढाइ मारत राहतात.... याची सर्वांची एक इकोसिस्टीम असते. ती तशीच चालू राहु द्यायची.

'माझे ऐकलं जावं, मला कोणीतरी रिस्पॉन्ड करावं, माझ्या बोललेल्या विचारांवर कोणीतरी रिअ‍ॅक्ट व्हावं' अशी सुप्त इच्छा इथे लिहिणार्‍या प्रत्येकाची असते. काही तर इतके मानसिकरित्या कॉम्प्लिकेटेड असतात की त्यांच्या प्रतिसादावर कोणी 'च्यायला काय वैताग आहे, त्रास आहे, डोकं उठवतो हा माणूस' अशी प्रतिक्रिया दिली तरी ती त्यांना गोड वाटते, कोणीतरी आपली दखल घेतंय (वैतागून का होईना) हे बघून डोपामाईन सिक्रिशन होऊन त्यांना एक किकसारखा आनंद मिळतो. ही एक विकृती आहे पण सटल लेवलची. कोण्या मुलीने कानाखाली चप्पल हाणली तरी तीने आपल्याला चप्पल हाणण्यालायक तरी समजले म्हणून परमानंदात विलिन होतात.

अशा अनेक प्रवॄत्ती जालावर येतात. सगळे आपआपल्या पद्धतीने व्यक्त होतात. ताकतीप्रमाणे व्यक्त झाले की वातावरण समजून घेऊ लागतात आणि एकतर सरळ सात्विक-संत होऊन नीट लिहू लागतात किंवा सोडून देतत लिहिणे. हे सर्व नैसर्गिक रित्या होतं.... दारु पिणार्‍याला न सांगता जेवणातून औषध द्या आणि दारु सोडवा - या जाहिरातीसारखं आहे. आपोआप सुधरतात लोक, किंवा नाही सुधरत.

असले नियम मांडून कंड शमवण्याखेरिज काही होत नसतं. बाकी अल्लाह मालिक.

म्हणून म्हणतो कोणाच्या मनःशांतीची चिंता तुला करायची गरज नाहीये. उपयोग नाही त्याचा. उपहास नाही, सत्य मनापासून सांगतो.

मला विचारलं तर एवढाच सल्ला देईल प्रत्येकाला की मनसोक्त व्यक्त व्हा. तुमचे सर्व गुणदोष इथे स्वच्छ दिसायला लागतील, तुम्ही किती चिडता, का चिडता, का वाद घालता, कुठे थांबता, कोणाशी जमत नाही, का जमत नाही सगळं सगळं इथं आरशासारखं स्पष्ट दिसेल आणि मग जर जाणवलं तर हेही जाणवेल की बदल होतोय... चिडचिड नाही होत. मनोरंजन होतं. मजा येते.

रुमणेशभाऊ तू एका आयडी ला वादात हरवाशील, नंतर तोच आयडी दु आयडी घेऊन परत भांडायला येईल, त्यामुळे तुमच्याकडे किती वेळ आहे आणि किती काळ तुम्ही समोरच्याला झेलू शकता हे डीसायिड करून वादातून बाहेर पडणे चांगले...
काही आयडी तू कितीही चांगला लेख लिही, तुझ्या जुन्या धाग्यांवरून शिव्या घालणे सोडणार नाहीत..

इग्नोरांस इस ब्लिस ! तुला शुभेच्छा !!! आणि हा लेख चांगला लिहिला आहेस !!

'माझे ऐकलं जावं, मला कोणीतरी रिस्पॉन्ड करावं, माझ्या बोललेल्या विचारांवर कोणीतरी रिअ‍ॅक्ट व्हावं' अशी सुप्त इच्छा इथे लिहिणार्‍या प्रत्येकाची असते. काही तर इतके मानसिकरित्या कॉम्प्लिकेटेड असतात की त्यांच्या प्रतिसादावर कोणी 'च्यायला काय वैताग आहे, त्रास आहे, डोकं उठवतो हा माणूस' अशी प्रतिक्रिया दिली तरी ती त्यांना गोड वाटते, कोणीतरी आपली दखल घेतंय (वैतागून का होईना) हे बघून डोपामाईन सिक्रिशन होऊन त्यांना एक किकसारखा आनंद मिळतो. ही एक विकृती आहे पण सटल लेवलची. कोण्या मुलीने कानाखाली चप्पल हाणली तरी तीने आपल्याला चप्पल हाणण्यालायक तरी समजले म्हणून परमानंदात विलिन होतात. >>> एकदम बरोब्बर लिहिलं नानाकळा! Happy

नानाकळा, तुमचं म्हणणं पटतंय....पण खरंच सगळे असे मनसोक्त व्यक्त व्हायला लागले (आणि काहिंना त्यासाठी 'अ' पासून 'झ' पर्यंत अक्षरांनी सुरु होणार्या शब्दांची पण गरज पडते बरं का!) तर माबो च्या वेमा व अ‍ॅडमीन यांना झाडूच घेवून बसावे लागेल.... Wink

काही तर इतके मानसिकरित्या कॉम्प्लिकेटेड असतात की त्यांच्या प्रतिसादावर कोणी 'च्यायला काय वैताग आहे, त्रास आहे, डोकं उठवतो हा माणूस' अशी प्रतिक्रिया दिली तरी ती त्यांना गोड वाटते, कोणीतरी आपली दखल घेतंय (वैतागून का होईना) हे बघून डोपामाईन सिक्रिशन होऊन त्यांना एक किकसारखा आनंद मिळतो. ही एक विकृती आहे पण सटल लेवलची. कोण्या मुलीने कानाखाली चप्पल हाणली तरी तीने आपल्याला चप्पल हाणण्यालायक तरी समजले म्हणून परमानंदात विलिन होतात.

नाना , चांगला मुद्दा.
दुसर्याकडून 'काय वैताग आहे, किती पिकवतो' अशी प्रतिक्रिया मिळवण्यात आनंद वाटणे असे जे लोक असतात त्यांना कितीही विकृत विकृत म्हणून सोडून दिले तरी शेवटी कुठेतरी तो एक abuse आहे- यांच्या विकृत किकचं बिल इतर unsuspecting victims नी का भरावं? अशा विकृत लोकांवर कोणत्याही सोशल मीडिया फोरमच्या व्यवस्थापनाने अंकुश ठेवायला हवा.

तर माबो च्या वेमा व अ‍ॅडमीन यांना झाडूच घेवून बसावे लागेल
>>> तेच तर गुपित आहे ना....! Happy
त्यालाच इकोसिस्टीम म्हणालोय मी. सगळं एकमेकांवर अवलंबून असतं, विकास-क्षय ह्या नैसर्गिक खेळात प्रकृतीमध्ये बॅलन्स राहतो.

विकास-क्षय ह्या नैसर्गिक खेळात प्रकृतीमध्ये बॅलन्स राहतो >> म्हणजे 'आग के लिये पानी का डर जरूरी है' इति मकबूल, बरोबर ना? Wink

>>अशा अनेक प्रवॄत्ती जालावर येतात. सगळे आपआपल्या पद्धतीने व्यक्त होतात. ताकतीप्रमाणे व्यक्त झाले की वातावरण समजून घेऊ लागतात आणि एकतर सरळ सात्विक-संत होऊन नीट लिहू लागतात किंवा सोडून देतत लिहिणे. हे सर्व नैसर्गिक रित्या होतं.... दारु पिणार्‍याला न सांगता जेवणातून औषध द्या आणि दारु सोडवा - या जाहिरातीसारखं आहे. आपोआप सुधरतात लोक, किंवा नाही सुधरत.<<

हो हो बरोबर आहे, अशा विकृतींना संस्थळांवरुन तडीपार केलेलं किंवा पळवुन लावल्याची उदाहरणं पहाण्यात आहेत... Proud

ऋन्मेष, चांगला धागा.
तुमचे उपदेशहि चांगले आहेत, मला स्वतःला त्यातले काही जमले नाही नि जमणार नाही ही गोष्ट वेगळी.
फारच झाले नि अ‍ॅडमिन ने हाकलून दिले तर जाईनहि.
मी आपला भारत नि मराठी यावरील प्रेमामुळे इथे आलो होतो.
पण आजकाल असे स्पष्ट जाणवते की आ़जकालचे भारतीय नि माझे यांचे काहीहि पटणार नाही नि मराठी तर काय विचारता, इतकी बदलली आहे की मायबोलीवर मराठीच लिहीतात की नाही या बद्दल शंका यावी.

<अश्याच उपायांना संकलित करायला आणि त्यावर चर्चा करायला हा धागा.>
हे आवडले.
मी एकच उपाय करण्याचा प्रयत्न करतो - काही दिवस मायबोलीकडे न बघणे. किंवा टीपापा वर जाणे - तिथे सगळी गंमतच.

नानाकळा,
आपली नैसर्गिकपणे व्यक्त व्हा पोस्ट वाचून मला माझ्या आजोबांची फिलॉसोफी आठवली. ते म्हणायचे की कधी कसली पथ्ये पाळायच्या भानगडीत पडू नका. डायटींग वगैरे प्रकारांवर तर ते हसायचे. त्यांचे म्हणने होते की आपल्याला जेव्हा जे खावेसे वाटते ते बिनधास्त खावे. आपल्याला काय हवे काय काय नको ते आपल्या बॉडीला समजते Happy

बाकी ती गोष्ट वेगळी की माझ्या डायबेटीज असलेल्या आज्जीला त्यांनी कधी साखर खाऊ दिली नाही.

नंद्याजी मला तरी कुठे ते सारे जमतेय. पण प्रयत्न सुरू आहेत. काही कमी जमते काही जास्त. त्यामुळे कोणी अमुक तमुक नंबरचा मुद्दा धागाकर्त्याकडे बघून वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली तरी ती मान्य आहेच.

बाकी अधूनमधून ब्रेक घेणे हा चांगला उपाय आहे. मी देखील बरेचदा घेतो. फक्त तो चोवीस तासांच्या फारसा वर जात नाही Happy

प्रत्येक संकेतस्थळाची स्वत:ची एक शैली असते. प्रत्येकाने त्यात स्वत:ला योग्य जागी फिट करून बघावे. जिथे फिट होऊ तिथेच बागडावे. कुठेच नाही झालो तर सरळ दुसरे सण्केतस्थळ शोधावे. वर जे नानाकळांनी नॅचरली व्यक्त व्हा म्ह्टले आहे ते योग्य आहे, फक्त एकच कंडीशन अप्लाय, ती जागा तुमच्या नेचरला सूट होणारी असावी.

थोडक्यात काय तर आजीला वाचनमात्र राहायला सांगितले. Happy
>>>>>>
पण हे आज्जीला स्वत:ला राहायचे नव्हते ना Happy

how do you manage to get so much free time to come out with so many useless & nonsense threads??
सगळीकडे ह्याचेच धागे वैताग....

शिर्षकात एक बदल कर:

सोशलसाईटवरच्या चर्चेत / वादात आपले डोके शांत कसे ठेवावे आणि इतरांचे कसे उठवावे.

Wink

how do you manage to get so much free time to come out with so many useless & nonsense threads??
>>>>>>

TIME MANAGEMENT AND PRIORITIES !
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. सविस्तर पुन्हा कधीतरी.

मानव Lol

मग त्या ईतरांनी आपले डोके उठू नये म्हणून काय करावे हे सुद्धा यात वाढवावे लागेल Wink

पण मुळातच कुठल्याही एक्स्टरनल फॅक्टरमुळे / बाह्य घटकामुळे आपले डोके कसे उठू नये, आपला मूड कसा खराब होऊ नये, किंवा आपला आनंद आपण गमाऊ नये हे प्रत्येकाने शिकायला हवे.

संपादित... लेख वाचला परत.. डोके शांत ठेवणे जरूरी आहे .. माझा रुमाल ☺️

Pages