"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो प्रोमो बघितला.

रुद्रम मुळे सोमवार हवाहवासा वाटायला लागलाय. >>> अगदी अगदी. आज जाम इंटरेस्टींग आहे असं प्रोमोवरुन वाटतंय.

मी पण रुद्रम मिस करतेय शनिवार आणि रविवार.
आजच्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा आहे.
पहिल्यांदा एखाद्या मालिकेसाठी इतकी वाट बघतेय.

आज जाम इंटरेस्टींग आहे असं प्रोमोवरुन वाटतंय. >> हो. उत्सुकता टिकवुन ठेवण्यात यशस्वी झाले आहेत .

<< रुद्रम मुळे सोमवार हवाहवासा वाटायला लागलाय. >> खरंच. उत्सुकता टिकवुन ठेवण्यात यशस्वी झाले आहेत .

एक गोष्ट पटली नाही. चंदुदादाला पोलिस हॉटेलमधे प्रश्न विचारतात. धुरत लक्ष ठेवायला सांगतात त्याच्यावर ते पण बाहेर पडल्यावर. मग आत हॉटेलात कोणाशी बोलतो, कोण येऊन भेटतं यावर नाही का नजर ठेवत क्रिमिनल बॅकग्राऊंडवाल्या माणसावर?

पोलिस गेल्यावर लगेच रागिणी येते चंदुदादांशी बोलायला. आता तिथेच पोलिसाने पाळत ठेवली असती तर ?? ती हाती लागू नये म्हणून अशा काही ऑब्व्हियस गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय का?

मी ही सिरियल अजिबात फॉलो करत नव्हते. पण खूप लोकांकडून ऐकलं आणि सुरुवातीपासूनचे सर्व एपिसोड्स ओझी वर पाहून काढले. आता रेग्युलर पर्यंत पोहोचले (आजच) आणि हा बीबी पण आजच वाचून काढला.. मस्त एन्जॉय करतायत सगळे Happy आता रोज रिपिट पाहणार Happy
मुक्ता बर्वे रियली रॉक्स. Happy
काही गोष्टी मला पण खटकल्या पण त्या गरज आहेत म्हणून वापरल्या असाव्यात उदा. मुक्ता बिनधास्त भिडते. अगदी काळजाचा ठोका चुकतो कधी कधी. सातव च्या घरी बिनधास्त घुसून फोटो काढणे, हॉस्पिटलात जाऊन अभय सातव ला संपवणे. विग घालून सातवच्या बायकोला भेटायला सदाच्या घरी जाणे. इ.
मला एक प्रश्न पडला की मुक्ता बिन्धास्त सातवच्या घरी घुसून फोटो काढायचा प्रयत्न करते, त्याची मुलगी पाहते. तिने खोटं सांगितलं की ती अकाऊंटंट ची सेक्रेटरी आहे, तरी पण सदा किंवा सातव ची बायको तिला तु असें का केलेस असं एकदाही विचारत नाहीत. ते का?
सदा इतका मुरलेला पोलिस असूनही विग वाली बाई आणि रागिणीच्या चेहर्‍यात त्याला साम्य का सापडत नाही?
आय सी यु च्या बाहेरचा मोरे तेव्हा कुठे होता जेव्हा रागिणी हॉस्पिटलात अगदी आय सी यू मध्ये घुसून सातवला मारते तेव्हा?
बाकी वंदना गुप्ते, किरण करमरकर.. सर्वांची कामं अप्रतिम. पाठक नी थंड डोक्याचं निनावी पात्रं सुंदर रंगवलंय.
मला विवेक चं पात्रं (जय मल्हार मधला नारद) खूप डोक्यात गेला. त्याचे ओठ, डोळे आणि बोलायची स्टाईल अजिबात आवड्त नाही. टिपिकल पुरूषोत्तम करंडक चं भारावलेलं बोलणं वाटतं मला Sad पुरूषोत्तम् ची एक वेगळीच देहबोली असते तशी वाटते)
एकूण वेगवान कथानक, दिग्गज कलाकार, प्रभावी धक्कातंत्र... मजा येतेय पहायला.

नटुकाकी ची एक मागच्या कोणत्या तरी पानावरची पोस्ट अगदीच पटली, या सिरियल समोर झी मराठी च्या सगळ्या सिरियल्स पाचकळ वाटतायत.

रिपीट आज रात्री बारा वाजता लागला आणि मी मानबा बघत होते नेहेमीप्रमाणे साडेबारापर्यंत वेळ काढायला. हेही झीयुवाचं धक्कातंत्र दिसतंय सतत वेळ बदलूून प्रेक्षकांना हळहळायला लावणं Happy

अकाऊंटंट ची सेक्रेटरी आहे, तरी पण सदा किंवा सातव ची बायको तिला तु असें का केलेस असं एकदाही विचारत नाहीत. ते का? >> दक्षिणा, जेव्हा अ सा ची मुलगी रागिणीला रिपोर्टींग करताना टीव्ही वर बघते तेव्हा ती आपल्या आईला हीच ती घरी आलेली बाई हे सांगते. मग अ सा ची बायको पहिल्यांदा सदाला हे सर्व सांगते तेव्हा सदाची रिअ‍ॅक्शन दाखवलीये की हे रिपोर्टर लोकं बातमी मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातात. खोटं बोलून घरात घुसणं हा त्यातलाच एक मार्ग. ( रिपोर्टरपासूनचा त्रास वाचवण्यासाठीच त्या दोघींना त्यानी स्वतःच्या घरी आणलं आहे. )

सदाला संशय आला नाही रागिणीचा, विश्वास बसला तिच्या बोलण्यावर हे मला जरा पटत नाहीये. मोस्टली आला असेल संशय पण तो दाखवत नाहीये प्रकरण पुढे नेण्यासाठी. त्याच्या हातात ती केस नाही आणि वरीष्ठ दाबून टाकतायेत हे माहितेय त्याला त्यामुळे रागिणी हाच एक मार्ग आहे केस रिओपन करण्याचा, खणून काढण्याचा.

सदाला रागिणीचा संशय आलाय. बोलतानाही तो तिला शब्दात किंवा टाइमलाइनमधे पकडायला बघत असतो, ती गोलमाल करुन निसटायला बघते. ती निघून गेल्यावर सदा "थालीपीठ काय! " हे ज्या टोनमधे म्हणतो ते नीट ऐकलं तर शंका येते.
पण सध्या तरी तो तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याच्या डिपार्टमेंटवर गोळ्या मारुन भ्रष्टाचार/कव्हराप बाहेर काढायच्या विचारात आहे असे दिसते.
मस्त चाललीय मालिका.

ती निघून गेल्यावर सदा "थालीपीठ काय! " हे ज्या टोनमधे म्हणतो ते नीट ऐकलं तर शंका येते.
पण सध्या तरी तो तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याच्या डिपार्टमेंटवर गोळ्या मारुन भ्रष्टाचार/कव्हराप बाहेर काढायच्या विचारात आहे असे दिसते. >>+१

कालचा 'केळ्याचं पीठ' सीन आख्खाच्या आख्खा भारी होता एकदम !!

आणि ठरल्याप्रमाणे रिपोर्टिंग पार पाडल्यावर रागिणी दुसर्‍या दिवशी उशीरापर्यंत झोपते. तिच्या डोक्यावरचं एक मोठं ओझं उतरल्याचं किती सहज जाता-जाता सूचित केलंय!
वंदना गुप्तेनं पण काल अफाट केला सीन... `तुझं नावच आठवलं नाही' हे वाक्य अंगावर आलं अगदी! क्लायमॅक्सला याचा काही ना काही संदर्भ/उपयोग्/फायदा/तोटा/गोंधळ असणार नक्की.

आता चंदूदादानी उल्लेख केलाय ते नवीन पात्र येतंय की काय? (टायटल साँगमध्ये संदीप पाठकच्या जस्ट आधी एक दाढीवाला दाखवतात, तो अजून मालिकेत आलेला नाहीये.)

हो, आजचाही छान. पण एकदम सीबीआय वगैरे आणलेत.... मालिका संपण्याकडे वाटचाल सुरु झाली की काय ???? नको ........

वंदना गुप्तेनं पण काल अफाट केला सीन... `तुझं नावच आठवलं नाही' हे वाक्य अंगावर आलं अगदी! > अगदी अगदी

चंदुदादाचे शेवटचे वाक्य म्हणजे हायड्रोजन बौम्ब होता!

(टायटल साँगमध्ये संदीप पाठकच्या जस्ट आधी एक दाढीवाला दाखवतात, तो अजून मालिकेत आलेला नाहीये.) >> तो दाढीवाला म्हणजे रागिणीचा शेजारी आहे.

' संदिप ' पाठक डाव्या हाताने बंदुक चालवतो ! Happy

कालचा भाग छानच.. रागिणीचा अभिनय जबरदस्त.! सदासमोर काय अ‍ॅक्टींग करते ती.. सदाला खरं वाटलं की संशय आलाय हे अजून कळले नाही.पण बरोबर दिशेने जात असतो तो.. रागिणी चे कॉल रेकॉर्ड चेक केले तर समजेल ती चंदूदादाला फोन करायची. तो फक्त लोकेशन ट्रेस करतो..
बातमी तर फार भारी दिली तिने.. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली म्हणजे आता जो कुणी सगळ्यात वर आहे त्यांना पण दखल घ्यावीच लागेल. त्यांच्या हालचालींना वेग येईल. तिच्या जीवाला धोका आहे आता.
समन्वय चेतना मध्ये ह्या बातमीचा काय परिणाम होईल.. बहुतेक आता समजेल आपल्याला. यात कोण कोण इनवाॅल्व आहे ते...

चंदुदादाचे शेवटचे वाक्य म्हणजे हायड्रोजन बौम्ब होता! >>>>>>>> हा कोण "डावा" माणूस म्हणजे सदा काल ज्याच्या बरोबर गाडीत बोलत असतो तो तर नव्हे ?

Spoiler Alert . ...........................

.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.

माझा अंदाज - संदिप पाठक

चंदुकाका रागिणीला सांगतो की मी तुला आता मदत करु शकणार नाहि पण आम्हा तिघांची टीम होती - मी , बाबु आणी ' संदिप डावा '
तुला संदिप डावा मदत करेल

कालचा भाग खूप आवडला. एक शंका - आपल्याला ते पुरावे दिसले नाहीत टीव्ही वर, दाखवले कि नाहीत ? चक्क मंदार पण टाळ्या वाजवत होता.

धन्यवाद राहुल.
टीवीवर दाखवले असतील पण आपल्याला नाही दाखवले.

Pages