Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही नवीन सुचतंय का कोणाला...
काही नवीन सुचतंय का कोणाला...? वरचे पदार्थ अल्मोस्ट अघोषित अधिकृत मेनुच ठरलाय सगळ्या बड्डे पार्टीज चा..
स्मॉल साईज पिज्जा ऑप्शन
स्मॉल साईज पिज्जा ऑप्शन चांगलाय...
सात वर्षाच्या मुलांना काहीतरी
सात वर्षाच्या मुलांना काहीतरी 'फन फूड' आयटम्स आवडतील. जसे वेगळ्या आकाराच्या किंवा रंगीत इडल्या, चाट बास्केट्स. मधे फेबुवर एक व्हिडिओ पाहिला होता एका फास्ट फूड जॉइन्ट चा. पाणीपुरीच्या पुर्या वापरून फ्युजन चाट/ पिझा.
म्हणजे पाणीपुरीच्या पुर्यांमधे मरिनरा सॉस, स्वीट कॉर्न, सिमला मिर्ची, कांद्याचे छोटे तुकडे असे मिश्रण घालून वरून चीज घालाय्चे आणि फूड टोर्च ने ते झटपट मेल्ट करुन सर्व केले होते. असले मस्त दिसत होते!! हे असले काहीतरी, सोबत केक पॉप्स, आइस्क्रीम कोन्स आणून ऐन वेळी आइसक्रीम आणि त्यावर वेगवेगळी टॉपिंग्स घालून देता येतील.
जबरा आयड्या मै..... ट्राय
जबरा आयड्या मै..... ट्राय करेन्गा अपुन..!
साबुदाणा वडे- चटणी व फ्रूट
साबुदाणा वडे- चटणी व फ्रूट सॅलड, हाका नूडल्स आणि मांचुरिअन बॉल्स किंवा चॉप स्युई व स्वीट कस्टर्ड , पास्ता आणि गार्लिक ब्रेड व पाईनॅपल पुडींग, ढोकळा, फाफडा, दही पुरी व जिलबी , अथवा दहिवडे, पुलाव व चॉकलेट मूस.......!
मै ची आयडिया आवडली. पुढच्या
मै ची आयडिया आवडली. पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा केलाच तर अमंलात आणू.
आइसक्रिम ऐवजी स्पंज केक + कस्टर्ड चे रंगिबेरंगी लेयर्ड डेझर्ट वेगवेगळ्या टॉपिंग्ज घालून... मेसन जार्स मध्ये. ( हल्ली इथे क्युट डिझाइन्सचे मेसन जार्स आणि काचेच्या बॉटल्स मिळायला लागलेय)
वाढदिवसाला केक पॉप्स करता
वाढदिवसाला केक पॉप्स करता येतील. वेगवेगळ्या सॉसेस (चॉकोलेट, व्हाईट चॉकोलेट, स्ट्रॉबेरी, मँगो इ) घोळवून फ्रीज केले तर भारी वाटतील.
तिकडे (म्हणजे नानाकळांचं
तिकडे (म्हणजे नानाकळांचं मुक्काम पोस्ट जिथे असेल तिथे) स्ट्रॉबेरीज मिळत असतील आत्ता तर चॉकलेट मेल्ट करुन स्ट्रॉबेरीज skewers मध्ये टोचून चॉकलेट सॉसमध्ये डीप करुन फ्रिजला टाकून गारेगार करुन खायला द्यायच्या.
अशा- https://m.ediblearrangements.com/fruit-gifts/chocolate-dipped-strawberri...@ADL412%20Count-adType%5EPLA
यातला कुठला पदार्थ आवडतो का
यातला कुठला पदार्थ आवडतो का बघा.
फ्रुट कबाब (फ्रुट्स कट करून एकामागे एक बांबु स्टीक वर लाऊन): अननस, द्राक्षे जी काही भारतात आत्ता फळ मिळतात ती
मिनी इडल्या किंवा पॅनकेक्स
पास्ता/मॅकरोनी चीज
मिनी पिज्झा
आईसक्रीम बार : दोन प्रकारचे आईसक्रीम , टॉपिंग्ज : वेगवेगळी फळाचे तुकडे, ओरिओ कुकीज तुकडे, गमी बेअर्स,कँडीज, चॉकोलेट चिप्स, ग्रनोला इत्यादी
आमच्याकडे आईसक्रीम बार हिट असतो. फोटो आहेत माझ्याकडे का बघते.
कुमारीका पूजन आणि त्यान्च्या
कुमारीका पूजन आणि त्यान्च्या आयाना हळदी कुन्कू चा प्लान करतेय... काय मेन्यू ठेवावा ?
झटपट होइल असा ?
मी कुठल्या कुठल्या फंक्शनला
मी कुठल्या कुठल्या फंक्शनला केलेले काही काँबिनेशन्स. अगदी झटपट वाले नाहीत. पण थोडी पूर्वतयारी करून ठेवली तर करता येतील.
१. विकतचा चिवडा (लक्ष्मीनारायण, बटाटा उपासाचा, मक्याचा) - बाकरवडि, घरी केलेला लाडु किंवा नारळाची वडी किंवा काजुकतली किंवा बेसन बर्फी
२. ढोकळा किंवा ईडली चटणी - जिलेबी
३. छोले पुरी, दहीभात, गुलाबजाम (हेवी पाहिजे तर)
४. लेमन राईस, तिखट्मीठ पुरी, चटणी
५. समोसा - वरील १ नं मधले गोड पदार्थ
६. चाट आयटेम्स , कापलेली फळे
७. साबुदाणा खिचडी, खजूर दाण्याचा लाडु
८. उपमा - शेवया, रवा - सुरळी वडी, लाडु,
बघा कोणते उपयोगी पडते का?
एक विकत एक बाहेरचे असं केलं तर होईल पटकन.
दिवाळी पार्टयांचे मेनू ठरले
दिवाळी पार्टयांचे मेनू ठरले का लोक्स? इथे शेअर करा की एकेक.
आलू पराठे , दही+ बटर +चटणी, व्हेज पुलाव, टोमॅटो सार, गाजर हलवा, आईस्क्रिम हा बेत कसा आहे? या सोबत (सोपा) फरसाण आयटम काय ? आईस्क्रीम सोडून सगळं घरीच करणार.
आणि अजून एक मेनू - दिवाळी फराळ गोड व तिखट, गोड शिरा, पाव भाजी, आईस्क्रीम/मिल्कशेक. हे इनफ होईल ना?
बाप रे सनव....पाव भाजी आणि
बाप रे सनव....पाव भाजी आणि शिरा...आणि प्लस फराळ....... खूप जास्ती जास्तीतसेच आलू पराठे गरमच चांगले लागतात व इतके वेळे वर पटापटा करणे शक्य नाही.
फरसाण आयटेम म्हणजे - छोटे समोसे ग्रीनचे, ढोकळा, फापडा- चटणी, मसाला पापड, एस पीडी पी,
आमच्याकडे दिवाळी फराळाचा
आमच्याकडे दिवाळी फराळाचा सगळ्यात आवडता मेनु म्हणजे मिसळ पाव
मिसळ मद्धे घालायला, शेव्,चिवडा,चकली ,खारी बुन्दी असे अनेको प्रकार असतातच.
त्याच्या सोबत शेवटी द्यायला दहीभात.
आणि मग आईस्क्रीम ..
फराळाची मिसळपाव दिवाळी
फराळाची मिसळ दिवाळी संपल्यावर ना? फराळ संपवायला?
धन्यवाद! भारीच आयड्या
धन्यवाद! भारीच आयड्या मिळाल्यात सगळ्या..
आलुपराठे करून ठेवायचे तेल/तूप
आलुपराठे करून ठेवायचे तेल/तूप/बटर न लावता वेळेवर दोन तवे ठेवून तेल/तूप/बटर लावून शेकून द्यायचे.
15 लोक्स भाऊबीज: पैटीस, पाईन एपल रायता, मां की दाल जीरा राईस फ्रुट कस्टर्ड (आदल्या दिवशी करणार) वर सांगितल्याप्रमाणे मुगलाई पराठे. भाजी सुचवा लिंकसहीत. तवाभाजी मसाला मिळाला नाही त्यामुळे रद्द
कोणत्याही प्रकारे केलेली
कोणत्याही प्रकारे केलेली मिक्स व्हेज (कोल्हापुरी, हंडी वैगेरे) किंवा मग तवा-भाजी च्या मसाल्याची रेसिपी पण मिळेल ऑनलाइन:)
https://www.google.co.in/amp/www.vegrecipesofindia.com/veg-kolhapuri-rec...
https://www.google.co.in/amp/www.vegrecipesofindia.com/veg-handi-recipe-...
Ingredients for the tawa masala
2 tsp coriander seeds
2 tbsp fennel seeds (saunf)
2 tsp cumin seeds
2 tsp methi seeds
2 tsp onion seeds (kalonji)
2 tsp pomegranate seeds (anardana)
A pinch of asafoetida
2 dried red chilli
1 tsp turmeric powder
2 tsp mango powder
Thanks Rajasi
Thanks Rajasi
आलुपराठे करून ठेवायचे तेल/तूप
आलुपराठे करून ठेवायचे तेल/तूप/बटर न लावता वेळेवर दोन तवे ठेवून तेल/तूप/बटर लावून शेकून द्यायचे.>>>> हेच लिहिणार होते. आमच्याकडे दिवाळीत रोजच वेगवेगळे स्टफ पराठे असतात( २५+ लोकांसाठी ). पराठे करणारी व्यक्ती सकाळीच ६०-६५ पराठे करून कोरडे भाजून ठेवते. आणि मग तव्यावर भरपूर तुप घालूब गरम गरम तळून देतात.
युक्ती सुचवा धागा कसा शोधायचा
युक्ती सुचवा धागा कसा शोधायचा?
तो मिळाला नाही म्हणून इथे विचारते.
एका पॉटलकला ६० साबु वडे करायचे आहेत. संध्याकाळी ७ ला खायचे आहेत. ४ ला करून ठेवले तर गरम करताना ओव्हनमध्ये किती वेळ काय टेम्प ला ठेवायचे ? कुरकुरीत राहतात का की वातड होतात...कोणाचा अनुभव असेल तर त्याप्रमाणे करता येईल. नाहीतर मग ऐन वेळी.
साबु वडे अप्पे पात्रात घडणार आहेत.
साबु वडे, तयार करून ट्रेमध्ये
साबु वडे, तयार करून ट्रेमध्ये लावून फ्रीज मध्ये आदल्या दिवशी करून ठेवता येतील. तळलेले जास्त चांगले लागतील, शॅलो-फ्रायपेक्शा.
आयत्याच वेळी तळलेले बरे, सोय असेल तर. चव, कुरकुरीतपणा आणि ताजेपणा यातच राहील. कुठल्याही प्रकारे री-हीट केलेला तळणीचा प्रकार फारसा चांगला नाही लागत. गरमागरम तळलेला प्रकार एकदम भाव खाईल.
माझ्या माहितीत तरी करून
माझ्या माहितीत तरी करून ठेवलेले साबुवडे वातड होतात . करताना माझं चुकत असेल तर काही कल्पना नाही
अप्पेपात्राचं आत्ता वाचलं, हो हो वात्तड होणारच.
माझं मत पण योकु सारखच.
माझं मत पण योकु सारखच. साबुदाणा वड्यात काहीही हेल्दी नाही तर उगाच आप्पेपात्रात कशाला. खायचेच आहे आवडीचं जंक तर चव तर मस्त हवी. होउ दे खर्च!
इतका आगाउ सल्ला केवळ चिवा आहे
इतका आगाउ सल्ला केवळ चिवा आहे रिसिविंग एंडला म्हणून देते आहे हां
>> साबुदाणा वड्यात काहीही
>> साबुदाणा वड्यात काहीही हेल्दी नाही तर उगाच आप्पेपात्रात कशाला
किनोवीय साबुदाणा वडे बटाट्याऐवजी कच्चं केळं किंवा रताळं घालून आप्पेपात्रात केले तर?
किनोवीय साबुदाणा वडे
किनोवीय साबुदाणा वडे आप्पेपात्रात केले तर? >>> तर ते ठीक होइल. तू कर रेसिपी लिही आणि फोटो टाक बरं.
हां. तळून करायची भीती वाटते.
हां. तळून करायची भीती वाटते. फुटले तर फारच पोपट होतो. अप्पे पात्रात आत्तापर्यंत चवदार, कुरकुरीत झाले.
शुम्पे, अगं हेल्दी म्हणून नाही, आळशीपणा म्हणून. अ पा मध्ये एकावेळी टपकन बारा होतात. दोन चार तळत बसायला बोअर होईल.
अ पा मध्ये ताजे करते मग. पाच वेळा टपकावले की काम होईल.
आभार सर्वांचे.
आप्पे पात्रात करणं वेळखाऊ
आप्पे पात्रात करणं वेळखाऊ नाही का मोठ्या कढईत तळण्यापेक्षा?
(माझ्याकडे आप्पे पात्र नाही त्यामुळे अजिबात स्वानुभव नाही मात्र आईकडे असेपर्यंत तिला फक्त ७ आप्पे एका वेळेला होऊ शकणारं पात्र वापरताना बघितलं आहे आणि त्यात आप्पे करणं म्हणजे अति वेळखाऊ काम विथ व्हेरी लो यील्ड अॅट अ टाईम एव्हढंच इम्प्रेशन टिकून आहे माझ्या मनात)
आप्पे करणं म्हणजे अति वेळखाऊ
आप्पे करणं म्हणजे अति वेळखाऊ काम>>>> हे मात्र आहे. एकदा हळदीकुंकुवाच्या समारंभाला आप्पे -चटणि मेनू ठेवला होता. मैत्रीण आली होती मदतीला पण मी बाकिच्या कामात बिझी असल्याने तिला आप्पेकामाला लावले होते तर मला दम भरत होती हे असलं किचकट आप्पे प्रकरण कशाला ठेवलंयस म्हणून...
Pages