अश्वत्थामा

Submitted by अनन्त्_यात्री on 20 September, 2017 - 23:45

थांब, आलोच
आतले कढ आवरून सावरून
ठसठसणारं मेमरी कार्ड फॉरमॅट करून
शहाणा मुखवटा चपखल बसवून
आलोच.

येतो- झाकून, तू दिलेल्या भळभळत्या जखमा
येतो- क्षणभर विसरून, की मी चिरंजीव अश्वत्थामा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!..
पण अश्वत्थामा म्हणजे काय सांगाल का??

नेहेमीप्रमाणे शब्दांचा चपखल वापर! आवडली रचना.
येतो- क्षणभर विसरून, की मी चिरंजीव अश्वत्थामा>>>
या ठिकाणी,
"येतो- क्षणभर विसरून, की मी चिरंजीव *मी*अश्वत्थामा"
हा बदल केलांत तर दोन अर्थ निघतील.
(१- चिरंजीव (जो आपल्याला ऑलरेडी अभिप्रेत आहे.) २- अश्वत्थामा= वेदना)
शेवटी बदल करण्याचा अधिकार आपलाच. Happy

@मेघा, अश्वत्थामा ही महाभारतामधील एक व्यक्तीरेखा आहे. गुरू द्रोणाचार्यांचा बुद्धिमान पण शापित पुत्र आणि सप्तचिरंजीवांपैकी एक ज्याला महाभारतातील धर्मयुद्धानंतर कृष्णानं शाप दिला, अर्जुनाच्या बाणानं माथ्यावर झालेली भळभळती जखम घेऊन तो आजही रानोमाळ हिंडतो आहे, त्या जखमेवर लावण्यासाठी लोकांना तेल मागतो असं सांगितलं जातं.

-राहुल, अश्वत्थामा या व्यक्तिरेखेची नेमकी माहिती तुम्ही दिलीय. धन्यवाद!
-जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या प्रतारणेत होरपळणाऱ्या माझ्या एका सुहृदाची रोजच्या वास्तवाला सामोरं जाताना होणारी तगमग व त्याचवेळी कराव्या लागणार्‍या तडजोडींची सार्वकालिकता मांडण्याचा प्रयत्न मी "अश्वत्थामा" मध्ये केलाय.

चांगली आहे

सप्तचिरंजीवांपैकी। >>> बाकीचे सहा कोण?

काही संदर्भ पुस्तके वगैरे असतील तर सांगा