कामावरून घरी आलो की माझा आवडता उद्योग म्हणजे हेडफोन आणि फुल्ल आवाजात गाणी. एकदा कामाच्या दोन चार दिवस सतत लोड नंतर दमून भागून घरी आल्यावर हेडफोन शोधायला गेलो तर सॅक मधून हेडफोन गायब !!!!!
डोक्यात आलेला पहिला विचार म्हणजे ह्या क्लिनिंग स्टाफ पैकी कोणीतरी ढापला बहुतेक....
लगेच आलेला दुसरा विचार म्हणजे हाच विचार माझ्या डोक्यात सर्वप्रथम का यावा ?. Lets zoom in there....
क्लिनिंग स्टाफ पैकी कोणीतरी हा उद्योग केला या विचाराच्या मागे असलेली (चुकीची) गृहीतके...
ते गरीब असतात, व्यसनी असतात, छोट्या मोठ्या गोष्टी लांबवणे आणि नंतर त्या विकून थोडे फार पैसे कमावणे यात त्यांना काही गैर वाटत नाही, हे लोक तसलेच असतात वगैरे वगैरे
हे काम रूम मध्ये येणाऱ्या दोन चार लोकांपैकी कोणाचेही असू शकते, मी स्वतः कुठं तरी तो हेडफोन विसरल्याची, कोणाला तरी वापरायला दिल्याची आणि नंतर विसरल्याची, हेडफोन कुठे तरी बेडखाली/कपाटात पडला असल्याची अशा अनेक शक्यता असताना माझ्या मनात आलेला पहिला विचार म्हणजे क्लिनिंग स्टाफ पैकी कोणी तरी हेडफोन ढापला.... हाच विचार पहिला येणे चुकीचे आहे. मी सर्व शक्यतांचा विचार करून मगच या निर्णयाप्रत येणे अपेक्षित आहे. पुढच्या वेळेस ही चूक होता कामा नये.
हा संशय जसा मनात कुठे तरी खोल लपून बसला आहे तसंच राग, लोभ, असूया, द्वेष, मत्सर, न्यूनगंड कुठे तरी खोल दडून बसले आहेत. अचानक कुठेतरी वर येऊन आपला चमत्कार दाखवून जातात आणि मला नंतर कितीतरी वेळ ओशाळवणे वाटत राहते. आजकाल जेव्हा कधी कधी हे होईल तेव्हा मी त्याच्या मुळाशी जात जात नेमका माझ्या डोक्यात हेच का आलं, किंवा मी एखाद्या प्रसंगात असाच का वागलो, हेच का बोललो हे शोधायचा प्रयत्न केला की मनात लपून बसलेली एखादी छोटीशी गोष्ट सापडते ज्याच्यामुळे मी असा वागलो. ती त्या व्यक्तीशी, प्रसंगाशी, स्थानाशी, माझ्या मनातील/विचारातील दोषाशी या पैकी कशाशीही किंवा सर्वांशी संबंधित असू शकते. अशा चुकीच्या भावना, असे विचार zoom in करून करून शोधून काढून टाकायला हवे....
Zoom out.....
मी करियरच्या सुरुवाती पासून हेवी इंजिनिअरिंग आणि तेल वायू क्षेत्रा संबंधित कंपन्यांमध्येच काम केले. या सगळ्या ठिकाणी कामाचे कायम प्रेशर असते, डेडलाईन पाळणे खूप महत्वाचे असते. डेडलाईन मिस झाल्या तर लाखात लॉस असतो. डेडलाईनच्या आधी काम क्वालिटी कंट्रोल चेक करून पूर्ण करून देणे खूप महत्वाचे असते. यातून कामाचे लांबलेले तास, ताण, झोप आणि आहार या कडे दुर्लक्ष, व्यसने यामुळे शॉप फ्लोअर वरचा स्टाफ कित्येकदा खूप चिडचिडा होतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून कधी कधी भयानक वादविवाद, आवाज चढवून भांडणे वगैरे होतात. या वातावरणात एक चार पाच वर्षे काढल्यावर मला जाणवायला लागले की मी छोट्या छोट्या गोष्टींवर पण खूप रिऍक्ट होतो. एका ठराविक काळानंतर जर परत त्या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येते की ती गोष्ट मुळातच तेवढी महत्वाची, क्रिटिकल किंवा अवघड नव्हती. जरा वेगळा approach घेतला असता तर सहज सोप्पे पर्याय शोधता आले असते. थोडं त्या प्रसंगातून बाहेर पडून विचार करायला हवा.
नंतर अजून विचार करता करता वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींना पण हाच फंडा लागू होतो हे सुद्धा लगेच कळले.
मित्र, नातेवाईक, बायको, समाज यांच्यात काही गोष्टी/दोष हे आहेत आणि असणारच आहेत. त्यावर वाद घालून, चिडचिड करून, समोरच्याला टोचून बोलून काही बदल होत नाही फक्त ती माणसे दुरावतात. आणि कधी कधी मुळातून ज्या गोष्टींवरून वाद, चिडचिड सुरू झाली ती इतकी मोठी नसतेच.
So what's the solution ???? Simple, Just zoom out....
या इतक्या मोठ्या विश्वात सात साडेसात बिलियन लोकांमध्ये, मी कोण, माझी मते/माझे विचार, माझे अनुभव विश्व याची इनमीन मर्यादा किती... इतक्या छोट्या प्रसंगाचे शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इफेक्ट्स किती....
मी आहे तिथून माझं घर, रस्ता, उपनगर,शहर, तालुका, राज्य, देश, खंड, हे जग, त्या जगात सात साडेसात बिलियन लोक, ते पण एका पृथ्वी वर जिथे कितीतरी लाखो वर्षे असंख्य माणसे जगली आणि मेली, ती पृथ्वी एका सौर्यमंडळात, ते सौर्य मंडळ एकाद्या गॅलक्सी मध्ये, ते एखाद्या आकाशगंगेमध्ये अँड सो ऑन....
वेळेचे बघायला गेलं तर एक क्षण, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, तप आपलं सगळं आयुष्य....
आजकाल मी कोणत्याही प्रसंगी राग आला, डिप्रेस झालो, वैतागलो की स्पेस आणि टाइम मध्ये स्वतःला zoom out करत जातो...असा नक्की काय फरक पडतो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी, कशाला उगाच जास्त रिऍक्ट व्हायचं आणि बोलून समोरच्याला दुखवायचं? Just let it go... Chill...Relax...
आताशा मी बरीच कमी चिडचिड करायला लागलो आहे, कपाळावरच्या आठ्या पण हळूहळू कमी व्हायला लागल्या आहेत, बऱ्याच गोष्टी नुसता हसून सोडून द्यायला लागलो आहे. अजून पण कधी कधी सटकतो पण पूर्वपदावर येण्याचा काळ काही मिनिटांवर येऊ लागला आहे..... बऱ्याच सुधारणा होत आहेत...
जाता जाता, शेवटी इतक्या मोठा लेख पाडल्यावर त्याचे चार ओळीत सार म्हणजे....
तुमच्या मनात जर एखादा चुकीचा किंवा वाईट विचार आला तर त्याच्यावर zoom in करा, तो मुळातच कुठून आणि का आला ते शोधा आणि नष्ट करा...
जर चिडला असाल, सगळ्या जगावर/स्वतःवर वैतागला असाल, डिप्रेस असाल तर जस्ट zoom out.... इतक्या मोठया विश्वात, अनादी अनंत काळामध्ये, एखाद्या प्रसंगाचा रिलेव्हनस किती, त्याचा परिणाम किती... या क्षणभंगुर आयुष्यात याचा किती लोड घ्यायचा हा विचार करा. Just relax.... Calm down and then act !!!
तुमच्या मनात जर एखादा चुकीचा
तुमच्या मनात जर एखादा चुकीचा किंवा वाईट विचार आला तर त्याच्यावर zoom in करा, तो मुळातच कुठून आणि का आला ते शोधा आणि नष्ट करा...जर चिडला असाल, सगळ्या जगावर/स्वतःवर वैतागला असाल, डिप्रेस असाल तर जस्ट zoom out.... इतक्यामोठया विश्वात, अनादी अनंत काळामध्ये, एखाद्या प्रसंगाचा रिलेव्हनस किती, त्याचा परिणाम किती...या क्षणभंगुर आयुष्यात याचा किती लोड घ्यायचा हाविचार करा. Just relax.... Calm down and then act !!!.>>>>
+++१११
मस्त वाटलं हे.
मस्त वाटलं हे.
मस्त लेख समर्पक शिर्षक
मस्त लेख समर्पक शिर्षक
नित्य जीवनात प्रत्येक क्षणी
नित्य जीवनात प्रत्येक क्षणी विचारपूर्वक जाणीव करवून देणारा अतिशय छान लेख
छान आहे लेख!!
छान आहे लेख!!
मस्त लेख समर्पक शिर्षक >> +१
मस्त लेख समर्पक शिर्षक >> +१
लेख आवडला.
लेख आवडला.
मी आहे तिथून माझं घर, रस्ता,
मी आहे तिथून माझं घर, रस्ता, उपनगर,शहर, तालुका, राज्य, देश, खंड, हे जग, त्या जगात सात साडेसात बिलियन लोक, ते पण एका पृथ्वी वर जिथे कितीतरी लाखो वर्षे असंख्य माणसे जगली आणि मेली, ती पृथ्वी एका सौर्यमंडळात, ते सौर्य मंडळ एकाद्या गॅलक्सी मध्ये, ते एखाद्या आकाशगंगेमध्ये अँड सो ऑन.... >> पटल ....
https://thelegacybuilder.files.wordpress.com/2012/04/youarehere.jpg
मस्त लेख!
मस्त लेख!
आपले म्हणणे अगदी खरे आहे.
छान विचार आहेत! पटलंच. चिडचिड
छान विचार आहेत! पटलंच. चिडचिड होत असेल तर मीही "what really matters?" असा प्रश्न स्वतःला विचारते. असा विचार केल्यास नक्की उपयोग होतो.
सहीच!!!
सहीच!!!
छान आहे लेख.
छान आहे लेख.
सविस्तर नंतर लिहितो. किंबहुना मागच्याच आठवड्यात याच्याच आसपासच्या विषयावर म्हणजे डोके शांत कसे ठेवावे यावर लिहायचा विचार करतच होतो. पण दोन ओळी खरडल्या आणि ते राहिलेच. जमल्यास ते पुर्ण करेन.
छान लेख
छान लेख
या क्षणभंगुर आयुष्यात याचा किती लोड घ्यायचा हा विचार करा. Just relax.... Calm down and then act !!!>>>> अगदी पटलं...
तुका ह्मणे होय मनासी संवाद ।
तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी___/\____
छान . मस्त आहे हे zoom in
छान . मस्त आहे हे zoom in and zoom out
मस्त लेख!
मस्त लेख!
टेन्शन नहीं लेनेका मामू !!
टेन्शन नहीं लेनेका मामू !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त लेखं , मी हे करण्याचा
मस्त लेखं , मी हे करण्याचा प्रयत्न करतोय . पटकन आलेली रिएक्शन आणि थोड़ा वेळ थांबुन घेतलेली एक्शन यामध्ये नक्कीच बराच फरक पडतो .
जी, +१
जी, +१
म्हणुनच काउंट टु १० बिफोर यु
म्हणुनच काउंट टु १० बिफोर यु स्पिक ...
छान लेख.
छान लेख.
उत्तम लेख
उत्तम लेख
मस्त लेख!
मस्त लेख!
सर्वाना धन्यवाद
सर्वाना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोक्या, तुमच्या त्या फोटोतल्या लिंक वरून https://youtu.be/e1FisCdAW0c हा व्हिडीओ आठवला.
अणू रेणू पासून ते आकाशगंगे पर्यंत...... zoom in ..... Zoom out....
मस्त लेख!
मस्त लेख!
मस्त लेख! अगदी पटलाच..अणू
मस्त लेख! अगदी पटलाच..अणू रेणू पासून ते आकाशगंगे पर्यंत...... zoom in ..... Zoom out....
मस्त लेख!
मस्त लेख!
' झूम ईन-- झूम आऊट' परफेक्ट
' झूम ईन-- झूम आऊट' परफेक्ट लिहल आहे. आवडल.