Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना.
हो ना.
धूरत झालेला पण मस्त संवादफेक
धूरत झालेला पण मस्त संवादफेक करतो. उगाच टाईट स्वाभिमानी पोलीस दाखवत बसला नाहीये. योग्य तितके भाव असतात बोलण्यात.
मला एक डाऊट येतोय की सातवची
मला एक डाऊट येतोय की सातवची मुलगी अडकेल का याच्यात. तिला सगळं खोटं वाटतंय ना. पण समहाऊ स्टोरी अशी वळवतील की काय असा डाऊट येतोय मला.
चंपा खरच. पु.भा. पाहुन झालं.
चंपा खरच. पु.भा. पाहुन झालं..
५ लाख तिला किती सहजपणे मिळाले. संपादका ला काही आवडलेलं दिसत नाही. रा कानामागुन येऊन तिखट होत चाललीये.
dr. मित्राने ही पटकन रिपोर्ट्स देऊन टाकले धुरत ला. पण धुरत ने साहेबाला का दिले, तो विरोधात आहे माहित असताना? त्याला ओरिजनल रिपोर्ट्स मिळाले स्वतःकडेच ठेवुन तपास चालू ठेवता आला असता ना.
धुरत ने साहेबाला का दिले, तो
धुरत ने साहेबाला का दिले, तो विरोधात आहे माहित असताना? त्याला ओरिजनल रिपोर्ट्स मिळाले स्वतःकडेच ठेवुन तपास चालू ठेवता आला असता ना.>> धुरतने एक copy स्वतः कडे नक्कीच ठेवली असणार. सगळंच देऊन टाकायला ती काय नेहमीची बिनडोक मालिका नाही आहे.
पण एक गोष्ट मात्र नक्की, असं सरळ सरळ भीडल्यामुळे सदाची उचलबांगडी होऊ शकते.
रागिणीला पोलीस कसे operate
रागिणीला पोलीस कसे operate करतात माहीत नसते तरी चंदूदादांना माहीत हवे. त्यांनी असा चुकीचा सल्ला कसा काय दिला. पोलीस स्केच बनवणार त्यांना कळायला हवे. बघू आता बाईसाहेब वाघाच्या गुहेतून कशा वाचतात ते.
धूरत झालेला पण मस्त संवादफेक
धूरत झालेला पण मस्त संवादफेक करतो. उगाच टाईट स्वाभिमानी पोलीस दाखवत बसला नाहीये. योग्य तितके भाव असतात बोलण्यात.>>+ १
एकदम नॅचरल
मला एक डाऊट येतोय की सातवची मुलगी अडकेल का याच्यात. तिला सगळं खोटं वाटतंय ना>>> मलाही तसेच वाटले.
धुरतने एक copy स्वतः कडे नक्कीच ठेवली असणार. सगळंच देऊन टाकायला ती काय नेहमीची बिनडोक मालिका नाही आहे. Wink >>
पण एक गोष्ट मात्र नक्की, असं
पण एक गोष्ट मात्र नक्की, असं सरळ सरळ भीडल्यामुळे सदाची उचलबांगडी होऊ शकते >> हो.
पुभामध्ये असे काही दाखवतात की आपल्याला चैन पडू नये. राचं काय होणार हे समजायला साडेनवाची वाट पहावी लागेल.
>> अगदी अगदी
सातवच्या खुनाचे पोस्ट मार्टेम
सातवच्या खुनाचे पोस्ट मार्टेम दाखवले का ? ख्नुनाचे कारण ? एक उगीचच नवीन शंका!
सातव हॉस्पिटलात डॉक्टर
सातव हॉस्पिटलात डॉक्टर देखरेखीखाली मेला ना,त्यामुळे पोस्ट मार्टेम केले नसावे.
पोमा करणाऱ्या डॉक्टरचे वागणे तितकेसे पटले नाही. अगदी वाटच पाहत होता धुरतची असे वाटले
रागिणी आता कदाचित धुरतच्या
रागिणी आता कदाचित धुरतच्या रडारवर येईल. आपले साहेब पोखरलेत हे त्याला कळलंय. त्याने रागिणीची झाडाझडती घेऊन तिचे सहकार्य घेऊन पुढे जायचे ठरवले तर चांगले होईल. नाहीतर आजवर रागिणी केवळ लक बाय चान्सने यशस्वी झालीय. पण यापुढे तो अप्रोच चालणार नाही.
चंदूदादांना माहीत हवे.
चंदूदादांना माहीत हवे. त्यांनी असा चुकीचा सल्ला कसा काय दिला. >>> चंदूदादा बरोबर बोलले की. त्यांनी आधी रा ला विचारुन घेतलं की ती कुठे सी सी टी व्ही कॅमेरासमोर आली होती का? तेव्हा रा सांगते की चेहरा दिसणार नाही याची तिनी काळजी घेतली होती. तेव्हा चंदूदादांचा सल्ला चुकीचा नाही.
सदा धुरत आता सुरवातीपेक्षा खूप सावध झाला आहे. आज तो त्याचा बॉसला पो. मा. चे रिपोर्ट देतो आणि सिस्टीम सगळी कशी पोखरलेली आहे वगैरे कमेंट करतो तेव्हा तो ज्या पद्धतीनी बॉसकडे कडे बघत असतो, ती नजर सांगत होती की त्याला बॉसचा संशय आला आहे. तो अभिनय खूप छान होता.
ती नजर सांगत होती की त्याला
ती नजर सांगत होती की त्याला बॉसचा संशय आला आहे. तो अभिनय खूप छान होता. >> आणी शेवटचे जयहिंद !
धुरतचे करियर सेट झाले आता इन्स्पेक्टर म्हणुन !
रागिणी आणि धुरत जीवावर उदार
रागिणी आणि धुरत जीवावर उदार होऊन सगळं करतायत.
चंदुदादा आणखी एक चुकीचा सल्ला देतो.. अभयच्या मोबाईल वरुन फोन करण्याचा.. आणि एवढा मेकअप आर्टिस्ट आहे तर दुसरा विग बनवून दिला असता तर..
अभयच्या बायकोचे वागणे संशयास्पद वाटत नाही का? पहिले किती आकांडतांडव केलेला तिने आणि आता खुनीचा स्केचही बघायला तयार नाही.
अभयच्या बायकोचे वागणे
अभयच्या बायकोचे वागणे संशयास्पद वाटत नाही का? >> सुरवातीच्या एपिसोडच्या तुलनेत गेले काहि एपिसोड मध्ये काही चुका झाल्या आहेत असे वाटते. पण उत्सुकता कायम ठेवली आहे.
कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी
कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी नर्सने पाहिलंय तेही 2दा. तीच नर्स सातवला अटेंड करत होती. पोलीस तिच्याशी बोलणे किंवा तिने पोलिसांशी बोलणे ह्या शक्यता ह्या दोघांनी विचारात घेणे आवश्यक होते. पोलीस गुन्हेगारांचे स्केच बनवतात हे स्वतः त्यात करियर करणाऱ्याला माहीत असणे अपेक्षित आहे. आणि स्केच बनवणे ही हल्लीची टेक्नॉलॉजि नाहीय. चंदूदादाना हे माहिती हवे होते.
सदाचा काम मलाही खूप आवडलं.
सदाचा काम मलाही खूप आवडलं. जीवावर उदार होऊन काम करणारा पोलीस आॅफिसर छान उभा केलाय त्याने.
रागिणी आता न्यूज चॅनेलला काय स्पष्टीकरण देणार काय माहित. पुढील भागात पाहून.. कपाळावर हात मारून घेतला. आजचा भाग बघेपर्यंत चैन पडणार नाही..
सर्वांना अनुमोदन. इझीली ५ लाख
सर्वांना अनुमोदन. इझीली ५ लाख मिळणं, विग घालून रागिणीला अभयच्या बायकोला भेटायचा दिलेला सल्ला, डॉक्टरने लगेचच पो.मा. रिपोर्ट्स धुरतला देणं- जरा घाईघाईच झाली काल.
सातवच्या बेसमेन्टमधे एक मुलगी होती, जी बडबड करत होती, तिला संदीप पाठकने किडनॅप करून स्वतःजवळ ठेवलं असावं असं मला उगाचच वाटतंय.
आपला नवरा काय करत होता ते
आपला नवरा काय करत होता ते कळल्यावर तिचे मन तिरस्काराने भरून गेले. तिला तो विषय नकोय आता आयुष्यात.
यांचे टायमिंग परत गंडतेय. रागिणी पोलिसाला भेटली, दादांना भेटली, वेष बदलला, हे वेषांतर ती घरी करू शकत नाही आई घरी असल्याने, म्हणजे तिने सेफ जागा पाहून हे केले. तिकडे धुरत बहिणीला स्केच देतो, मुलगीही घरात नाहीय आणि आता रागिणी पत्ता शोधून घरी जाऊन धडकणार. किती वेळ लागला हे सगळे करायला?
रागिणी अजून पोचली नाहीये
रागिणी अजून पोचली नाहीये सातवकडे. ते काल 'उद्याच्या भागात' म्हणून दाखवलं आहे. आज जाईल ती. म्हणजे दुसरा दिवस. त्यातही ती सातवच्या घरी जाणार आहे, तिला माहित नाहीये की ते धुरतकडे शिफ्ट झालेत ते.
जरा घाई होतेय खरी, पण या रोज घडणा-या घटना आहेत असं आपण मानायचं काही कारण नाही. मध्ये काही दिवस जातही असतील.
शेजारीण सांगते की पोलीस
शेजारीण सांगते की पोलीस भावाच्या घरी शिफ्ट झालीत माय लेकरे म्हणून.
हो, हे सगळे एकाच वेळी घडते असे मानायला नको, पण काही गोष्टी अगदीच नजरेत खुपतात.
काल त्या शेजारच्या बाईने
काल त्या शेजारच्या बाईने सांगितलं ना रा ला ते भावाकडे िशफ्ट झालेत म्हणुन.
चंदुदादांनी फोन on करायचा व विग घालायचा सल्ला देणं चुकलच. रा ला तरी आठवायला पाहिजे नर्सने आपल्याला विग घालुन पाहिलय.
नाहीतर पु.भा. मधे रा जेो जिना चढताना दाखवलीये तो स्वतःच्याच घरचा असेल किंवा आणखी तिसराच.
पण या रोज घडणा-या घटना आहेत
पण या रोज घडणा-या घटना आहेत असं आपण मानायचं काही कारण नाही. मध्ये काही दिवस जातही असतील. बरोबर.
इझीली ५ लाख मिळणं.. माखिजाला तेच हवं असेल बहुतेक.. रागिणीला काय माहिती मिळते..त्यासाठीच त्याने तिला परत घेतलं न्युज चॉनेल मध्ये..!
चंदुदादा आणखी एक चुकीचा सल्ला
चंदुदादा आणखी एक चुकीचा सल्ला देतो.. अभयच्या मोबाईल वरुन फोन करण्याचा..>> मलाही हे खटकलं कारण चंदुकाका स्वतः च तिला फोन on करू नकोस असं सांगत होते. मग आता direct त्याच फोन वरुन call करायला सांगतात?
माखिजाला तेच हवं असेल बहुतेक.
माखिजाला तेच हवं असेल बहुतेक.. रागिणीला काय माहिती मिळते..त्यासाठीच त्याने तिला परत घेतलं न्युज चॉनेल मध्ये..! >>>> करेक्ट. पण मग तो तिला मारून का नाही टाकत ? नायिका म्हणून
मग आता direct त्याच फोन वरुन
मग आता direct त्याच फोन वरुन call करायला सांगतात? >>> आता तसे दिवस होऊन गेलेत अभय सातव मरून आणि प्रकरण उघडकीस आलं आहे. अजूनही पोलिस त्याचा नंबर ट्रॅक करत असतील असं वाटलं नसेल चंदू काकांना.
धुरत एक कॉपी स्वतःकडे ठेवली
धुरत एक कॉपी स्वतःकडे ठेवली असेलच आणि कदाचित त्या डॉक्टरनेपण . मला असं वाटत सातव च्या बायकोचा आवाज ऐकायला रागिणीने तिच्या घरी जाण्याची जरुरी नव्हती . तिच्या शेजारणीला म्हटलं असत" तुमच्याकडे त्यांचा फोन असेल तर मला द्याल का ? "आणि फोनवरून काही तरी थातुर मातुर बोलून तिने सातव च्या बायकोचा आवाज ऐकला असता तरी ते पुरेस होत . पण केवळ प्रेक्षकांची धाकधूक करायला ती प्रत्यक्षात भेटते असं दाखवतील . ती सातव ची बायको स्केच वरून तिला ओळखलं हि पण पण हि वेळीच पोबारा करून टॅक्सीत बसून विग काढून ठेवेल आणि नॉर्मल लूक मध्ये येईल ज्यात फक्त सातव ची मुलगीच तिला ओळखू शकते. तिचा नॉर्मल लूक पाहिलेले सातव ची मुलगी आणि तिचा विग मधला लूक बघितलेली नर्स दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती असल्याने पोलिसांचा पण गोधळ उडू शकतो
पहिले किती आकांडतांडव केलेला तिने आणि आता खुनीचा स्केचही बघायला तयार नाही.>> त्यावेळी तिला तिच्या नवऱ्याचे प्रताप माहित नव्हते आता बरेच दिवस झालेत विचार करता करता तिला समजले नवरा सुद्धा बरीच गैरकानूनी काम करत होता त्यामुळेच तिला कशातच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. ती कालच्या भागात भावाला सांगते पण "अरे कशाला एवढा इन्व्हॉल्व होतोस त्या केस मध्ये . गावाला वाहिनी आहे तुझा मुलगा आहे मी आहे जाऊ दे तू एवढा इंटरेस्ट घेऊ नको "
नविन प्रोमो - रा ने केलाच फोन
नविन प्रोमो - रा ने केलाच फोन ऑन. लगेच पोलिसांना लोकेशन कळलं पण.
कुठे पाहिलास प्रोमो ?
कुठे पाहिलास प्रोमो ?
मला तर आता चंदूदादावर पण संशय
मला तर आता चंदूदादावर पण संशय येतो आहे.
धक्कातंत्र
Pages