बुलेट ट्रेन - मुंबई अहमदाबाद मुंबई

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2017 - 15:44

बघता बघता आपल्या डोळ्यांसमोर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावायला लागेल तो दिवस आता फार दूर नाही.
यानिमित्ताने मनात उठलेले प्रश्न
प्रश्न उठायचे कारण - बुलेट ट्रेननिमित्त होणारा अवाढव्य खर्च - तब्बल १.१ लाख कोटी !
आणि त्याचा मला पर्सनली काहीच न होणारा फायदा.
अर्थात मी टॅक्स भरतो म्हणून प्रत्येक गोष्टीचा फायदा मला व्हायलाच पाहिजे असे गरजेचे नाही, देशाचा विकास याला देखील आपलाच फायदा म्हटले पाहिजे.
पण बुलेट ट्रेन हि खरेच विकासासाठी आहे का? असल्यास कोणाच्या विकासासाठी? आणि तो देखील होणार आहे का?
माझ्या ऐकण्यात आले आहे की बुलेट ट्रेनचे तिकीट विमानाएवढेच किंवा किंचित जास्तच असणार आहे. जर हे खरे असेल तर किती लोकं या ट्रेनचा वापर करतील? याचा काही सर्व्हे काही स्टडी केला आहे का?
(माझ्या कानावर आलेली बातमी - सरकारी अनुमानानुसार सुरुवातीला वर्षाला 1.6 कोटी लोक या ट्रेनने प्रवास करतील, म्हणजे दिवसाला जवळपास 45000 लोक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जातील. - मला जरा हा आकडा जास्तीचा फुगवलेला वाटतोय. प्लीज कन्फर्म)
जर आजच्या तारखेला हा प्रकल्प फायद्यात जावा ईतके लोकं प्रवास करणार नसले तरी येत्या काळात ते वाढणार आहेत का? किंबहुना ते वाढावेत यासाठी काही योजना आहेत का?
आजच्या तारखेला हा प्रकल्प फारसा फायद्यात नसला तरी काही वर्षांनी जेव्हा देशातील महत्वाची सारे शहरे बुलेट ट्रेनने जोडली जातील तेव्हा ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बुलेट ट्रेनसाठी भारताला जपानकडून ०.०१ टक्के ईतके अविश्वसनीय नगण्य दराने कर्ज मिळाले आहे. याबद्दलही उलट सुलट चर्चा चालू आहे. कोणी जाणकार यामागचे गणित उलगडू शकेल का?

वसई ते बडोदा या मार्गावर १२४ ट्रेन धावतात त्यातल्या काही रोज आहेत, काही आठवड्यातुन एकदा दोन , तीन तर काही ६ वेळा आहेत. ह्या मार्गावर आजुन ट्रेन वाढवल्या तरी फुल जातिल पण ट्रॅक ची कॅपॅसिटी नाही.

मुंबई ते बडोद्याच्या मध्ये रोज २६ ट्रेन आहेत. त्यात दोन शताब्दी आहेत . ह्या सगळ्या ट्रेन पावसाचे तीन महिने सोडले तर फुल असतात. ह्यात ४५००० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. बडोदा हे मुम्बई अहमदाबाद रेल्वे लाईन वर स्टेशन आहे. मुबई पासुन ४०० किमी वर असलेल्या ह्या स्टेशन वरुन दिल्ली & अहमदाबाद ला ट्रेन जातात.

बुलेट ट्रेन चालु झाल्यास बाकीच्या ट्रेन ची कॅपॅसिटी वाढवता येईल, पुणे- दिल्ली दुरन्तो, पुणे - जयपुर सारख्या गाड्या रोज धावतिल.

शाघाई- बिजिंग , टोक्यो - नगोया किंवा ओसाका ह्या ट्रेन चे टिकिट विमानाएवढे किंवा जास्त आहे. पण दर अर्ध्या तासाला एक ट्रेन आणि ट्रेन ७५% कॅपॅसिटी वर रन करत असल्याने लोक ट्रेन पसंद करतात. ट्रेन साठी ५ मिनिटे आधी आले तरी तिकिट काढुन ट्रेन मिळु शकते. विमानासाठी शहरापासुन लांब आणि ३ तास आधी जावे लागते. ट्रेन चुकली तर अर्धा तासात दुसरी ट्रेन असते. विमानासाठी तसे नाही. तसेच मधल्या स्टेशन साठी विमानाची सोय नसल्याने ते ट्रॅफिक असतेच. आजही राजधानी मुम्बई दिल्ली चे १AC चे तिकिट विमानापेक्षा जास्त आहे तरी पण १AC मध्ये पाहिजे तेव्हा तिकिट मिळत नाही.

>>कोणी जाणकार यामागचे गणित उलगडू शकेल का?<<
मी जाणकार नाहि, पण असं वाचनात आलंय कि जपानच्या बँकांना पडुन असलेला पैसा मोबलाय्ज करायचा आहे. सध्याचा जपानमधल्या बाँडचा व्याजाचा दर ०.०४% आहे, बुलेट ट्रेन साठी देण्यात येणार्‍या कर्जावर ०.१% व्याज (०.०१% नाहि) आकारण्यात येणार आहे म्हणजेच जपान साठीहि हा व्यवहार अगदिच आतबट्ट्याचा ठरणारा नाहि.

तरीहि बुलेट ट्रेनची गरज आहे का, हा प्रश्न अनुत्तरीत रहातो. फक्त या बुलेट ट्रेनवर होणार्‍या खर्चात संपुर्ण भारतातल्या रेल्वे इंन्फ्रास्ट्रक्चरचा कायापालट होउ शकतो असं सुरेश प्रभुंचं मत होतं असं ऐकिवात आहे...

राज ,
प्रभुच्या मताशी सहमत आहे. पण पुर्ण रेल्वेच्या कायापलटासाठी कोणी ०.१% नी कर्ज देणार नाही त्यासाठी ८ ते १०% व्याजानी कर्ज घ्यावे लागेल आणि ते पण व्याज पहिल्या दिवसापासुन द्यावे लागेल. त्याचे व्याज आणि मुद्दल परत फेडण्यासाठी जे तिकिट दर वाढवावे लागतिल ते द्यायची तयारी लोकाची आहे का?

५ वर्षानी घराचा ताबा मिळणार आहे आणि जर ५० वर्षाचे लोन घेणार आहे. महिन्याला कर्ज फेडण्याची ऐपत न बदलता ०.१% आणि ८% व्याज दरात मिळणार्या घराची तुलना करा त्यावरुन तुम्हाला अंदाज येईल.

स्वताचे फक्त १२००० कोटी घालुन एका busy रेल्वे लाईन वर आजुन दोन ट्रॅक येत असतिल आणि ५० वर्षात ना नफा ना तोटा पध्धतीत चालली तरी वाईट काय आहे. एक लक्षात घ्या की उरलेले ९८,००० कोटी बुलेट ट्रेन आहेत म्हणुन मिळत आहेत नाहीतर ते पैसे नाहीत.

जर ९८,००० कोटी सध्याचा व्याज्दराने घेउन रेल्वेचा कायापालट करायची economically feasible योजना असेल तर ती पण राबवायला हरकत नाही.

मुंबईतील स्कायवॉक सारखी बुलेट ट्रेनची अवस्था होणार आहे. फारसा वापर होणार नाही. फारतर सकाळी व संध्याकाळी जास्त वापर होईल, तोही एकाच दिशेने.
जपानने दीर्घ (५० वर्ष) मुदतीचे कर्ज ३-४ % व्याजाने दिले तरी संपूर्ण रेल्वेचा कायापालट करता येणे शक्य आहे. परंतू जपान असे करणार नाही, भले जपानच्या अर्थव्यवस्थेत डिफ्लेशन असेल ,परंतू कमी व्याज आकारून बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान भारतास विकता येत असल्यामुळे जपानला फायदाच आहे. जपान ने बुलेट ट्रेनची निर्मिती भारतातच करावी अशी अट आहे, जपानला ही अट मान्य आहे.त्याबदल्यात जपान अन्य (गरज नसलेले) प्रकल्पही भारताच्या गळ्यात मारू शकते.

0.01% व्याजाने जपानने कर्ज दिले म्हणजे थोडक्यात भारताला भीकच दिली आहे.स्वतःच्या अवास्तव कल्पना राबवण्यासाठी भाजप व मोदी सरकार देशाचा स्वाभिमान गहाण ठेवत आहेत.

http://m.economictimes.com/industry/transportation/railways/bullet-train...

The proposed bullet train between Mumbai and Ahmedabad will have to ferry 88,000-118,000 passengers per day, or undertake 100 trips daily, for the Railways to keep it financially viable, according to a report by Indian Institute of Management Ahmedabad ( IIM-A).

-- दिवसाला 100 किंवा तासाला 3 एका दिशेला नक्कीच धावू शकते ट्रेन. सांताक्रूझ ला एअरपोर्ट ला जाण्यापेक्षा bkc ला जाणे नक्कीच कमी वेळखाऊ आहे त्यामुळे विमानाने जाणारे लोकही याच ट्रेन ने प्रवास करतील.

शिवाय हे देखिल पाहिले पाहिजे. सध्या देशाला याची जास्त गरज आहे ->
As per the paper, "there are many positive benefits and externalities of the HSR which would be useful in India's overall aspirational development."
"These externalities include technology percolation into other domains, economic development, game-changing sense of connectivity, and national pride due to cutting-edge infrastructure.

माझ्या आठवणीप्रमाणे बुलेट ट्रेन संदर्भात ' य' वेळा फिझिबिलिटी स्टडीज झाल्यात. फायनाशियली व्हायेबल किंवा नॉन व्हायेबल अशा दोन्ही अर्थाचा रिझल्ट असलेल्या स्टडीज होत्या या. साधारणत: २००० सालाच्या मागेपुढे पहिला अभ्यास झाला असावा.
मी स्वत: २००२ पासून मुंबई अहमदाबाद रुट च्या बुलेट किंवा तत्सम ट्रेनबद्दल वाचत/ ऐकत आले आहे .

प्रकल्पाचे आकडे धाडसी आहेत असं म्हणु शकतो. आकड्यांनुसार दिवसाला एक लाख लोकांची ने-आण करणं (महागडं तिकिट लोक घेतील हे गृहित धरुन) शक्य झालं तर हा प्रोजेक्ट यशस्वी होउ शकेल. तरी सुद्धा भारतातला परदेशी कंपन्यांनी बांधलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आत्तापर्यंतचा इतिहास (सोशियोपोलिटिकल इफेक्ट) पहाता "एन्रॉन" ची पुनरावृती होइल का या शंकेची पाल मनात चुकचुकते...

ह्या रेल मार्गावर फार कमी स्थानके असणार आहेत. दोनन स्थानकांदरम्यानचे अंतर पुष्कळ असेल. म्हणजे दरम्यानच्या प्रवाशांना स्थानकात पोचण्यासाठी खूप प्रवास करावा लागेल. शिवाय हा रेल मार्ग जर जुन्या मार्गाहून वेगळ्या इलाक्यातून आखला असेल तर स्थानकेही वेगळी असतील. त्यांच्यापर्यंत ॲप्रोच रोड आणि सार्वजनिक वाहतुकीची सोय करावी लागेल. अन्यथा मधल्या स्थानकांवरची प्रवासीसंख्या रोडावेल. मुंबईत सहार एअरपोर्टला उत्तर दिशेकडून बीकेसीपेक्षा अधिक चांगली कनेक्टिविटी आहे . मुंबईबाहेरून येणारा प्रवासीवर्ग सहारपर्यंत बीकेसीपेक्षा अधिक आरामात येऊ शकतो. बुलेट रेल वे ला ठाण्यानंतर कुठे थांबा आहे ते माहीत नाही . पण महाराष्ट्रातील प्रवासी बी के सी पेक्षा ठाण्याला अधिक पसंती देतील. तिथे प्रवासीसंख्या जास्त झाली तर तिथे सुरक्षातपासणी, वाहतूकदाटी वगैरेमुळे वेळ मोडेलच.
जास्त पैसे देऊन कमी वेळात पोचण्याची निकड असणारे प्रवासी बहुतेक वेळी कामकाजाच्या निमित्ताने प्रवास करतात. सकाळी कामाच्या ठिकाणी पोचायचे आणि दिवसभरात काम संपवून संध्याकाळी परतायचे असा शिरस्ता असतो. त्यामुळे 'पीक अवर' लाच जास्त गर्दी राहील . इतर वेळी नाही.
सुरक्षातपासणीही कडक असेलच. आणि डब्यात/ स्थानकात
शिरण्यासाठी रांगही लावावी लागेल. तिथे वेळ मोडेलच. आणि बाहेर वाहतूकदाटीही होईलच.
पुरेशी प्रवासीसंख्या हा मुद्दा प्रश्नचिह्नांकित वाटतो.

हिरा चांगले मुद्दे आहेत.

मला एक नाही समजले, जपान आपल्याला नगण्य व्याजदराने कर्ज देत आहे ते फक्त बुलेट ट्रेनसाठीच देत आहे का? ईतर प्रकल्पांसाठी का नाही? फिरून ते पैसे त्यांच्याच खिश्यात येणार आहेत म्हणून का?

वरील बरेचसे मुद्दे योग्य वाटतातच पण ते बुलेट ट्रेन धावू लागल्यावरचे आहेत. पण ती मार्गाला लागेपर्यंत आणि नंतर , बांधकामावरच्या कामगारापासून इंजीनिअरपर्यंत अनेक जॉब्ज निर्माण होणार आहेत हा भारताचा सर्वात मोठा फायदा आहे. २०२२ म्धे ट्रेन सुरु होणार असली तरी या कर्जाची परतफेड १५ वर्षांनी सुरु होणार . म्हणजेच ती सुरु झाल्यावर सुमारे दहा वर्षे तिला प्रॉफीटमधे यायला लागणार याचा अंदाज बांधला गेला आहे. या मधल्या काळात गरजेप्रमाणे तिचा आवाका वाढवणे, आण्खी काही शहरे बुलेट ट्रेननी जोडता येतात का ते पहाणे वगैरे गोष्टी चालू राहतीलच.

People opposed to Rajdhani Express when it was started saying that this country does not need this luxury trains etc. but today you can see the success. So this type of criticism is expected.

People opposed to Rajdhani Express when it was started saying that this country does not need this luxury trains etc.

>>> राजधानीला विरोध झाल्याचे काही पुरावे मिळतील का?

राजधानी तर १९६९ला सुरु झाली. दुरांतो एक्स्प्रेस जी ह्याच दशकात सुरु झाली तिलाही काही विरोध-बिरोध होतांना दिसला नाही.

हा घ्या राजधानीला विरोध झालेला पुरावा. पहा विभाग (History)
https://en.wikipedia.org/wiki/Howrah_Rajdhani_Express
रेल्वेच नाही तर जवळ जवळ सगळ्याच मोठ्या प्रकल्पाना , सगळ्याच पक्षांच्या राजवटीत विरोध होत असतो. काही त्यात अडकून पडतात काही पुढे जातात. असा विरोध हे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण आहे.

शुगोल, कोणत्याही मोठ्या बांधकामाच्या कामात रोजगार निर्मिती होतेच. हे ९८००० किंवा किती ते हजार कोटी कुठल्याही मोठ्या कामासाठी वापरले तरी रोजगार निर्माण होणारच. आम्ही काही लोकानी कुलाबा - सीप्झ पेक्षा बोरिवली किंवा अंधेरी ठाणे मेट्रो बांधावी आणि मुंबई सिटीलिमिट्स च्याबाहेर पश्चिम आणि मध्य रेल्वे जोडाव्यात अशी एक मोहीम क्षीणपणे राबवली होती. सुदैवाने ती मा. सुरेश प्रभूंपर्यंत पोचली होती . त्यानंतर काही दिवसांनी अंधेरी - दहीसर मेट्रो रेल्वे भविष्यात भाइंदर पर्यंत वाढवून घोडबंदर मार्गे पुढे नेण्याची घोषणाही रेल मंत्रालयाकडून झाली होती. अर्थात ती आमच्या इवल्याश्या मोहिमेमुळे नक्कीच नसेल पण अशा अनेकानेक तातडीच्या लोकोपयोगी योजना राबवता येण्याजोग्या आहेत. एम एम आर डी ए परिसरात वाहतूकसुविधांची अत्यंत निकडीची गरज आहे. डोंबिवलीच्या लोकांना दिंडोशी आणि आजूबाजूच्या आय टी क्षेत्रात येण्यासाठी खूप यातायात करावी लागते . अंधेरी - घाटकोपर मेट्रोची क्षमता केव्हाच अंतिम सीमेपर्यंत पोचली आहे. असो. हे एक उदाहरण झाले. अशा अनेक तीव्र समस्या अनेक ठिकाणी आहेत. गडचिरोलीमध्ये रस्त्यांची वानवा आहे. मराठवाड्याला कनेक्टिविटी कमी आहे वगैरे. इतर राज्यांतही असतील.
जाता जाता : राजधानीला म्हणण्यासारखा विरोध झालेला नव्हता . विकीच्या एखाददुसऱ्या लिंक्स सर्व सत्य सांगतातच असे नाहीं.

मराठवाडा, विदर्भात रेल्वेचे जाळे व सहापदरी रस्ते प्रचंड गरजेचे आहे. इतके की तीच सर्वात मोठी गरज आहे आताची. मुंबई-औरंगाबाद-नागपुर अशी बुलेटट्रेनची घोषणा आणि कामे सुरु झाली असती तर कितीही विरोधी असू देत मी नाचत पेढे वाटले असते. भाजपच्या निवडणूकपूर्व जाहिरनाम्यात ह्या भागात रेल्वेजाळे विस्तारण्याबद्दल सविस्तर माहिती होती. आता जाणवते की सगळ्यांना गाजर दाखवून मते घेऊन फक्त गुजरातचा विकास होत आहे.

आपले मुख्यमंत्री ( जे विदर्भातून येतात, ज्यांना विदर्भाच्या सर्व समस्यांची पूर्ण जाण आहे, त्यावर त्यांनी आयुष्यभर आवाज उठवला) आता गुजरातच्या आदेशावर जणू मान डोलावत आहेत. हे सगळे उद्विग्न करणारे आहे. इथे राजकारणी विचारधारेचा प्रश्न नाही. विकासाचा समतोल असला पाहिजे इतकेच अपेक्षित आहे.

गुजरात हे येत्या काळात औद्योगिक जायंट होणार आहे. हे सत्य आता कोणीही बदलु शकत नाही. गुजरात काय व्हायचा तो होवो, पण त्यामुळे इथल्या इंडस्ट्रीची वाट लागत असतांना राज्यसरकार ढिम्म बसलेले आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना आता गुजरातेत जाऊन नोकर्‍या व्यवसाय करावे लागणार आहेत. कोणाला यातही राष्ट्राचा विकास वगैरे दिसत असेल तर त्यांच्यासारखे तेच.

राजधानीला राजकिय विरोध झालेला असे त्या लिन्केत म्हटले आहे. हा राजकीय विरोध कोण व का करत होते ते समजले नाही, कोणाला अधिक माहिती असेल तर नक्की द्यावी.

राजधानीला लोकांकडून विरोध निदर्शने वगैरे फारशी झाली नव्हती हे प्रत्यक्षदर्शित्वामुळे मला सांगता येईल. अर्थात प्रत्यक्षदर्शित्वाबाबत विश्वासार्हतेची शंका उपस्थित होऊ शकते, - होतेच पण विकीवरून अनेक ठिकाणचे सर्वंकष आणि सम्यक दर्शन अनेकदा होत नाही, एखादी ठळक बातमी त्या त्या ठिकाणापुरती असते तेव्हढीच दिसते.

बुलेट ट्रेनचा मार्ग महाराष्ट्रात १००कीमी आणि गुजरातेत ४०० कीमी आहे.एकुन खर्च १लाख दहा हजार कोटी ,पैकी जपान ८८हजार कोटी कर्ज देणार आहे व महाराष्ट्र सरकार २० हजार कोटी देणार आहे .राहीलेले २००० कोटी केंद्र सरकार देणार आहे.
यातली मजा अशी आहे की गुजरातला फुकटातच बुलेट ट्रेन मिळणार आहे.भाजप व राज्य सरकार गुजरातधार्जिणे झाले असल्याचा हा प्रकार आहे.

सिंजी, थोडंसं करेक्शन, केंद्रसरकार १० हजार कोटी आणि गुजरात्+महाराष्ट्र प्रत्येकी पाच हजार कोटी देत आहेत.

पश्चिम रेल्वेच्या गुजरातला जाणार्‍या ट्रेन मध्ये सर्वात जास्त प्रवाशी हे मालाड-बोरीवली या गुजराती बहुसंख्य भागातील असतात.
या भागात बोरीवलीला बुलेट ट्रेनचा थांबा आहे का?

मुळात आत्ता बुलेट ट्रेनची गरजच काय होती ते समजत नाहीये. एवढ्या पैशात आताचीच रेल्वे यंत्रणा सुधारता आली असती की.

aho Rashmi this money Japan is giving for Bullet Train only and not to modify current railway. If you don't want bullet train then Japan will not give this money. Read Sahil Shah's post above.

"लोक उपाशी आहेत आणि तुम्ही काय बुलेट ट्रेन आणता" अशा विचारांच्या लोकांना अजिबात महत्त्व देऊ नये. पण सर्व मेजर विरोधकांनी बुलेटट्रेनच्या रुट बद्दल आक्षेप नोंदवलेला आहे.

माझाही बुलेट ट्रेनला विरोध नाही तर ह्या रुटला व संबंधीत व्यवहारांच्या अपारदर्शकतेबद्दल आक्षेप आहे. आपल्या देशाला एक नाही किमान दहा बुलेट ट्रेनची गरज आहे. त्यासाठी जपान कर्ज देत असेल तर चांगलेच आहे.

Is it like we had approached Japan for several projects and Japan dismissed them all except this Bullet Train? Or we wanted Bullet train at any cost (which was exhorbitant any way, and beyond our means) and asked Japan for helping hand?

Pages