कोहं

Submitted by र।हुल on 11 June, 2017 - 12:51

मी कोण?

सांग मना
आठव कान्हा
का येतो ?
सांग मना ॥१॥

सांग मना
भार धरा
का येतो ?
सांग मना ॥२॥

सांग मना
आप पया
का येतो ?
सांग मना ॥३॥

सांग मना
वन्ही तेजा
का येतो ?
सांग मना ॥४॥

सांग मना
वेग वाता
का येतो?
सांग मना ॥५॥

सांग मना
घन नभा
का येतो ?
सांग मना ॥६॥

सांग मना
प्राण देहा
का येतो ?
सांग मना ॥७॥

―₹!हुल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्स.
पद्मसर, नाही.
'कोहं' म्हणजे मी कोण? कवितेत मनाला पंचमहाभूतांसंदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. ज्यांचे उत्तर गुढवादाकडे घेऊन जाते. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.

स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.>>> यावरून मलापण एक कल्पना सुचली..
राहुल, मीपण लिहू का एक कोहं?

सुंदर !