बोगोरबुदूर रिव्हाईज्ड

Submitted by अविनाश जोशी on 2 September, 2017 - 07:33

--१--

जयंत शहाचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पडले होते म्हणण्यापेक्षा बसले होते. वरळीच्या त्यांच्या सागर मंझीलच्या पार्कींग लॉट मधेच त्याचा कुणीतरी गाडीतच गेम केला होता. जुनी इमारत आणी रात्रीची वेळ असल्यामुळे लॉटमधे कुणीच नव्हते. गाडीची पुढची काच उघडीच होती आणी खुन्याने अगदी जवळुन डोक्यात आणी छातीत गोळ्या झाडल्या होत्या.
शहा ही मुंबई जगतातील बडी असामी होती. आई जन्मत:च गेली होती. एकटा असल्यामुळे लाडातच वाढला होता. हर्षद मेहताच्या नादाला लागुन वडीलांनी सर्व संपत्ती आणी आपला हिऱ्याचा व्यापार घालवला होतता आणी आत्महत्या करुन सुटका करुन घेतली होती. नशीबाने वरळीचा फ्लॅट तसाच होता.
पंचविशीतच शहा एकटाच वरळीत रहात होता. वडीलांच्या पासुनच कोणी नातलग फीरकत नव्हते. नाही म्हणायला दिवसात एक नोकर येउन जायचा.
शहा होता हिकमती. बी. कॉम होता. बापाच्या धंद्यामुळे हिऱ्यांची चांगली पारख होती. मार्केटमधे ओळखी होत्या. छोटी मोठी डील करु लागला. जात्याच गोडबोल्या आणी डॅशींग असल्यामुळे जम बसायला वेळ लागला नाही. पंचरत्न मधे जश कॉर्पोरेशनच्या नावाने गाळा घेतला. धंद्यात पहील्या पासुनच त्याने चित्रपट सृष्टीतले, शेअर मार्केटमधले, सरकारी अधीकारी व राजकारणी कस्टमर जोडले होते. त्यांचा पैसा काळा का गोरा ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नव्हते. ह्या लोकांकडे बक्कळ पैसा असतो आणी त्यांना हिऱ्यातल काहीही कळत नाही एवढ्या दोन गोष्टी त्याला धंद्याकरता पुरे होत्या. जम बसल्यावर त्याने बॅंकॉक , दुबई अशा वाऱ्या सुरु केल्या.
चार पाच वर्षातच शहा उच्चभ्रु वर्तुळात उठबस करु लागला. सिने जगतातल्या छोट्या मोठ्या नट्यांबरोबर दिसु लागला. अशातच त्याला माखानी भेटला. राहुल माखानी. तसा सीए होता पण केसेस सगळ्या अंडरवर्ल्डच्या. माखानीचे डोके व शहाचे लागेबांधे ह्यातुन जश टेक्स्टाईल्स उभे राहीले. बंद पडलेली एक मील लीज वर घेउन त्यांनी पुर्ण नवी मशीनरी टाकली. त्याच्या टेक्नीक करता माखानीने याकुबला आणले. याकुब ईराकला मील चालवत होता. अमेरीकन हल्ल्यानंतर तो भारतात परतला. तल्लख व हुशार इंजीनीअर होता. मीलच्या सर्व टेक्नीकल जबाबदाऱ्या त्याने उचलल्या. याकुबचे मीडल इस्ट मधे भरपुर ओळखी होत्या, त्यातुनही त्याने मशीनरीची चांगली डील्स केली.
मीलला भांडवल बरेच लागणार होते. शहाने जशचे शेअर्स जवळच्याच लोकांना ४०% टक्के डिव्हीडंड कबुल करुन विकले. शहावर विश्वास असल्याने लोकांनीही भरभरुन दिले. लोक आता हर्षद मेहताही विसरली होती. माखानी मागेच होता. साल्याच डोक अफाट होत. उलट्यासुलट्या उड्या मारुन त्याने एक पैसाही न घालवता कंपनीची ५०% मालकी शहाच्या व त्याच्या नावावर केली होती. वरुन बंद गिरणी चालु करुन शेकडो लोकांना रोजगार मिळवुन दील्याबद्दल सरकारकडुन ग्रॅंटही उकळली होती.
कंपनीची उलाढाल गेल्या चार वर्षात ५०० कोटींवर पोहोचली होती व कंपनीने भारतातल्या प्रमुख शहरात तसेच दुबई, शांघाय, सिंगापुर अशी आउट्लेटस उघडली होती. टेक्स्टाईल्मधे इंम्पोर्ट एक्स्पोर्ट्चा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढवला होता. शेअर होल्डर्सना ६०/७०% टक्के डीव्हीडंड मिळत असल्याने सगळेच खुश होते. डायरेक्टएर बोर्ड नावालाच होते. कंपनी प्रायव्हेट असल्याने सेबी कींवा कुणाचीही कटकट नव्हती. शहा जरी चेअरमन असला तरी सर्व काम माखानी आणी याकुबच बघत असत तर शहा फक्त मिरवत असे. बाहेरच्या जगात माखानी आणी याकुब कुणाला माहीतही नव्हते.
जश म्हणजे शहा हे समीकरण लोकांच्या डोक्यात ठाम बसले होते. त्याच्या पोरींच्या भानगडी , त्याच्या पार्ट्या, त्याच्या आलीशान गाड्या हे मीडीयाचे आवडते खाद्य होते. नाही म्हणले तरी आज त्याची मालमत्ता काही कोटीत होती आणी असा हा शहा कुत्र्याच्या मॊतीने आज पार्कींग लॉटमधे गाडीत मेला होता.
बारा वाजता ईमारतीत रहाणारा कुणाल आला. गाडी पार्क करेपर्यंत त्याला शेजारच्या गाडीतुन तीन वेळा तरी मोबाईलचा आवाज आला होता. गाडीत कोणीतरी झोपले आहे असे त्याला दिसले. शहाची गाडी त्याने ओळखली. काय वैताग आहे म्हणुन कुणाल गाडीकडे गेला. परत त्याला मोबाइलची रिंग ऐकु आली. अंधारात त्याला वाटले की शहाला पार्टी जरा जास्तच झाली असावी. कारच्या उघड्या खिडकीतुन त्याने शहाला हालवले आणी तो स्वत:च हादरला. कारण शहा चक्क सीटवरच लवंडला होता. त्याला उठवण्याकरता दार उघडले. लाइटच्या प्रकाशात त्याला झालेला प्रकार दिसला. खर तर तो भेदरलाच होता पण शांत डोक्याने त्याने शहाची नाडी बघीतली. डोळे बघीतले. शहा मेलाच होता. दार आणी खिडकीची काच लावुन त्याने दारातल्या गुरख्याला मोबाइल केला.
" बहादुर, मी कुणाल बोलतोय. गेटला कुलुप लाव. आणी इकडे पार्कींग मधे ये "
"कशाला साहेब ? "
" हे बघ उगीच चॊकशा करु नकोस. चटकन ये. "
" कुणी आले म्हणजे ?"
" करतील मोबाइल. तु लगेच इकडे ये बघु" गुरखा दोन मीनीटातच आला.
" हे बघ. तु इथे या गाडीजवळ उभा रहा. कुणालाही गाडीला हात लावु देउ नकोस"
" शहा साहेबांची गाडी दिसतीय. पण ते तर तासाभरापुर्वीच आले होते. "
" फार चॊकशा नकोत. मी येतोच पाच मिनीटात. आणी हो कुणाला बाहेर जायचे असले तरी मी येइ पर्यंत थांबव"
कुणालने घरातल्या लॅंडलाईनवरुन फोन करुन कंट्रोल रुमला माहीती दिली. कपडे बदलुन तो खाली गेला व बहादुरला त्याने गेटवर पाठवले.
" बहादुर आता तु गेटवर जा पण कुणालाही आत सोडु नकोस कींवा बाहेर जाउ देउ नकोस. "
" का साहेब. ?"
" हे बघ सांगीतले तेवढेच कर. आणी थोड्या वेळाने पोलीस येतील त्यांना आत पाठव."
---२---
क्राईम ब्रॅंचचे ई. राणे एक रुबाबदार व्यक्तीमत्व होते. हाय प्रोफाईल केसेस मधे बहुतेक त्यांनाच पाठवले जायचे. होते डीसीपी पण ई. म्हणवुन घेणेच त्यांना आवडायचे. मीडीयाचा केंव्हा वापर करायच आणी केव्हा मीडीयाला पलटी द्यायची त्यांना चांगले ठाउक होते. सागर मंझील मधे ते दोन तीन हवालदारांना घेउन आले . कुणाल गाडीजवळ उभाच होता.
" आपण कोण ?"
" मी कुणाल कोहली. मीच पोलीसांना फोन केला होता."
" काय भानगड आहे. खुनाची केस म्हणुन मी आलो. बॉडी कुठे आहे ?"
" साहेब, गाडीत बॉडी आहे. "
राणेंनी रुमाल हातात घेउन गाडीचे दार उघडले. आत लवंडलेले प्रेत दिसले.
" हं मग तुम्ही का मारलत याला ? आणी कोण आहे हा ? "
" साहेब ह्याचे नाव जयंत शहा. ह्या इमारतीत सहाव्या मजल्यावर ६१ नं ला राहतो. "
" काय जयंत शहा ? म्हणजे जश चा मालक.? अहो कोहली तुम्ही भलतेच लचांड मागे लावुन दिलेत. आता सी एम पासुन फोनाफोनी. मीडीयाच्या ब्रेकींग न्युज. मुंबाईत पोलीस झोपलेत का? अहो जरा कुणा फालतु माणसाचा तरी खुन करायचात. आणी तुम्ही ईथे काय करताय ? "
" मी इथेच तीसऱ्या मजल्यावर रहातो. आणी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आत्ताच आलो. गाडीत मोबाईल बर्याच वेळा वाजला म्हणुन गाडीजवळ आलो तर मला प्रेत दिसले. गाडीची पुढची काच उघडीच होती. कुणाला पोलीस यायच्या अगोदर कळायला नको म्हणुन मी लावुन घेतली."
" शिंदे. तुम्ही गेटवर जा. गुरख्याला येथे पाठवुन द्या. तो जर काही रजीस्टर ठेवत असला तर ते घेउन बोलवा"
" बर साहेब."
" आणी फोरेन्सिक टीमला फोन करुन बोलावुन घ्या"
गुरखा रजीस्टर घेउन आला.
" काय बहादुर कीती वर्ष झाली इथे?"
" सहा वर्ष झाली साहेब. रात्री पहारा देतो. दिवसा एक वेगळा सिक्युरीटीचा माणुस येतो. "
" मराठी छान आहे. केंव्हा आलास नेपाळ्हुन ?"
" कसले नेपाळ साहेब ? साताऱ्याकडचा आहे. पहारा देतो म्हणून सगळे गुरखा म्हणतात. "
" बर. ही गाडी ओळखतोस ?"
" शहा साहेबांची "
" केंव्हा आले ?"
गुरख्याने रजीस्टर बघुन सांगीतले.
" ११.०५ ला साहेब "
" एकटेच होते?"
" नाही. कुणीतरी पोरगी होती "
" नाव ?"
" माहीत नाही. शहा साहेबांना नाव विचारलेले आवडायचे नाही."
" अजुन कोण कोण आल आणी गेले ?"
" ११.०५ ला शहा साहेब आले. नंतर ११.१० ला काशीनाथ तारी आला. तो साहेबांच्या कंपनीत कामाला होता. तो ११.३०ला घाइघाइत बाहेर गेला. १२ वाजता कुणाल साहेब आले आणी १२:४३ ला तुम्ही आलात. "
" ठीक आहे. जा तु गेटवर आणी आमच्या हवालदाराला पाठवुन दे"
" साहेब काय झाले "
" गावडे ह्याला आत घेरे. सांगतो भड्वीच्याला "
" चुकले साहेब"
राणे हा फार कुशल पोलीस अधीकारी होता. त्यांनी पकडलेल्या केसेस क्वचीतच सुटत असत.
" कोहली तुम्हाला उलटे सुलटे प्रश्न विचारल्याबद्दल राग आला असेल पण आमच्या दृष्टीत सर्व़च संशयीत असतात. "
" मला माहीती आहे कारण मी बातमीदार आहे "
" बोंबला ! म्हणजे आता मीडीयाला काय थोपवणार ?"
" साहेब तुमची कीर्ती मी ऐकुन आहे. तुम्ही परवानगी दिल्याशिवाय मी न्युज नाही देणार. नाहीतर तुम्हाला फोन करण्याआधी मी न्युज दिली असती"
तेवढ्यात फोरेन्सिकची गाडी आली. डॉग स्क्वाडही आले होते.
" अरे ह्या कुणालचेही प्रिंटस घ्या "
" फोटो ही घ्यायचेत का? "
" नाही पण प्रिंट घ्यायला लागतील कारण त्याने दहा ठीकाणी हात लावला असेल. "
" साहेब बॉडी स्टीअरींगवर होती. मी हात लावल्यावर पडली"
" ठीक आहे. सावंत आहे तसे फोटो घ्या नंतर बॉडीला बसवुन परत घ्या, कोहली शहा एकटेच रहात होते का ? "
" हो. पण एकटे कधीच नसायचे "
" म्हणजे?"
" कुणीतरी पोरगी बरोबर असायचीच. "
" आज ही कुणीतरी होतीच की . ती कुठे असेल?"
" ६१ मध्रेच असेल"
" खाली कशी आली नाही?"
" एकतर ती नवथर असेल. भेदरुन गेली असेल. दुसरे म्हणजे शहाचा मोबाइल नं तीच्याकडे नसेल."
" सावंत जरा तो मोबाइल प्रिंट करुन मला द्या पाहु. मिस कॉल्स बघुदेत. "
फोनवर मिस कॉल्सच नव्हते.
" कोहली तुम्ही तर म्हणताय फोन ऐकुन तुम्ही गाडीकडे आलात पण मी्स कॉल्स तर नाही आहेत. "
" साहेब मला क्लीअर मोबाईल रिंग ऐकु आली. "
" सावंत गाडीत दुसरा मोबाईल आहे का बघा."
" साहेब गाडी डस्ट करुन झाली आहे. गाडी टो करुन लॅबला न्यावी लागेल. दुसरा फोन नाही"
" मग बॉडीच्या खिशात आहे का बघा"
" साहेब एक अर्धा तास लागेल. खर म्हणजे आम्ही लॅब मधेच खिसे तपासतो कारण फील्ड्मधे महत्वाचा पुरावा हरवण्याची शक्यता असते, त्यामुळे बॉडी बॅग मधे घातली आहे. परत सगळे उघडायला लागेल."
" नको राहु देत."
" पण साहेब बॉडी ठेवत असताना एकदा रिंग ऐकु आली होती."
" बर आहे. तुमचे आवरले की तुम्ही निघा. आणी मिडीयाला बाइट देउ नका. "
" ओके. आणी साहेब गाडीत मोजुमा परफ्युमचा वास आहे. शहाच्या बॉडीला ब्रुट्स्चा आहे"
" कोहली धन्यवाद. जरुर पडल्यास बोलवुच. आता जरा ६१ मधे जातो."
" राणे साहेब मी तुमच्या बरोबर येउ का? "
" नकॊ .मीडीयातील एकाला फेवर केल्याचा आरोप यायचा"
" साहेब प्लीज. आता योगयोगाने ह्या भानगडीत सापडलोच आहे तर जरा द्या ना परवानगी"
" बर चला. आणी तीथे कोणच्याही कॉमेंट्स करायच्या नाहीत आणी पोलीसांबद्दल लिहायचे नाही. सावंत ह्यांची झडती घ्या आणी सर्व काढुन घ्या. खाली आल्यावर परत करु "
--३--
कुणाल आणी राणे सहाव्या मजल्यावर ६१ ला पोहोचले. दार एका अतीशय सुंदर मुलीने उघड्ले. बीझनेस सुटमधे होती पण चेहरा म्लान दिसत होता. तीला बघताच कुणालला कुछ कुछ होने लगा. राणेंनी आपला पोलीसीखाक्या सुरु केला.
" काय हो बाइ ? कोण तुम्ही ? आणी ह्या शहाच्या फ्लॅटमधे काय करताय? आयला आता धंदा करणाऱ्याही बिझनेस सुट घालायला लागल्यात. "
" मि. माईंड युवर लॅंन्गेज. मी सोनल गोखले. माखांनीची सेक्रेटरी. शहांनी बोलावले म्हणुन आले. ते अजुन आलेच नाही. गेल्या दोन तासात दहा तरी फोन केले असतील "
" तुम्ही शहांबरोबरच आलात ना?"
" नाही. त्यांच्याबरोबर मेरी आली. शहा खाली येउनही वर का येत नाहीत मला कळले नाही."
" कोण मेरी? कुठाय ती ?"
" मेरी. जरा इकडे ये"
एक चुणचुणीत स्कर्ट मधील पोरगी समोर आली. ती येताच मोजुमाचा वास सुटला.
" काय ग टवळे ? शहाबरोबर तुच आलीस ना?"
मेरीची मान खाली.
" धंदे करताना लाज नाही वाटत आणी आता सोंग आणतीय. रात्रीचे कीती पैसे घेते? "
" साहेब मी त्यातली नाही हो."
" गप. अजुन कोणकोण आत आहे. गावडे सर्वांची झडती घ्या"
" मि. अजुन शहा आले नाहीत. आणी घरात आम्ही दोघी स्त्रीयाच आहोत. आत कोणी नाही. "
" गावडे जरा कंट्रोलला फोन करुन स्त्री पोलीस मागवुन घ्या. आणी तुम्ही जागा तपासा. जर यांनी आडकाठी केली तर आज जरा हवा खाउ देत आतली."
" मि. तुमच्याकडे वॉरंट आहे का ?"
" हे बघा बाई खुनाचा तपास चालु आहे आणी स्त्री पोलीस नसताना सुद्धा संशयावरुन तुम्हाला अटक करु शकतो. गावडे तुम्ही तुमचे काम करा"
सोनलचा चेहरा पडला होता. कुणालला राणेंचा संताप आला. येवढया सुंदर पोरीला छळायच म्हणजे काय.
"खुनाचा ? कोणाचा खुन ? " राणेंनी दुर्लक्षच केले.
" आणी बाई शहा नसताना तुम्ही आत कशा आलात ? "
" मी येइपर्यंत नोकर थांबला होता."
" अजुन इथे कोण आले होते का ?"
मेरीचा चेहरा गोरामोरा झाला."
" होय साहेब. कात्री आला होता. " मेरी
" कात्री ? "
" काशीनाथ तारी. त्याचे टोपण नाव कात्री " मेरी खाली मान घालुन बोलली
" तो कशाला आला होता?"
मेरी बोलायला तयार नव्हती.
" भवाने आता काय थोबाड बंद झाले ? "
" साहेब आम्ही एकाच ऑफीसमधे काम करतो. तो माझा प्रियकर आहे. मी इथे आल्याच कळले म्हणून तो चीडुन इथे आला होता. शहांच्या बरोबर ईथे मुली कशाला येतात हे सगळ्यानाच माहीत आहे."
" मग तो शहावर चिडला असेल ना? का तुझ्यावर ? "
" दोघांवरही."
" पण हे माहीती असुनही तु इथे कशी आलीस?"
" शहांना नाही म्हणायची ताकद नव्हती. ऑफीसमधे बहुतेक मुलींना हा फ्लॅट माहीती आहे. आज त्यांची दृष्टी माझ्यावर पड्ली. ऑफीसमधुन आम्ही इथे आलो. पार्कींग मधे गाडी लावतानाच त्यांना फोन आला. मला किल्ली देउन फ्लॅटमधे पाठवले आणी दहा पंधरा मिनीटात येतो म्हणले"
" मग ?"
" साहेब मी तसली नाही हो. हवे तर माझी तपासणी करा. मी अजुन कुमारीकाच आहे. मी अतीशय भीतभीतच वर आले. किल्लीने दार उघडले तर सोनल मॅडम होत्या "
" त्यांना पाहुन काय वाटले "
" काही वाटण्याच्या आतच बेल वाजली. कात्री आला होता. आल्याआल्याच त्याने शिव्यांची घाण सुरु केली. सोनल मॅडमने आम्हाला आतल्या खोलीत ढकलले. शहा आले तर तमाशा नको म्हणली. दहा पंधरा मीनीटे तणतण करुन कात्री गेला. "
" मग शहा केव्हा आले "
" आम्ही दोघी त्यांची वाट बघत बसलो. मॅडमने त्यांना फोनही केले पण त्यांनी ते उचलले नाहीत."
" मुडदा कसा फोन उचलेल ? "
सोनल मटकन खालीच बसली. मेरीला कळायला थोडा उशीर लागला.
" शहा साहेबांचा खुन झालाय ? "
" होय. पत्रकार चला निघा तुम्ही. आणी खुनाची बातमी देउन टाका. पण ह्या दोघींचा उल्लेख नको. फोरेन्सीक्चे फोटो आजच देतो. तेवढाच तुम्हाला स्कुप. गावडे दुसऱ्या हवालदाराबरोबर ह्या दोघीना त्यांच्या घरी सोडा. फ्लॅट सील करा. बघु उद्या सकाळी"
--४--
दुसऱ्या दिवशी मुंबई शहर हादरले होते कींवा मीडीयाने हादरवले होते.
" मुंबईत खुनी मोकाट. उद्योगपतीचा खुन "
" खुन पडत असताना, गृहमंत्री प्रीमीयर मधे मग्न "
" मुंबई असुरक्षीत ? परप्रांतीयाना बाहेर काढा "
" सरकार झोपले आहे काय. पोलीस चॊकीपासुन २०० मीवर शहांचा खुन "
कुणालचा खबर पेपर सोडला तर कुणाकडेच फोटो नव्हते. शहाचे फाईल फोटो छापण्यावरच इतरानी समाधान मानले होते. साहजीकच खबरचा खप आणी कुणालचा भाव दोन्ही वर गेले होते. खबरने कुणालला ह्या केसचे कव्हरेज करायला सांगीतले होते.
चॅनेलनी मात्र हैदोस घातला होता. पहाटेपासुनच दांडेकरांनी सागर मंझील बाहेर फील्डींग लावली होती. शहाच्या भानगडी पुन्हा चघळल्या जात होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाईटस घेतल्या जात होत्या. कुणालला तर मीडीयाने हीरो केले होते. राणेंच्या मुलाखती मात्र कुणी घ्यायला गेले नाही. त्यांना हव असेल तेव्हाच ते बोलावतील हे मीडीयाला माहीत होते. राणेनी गुरख्याचे रजीस्टर आणी गुरखा ह्या दोघांनाही रात्रीच हलवल्यामुळे शहांच्या फ्लॅटमधे दोन मुली होत्या हे कुणालशिवाय कुणालाच माहीत नव्हते.
राणेंचा फोनही सकाळपासुन खण्खणत होता. गावडे वार्ताहरांना कटवायच काम करत होते. एक फोन मात्र त्यांनी राणेंच्या हातात ठेवला.
" साहेब. होम मधुन फोन आहे "
" आयला! झाली का सुरुवात. बर द्या ईकडे. हॅलो ई.राणे बोलतोय. "
" परब बोलतोय."
" बोला साहेब"
" अरे त्या शहाच सोडवा काहीतरी. आमच्या साहेबांना फोन वर फोन येतात"
" परब फोन करण सोप असत हो. पण फील्डच्या अडचणी कोण बघणार. ?" राणे कोणाला बधणारे नव्हते.
" अहो पण सेशन चालु आहे. प्रश्नांना पेव फुटेल आता "
" ते बघुतेक तुमच्या साहेबांना. माझ काम चालु आहे. लवकरात लवकर संपवीन "
" तेच तर आम्ही म्हणतोय" परब बचावात
" ठीक आहे. रिपोर्ट करीनच, "
फोन खाली ठेवुन राणे विचारात मग्न झाले.
" गावडे फोरेन्सिकचा काही रिपोर्ट ?"
" नाही साहेब"
" जरा फोन लावा पाहु. काही कळतय का बघु"
गावडेनी फोरेन्सिक लॅबला फोन लावला. प्रेत नुकतेच पोस्टमॉर्टेमला घेतले होते. बाकी शहानिशा चालु होती.
" गावडे चला गाडी काढा. जशच्या ऑफीसात चक्कर टाकु."
दोघेही जशच्या बांद्राकुर्ला कॉंप्ले़क्स मधे पोहोचले तेंव्हा दुपार उलटुन गेली होती. ऑफीसच्या वातावरणात एक वेगळेच टेंशन जाणवत होते.
" माखानी कुठे आहेत"
" थांबा सर. मी बघते. आपण काय घेणार. चहा कॉफी" रिसेप्शनीस्ट
"जरा लवकर . अरे ही तर सोनल. सोनल तुमचे बॉस कुठे आहेत ?"
" या ना ! इकडॆ या" सोनल दोघांना घेउन माखानींच्या केबीन मधे गेली.
माखानी कागद्पत्रांच्या ढीगाऱ्यात बसले होते.
" साहेब हे ई. राणे. आपल्याला भेटायला आले आहेत."
" या साहेब. सोनल जरा कॉफीच बघ"
"माखानी शहांचा खुन झाल्याच तुम्हाला केंव्हा समजल ?"
" काल रात्री दोनच्या सुमारास सोनलने फोन केला"
" Oh I see. मग तुम्ही काय केलेत?"
" काय करणार ? शहाला फॅमीली अशी नव्हतीच त्यामुळे तो भाग नव्हताच. मी फ़्रेश होउन पहाटे पाचलाच ऑफीसला पोहोचलो. सोनलही सात वाजता आली"
’ एवढ्या लवकर?"
" अहो शहा साहेंबांचे असे झाल्यामुळे येथे वरेच बदल करवे लागतील. शहा कंपनीचे एम डी व एक मुख्य शेअरहोल्डरही होते. सर्व डायरेक्टरस ना कळवणे. वर्तमानपत्रांना माहीती पाठवणे, सह्यात बदल करुन घेणे अशी सत्राशे साठ काम आहेत. आज सकाळी दहा वाजता शोक सभाही झाली. "
" माखानी काल इतक्या रात्री तुमची सेक्रेटरी शहांकडे कशाला गेली होती ?"
" शहांना दुबईच्या व्यापाराचे काही आकडे बघायचे होते आणी नवीन ब्रॅंचेस विषयी चर्चाही करायची होती. शहांनी मला १० वाजता घरी बोलावले होते पण संध्याकाळीच आईच्या छातीत दुखु लागल्याने तीला घेउन मी लीलावतीला गेलो आणी सोनलला माहीती घेउन शहांकडे पाठवले."
" पण तुम्ही शहांची ख्याती माहीती असुनही सोनलला पाठवलेत?"
" सोनलला शहा हात लावायचे धाडस करणे शक्य नव्हते. एकतर पोरगी चटपटीत आहे आणी पहील्यापासुन असल्यामुळे तीला कारभाराची इथंभुत माहीती आहे. "
" पण तुम्ही शहाला येत नाही असे का नाही सांगीतले ?"
" त्यांना दुबईला एक दोन दिवसातच जायचे होते. आणी मी इतका गोंधळुन गेलो होतो की त्यांना फोन करायच विसरलोच"
" सोनलने अजुन काय काय सांगीतले ?"
" मेरी व तारी हे प्रकरण ही सांगीतले. आज दोघेही आली नाहीत. "
" मला त्यांचे घरचे पत्ते , फोन नं ई डीटेल्स द्या "
" सोनल ! ह्यांना काय हव ते बघ. राणेसाहेब तुम्ही यादी द्या. तुम्हाला सर्व मिळेल"
" बर माखानी ह्या खुनाबद्दल तुम्हाला काय वाटते"
" फार वाइट झाल"
" नाही म्हणजे का झाला असावा ? "
" अवघड आहे. त्यांची पोरींची भानगड असु शकते. "
" कुणावर संशय ?"
" संशयीतात माझच पहील नाव असेल. "
" का?"
" जशचे कोट्यावधी रु चे शेअर्स आमच्या दोघांच्या नावावर होते आता शहा गेल्यावर ते सर्व माझ्याच मालकीचे झाले"
" बरोबर आहे तुमचे म्हणणे. अजुन कोणी? "
" पोरींची भानगड असली तर सांगण अवघड आहे. कारण त्याच्या सर्व भानगडी त्याला तरी आठवत असतील का ह्याची शंकाच आहे. रात गयी बात गयी असे त्याचे काम होते "
" माखानी मला ऑफीसमधे काही लोकांशी बोलायला लागेल. ते इथेच बोलले तर चांगले होइल."
" ठीक आहे. व्यवस्था होइल. उद्या बोर्ड मीटींग आहे. ती झाल्यावर मी करतो."
" मी उद्या मीटींगला हजर रहाणार आहे. मला सगळ्याच बोर्ड मेंबर्सना भेटायला आवडेल "
" पण तुम.." माखानी प्रथमच चांचरला
" माखानी सरळ काम होत नसेल तर मला वाकड्यात जावे लागेल. उद्या तुमच्या मीटींगला स्टे येईल आणी हाय कोर्टाच्या हुकुमाने मी हजर राहीन" राणेंनी उगीचच ढोस दिला.
" नाही तस काही नाही. उद्या या तुम्ही चार वाजता. पण सगळी बडी धेंड आहेत, उगीच कुणाच्या शेपटीवर पाय नको पडायला " माखीजाचा काउंटर
--५--

राणे व गावडे ऒफीसला परत गेले. फोरेन्सीक कडुन अजुन रिपोर्ट आले नव्हते. नाही म्हणायला पोस्टचे प्राथमीक अहवाल आले होते.
" गावडे काय म्हणतय पोस्ट?"
" तीन बुलेट्स निघाल्या. एक सरळ एक मानेत , आणी एक खांद्यात"
" अजुन काय"
" ०. ३८ कॅलीबरच्या आहेत. जवळुनच झाडल्या आहेत. डोक्यातील गोळी प्राणघातक आहे. "
" म्हणजे खुनी शहाच्या ओळखीचा असावा."
" कसे साहेब ?"
" अरे. शहा फोन करत होता. त्याला वर जायची घाई असणार. अशा वेळेला कोणी ओळखीचे दिसले तरच तो खीडकीची काच खाली घेइल."
" पण त्या वेळेला त्याच्या ओळखीचे कोण येणार ?"
" गुरखा , कूणाल, त्या दोन पोरी, त्या बिल्डींगमधील रहाणारे, आणी गुरख्याला पटवुन कीवा भींतीवरुन उडी मारुन आलेले कुणीही. "
" पुढे काय?"
" उद्या डायरेक्टर बोर्डाची मीटींग आहे. त्या अगोदर कुणाकुणाकडे फायर आर्मसचे लायसंस आहे ते बघ. डायरेक्टर्स, मॅनेजरस. वाटल्यास अजुन माणस घे"
" बर"
" वॉरंट घे आणी फोरेन्सिकला घेउन पंच घेउन. शहाचा फ्लॅट पिंजुन काढ "
"हो साहेब"
" गाडीवरचे आणी फ्लॅटवरचे प्रिंट्स उद्याच हवेत म्हणव. तसेच गाडीतल्या आणी बॉडी वरच्या सामानाची यादी लगेच घेउन या"
" साहेब परबांचा दोनदा फोन येउन गेला. प्रगती काय झाली विचारत होते"
" त्या परबला घेउन जा फ्लॅटवर यादी करायला. आता परत फोन आला तर सी एम कडे गेलो आहे सांग. नसती कटकट साली . लगेच रिझल्ट लागायला हे काय २०/२० आहे?"
गावडेने हसू दाबले.
" बर गावडे मी आता जरा घरी जाउन पडतो. तु ही लोकांना कामाला लावुन आराम कर. उद्या सकाळपासुनच कामाला लागु"
--६--

रात्री त्यांना जाग आली तेव्हा फोन वाजत होता. हा नंबर थोड्या लोकांकडेच असल्याने राणेंनी फोन उचलला.
" साहेब "
" बोला गावडे"
" जश मधुन फोन होता की मीटींगची वेळ बदलली आहे. आता सकाळी दहा वाजता मीटींग आहे. "
" बर मी जाइन. कुणा दुसऱ्याला गाडी घेउन पाठवुन द्या. तुम्ही काल सांगीतलेली काम चालु ठेवा. "
सकाळी साडेनउला राणे जश ला पोहोचले. सोनल रिसेप्शन्मधेच होती.
" या ना सर. बोर्डरुम मधेच जाउ " सोनल आता मि वरुन सर वर आली होती.
बोर्डरुम मधे माखानी आणी दोघ होती.
" माखानी मी मुद्दामच लवकर आलो. मला सगळ्यांचा परिचय करुन घ्यायला आवडेल. "
" सर आमचे ८ संचालक आहेत शहा धरुन. मी तुम्हाला सगळ्यांची नाव आणी व्यवसाय देतो. तसेच आल्या आल्या ओळख ही करुन देतो. "
" आजचा कार्यक्रम काय आहे "
" पहा ना आजचा अजेन्डा "
अजेन्डा

1. सभेकरता चेअरमन निवडणे
2. शहांना श्रद्धांजली अर्पण करणे
3. मागच्या सभेचा वृत्तांत फायनल करणे
4. नवीन सी एम डी नेमणे
5. नवीन संचालक नेमणे - याकुब शेख
6. शहांचे नाव रजीस्टर मधुन काढणे
7. नवीन सह्यांकरता अधीकार देणे
" सर सर्व नैमित्तिक कामे आहेत. आणी हि डायरेक्टरस ची यादी"
संचालक मंडळ
जयंत शहा
राहुल माखानी
जश
चुनाभट्टी
रुप बाटलीवाला
इंडस्ट्री
कुलाबा
राकेश मोदी
लॉ
वरळी - शहाच्याच इमारतीत
अतुल साने
इंडस्ट्री
सायन
केशव जरीवाला
सिनेजगत
जुहु
मीना थोडानी
सिनेजगत
गोरेगाव
कीरण मोरे
कामगार प्रतीनीधी
लालबाग
" मला वाटत राकेश मोदींशीच एकदा बोलायला लागेल."
तेवढ्यात राणेंचा फोन वाजला. गावडेंचा होता. अर्जंट असल्याशिवाय गावडेंनी फोन केला नसता.
" बोला गावडे"
" साहेब आपल्याला लगेच निघायला हवे नाला सोपाऱ्याला"
" का रे. मीटींग संपल्यावर निघु. "
" साहेब प्रींट रिपोर्ट आला आहे. बरेच प्रींटस आहेत. शहाचे आणी कुणालचे सोडता ७/८ तरी आहेत. "
" बर."
" ब्युरोनी त्यातले दोन आयडेंटीफाय केले आहेत."
" काय ?"
" एक राधा नावाच्या बारबालेचा आहे "
" दुसरा?"
" तारीचा. मुख्य म्हणजे तारीचा प्रींट गाडीच्या दारावर आहे आणी त्याला रक्त आहे त्याला आर्मड रॉबरी करता ४ वेळेला पकडले होते . दोनदा तो आतही होता."
" बर तु अस कर. येथे ये. आपण निघु"
" काय साहेब काही प्रॉब्लेम" माखानी
" नाही. दुसऱ्या केसची इमर्जन्सी आली आहे. मी आता थांबत नाही"
" सर आपण माखानींच्या केबीन्मधे गाडी येइपर्यंत बसा. कॉफी घ्या." सोनल
" बर चल"
केबीन मधे जाण्यासाठी बाहेर पडले तर रिसेप्शन मधे कुणाल दिसला.
"काय रे तु इथे काय करतोयस?"
" मला ही केस कव्हर करायला सांगीतली आहे"
" केसच कव्हर कर. दुसरी कडे कव्हर करु नकोस. आणी मला संध्याकाळी भेट."
सोनलचा गोरामोरा चेहरा राणे.च्या नजरेतुन सुटला नव्हता.
-७-

राणे इमारतीच्या बाहेर पडले व त्यांनी कमीशनर ऑफीसला फोन लावला.
" राणे बोलतोय . साहेब आहेत का ? "
" एक मिनीट "
" हं राणे. काय म्हणतोय तपास ? "
" साहेब थोडी मदत हवी होती. "
" काय?"
" साहेब. एक संशयीत. नाला सोपाऱ्यात आहे. त्याला उचलायचा आहे. "
" हं"
" साहेब टेरीटरी ठाणे ग्रामीण आहे. त्यांचे स्क्वाड असले तर सोपे होईल"
" ठीक आहे. करतो व्यवस्था. "
" साहेब आर्मड स्क्वाड पाहीजे. आणी हवालदार मुख्य असला तर बर होइल. इं असला तर इगो प्रोब्लेमस होतात "
" राणे तुम्ही DCP CRIME आहात.ब पण सगळ्याना तुम्ही ई.न्स्पेक्टर असे सांगता. आज जरा DCP व्हा. "
" साहेब DCP पेक्षा इन्सपेक्टर म्हण्ल्यावर जास्त काम होतात."
" बर. आणी तुम्ही त्या होमला काय डीवचले. राज्यमंत्रीचा फोन होता, रिपोर्टस मिळत नाहीत म्हणुन. "
" तुम्हाला माहीतच आहे. दर तासाला माहीती द्यायला हे काय हवामानखाते आहे"
" स्क्वाड कार दहीसर नाक्यावर असेल. ई. जाधव आहेत. चांगला माणूस आहे. त्यांना सांगीतले आहे वॉरंट ही तयार ठेवायला "
गावडे गाडी घेउन पोहोचतच होते. बरोबर दोन कॉन्स्टेबल होते. एक वायरलेस सेट हॅंडल करत होता.
राणे निघाले तेम्व्हा अकरा वाजुन गेले होते.
--८--
राणे बाहेर पडायची कूणाल वाटच बघत होता. सोनल समोरच उभी होती
" मिस. मला जरा तुमचाशी बोलायचे होते"
" सॉरी. मला आता बोर्ड मीटींग आहे "
" आपण दोन वाजता लंच घेउया का ? म्हणजे मीटींग नंतर तुम्हाला वेळ असेलच ना ?"
सोनलच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट दिसत होती.
" बर. "
" मी कॉपर चिमनी, ऍनी बेझंट रोडवर वाट पहातो"
" तुम्ही निघा येथुन माखानी चिडतील."
" OK. बाय"
कुणाल कॉपर चिमनी मधे सोनलची वाट पहात थांबला होता. सोनल अडीच वाजता धावत पळत आली.
" काय ग ! काय वाघ मागे लागला का " कुणाल एकेरीवरच आला.
" नाही. उशीर झाला न म्हणुन "
" चल अगोदर ऑर्डर देउ. तुला माहीती आहे का हे रुमाली रोटीचे जनकस्थान आहे "
" बर का बोलावलत ?"
" तु का आलीस ? "
" ऑफीस मधे तमाशा नको म्हणून"
" हे बघ सोनल. मला तु पहील्या दिवसापासुनच आवडली आहेस. म्हणजे कालपासुन. आपला परिचय वाढावा अशी माझी इच्छा आहे" कुणाल डायरेक्ट
" मला जरासा वेळ हवा "
" दिला. जेवण संपेपर्यंत" सोनल खुदकन हसली
" बर काय म्हणतीय मीटींग ? "
" हे बघ तुला माहीतीकरता ओळख वाढवायची हाहे का?"
"सोनल. ही माहीती सर्वांकडे उद्यापर्यंत असेल. "
" काही विशेष नाही. माखानी चेअरमन झाले. याकुब CEO माखानीच्या जागी. शहा मेल्यामुळे आता माखानी २५% भागीदार झाले आहेत. फार कडक माणुस आहे. "
" तु किती दिवस तीथे आहेस ?"
" सुरुवातीपासुन. म्हणजे सहा वर्ष. मी पण सी ए आहे आणी फायनान्स मधे एम बी ए केले आहे. "
" मी कुणाल . खबरचा वार्ताहर. शहांच्या बिल्डींगमधेच रहात असल्याने आणी मलाच बॉडी सापडल्याने मी इनव्हॉल्व झालो"
" हो ना त्या दिवशी आम्ही काय घाबरलो होतो. "
दोघांनी बऱ्याच गप्प मारल्या. टेलीफोन आदान प्रदान केले.
" काय ग ? मी कुठे राहतो ते तुला माहीती आहे. पण तु कुठे राहतेस ?"
" बोरीवली इस्ट्ला. वडील नेव्हीत होते तेंव्हा आम्ही जगभर भटकत होतो. आता मात्र इथेच. वडील जाउनही सात वर्षे झाली. आता मी आणी छोटी बहीण राहतो."
" माझ्या वडीलांचा कापडाचा होलसेल व्यवसाय. आता माझा मोठा भाउही ते बघतो. वरळीला आम्ही एकत्रच राहातो. "
गप्पात वेळ कसा गेला हे दोघांनाही कळले नाही. शेवटी परत भेटायचे ठरवुन दोघेही आपाअपल्या दिशेने निघुन गेले.
--९--
राणे आणी गावडे नाला सोपाराकडे निघाले.
" साहेब आज तुम्ही DCP चा ड्रेस घातलाय"
" दुसऱ्या टेरीटेरीमधे जायचे आहे ना ? हे एक तारीचा चांगलाच क्ल्यु मिळाला आहे. "
" बघु आता तो जागेवर आहे का ? "
" जरा इ जाधवांना वायरलेसवर घ्या "
" हे घ्या साहेब"
" जाधव ! राणे बोलतोय. "
" बोला! आम्ही पोचतोय दहीसरला."
" नको, तुम्ही नाला सोपाराला जा आणी लक्ष ठेवा. जर तारी पळायला लागला तर उचला. "
"बर"
वायरलेस बंद करुन राणे गावडेकडे वळले.
" गावडे अजुन काय फोरेन्सिक कडुन ?"
" गाडीतल्या वस्तुंची यादी आली आहे. मयताच्या अंगावरील यादी आली आहे."
" हं"
" आणी साहेब एक गोळी सीट्मधे सापड्ली"
" कुठे?"
" बॅक हेड रेस्ट मधे"
" अजुन काही"
" पुंगळ्या सापडल्या. चारही आहेत. फेडरल कंपनीच्या आहेत"
" आर्म लायसन्स कुणाकडे ?"
" कुणालच्या नावावर आहे. गेल्या वर्षीच. कोल्ट आहे त्याच्याकडे ०.३८ कॅलिबेर"
" कुणालकडे?"
"हो. अजुन मोदींकडे आहे. त्यांच्याकडे ९ मिमि लुगर आहे"
" माखानींकडे लायसन्स आहे. बाकीं तपास चालु आहे. "
" पोस्ट मधे अजुन विशेष काही नाही. "
नालासोपाराला पोहोचल्यावर पत्त्ता विचारुन गाडी भावडेचाळीत गेली. गावडे व राणे उतरले.
जाधव जवळ आले व DCP लेव्हलचा अधीकारी पाहुन दचकले. एक कचकचीत सॅल्युट टाकला.
" साहेब आपण. ई. राणे येणार होते ना?"
" साहेबांना ई. म्हणुन घेणे बरे वाटते" गावडे
" जाधव काय स्थीती आहे? "
" तारी पहील्या मजल्यावर रहातो. दोन रुम्स आहेत. घरातच आहे"
" चला."
सर्व लवाजमा तारीच्या खोलीजवळ पोहोचला. दरवाजा लोटलेला होता. सात आठ्जण आत घुसले. तारी आत खुर्चीवर पेपर वाचत बीडी फुंकत होता.
एका हवालदाराने त्याच्या तोंडातील बीडी काढुन फेकुन दिली. पेपर हिसकावुन घेतला व एक सणसणीत लगावली
" भोसडीच्या नसते धंदे करायला हवेत आणी वर बीड्या फुंकत बसतो."
" हे बघ तारी एकतर तुझ्या घराची झडती घ्यायचीय. आणी जरा तुझ्याशी बोलायचय"
" साहेब मी काही नाही केल"
" तु काल शहांच्या घरी कशाला गेला होतास ?"
" मी साहेब?"
" जाधव जरा घराची झडती घ्या बर. "
" तारी तुला इथे बोलायचय का स्टेशनमधे यायचय? तु काल शहांच्या घरी कशाला गेला होतास ?"
" मेरी तीथे गेली म्हणुन"
"तुला मेरी तीथे गेल्याचे कसे कळले ?"
" फोन आला होता"
" काय?"
" कोणीतरी सांगीतले की शहा तुझ्या पाखराला घेउन प्रभादेवीला कोहीनुरमधे बसलाय"
" मी तीथे पोहोचलो तर शहा आणी मेरी हसतखेळत जेवत होते. रांड साली"
" मग?"
"मी बाहेरच बाइकवर थांबलो. साडेदहानंतर दोघे बाहेर आले आणी गाडीत बसुन निघुन गेले. मी पण त्यांचा पाठलाग केला."
" बर"
" शहाची गाडी आत गेली. पण गुरख्याने मला आडवुन चॊकशी केली. मी आत गेलो तेंव्हा शहा दिसला नाही पण मेरी घाईघईने लिफ्ट मधे गेलेली दिसली. मी पण दोनतीन मीनीटात वर गेलो."
" आणी तमाशा केलास"
" आपल डोक पॅक झालेल साहेब. सालीचा जीवच घेतला असता. मॅडम मधे पडल्या आणी त्यांनी आम्हाला शेजारच्या खोलीत ढकलले."
" कीती वेळ होतास तीथे?"
" काही कल्पना नाही पण १५/२० मीनीटे तरी होतो. "
" शहांवर चिडला होतास ना ? आणी खाली जाउन खुन केलास न"
" चिडुन मी खाली गेलो आणी.."
तेवढ्यात जाधव बाहेर आले. त्यांच्या हातात रक्त लागलेला शर्ट आणी रुमालात धरलेले रिव्हॉल्वर होते.
" हे काय जाधव?"
" साहेब आत सापडले."
रिव्हॉल्वर कोल्ट पायथॉन ०.३८ होते. जाधवांनी रिव्हॉल्वर उघडुन पाहीले. चार चेंबर्स रिकामी होती. आणी बुलेटस फेडरलच्याच होत्या.
" तारी You are under arrest. हव तर तुझ्या वकीलांना बोलावुन घे. आता देवच तुला वाचवेल"
"राणे साहेब. काय करायचे?"
" जाधव त्याला ठाणे कोर्टातुन रिमांड घ्या. खोली सील करा आणी पींजुन काढा. फायर आर्म्स खाली बूक करा. गावडे ह्यांच संपल्यावर शर्ट फोरेन्सिकला जाउदेत आणी रिव्हॉल्वर बॅलीस्टीकला. "
" सर त्याला इथेच ठेवायचय"
" हो सध्या तरी. मीडीयाच्या भुतांपासुन जरा दुरच राहुदेत. शर्ट तर पुराव्यात घेउच नका तो गावड्यांनाच द्या. गावडे रिव्हॉल्वरचा नंबर घ्या आणी ट्रेस करा. "
--१०--

जाधवांना तीथेच सोडुन राणे ऑफिसला पोहोचले. कुणालला त्यांनी संध्याकाळी बोलावले होतेच.
" कुणाल काय म्हण्तीय सोनल ?"
कुणाल गोरामोरा.
" बर तुझ्याकडे आर्म लायसन्स आहे ?"
" हो."
" आणी रिव्हॉल्वर?"
" हे घ्या .?"
रिव्हॉल्वर नुकतेच साफ केलेले होते. स्मिथ वेसनचे होते
" तुम्ही हे का ठेवताय ?"
" काही कुलंगडी झाली की धमक्या येतात."
" वापरले आहे का?"
"अधुन मधुन प्रॅक्टीस करतो"
" मग काय न्युज.तु केस कव्हर करतोयस ना?"
" साहेब तुम्ही तर केसवर पांघरुणच घालुन ठेवलय."
" काही कळल तर कलवेन मी तुला. ये आता"
कुणाल गेला आणी थोड्या वेळाने गावडे आत आले
" साहेब. तारीकडचे रिव्हॉल्वर स्पेशल एडीशन आहे. शहाच्या वडीलांच्या नावावर होते. पण नंतर लायसन्स रिन्यु नाही. आणी फोरेन्सिकने शर्टावरचे रक्त आणी शहांचा ब्लडग्रुप एकच आहे हे सांगीतले. "
" ठीक आहे. मी जरा कमीशनर साहेबांकडे जाउन येतो. जाधवांच संपलेले असले तर ठाण्याला जाउन तारीला घेउन या आणी ३०२ खाली बुक करा. बुक करायच्या अगोदर मला फोन करा."
राणे कमीशनर ऒफीस मधे पोहोचले तेंव्हा संध्याकाळ झाली होती. राणेनी सर्व रिपोर्ट केला.
" साहेब सकृतदर्शनी पुरावा आहे पण मला मन सांगतेय की जरा थांबावे. "
" राणे आपण सी एम ना रिपोर्ट करु. ह्यात फार उलटे सुलटे कगोरे आहेत."
" साहेब होमला नको सांगायला"
" नाही. मी करतो हॅडल"
कमीशनर साहेबांनी सी एम ऑफीस्ला फोन लावला. त्याच्या पीए ने उचलला.
" काय वाघ ? साहेबांना वेळ आहे का ? जयंत शहाची केस आहे म्हणाव. "
" एक मीनीट.. साहेबानी वर्षावर बोलावले आहे ९ वाजता "
" ठीक आहे. राणे सी एम शी बोलेपर्यत तारीला बुक करु नका "
" साहेब मला हे राजकारण कळत नाही"
" काय करणार ? नाइलाज असतो. बर मला जरा ब्रीफ करा. आणी तुम्ही पण चला"
" साहेब मी कशाला ?"
" खड्ड्यात पडायला कोणी बकरा हवा ना?" कमीशनर हसुन म्हणाले " आणी बघा जरा ही लोक प्यादी कशी हलवतात ती "
गप्पा मारत दोघेही मलबार हीलवर पोहोचले. सुरक्षा व्यवस्थेतुन आत पोहोचले. साहेब अजुन यायचे होते. बाहेर लॉन मधे बऱ्याच खुर्च्या ठेवल्या होत्या.
थोड्याच वेळेत पी ए आला.
" दहा मीनीटात साहेब पोहोचत आहेत. "
" ही कसली तयारी? "
" पत्रकाराना बोलावलय. होम मीनीस्टर ही येतात अर्ध्या तासात ." पीए नीघुन गेला
" बघीतलत राणे एकेक खेळी. होमला आणी प्रेसला एकाच वेळी येतील अशी सोय आहेत. आणी आपल्याकडुन त्याच्या अगोदरच रिपोर्ट घेणार. वेळ अशी निवडली आहे की उद्या पेपरमधे हेड्लाइन्स आणी आज लेट न्युज ला चॅनेलस वर. "
" आपल्या कळण्या पलीकडचे आहे"
चॅनेल वाली मंडळी जमु लागली होती. त्यांची चहापाण्य़ाची सोय होत होती.
पीए नी थोड्याच वेळेत कमीशनर व राणेंना आत बोलावले. दोघांनीही आत जाउन सी एम ना सॅल्युट केला.
" बसा बसा आता दहा मीनीटात सांगा बर"
" साहेब हे राणे DCP crime "
" बोला राणे"
" साहेब शहाचा खुन झाला त्यावेळेस तारी हा त्याचा कर्मचारी तीथे गेला होता. चार्ज शीटर आहे. त्याची मैत्रीण गेली म्हणुन तो चीडुन तीथे गेला होता. त्याचे ठसे गाडीवर आहेत. आज रेड्मधे त्याच्याकडे हत्यार सापडले. पुरावा तर आहे. बॅलॅस्टीकचा रिपोर्ट यायचाय. "
" राणे बूक करा. आणी लवकरात लवकर सेशन कमीट करुन घ्या. "
" पण सर मला वाटते त्याला कुणीतरी फ्रेम करत असाव "
" जाउ द्या हो. सुटेल तीथुन. आज तर मीडीया शांत होइल. हे बघा आलेच होम. चला जरा आता पत्रकाराना तोंड देउ"
घाइघाइनी सर्व बाहेर गेले. पत्राकारांनी त्यांना गराडा घातला. ओबी व्हॅन्मुळे थेट प्रक्षेपण चालू होते. राणेंनी तेवढ्यात कुणालला फोन करुन त्या रात्रीची न्युज द्यायला सांगीतली.
" काय साहेब काय विशेष ?" संदीप टाइम्सचा क्राइम रिपोर्टर
" काही नाही जरा गप्प मारायचा मुड होता"
" इथे होम आहेत. कमीशनर आणी राणॆ आहेत. शहाच्या खुनाची काही न्युज आहे का ?" पत्रकार चलाख होते.
" हो. आज संशयीताला अटक झाली आहे. डीटेल्स तुम्हाला राणे देतीलच. पण न्युज जरा जपुन द्या. " मुख्यमंत्र्यांनी बॉल टोलवला.
" तपास चालु आहे. संशयीताचे नाव काशीनाथ तारी असुन त्याला नाला सोपारा मधे अटक केली आहे. " राणे
" काय पुरावे? "
" तारीच्या हाताचे ठसे, खुनी हत्यार इ. आणी हे बघा तपास चालु आहे. त्यामुळे मला जास्त सांगता येणार नाही."
पत्रकार पांगले.
" राणे तुम्ही राजकारणात येयला हरकत नाही " सी एम " काय होते आहे ते कळवा "
--१२--

दुसऱ्या दिवशी परत कुणालला भाव मिळाला कारण फक्त खबरमधेच सोनल आणी मेरी बद्दल न्युज होती.
अफवांचे पीक आले होते. काही मीडीयावाले शहाच्या सर्व जुन्या पुराण्या भानगडी उकरण्यात मग्न होते. सर्व आकडे गोळा केले तर शहाला पोरींकरता गिनीज बुक मधे नाहीतर लिम्का बुक मधे तरी स्थान मिळाले असते.
सोनल आणी मेरी एकदम प्रकाश झोतात आल्या होत्या. त्यात दोघीही फोटोजेनीक असल्याने आणी राणेंनी काहीही बाइटस न दिल्याने तर मीडीयावाले त्यां दोघींच्या मागेच लागले होते. माखानीने दोघीना आठ दिवस सुट्टी देउन गावाला जायला सागीतले होते. त्याला जशकडे लोकांचे लक्ष वेधुन घ्यायचे नव्हते.
राणे तर गडबडीतच होते. बॅलॅस्टीकने खुन कोल्टनेच झाल्याचा रिपोर्ट पाठवला होता. तारीकडे सापड्लेल्या रिव्हॉवरनेच खुन झाला होता. त्याच्या शर्टावरचे डागही शहाच्या ब्लडग्रुपशी जुळत होते. पुरावा तर भरपुर होता पण तरीही राणेंना काहीतरी खटकत होते. बराच विचार करुन त्यांनी शेवटी समीरला फोन लावला.
समीर. वय २८. समी"र पटेल हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. लहानपणीच आईवडीलाचा इस्ट आफ्रिकेत अपघाती मृत्यु झाल्यामुळे समीर मुंबईत काकांकडेच वाढला होता. त्यचे काका म्हणजे मुंबई शेअरबाजार आणी मेटलंमार्केट मधे एक मोठे प्रस्थ होते. लग्नाशिवायच होते आणी समीरचे पालन त्यांनी मुलासारखे केले होते. मलबारहील वर बंगला असल्याने उच्च्भ्रु आणी उच्चपदस्थ लोकात उठबस होती. पुणे, अलीबाग, सुरत अशा प्रॉपर्टीज होत्या. बऱ्याच कंपन्यात गुंतवणूक होती.
समीर तर हीरोच होता. गोरापान आणी राजबींडा तर होताच पण त्याचे डोके अफ़लातुन होते. IIT मधुन बी टेक झाल्यावर त्याने लॉची डिग्री पण घेतली होती. काका गेल्यावर प्रॉपर्टी संभाळणे, फास्ट गाड्या व मोटरबाईकस फीरवणे आणी उचापती करणे एवढाच त्याचा उद्योग होता. मेंदुला झीणझीण्या आणणारी कोडी त्याला फार आवडत. बरेच अवघड आणी नाजुक प्रसंग त्याने सोडवले होते. पोरींच्या बाबतीत तो शहाच्या एकदम विरुद्ध होता. म्हणजे पोरी त्याच्याभोवती फीरायच्या पण हा त्यांना कटवायचा. राणेंना काही खटकल की ते समीरला फोन करायचे.
" समीर राणे बोलतोय "
" बोला काय म्हणतोय कात्री.?"
" तुला सगळ्या जगाची खबर असते रे.."
" राणे तुम्ही फोन केला आहेत म्हणजे काहीतरी कोडे असणार. मग काय म्हणता ?"
" खर आहे तुझ. जरा भेटुया. पण तुझे ते हार्लेचे भुत घेउन नको येउस. सगल्या क्राइम ब्रॅंचला कळत. आणी तुझ्या त्या जांभळ्या पिवळ्या गाड्या पण नकोत. अख्खा मीडीया इथे गोळा होइल. "
" राणे तुम्हीच याना बंगल्यावर. छान लॉनवर स्कॉच घेउन बसु. वाट पहातो"
राणे फ्रेश होउन लालमहल वर पोहोचले. समीरच्या काकांना सगळे लाला म्हणायचे आणी बंगल्याला लालमहल. सध्यातरी त्या अवाढव्य वास्तुत समीर आणी त्याचा नोकर तानाजी एवढेच रहात होते. लॉनमधे समीर त्यांची वाटच पहात होता.
" काय राणे आज या गरीबाची आठवण काढलीत?"
" अशा गरीबीत राहायला मला पण आवडेल"
" बर काय विशेष ?"
" अरे त्या तारीला उचलेला आहे खरा पण माझी इंटुयशन वेगळेच सांगतीय"
" खर आहे कात्री हा भुरटा चोर. घोडा बाळगतो पण वापरतो धमकी साठी. "
राणेंना नेहमीच समीरच्या अंडरवर्ल्ड ज्ञानाचे आश्चर्य वाटे. त्याला कोण कुठुन बातम्या देतो हे कळत नसे.
" समीर हे प्रकरणात सी एम ना चटकन निर्णय हवा आहे. त्यामुळे माझ्या ईच्छेविरुद्ध खटला उभा राहील. मला जरा तपासालाही मर्यादा आहेत. तुला तसे काही नाही. खटला उभा राहील्यावर तु जरा उपस्थीत राहुन ह्या प्रकरणाच्या मुळाशी जावेस असे मला वाटते."
" म्हणजे लष्करच्या भाकरी भाजु तर ?"
" खर म्हणजे पोलीसांनी तुला असे सांगणे थोडे अवघड आहे. पण माझे हात बांधले गेल्यामुळे मी तुला वैयक्तीक विनंती करतोय. आणी लष्करच्या भाकरी म्हणलास तर प्रत्येक प्रकरणात तु फायदा करुन घेतोसच. "
" आता तुम्ही म्हणताय तर नाइलाज आहे. पण जरा मला ब्रीफ कराना"
" अरे त्या रात्री कंट्रोलला फोन आला. शहाचा मर्डर म्हणल्यावर तो डायरेक्ट क्राइमला हॅंडल करायला सांगीतला. फोन कुणाल नावाच्या त्याच इमारतीत रहाणाऱ्या वार्ताहराने केला होता. त्यालाच बॉडी सापडली असे तो म्हणतो. शहाच्या फ्लॅटमधे सोनल आणी मेरी ह्या दोघी तरुणी होत्या. सोनल ही माखानीची सेक्रेटरी आहे आणी ती काही कामानिमीत्त आली होती. मेरीला शहा मजा मारायला घेउन आला होता. फोन आल्यामुळे शहा खालीच थांबला आणी मेरीला त्याने पुढे जायला सांगीतले. मेरी पाठोपाठ तारी फ्लॅटवर पोहोचला. मेरी त्याची प्रेयसी होती आणी तो भडकुनच तीथे पोहोचला होता. मेरीचे आणी त्याचे जोरात भांडण झाले आणी तो तेथुन बाहेर पडला. त्या दोघी तीथेच शहाची वाट पहात थांबल्या. तो आला नाही म्हणून सोनलने त्याला मोबाइलवर फोन ही केले. कुणाल आला तेंव्हा अशाच फोनमुळे तो गाडीकडे गेला आणी त्याला बॉडी सापडली. "
" ओह असे झाले तर "
" गुरख्याकडे ह्या सगळ्या नोंदी आहेत वेळेसकट. आम्ही वर गेलो तेंव्हा सोनल आणी मेरी शहाची वाट पहात थांबल्या होत्या. त्यांना खुनाची बातमी मी दिली. "
" आम्ही वर गेलो ??"
" तो कुणाल मागे लागुन आला. वरती बहुधा त्याचे आणी सोनलचे साटेलोटे जुळले आणी सध्या ते एकमेकांना भेटत आहेत."
" इंटरेस्टींग"
" हो ना. म्हणजे damsel in distrait . तपास चालु असताना अचानक तारीचे प्रींट ओळखले गेले आणी रेडमधे खुनी हत्यार सापडले. "
" मला जरा वेळ द्या"
--१३--
समीर वेषभुषा बदलण्यात पारंगत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो टपोरी वेष करुन नालासोपाराला गेला. कात्रीच्या चाळीच्या आजुबाजुला त्याने चॊकशा केल्या. शेवटी त्याला एक देशी दारुचा बार दिसला. आत जाउन तो जरा जोरातच एका टेबलावर बसला. नवखा माणुस पाहील्यावर शांतता पसरली.
" काय राव वाट चुकला काय? " टेबलावर ग्लास आपटत मालकाने विचारले.
" नाही वाट शोधत आलोय "
" अस्स पण इकडच्या वाटा जरा डेंजरस आहेत " मालक कुत्सितपणे बोलला
समीरने मालकाचा टेबलावर असलेला हात जोरात पिरगळल. मालकाने बोंबडी ठोकली. ४/५ गिर्हाइक समीरच्या अंगावर धावुन येताच समीरने खीशातुन रामपुरि मालकाच्या गळ्याला लावला
" शेळपटांनो या ! ह्याला अडवा करतो. आणी मग भडव्यांनो तुमच्याकडे बगतो. आयला पाहुण्याशी वागायची ही काय तर्हा? "
मालकाचा हात सोडुन त्याला खुर्चीत कोंबत समीर म्हणला
" आणी अकलेच्या कांद्या तु या शेराशी पंगा घेतोस? "
मालक अजुन हातच चोळत होता
" बोल तो कात्री कुठाय? हराम माझे २५००० घेउन पळाला आहे. "
" काहीतरी चुकतय साहेब." मालक आता साहेब नावावर आला होता
"कात्रीने कुणाचे पैसे कधी बुडवले नाहीत. ऊलट त्यानेच बऱ्याच जणांना मदत केली आहे. "
" म्हणजे बरे पैसे मिळवायचा का?"
" असे प्रश्न इथे कुणी विचारत नाही"
" मग माझे पैसे कसे बुडवले. तीन दिवसापुर्वी देतो म्हणला आणी अजुन थोबाड दाखवत नाही "
" कसे दाखवणार ? पोलीसांनी त्याला उचलला नव्ह "
" काय भानगड केली?"
" काय त्याचा मालकाच्या भानगडी आणी हा गेलाय सतराच्या भावात "
समीर अर्धा पाउण तास गप्पा मारुन बाहेर पडला. बऱ्यापैकी अंधार पडला होता.
--१४--
चाळीत शिरुन त्याने तारीची खोली शोधली. कुलुप तर त्याच्यापुढे टीकतच नसे. आत शिरुन त्याने दार आतुन लावुन घेतले. खिशातुन टॉर्च काढुन त्या प्रकाशात तो शोधु लागला. खोलीत कुबट वास येत होता. भांडी अस्ताव्यस्त पसरलेली होती. कपड्यांचे बोळे इकडे तिकडे पसरले होते. गादी वरचे शीट खालीच पडले होते. गादीखाली ३/४ खास अश्लील मासिके होती.
समीरला गादीत काहीतरी कडक लागले. समीरने गादी उलटी केली. मागचा भाग चाकुने उघडला. गादीत दोन लाख रुपये लपवले होते. म्हणजे तारीला पैशाची कमतरता नव्हतीच. पण इतकी रक्कम आली कोठुन हा प्रश्न होताच. समीरने ते पैसे सरळ खिशात घातले. अशा कृत्यात तो पापपुण्य मानत नव्हता.
शोधता शोधता त्याला छोट्या कपाटावर ३ ईंच उंचीची एक गणपतीची मुर्ती दिसली. मुर्ती धातुची होती. कुठला धातु हे बॅटरीच्या प्रकाशात कळणे अशक्य होते. मुर्ती वेगळीच दिसत होती. मुर्तीही समीरच्या खीशात गेली. बाकी फारसे काही दिसले नाही. दार उघडुन बाहेरचा त्याने कानोसा घेतला. आणी परत कुलुप लावुन तो चालत चालत गडीपाशी आला.
समीर घरी पोहोचला तेंव्हा रात्र चांगलीच पडली होती. तानाजीला त्याने मुर्ती फ्रेश करायला दिली आणी स्वत: फ्रेश होउन तो स्टडीत बसला. विचार करायची ती त्याची आवडती जागा होती. विविध विषयांवरील पुस्तकांनी खोली भरलेली होती. खोलीच्या बाहेरचा लाल दिवा चालु असला तर तानाजीसुद्धा आत येत नसे.
विचारात असताना तानाजी चकचकीत मुर्ती घेउन आला. तानाजीला त्याने मुर्तीचे सर्व बाजुने डिजीटल फोटो काढुन त्याच्या कंप्युटरवर अपलोड करायला सांगीतले. त्याने गुगलवर गणपतीच्या इमेजेस सर्च केल्या. त्याला कुठलाही साजेसा फोटो मिळाला नाही. कंटाळुन शेवटी तो झोपी गेला.
सकाळी त्याने जशची संचालकांची यादी चाळली. अतुल साने आणी मीना थोडानीला तो ओळखत होता. त्याने दोघांना फोन करायचे ठरवले.
" हाय मीनु!! समीर बोलतोय"
" मी स्वप्नात तर नाहीना "
" चल ग अजुन तुझी झोपायची वेळ झाली नाही."
" कैसे याद कीया ?"
" तु त्या जशच्या बोर्डवर आहेस ?"
" हो"
" कसा चालतोय कारभार?"
" मला काय माहीत? शहाने सांगितले म्हणुन मी ३० लाख गुंतवले. दरवर्षी २० लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते"
" एवढे कस काय ?"
" मुझे आम खानेसे मतलब, मै पेड क्युं गिनु ?"
" हो आणी तुला गिनती येते कुठे ?"
" समीर ..."
"पण आता शहा तर नाही"
थोडावेळ गप्प मारुन त्याने फोन ठेउन दिला. इतका फायदा देणारा धंदा असावा हाचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने सानेशी बोलायचे ठरवले.
" काय सानेसाहेब ?"
" समीर ? काय विशेष? "
" तु जशच्या बोर्डवर आहेस ? "
" हो "
" कंपनी इन्वेस्ट्मेंटवर चांगले रिटर्नस देतीय म्हणे?"
" हो मी ५० लाख गुंतवले होते आणी ४ वर्षात मला दिड कोटी तरी मिळाले आहेत. चांगला आहे"
" पण इतके रिटर्न्स देणे कसे काय परवडते ?"
" अरे कॅपीटल तसे कमी आहे. आणी इंम्पोर्ट एक्स्पोर्ट छान चालतो"
" कोण बघत सगळ ?"
" माखानी "
" जरा बघ. दुपारी भेटु. अस कर ना. १ वा लॅंड्स एंडला लंच घेउ आणी ३ वाजता जशच्या ऑफीसला जाउ"
दुपारी जशच्या ऑफीसमधे दोघे पोहोचले.
रिसेप्शनमधेच एक गणपतीची मुर्ती होती. समीरला तारीकडे सापडलेल्या मुर्तीची ती हुबेहुब प्रतीकृती होती. फक्त तारीची ३ इंच उंचीची होति तर ही अडीच फुटाची होती. माखानी त्यांची वाटच पहात होता. केबीनमधे सोनलही होती.
" काय साने ? आज कोण पाहुणा आणलात ?"
" माझा मित्र आहे . समीर पटेल . गडगंज श्रीमंती आहे. त्याला आपल्या कंपनीत गुंतवणुक करण्याची इच्छा होती. "
" काय पटेल साहेब. एकदम अचानक ?"
" अहो गेले दोन तीन दिवस तुमच्या कंपनीचे नाव वृत्तपत्रात झळकतेय. मला आठवले कि साने आणी मीना तुमच्या बोर्डवर आहेत. त्यांच्याशी बोलताना मला गुंतवणुक करावीशी वाटली "
" बरोबर आहे. शहा सगळ बघत होते. ते गेल्यामुळे आता सगळच गोंधळाचे झाले आहे. आणी आता नवीन गुंतवणुक तर आम्ही बंदच केली आहे."
" सर्व?"
" हो आता कुठल विस्तार करायचा ठरल तर विचार करु. तुमचे नाव लक्शात ठेउ. " माखानी त्यांना कटवायला बघत होते.
" माखानी साहेब तुम्ही बरेच बीझी दिसताय. मला एकच सांगा रिसेप्शन मधला गणपती कुठला आहे " माखानी जरा गोंधळल्या सारखे वाटले.
" गणपती ? काही कल्पना नाही बुआ. बरेच दिवस तो आहे. "
" ठीक आहे. निघतो आता. "
माखानीनी गणपतीचा विषय का टाळावा हे त्याच्या लक्षात आले नाही.
कुणाल, सोनल व मेरी ह्या पात्रांना तर त्याला गाठायचेच होते. तारीचीही एकदा भेट घ्याअची होती. आणी शक्यतो राणेंच्या लक्षात येउ न देता करायचे होते. कुणाल ते सोनल आणी सोनल ते मेरी जाणे त्याला शक्य होते. पण कुणालला कसे गाठायचे हा तसा प्रश्नच होता. जश मधुन बाहेर पडल्यावर तो सहज राणेंच्या ऑफीसमधे डोकावला. राणे जागेवरच होते. समोर कुणीतरी तरुण होता.
" काय समीर काय खबरबात ? अरे हो तुझी ओळख करुन देतो. हा कुणाल, खबरचा वार्ताहर. आणी कुणाल हा समीर. समीर पटेल. "
" म्हणजे शहांची बातमी देणारा का काय ? "
" हो तोच तो. कुणाल, समीरची ओळख करुन देण अवघड आहे. पण तुला एकच सांगतो, कुठल्याही अडचण आली तर त्याचा दरवाजा तु कधीही ठोठवु शकतोस. कसल्याही प्रसंगातुन बाहेर काढण्याची त्याची ताकद आहे आणी हिम्मतही. :"
" या कुणालराव एकदा गप्प मारायला. बायकोसकट या. बायको नसली तर मैत्रीणीला घेउन ये "
--१५--
राणेंचा निरोप घेउन समीर तीथुन निघाला. गणपतीचा विषय मात्र त्याच्या डोक्यातुन जात नव्हता.
शेवटी त्याने कांचनला फोन करायचे ठरवले. हा मित्र ASI मधे म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण [Archeological Survey of India] च्या मुंबई शाखेत होता आणी त्याचे अशा गोष्टींबद्दल ज्ञान अफाट होत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे सरकारी डिपार्ट्मेंट तसे फारसे प्रसिद्द नाहीच. कधीतरी कुठे प्रोटेक्टेड वास्तु आहे अशी पाटी वाचतो तेवढीच. पणं हे खात भारतात आणी भारता बाहेर उत्खनन करत असते. कांचन हा एक पुरातत्व्वेत्ता होता आणी ASI मधे सिनीअर होता.
“कांचन. समीर बोलतोय.”
“बोला! पण आज तुझ्याकडे यायला आणी दारु ढोसायला वेळ नाही. घरी लवकर जायलाच पाहीजे.
आशा घरी वाट बघत असेल”
“आशा वाट बघेल पण माझ्या घरी. त्यांना आणायला तानाजी गेलाय. मी आशाला फोन केलाय. चल मी येतोय.”
त्याने कांचनला ऒफीस मधुन सरळ घरी नेले. त्याची बायकापोर अगोदरच आली होती. सर्व पोर समीरच्या बंगल्यावर खुष असत. दोन अवाढव्य जर्मन शेफर्ड्स, स्वीमींग पुल, मोठी बाग आणी खायचे लाड पुरवणारा तानाजी. पोरांना पिकनीकला आल्यासारखेच वाटायचे. बायका मात्र कंटाळयाच्या आणी समीरच्या मागे लग्नाची टुरटुर लावायच्या.
कांचन आणी समीर त्याच्या स्टडीत बसले होते. समीरने पहील्यांदा त्याला गणपतीचे फोटो दाखवले.

" समीर हे तर बोगोर बुदुर च्या प्रतीकृती आहेत "
" हे काय ? म्हणजे मला बोगोर माहीत आहे . बोरो बुदुर ही माहीत आहे. पण बोगोर बुदुर काय आहे?"
“त्याकरता तुला थोडी इंडोनेशीयाची पार्श्वभुमी सांगतो. हा देश बेटांचा असुन तो ऒस्ट्रेलियापासुन ते मलेशियापर्य़ंत पसरला आहे. समीर किती बेट असतील ?”
“अरे असतील ४००/५००”
“लोकांना ह्या देशाबाद्दल फार कमी माहीती आहे. १७,५०० हुन जास्त बेटांचा बनलेला हा देश २०,००,०० स्क्वेअर कि. मी आहे. भारत जवळ ३०,००,००० स्क्वे कि मि आहे”
“बापरे!!”
“ह्या देशात वैदिक , बुद्ध संस्कृतीचा भरपुर प्रभाव होता आणी आजही तो दिसुन येतो. नाव सुद्दा बघ सुकार्नो (सुकर्ण) , सुकार्नो पुत्री, आदीत्य “
“पण असा पसरलेला देश सांभाळायचा म्हणजे जरा अवघडच”
“अरे ऎवढी बेट असली तरी आठ दहाच मोठी आहेत आणी १२,००० बेटांवर तर वसतीच नाही”
“कांचन !! त्या बोगोर बुदुरचे काय झाले?”
“बोरोबुदुर हा बुद्ध स्तुपाबाद्दल आणी देवळांबद्दल पसिद्द आहे तर बोगोर हि ब्रिटीश कालातील राजधानी होती आणी सध्या बर्याच गोष्टींबद्दल कुप्रसिद्ध आहे. त्यात तिथे असलेला कवटीचा गणपती फारच फेमस आहे.”
“पण हे बोगोर बुदुर काय प्रकरण आहे?”
“अरे आमच्याइथे एकदा आमचे डायरेक्टर च्कुन इंडोनेसीयन अवशेषांना उद्देशुन बोगोर बुदुर म्हणले आणी तो शब्द आता कायम झाला आहे विशेषतः तस्करी व्यवसायातल्या वस्तुंकरता"
समीरची बोट की बोर्ड वरुन झरझर फीरली आणी काही सेकंदातच बोगोरचा गणपती स्क्रीनवर आला.
" अरे खरच की . पण कांचन ही तस्करीची भानगड समजली नाही "
" इंडोनेसिया ज्वालामुखीं करता ही प्रसिद्ध आहे. आअजही तेथे १५० हुन अधीक जीवंत ज्वालामुखी आहेत. गेल्या काही शतकांमधे ह्या बर्याच ज्वालामुखीची राख सर्व बेटांवर पसरली आहे. ट्यात किती अवशेष आहेत हे सांगणे अवघाडच आहे. त्यातुन त्या देशाला ८०,००० कि मी हुन जास्त समुद्र किनारा आहे."
"म्हणजे तस्करी करता मस्तच आहे म्हण की."
" थट्टा राहुदे समीर पण तुझ्याकडे हे फोटो कुठुन आले. ? "
समीरने स्टडीचा लाल दीवा लावला.
तारीची गणपतीची मुर्ती काढुन समोर ठेवली.
" माय गॉड! समीर ही मुर्ती जर ओरीजीनल असली तर तीची किम्मत कोटीत जाइल आणी मला असे वाटते की ही खरी आहे"
" आर यु शुअर ?"
" प्रश्नच नाही. पण तुला हा गणपती मिळाला कुठे ? "
" एका चाळीत. जर ही मुर्तीची किम्मत एवढी असेल तर अडीच फुट मुर्ती केवढ्याची असेल ?"
" उगीच काहीतरी ढाका टाकु नको. आणी ती कुठे आहे धारावीत का ? "
" थोडी जागा चुकलास. समोरच BKC मधे जश च्या ऑफ़ीसमधे रीसेप्शन मधे"
" काय ? मग ती खोटी तरी असेल कींवा त्याना तीच्या कीमतीचा अंदाज नसेल . मला बघता येइल का ती मुर्ती ?"
" बघुया ट्राय करु . तोपर्यंत ही तु घेउन त्याची कीम्मत ठरव "
" हे बघ तुझी काम असतात भानगडीची. तुच टेस्ट करायला म्हणुन पाठवुन दे. आणी एकच नको. ८/१० मुर्ती कसल्याही भंगारमधुन गोळा करुन पाठव. "
" बर"
" आणी ऑफ़ीशीयल अहवाल आणी माझा अहवाल यात फरक असेल"
" चल जरा बाहेर जाउन बसु. नाहीतर तुझ्या घरी मला चहासुद्दा मिळणार नाही"
दोघेही स्टडीतुन बाहेर आले. मुले कुत्र्याशी बागेत खेळत होती.
" काय आशा वहीनी ? आमचा मित्र काही सुधारतोय का नाही ?"
" हे बघा उगाच पेडगावला जाउ नका. अगोदर एक बायको आणा म्हणजे इथे आल्यावर आम्ही बोअर होणार नाही "
" अग तो कसली बायकॊ करतो? सतराशे साठ मैत्रीणी त्याला "
गप्पा मारत वेळ कसा गेला ते कळलेच नाही
--१६--

आठ दहा दिवसातच तारीचा खटला उभा राहीला. सरकारी वकील कदम निष्णात होते. लवकरच १०० फाशीच्या शिक्षा पुर्ण करणार अशी जनतेला खात्री होती.
मेरीने धावपळ करुन जेम्स नावाचा वकील दिला होता. थोडा विक्षीप्त होता पण लढणारा होता. त्याला जे नावानेच लोक ओळ्खायचे. न्यायाधीश काळे होते. हुशार आणी आरोपीला संशयाचा फायदा देणारे होते.
पहील्याच दिवशी खटला सुरु होउन सुरवातीचे सोपस्कार झाल्यावर कदम उभे राहीले.
" मिलॉर्ड . हा खटला फार सरळ आहे. आरोपी खुनाच्या वेळी तेथे गेला होता. त्याची प्रेयसी मयताबरोबर गेल्यामुळे तो त्याचा पाठलाग करत होता. प्रेयसीबरोबर भांडुन तो पार्कींग मधे आला आणी त्याने शहाचा खुन केला. आरॊपीचे ठसे शहाच्या कारच्या दरवाजावर सापडले आहेत. आरोपीकडे सापडलेल्या रिव्हॉल्वरनेच शहाचा खुन झाला आहे. तपासणीत रक्ताने माखलेला शर्ट आहे आणी तो ब्लड ग्रुप मयताशी जुळत आहे. ह्या सर्व पुरांव्यावरुन हा खुन आरोपीने केला हे सिद्ध होत आहे. हे सर्व पुरावे आपल्यापुढे आम्ही सादर करणार आहोत "
" जेम्स तुम्हाला काही बोलायचे आहे ?"
" मिलॉर्ड गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे. " जे
कदमांनी पहील्यांदा गुरख्याची साक्ष घेतली. त्याचे रजीस्टरही पुरावा म्हणुन सादर केले.
" बहादुर. तु हे रजीस्टर व्यवस्थीत ठेवतोस ? " कदम
" हो "
" तु रात्री ड्युटीवर असताना बाहेरचे दार उघडे असते ? "
" नाही. त्याला मी कुलुप लावतो. सर्व रहीवाशांकडे माझा मोबाइल आहे. आत बाहेर करताना ते मला फोन करतात. "
" कुणी पाहुणे असले तर ?"
" बाहेर जाताना त्यांना फ्लॅट मालकाकडुन फोन करायला लागतो. आत येताना बाहेर बेल दाबुन CCTV कॅमेरा समोर उभे रहावे लागते. ज्याच्याकडे जायचे असेल त्याने कॅमेरा बघुन परवानगी मिळाल्यावरच दार उघडल जात. "
" म्हणजे या रजीस्टर च्या बाहेरची कुणीही व्यक्ती आत बाहेर जाउ शकत नाही?"
" नाही साहेब. "
" दॅटस ऑल युवर ऑनर "
जे उलटतपासणीला उभा राहीला.
" बहादुर तु असताना नेहमीच दाराला कुलुप असते ?"
" हो "
" तु आत बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवतोस ?"
" हो"
" पण यात मेरीची नोंद नाही "
" फ्लॅटच्या मालकाबरोबर असे कुणी असेल तर आम्ही एक पाहुणा म्हणून नोंद करतो. "
" हल्ली सगळ्या गाड्या एसी असतात. मागे कुणी झोपले असेल तर तुला दिसणे शक्य नाही"
" ऑब्जेक्शन :" कदम
" ओव्हर रुल्ड "
" बहादुर माझा प्रश्न कळला ना ?"
" हो . तशा स्थीतीत पाहुणा आत बाहेर करु शकतो "
" आणी त्याची नोंद तुझ्या रजीस्टर मधे नसेल. "
" नाही "
" दॅटस ऑल युवर ऑनर "
त्यानंतर कदमांनी राणेंच्या एका तपास अधीकाऱ्याची साक्ष घेतली. त्याने प्रेताचे फोटो, गाडीचे फोटो, गाडीतल्या व शहाच्या खिशातल्या वस्तुंची यादी असे पुराव्यात सादर केले.
त्यानंतर बॅलॅस्टीक एक्स्पर्टच्या साक्षीत त्याने शहाच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या आणी तारीकडले सापडलेले रिव्हॉल्वरने झाडलेल्या गोळ्या ह्यातील साधर्म्य दाखवले. त्याच्या प्रमाणे त्याच ह्त्याराने शहाचा खुन झाला होता.
दोन्हीवेळेला जे ने उलटतपासणी घेतली नाही. दिवसाचे कामकाज संपल्यामुळे कोर्ट थांबले. सोनल साक्षीदार म्हणुन आणी कुणाल वार्ताहर म्हणुन उपस्थीत होते.
समीरही एक चक्कर टाकुन गेला होता. त्याने भंगारमधुन ८/९ मुर्ती घेतल्या होत्या आणी सर्व मुर्ती तपासासाठी ASI ला दिल्या होत्या. कुणाल सोनल जोडीलाही त्याने जेवणाचे आमंत्रण दिले होते. रोज कोर्टात यायची त्याला जरुर नव्हती. कुणाल त्याला विशेष गोष्टी सांगणार होता.
--१७--
दुसऱ्या दिवशी फोरेन्सिक साक्ष होती. कदमांनी प्रथम डॉ गुणेंची क्वालीफीकेशन अनुभव वदवुन घेतले आणी मग मुख्य मुद्याला हात घातला.
" मयताचे पोस्ट तुम्ही केलेत ? "
" हो. "
" मयताच्या अंगात किती गोळ्या सापडल्या ? "
" तीन. एक कपाळातुन मेंदुत गेली होती. दुसरी मानेतुन आत घुसली होती आणी तीसरी खांद्यात "
" कुठली प्राणघातक होती?"
" मेंदुतली. काही सेकंदातच त्या गोळीने प्राण घेतला असावा "
" म्हणजे पहील्याच गोळीने"
" गोळ्या झाडल्याचा सिक्वेन्स सांगणे शक्य नाही. मी फक्त एक क्र दिलेली गोळी एवढेच म्हणु शकतो. "
" किती अंतरावरुन झाडल्या गेल्या "
" दहा ते पंधरा इंचावरुन "
" कशावरुन ?"
" मयताच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या दारुचे डाग होते. जवळुन गोळ्या झाडल्या तरच असे डाग पडु शकतात."
"मृत्यु किती वाजता झाला ?"
" साडे अकराच्या आसपास"
"कशावरुन? "
" पोटातील अन्नाच्या स्थीतीवरुन. साधारणत: एका तासापुर्वी जेवण झाले असावे. पोटात तंदुरी चीकन व पनीर मसाला व नान ह्यांची स्थीती. "
" दॅटस ऑल युवर ऑनर " जे उलट तपासणीला उठला.
" एकच प्रश्न . मृत्यु साडेअकराला झाला कशावरुन ?"
" मी सांगीतल्याप्रमाणे अन्नाच्या स्थीतीवरुन. जेवणानंतर सुमारे एक तासाने . जेवण साड्दहाला झाल्यामुळे मी वेळ सांगीतली."
" तुम्हाला जेवणाची वेळ कशी कळली ?"
गुणे गप्प.
" मिलॉर्ड ! Proper foundation was not laid. Request to remove entire testimony of this witness"
कदमांना झटकाच बसला.
" खुनाची वेळ साडे अकरा असल्याचा भाग फक्त काढुन टाकावा अशी कोर्ट आज्ञा देत आहे"
कदम उठुन म्हणाले
"मिलॉर्ड एवढ्याच गोष्टीकरता मी तपासाधीकारी आणी रेस्तॉरंटच्या स्टुअर्टला बोलावतो. तोपर्य़ंत कोर्टाने सुट्टी घ्यावी अशी विनंती आहे "
" जेम्स तुमचे काय म्हणणे आहे "
" मिलॉर्ड पुढचा विट्नेस बोलवावा " कदमांना ब्रेक कशाकरता हवा आहे हे जे ने ओळखले होते.
" ठीक आहे. कदम "
--१८--

कुणालची साक्ष कदमांनी काढली.
" आपले नाव"
"कुणाल कोहली"
" व्यवसाय ?"
" खबरचा वार्ताहर "
" तुम्हाला बॉडी सापडली ?"
"ऑब्जेक्शन. लीडींग प्रश्न आहे . कारण ह्यात कुणालने पाह्यच्या अगोदर शहा मेला होता असे गृहीत आहे. "
" सस्टेन्ड"
" तुम्ही कुठे राहता " कदम
" वरळीला सागर मंझील मधे "
" खुनाच्या दिवशी तुम्ही काय पाहीलेत ?"
"ऑब्जेक्शन. खुनाची वेळ अजुन ठरायचीय "
" सस्टेन्ड"
" बारा तारखेला रात्री तुम्ही घरी किती वाजता पोहोचलात?"
" साडे अकरा बारा"
" तुम्ही गाडी पार्क करताना काय झाले "
" ३/४ वेळा मोबाइलची रिंग ऐकु आली. शहाच्या गाडीतुन ती आल्यासारखे वाटले म्हणुन मी त्याच्या गाडीकडे गेलो"
" मग काय झाले ?"
" गाडीची काच उघडी होती. शहा एकटाच आत होता. तो शुद्धीत नसावा असे वाटत होते. तेवढ्यात परत फोन वाजला. शहाला जागे करावे म्हणुन मी त्याला हलवला तर तो समोरच्या सीटवरच आडवा झाला"
" तो मृत आहे हे केंव्हा कळले?"
" मला वाटले त्याला दारु जरा जास्त झालि आहे. म्हणुन मी कारचा दरवाजा उघडुन त्याला हलवले. प्रतीसाद मिळत नाही म्हणल्यावर मी नाडी बघीतली. तोपर्यंत त्याच्यावर हल्ला झाल्याचे लक्षात आले होते."
" मग तुम्ही काय केलेत"
" मी दार लावले. त्या अगोदर काच लावुन घेतली. गुरख्याला फोन करुन बोलावले. त्याला थांबायला सांगुन मी वर फ्लॅटवर गेलो. कंट्रोल रुमला फोन करुन सांगीतले आणी खाली जाउन गुरख्याला दारावर पाठवुन दिले"
" दॅटस ऑल युवर ऑनर "
जे ने कुणालची उलट्तपासणी घेतली नाही.
" मिलॉर्ड मी आता कोहीनुरच्या स्टुअर्ट्ला बोलावतॊ"
" त्याची जबानी जर खाण्याबद्दल आणी वेळेबद्दल असली तर सरकारी वकीलांनी तसे प्रतीपादन करावे . आम्ही त्याला अनुमोदन देउ. "
कदम चडफडत बसले. त्यांनी घड्याळाकडे पाहीले. कोर्ट संपायला अजुन बराच अवकाश होता.
त्यांनी सोनलला बोलावले.
" आपले नाव ?"
" सोनल गोखले "
" आपण काय करता ?"
" मी जश मधे श्री माखांनीची असीस्टंट आहे "
" आपण त्या रात्री शहांकडे कशाला गेला होतात ?"
" शहांनी माखानींकडे काही अकाउंट्स आणी एक्स्प्लनेशन्स मागीवली होती. आयत्यावेळी माखांनीच्या आइला हॉस्पीटलमधे ऍड्मीट करायला लागले. तेंव्हा माखानीनी मला कागदपत्र घेउन शहांकडे पाठवले"
" मग ?"
" मी नउच्या आसपास पोहोचले. मला चहा देउन नोकर निघुन गेला. मी शहांची वाट पहात थांबले "
" मग "
" दोन तास थांबल्यावर मी निघणार होते, तेवढ्यात मेरी आली. मी तीला ओळखत नव्हते. पण मी काही विचारायच्या आतच तारी आला आणी त्या दोघांचे जोरात भांडण सुरु झाले. शहा वर येतच होते. मी तमाशा नको म्हणुन त्या दोघांना आतल्या खोलीत ढकलले. पंधरा मीनीटात तणतण करीत तारी निघुन गेला."
" मग. ?"
" आम्ही दोघी थांबलो. मेरी मला ओळखत होती. मी तीची ओळख करुन घेतली. खर म्हणजे मला तीची दया आली होती. शहाचे शॊक मला चांगलेच माहीती होते."
" पुढे ?"
" बराच वेळ वाट पाहुनही शहा साहेब आले नाहीत. मी त्यांच्या मोबाइलवर तीन चारदा कॉल दिला. ते त्यांनी उचलले नाहीत. काही वेळाने राणे आणी कुणाल आला आणी आम्हाला खुन झाल्याचे कळले "
जे ने तीचीही उलट तपासणी घ्यायला नकार दिला. आता मात्र कदम पेचात पडले होते. शेवटी कोर्टानेच काम थांबवुन त्यांची सुटका केली. खटल्यात अजुनही काही दम नव्हता. आता मेरी, फ़ींगरप्रीन्ट एक्स्पर्ट आणी राणे ह्यांच्याच महत्वाच्या साक्षी होत्या.
--१९--

सोनल आणी कुणाल त्या दिवशी संध्याकाळी खास बोलावण्यावरुन समीरच्या घरी पोहोचले. दोघेही समीरचा राजेशाही थाट पाहुन भारावुन गेले. समीरने थोड्याच वेळात दोघांना बोलते केले.
" सोनल तु शहांकडे जायला घाबरली नाहीस." समीर
" शहा तसे घाबरट होते. आणी माझे वडील नेव्हीत असल्याने मला सेल्फ डीफेन्स पुर्ण येतो. "
कुणाल सोनलकडे हपापलेल्या नजरेने पहात होता. सोनल त्या मानाने कूल वाटत होती.
" सोनल तुमच्या रीसेप्शन मधे कसला गणपती आहे?"
" माहीत नाही. शहांना असा नाद होता "
" कुणाल कधी गेलास तर तीथला फोटो आण रे " समीर " आणी काय मीडीयाला काय वाटतय खटल्या बद्दल ?"
" अजुन तरी काही दम वाटत नाही. तारी सुटेलस वाटत. त्यातन मेरी वरुन तो खुन करणार नाही. उलट शहालाच त्याने पेचात पकडल असते."
" बिचारी मेरी !" सोनल " ती पॅकींग मधे आहे. कुठुन शहाच्या नजरेस पडली कोण जाणे? मुलगी सालस आहे आणी तारीवर जीव लावुन बसलीय "
"एकदा भेटायला पाहीजे. "
" सांगते तुम्हाला भेटायला. येइल उद्याच "
" सोनल तुमच्या कंपनीत गुंतवणुक करायची इच्छा होती. तुमच्या कंपनीचे फायदे अवाढव्य आहेत."
" हो ना आमच्या कंपनीची प्रगती फारच जोरात आहे. आणी हो तुम्हाला त्या गणपती विषयी एवढी उत्सुकता का आहे? "
" काही नाही. वेगळाच वाटला. आणी मला सुंदर आणी नवीन गोष्टी नेहमीच आवडतात. " समीर सरळ आव्हान देत म्हणाला.
" पण अशात डेंजर असु शकते "
" आणी डेंजर असले तर खेळायला मला अधीकच आवडते. बर तु राहतेस कुठे? "
" बोरीवली इस्टला आमचा एक छोटा बंगला आहे. तीथे मी आणी माझी बहीण मीनल दोघेच राहतो"
" म्हणजे श्रीमंत दिसताय"
" नाही हो. बंगला नावाला. वडील नेव्हीत होते. त्यांनी हॊसेने रिटायर झाल्यावर जागा घेतली पण बंगला पुर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यु झाला. बंगला अर्धवटच राहीला आणी आम्ही अजुन कर्जच फेडतोय."
" बहीण काय करते?"
" इंटीरीअर डिझायनर आहे "
" बर एक खाजगी प्रश्न . तु आणी बहीणीनी लग्न का नाही केले ? "
" तस काही खास कारण नाही " कुणाल कडे एक चोरटा कटाक्ष टाकीत सोनल म्हणाली.
दोन तीन तास घालवुन दोघे बाहेर पडली. समीरला अजुन दिशा सापडत नव्हती. सकाळी मेरी भेटायला येणार होती तोपर्य़ंत थांबणे भाग होते.
--२०--

सकाळी दहा वाजता मेरी भेटायला आली.
ती दबुन जाउ नये म्हणुन समीर साध्या कपड्यात व्हरांड्यातच बसला होता.
" ये मेरी . चहा घेणार का ?"
" नको साहेब. "
" अग घे ग. हव तर टोस्ट सांगतो. का ऑम्लेट खाणार आहेस ?"
मेरी रडायला लागली.
" साहेब एवढा चांगुलपणा कोणी दाखवत नाही हो. God Bless You!"
" बर मेरी तु काय काम करतेस ?"
" मील मधे पॅकींग सेक्शन्मधे दिवसपाळीला "
" बर"
" रात्रपाळीला सर्व पुरुष असतात आणी सर्व जड काम म्हणजे बेल्स तयार करणॆ. स्ट्रॅप करणे हे रात्रपाळीला होत. आम्हाला त्यावर लेबल्स चिटकवणे वगेरे काम असतात"
" त्या दिवशी तु शहा बरोबर कशी गेलीस "
" सकाळी शाहांनी मला फ़्लोअर वर बघीतले. थोड्या वेळाने केबीनमधे बोलावुन घेतले आणी संध्याकाळी वरळी नाक्यावर बोलावले "
" मग "
" मी बरीच कारणे सांगीतली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी नोकरीचा प्रश्न आहे. "
" सोडुन द्यायची"
" साहेब आमच्या सारख्यांचे हातावर पोट असते. आणी सोडल्यावर दुसरीकडे लगेच कुठे मिळणार "
"ते खरच आहे. पण म्हणुन तु त्याच्या ईच्छेला मान तुकवलीस ?"
" नाही हो. पण जाण भागच होते. नंतर काय होते ते बघु असा विचार केला."
" आणी तशी वेळ आली असती तर ? "
" मग काय साहेब झक मारत देह त्याच्या हवाली केला असता. पण नंतर तारीला तोंड दाखवले नसते. लग्न तर दुरच राहीले"
" तुझी आणी तारीची ओळख कशी ?"
" शहा हा काही माझ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारा पहीलाच न्व्हता. रात्रपाळीच्या बऱ्याच कामगार माझ्याकडे त्या नजरेने बघत "
" त्यात तारीही ?"
" नाही, नाही. उलट एकदा एकाने काम करताना माझा हात धरला तर तारीने त्याची ह्जामत केली आणी तेंव्हापासुनच त्याची आणी माझी ओळख झाली. "
" तारी काय काम करतो?"
" तो काहीवेळेला रात्रीच्या शिफ्टला असतो तर काहीवेळेला माखानींची कामे करतो. बऱ्याच वेळेला तो मुंबई बाहेर असतो."
" तुला तो काय करतो माहीत नाही?"
" नाही. पण तो माझ्याबाबतीत अगदी सरळ आहे. आणि सगळी त्याला घाबरुन असतात. "
" ठीक आहे. जपुन रहा. आणी तुमच्या ऑफीसमधे एक मोठा गणपती रिसेप्शनमधे आहे, त्याबद्दल तुला काय माहीत आहे का ?"
" नाही साहेब, पण महीन्याभरापुर्वी मला असाच एक छोटा गणपती मीलमधे पॅकींगच्या कचऱ्यात सापडला तो मी तारीला दिला होता. "
" कचऱ्यात ?"
" हो साहेब. "
" मग तो गणपती कुठे आहे ?"
" तारीलाच माहीती साहेब. "
" ठीक आहे. आज तुझी साक्ष आहे. कधीही खोट बोलु नकोस. ये आता"
मेरी गेल्यावर समीर गणपतीच्या गुपीतात बुडुन गेला.
--२१--

मेरी साक्षीला उभी राहीली.
कदम आज केस संपवायच्या मुड मधे होते.
" मिलॉर्ड मला जरा leading प्रश्न विचारण्याची संधी द्यावी कारण हा hostile witness आहे. "
" कदम तुम्ही सुरवात तर करा"
" नाव?"
" मेरी डिसुझा "
" काम काय करतेस ?"
" जशच्या फॅक्टरीत आहे. "
" आरोपीला ओळखतेस ?"
" हो "
" कशी "
" जशमधेच तो हि कामाला आहे "
" जश सोडुन तु काय काम करतेस?"
" साहेब वेळ कुठे असतो "
" पण तु प्रॉस आहेस आणी धंदा करतेस ?"
"ऑब्जेक्शन. संबध नसलेला प्रश्न आहे. "
" सस्टेन्ड"
" शहा बरोबर तु खुनाच्या रात्री जेवायला गेली होतीस ?"
" बिल कीती झाले ?"
" माहीत नाही."
" शहाने तुला रात्रीचे किती पैसे दिले?"
"ऑब्जेक्शन. संबध नसलेला प्रश्न आहे. "
" सस्टेन्ड"
" जेवल्यावर तु शाहाबरोबर त्याच्या फ्लॅटवर गेलीस.?"
" हो."
" कशाला ?"
" शहाने बोलावले होते "
" कशाला ?"
" माहीत नाही"
" शहा मुलींना फ्लॅटवर कशाला घेउन जायचा ?"
" माहीत नाही"
" पुर्वी कितीवेळेला फ्लॅटवर गेली होतीस"
" एकदाही नाही"
" इमारतीत पोहोचल्यावर काय झाले ?"
" शहांना फोन आला. त्यांनी मला फ्लॅटची किल्ली दिली आणी पुढे जाण्यास सांगीतले "
" मग. "
" मी वर गेले. किल्लीने दार उघडुन गेले तर सोनल मॅडम आत होत्या."
" मग? तुला आश्चर्य नाही वाटले?"
" वाटले ना"
" मग तारी केंव्हा आला "
" आम्ही दोघी काही बोलायला सुरुवात करणार तर बेल वाजली. आणी तारी आला. "
" तो कसा काय आला?"
" माहीत नाही"
" तु त्याला बोलावले होतेस?"
" नाही."
" शहाने बोलावले होते?"
" माहीत नाही."
" मग काय झाले?"
" काही नाही. आम्ही दोघे बोललो आणी पंधरा वीस मीनीटात तो निघुन गेला"
" इतक्या शांततेत घडले?"
" म्हणजे?"
" तारी चीडुन आला होता का ?"
"हो"
" का चिडला होता?"
" माहीत नाही "
" तुझ्याशी तो भांडला का ?"
" हो."
" का?"
" आठवत नाही "
" पण त्याने तुला थोबाडीत मारली आणी जास्त तमाशा नको म्हणून सोनलने तुम्हाला आत ढकलले? "
" ऑब्जेक्शन. Argumentive आहे "
" ओव्हररुलड"
" सोनलने आम्हाला आत जायला सांगीतले"
" शहा आले तर तमाशा नको अशी ती म्हंणाली?"
" आठवत नाही"
" मेरी तुच खुन कशावरुन केला नाहीस? म्हणजे शहाला शेवटी जीवंत पाहीलेली तुच होतीस."
" ऑब्जेक्शन. are you impeaching your own witness? आणी मेरीने शाहाला शेवटी जीवंत पाहीले कशावरुन?"
" सस्टेन्ड"
" मेरी. तु शहाबरोबर आलीस म्हणुन तारी चिडला होता का?"
" माहीत नाही"
" त्याने तुला शिव्या दिल्या का?"
" हो"
" शाहाचा गेमच करतो अस तो म्हणाला का?"
" आठवत नाही"
" दॅटस ऑल युवर ऑनर "
जे ने उलट तपासणीस सुरुवात केली
“मेरी तु वर एकटीच का गेलीस?”
“शहा साहेबांना उतरताना फोन आला. त्यांनी मला किल्ली दीली आणी फ्लॆट मधे जायला सांगीतले”
“मग”
“मी वर गेले. दार उघडेच होते. आत सोनल मॆड्म दिसल्या”
“मग”
“मी जरा चपापलेच. मॆडमही शहाबरोबर असतात काय असे वाटले”
“मला पाहुन मॆडम जरा चमकल्या. त्यांचे शहांकडे काम होते आणी आता मी आल्यामुळे ते होणार नाही असे वाटल्यामुळे त्या जरा त्रासलेल्या वाटल्या”
“conclusion of witness” कदमांचा एक प्रयत्न
“ मेरी मग काय झाल तेवढेच सांग”
“आम्ही बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तारी आला”
“किती वेळाने?”
“२/३ मिनिट फार फार तर ५ “
“that’s all Your Honour”
strong>--२२--

आता पाळी होती राणेंची.
" आपले नाव?"
" सुरेश राणे"
" व्यवसाय?"
" पोलीस खात्यात DCP Crime "
" तुम्हाला खुन झाल्याचे कसे कळले?"
" कंट्रोल रुमकडुन फोन आला. हाय प्रोफाईल असल्यामुळे मला जायला सांगीतले"
" मग गेल्यावर काय आढळले?"
" गाडी पार्कींग मधे होती. गाडीच्या सर्व काचा बंद होत्या. ड्रायव्हरशेजारची काच कुणाल्ने लावली होती. आत कुणालचे ठसे होते."
" आणी"
" प्रेत सीटवर कलंडले होते. "
" मग?"
" मी फ्लॅटवर गेलो. तेथे मेरी आणी सोनल होत्या. "
" तारी बद्दल काय सांगु शकाल . तारी त्याच सुमारास तेथे येउन गेला होता व त्या दोघींच्या सांगण्यावरुन तो चिडलेला होता. "
" तारीचा संशय कसा आला?"
" तारीचे ठसे गाडीच्या दारावर सापडले. तो चार्ज शीटर असल्याने ते ओळखले गेले"
" मग?"
" त्याच्या घराच्या झडतीत खुनी हत्यार सापडले?. तसेच रक्ताने माखलेला शर्ट ही सापडला. हत्यारावरही त्याचे ठसे होते. "
" दॅटस ऑल युवर ऑनर "
जे उलटतपासणीला उभा राहीला.
" राणे. तुम्ही एक कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी आहात."
राणे गप्प राहीले.
" हा खुन तारिने केला असे तुम्हाला खरेच वाटते का?"
" चार्जशीट तरी तसेच आहे. "
" तुम्हाला काय वाटते?"
" ऑब्जेक्शन. विट्नेस कन्क्लुजन " कदम
" मिलॉर्ड साक्षीदार एक्स्पर्ट आहे. त्यांनी धेकडो केस पाहील्या आहेत"
" ओव्हररुलड"
"चार्जशीट प्रमाणे माझे मत आहे"
" ठीक आहे. ज्या हत्याराने खुन झाला ते कुणाचे होते"
" शहाच्या वडीलांच्या नावावर घेतले होते. पण ते मेल्यावर लाय्सन्स रिन्य केले नव्हते?"
" मग ते कुठे होते?"
" शहांकडे असावे"
" Exactly. मग त्या हत्याराने तारीने खुन कसा केला?"
" तारी चीडून आल्यवर शहाने पिस्तुल काढले असेल व झटापटीत तारीने झाडले असेल. "
" जवळुन गोळी झाडल्यामुळे बंदौकीच्या दारुची नोंद शाहाच्या चेहऱ्यावर होती."
" हो"
" तारीला २४ तासातच अटक झाली आणी तो आंघोळ न करताच घरी होता"
"हो"
" त्याच्या हातावर दारुची नोंदीची तपासणी केली का?"
"हो"
" काय आढळले?"
" नकारात्मक"
" मयताच्या हातावर टेस्ट घेतलीच असेल"
"हो"
"रिझल्ट?"
" निगेटीव्ह."
" म्हणजे खुनी कोणी तीसराच असला पाहीजे"
" असच नाही. तारीने हातमोजे घातले असु शकतात."
" पण त्याचे ठसे तर गाडीवर आणी ह्त्यारावर आहेत?"
" हो"
" मग दारुचे का नाहीत?"
" माहीत नाही"
" बर. तारीचे दारावर ठसे आहेत?"
" हो"
" ते रक्तात माखले आहेत"
"हो"
" त्याचा अर्थ ठसे खुन झाल्यावर आहेत"
" हो"
" बर हा फोटो बघा. यात शाहाचा हॉल दिसत आहे. त्यात टीपॉय्वर किल्या आहेत."
" हो त्या मेरीने ठेवलेल्या आहेत."
" त्याचे फिंगरप्रींटस घेतले होते का?"
" हो"
" कुणाचे होते?"
" कुणाचेहॊ नव्हते."
“बर! मेरी वर गेली तेंव्हा शहा फोनवर होते”
“हिअरसे एविडन्स . ऒब्जेच्टेद” कदम
“राणे. तुम्ही फोन कंपनीची रेकॉर्डस चेक केली असतीलच”
“हो”
“मग काय सांगु शकता?”
“त्या फोनवर ११.०८ ते ११.२० फोन चालु होता”
“फोनवर कोण होत?”
“तपासा अंती तो फोन याकुब चा होता, पण फोन कुणी केला सांगण अवघड आहे”
“का ?”
“त्या दिवशी याकुब दुबईत होता आणी त्याने फोन ऒफीस मधेच ठेवला होता”
" दॅटस ऑल युवर ऑनर "
--२३--
बाहेर येताच राणेंनी कमीशनरला फोन केला.
" साहेब. केस टिकेल अस वाटत नाही. मी आपल्याला अगोदरच सांगीतले होते."
" जाउ द्या हो. केस लांबवायचे बघा. मी कदमांशीही बोलतो."
" पण रेकॉर्ड खराब होत ना?"
" रेकॉर्डच माझ्यावर सोडा"
" साहेब मला आता जरा माझ्या पद्धतीने जाउ देत. मला काहीतरी वेगळीच भानगड वाटतीय."
" मला लुपमधे ठेवा म्हणजे झाले"
" मला जरा माखानीचा मागोवा घ्यायचा आहे."
" जपुने"
दुसरा फोन त्यांनी समीरला लावला.
" अरे काय पत्ता काय तुझा?"
" मुंबैतच आहे"
"अरे इथे आमची अब्रु जायची वेळ आली आणी तु तर पार्ट्यातच मग्न आहेस."
" राणे ह्या केसच्या मुळाशी वेगळीच भानगड दिसत आहे. मी तुम्हाला एक निच्छीत सांगतो की तारीने हा खुन केलेला नाही."
" ते तर माझेही मन सांगतय पण पुरावे तर सगळे त्याच्याविरुद्ध आहेत"
" ते टीकणारे नाहीत"
" पण दुसऱ्या कोणाकडे बोट दाखवायला जागा नाही."
" तुम्ही जशमधे गणपतीची मुर्ती आहे, त्याच्यावर लक्ष द्या?"
"का?"
"ती कोट्यावधी रुपयांची आहे. जशकडे ती कशी आली हे बघायला लागेल"
" अरे जशला पैशांची थोडीच कमी आहे. पण तरीसुद्धा कुणालातरी लावतो कामाला "
राणे चक्रावुन गेले होते. तारी नाहीतर कोण हा प्रश्न त्यांना सतावत होता.
--२५--
समीरला ही तोच प्रश्न पडला होता.
त्याने गणपतीचे गुढच उलगडायचे ठरवले. त्याने कुणालला फोन लावला.
" अरे कुणाल तुला मी जशच्या रीसेप्शनचे फोटो काढायला सांगीतले होते. त्याचे काय झाले"
" काढले, पण त्यात गणपती नाही"
" काय?"
" पाहीजेतर मी इमेल करतो. तुम्ही पाहुन घ्या"
हा ही मार्ग बंद झाला होता.
त्याने कांचनला फोन करायचे ठरवले
" कांचन्भाय अरे माझ्या कामाचे तु काय केलेस?"
" काही नाही. अरे आज सकाळी तर सॅंपल्स माझ्याकडे आली. टेस्टस सुरु केल्या आहेत. उद्या पर्यंत
तुला कल्पना देतो."
चला हा ही डेड एंड!!
आता जशच्या ऑफीसला रात्री भेट देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
दिवसभरात समीरने जश सिक्युरीटीची टेहळणी केली. तशी फार कडक नव्हती. इमारतीच्या प्रवेश्द्वारावरच फ्क्त होती आणी ती ही फारशी हायटेक नव्हती. तरीसुद्धा समीरर्ने कुठलाही धोका पत्करायाचा नाही असे ठरवले.
रात्र पडताच तो बाहेर पडला.
कोपऱ्यावर उभी केलेल्या एका जुनाट फियाट मधुन त्याने BKC कडे जायचे ठरवले.
ती गाडी दिसायला पिवळ्या काळ्या टॅक्सी सारखी होती. समीर अशा वेगवेगळ्या गाड्या तयार ठेवत असे. आज त्याच्या अंगावर खास खाकी ड्रेस अगदी बिल्ल्यासहीत होता.
साडेअकराच्या सुमारास तो जशच्या निमारतीपाशी पोहोचला. गाडी त्याने मागच्या बाजुला नेली. तिथले फ्राइट लिफ्टचे कुलुप म्हणजे समीरच्या हातचा मळ होता. तो मुद्दामहुन दोन मजले वर गेला आणी चालत खाली आला.
जशचे दार उघडुन आत जाणे त्याला अवघड गेले नाही. आत भरपुर प्रकाश होता. त्याला रिसेप्शन मधे गणपती दिसला नाही, त्या जागी एक गरुडाची मुर्ती होती.
माखानीची केबीन त्याला माहीत होती. त्याचेही कुलुप उघडुन तो आत शिरला.
अगोदर त्याने मोर्चा माखानीच्या कंप्युटरकडे वळवला. दोन मिनीटातच त्याने पासवर्ड हॅक केला. तो डाटा बघण्यात फारसा वेळ घालवत बसला नाही. त्याने खिशातुन एक सॅटेलाइट फोन काढला. तो जोडुन त्याने सर्व माहीती त्यच्या घरच्या कंप्युटरकडे पाठवायला सुरुवात केली. ते काम चलु असतानाच त्याने केबीनची बारकाइने तपासणी करायला सुरुवात केली. महत्वाच्या फाइल्सचे तो डिजीटल फोटोहि घेत होता.
सर्व पेपर्स चाळल्यावर त्याने ऑफीसच्या सेफकडे मोर्चा वळवला. सेफ एक गणपती सोडला तर पुर्ण रिकामी होती. हिच मुर्ती समीरने रिसेअप्शनमधे पाहीली होती. आता तर त्याला गणपतीचे गुढ जास्तच सताउ लागले. काहीतरी हालचाल केल्याशिवाय पुढचा मार्ग दिसणार नव्हता. त्याचा डाटा ट्रान्स्फरही पुर्ण झाला होता. गणपतीची मुर्ती जड असली तरी समीरला हलवण्यासारखी होती. त्याने गणपतीची मुर्ती फ्राईट लिफट पाशी आणली. सर्व ऑफीस बंद न करता त्याने सताड उघडे टाकले.
खाली आल्यावर गणपती डीकीत टाकेपर्यंत त्याचा सुद्धा दम निघाला होता. गाडी सुरु करणार तेवढ्यात एका इन्स्पेक्टरने गाडी थांबवली.
" चल बे जरा बोरीवली "
" नाही साहेब मला ठाणयाला जायचय"
" अरे काय् माज आला काय? का मी"च तुला ठाण्याला घेउन जाउ"
" नाही साहेब आत्ता नाही येणार. हवे असेल तर कंप्लेंट करा. माझा मीटर मी बंद केला आहे. तुम्ही जबरदस्ती केलीत तर उद्या शहरातल्या गाड्या बंद होतील. मी तुम्हाला दुसरी तॅक्सीपर्यंत घेउन जातो."
इन्स्पेक्टर चडफडत होता. पण ड्रायव्हर सेनेचा असला तर भलतेच अंगलट यायचे म्हणुन तो कसाबसा तयार झाला. समीरला खात्री होती तो त्याला परत पाहीले तरी ओळखु शकणार नाही. त्याने सायनला त्याला सोडले. इन्स्पेक्टर उतरताना त्याचा नंबर घ्यायला विसरला नाही.
काही वेळ इस्टर्न एक्स्प्रेस वर गेल्यावर गाडी वळवुन घरी नेली. गणपती त्याने उतरवुन तानाजीला त्या संबधात सुचना केल्या. आता ती मुर्ती जवळ्जवळ गुप्त झाल्यात जमा होती.
गाडीच्या नंबर प्लेटस त्याने बदलल्या आणी गाडी त्याने भेंडीबाजारमधे सोडुन दिली. गाडीचा प्रत्येक भाग सकाळपर्यंत वेगळा होइल ह्याची त्याला खात्री होती. घरी जाउन त्याने मस्त ताणुन दिली.
सकाळी तो खाली आला तो राणेंचा आरडाओरडा त्याला ऐकु येत होता. खाली आलो तर तानाजीवर त्यांची सरबत्ती चालु होती.
" हं सांग. तुझा मालक काल रात्री कुठे होता. ?"
" राणे त्याल का छळता. मी येथेच आहे."
" या. आज जरा झोप जास्तच झालेली दिसते."
" खरय. काल घेलाशेटबरोबर बसलो होतो. बोलता बोलता तीन कधी वाजले कळलेच नाही."
" घेलाशेटनी काय टॅक्सीचा धंदा सुरु केला काय?"
" अस तुम्हाला का वाटल?"
" एक सांग BMY 2792 गाडी तुझी आहे?"
" हो. माझी पहीली गाडी?"
" काल रात्री एक वाजता तु BKC मधे काय करत होतास?"
" राणे मी काल रात्री घेलाशेटबरोबर होतो "
" काल आमच्या एका इस्पेक्टरने तुला तीथे पाहीले"
" नाही म्हणजे त्याची ड्युटी जरा जास्त झाली असेल."
" त्याला मी इथेच बोलावले आहे. येइलच तो इतक्यात."
" बर काय चहा घेणार?"
" त्या अगोदर मला घेलाशेट्शी बोलु देत."
" खुशाल" समीरने अगोदरच फील्डींग लावली होती. तेवढ्यात कालचा इन्स्पेक्टरही आला. कालचा समीर आणी आजचा ह्यात जमीन अस्मानाचे अंतर होते.
" जाधव. काल तुम्ही ह्याला भेटला होता?" समीरकडे बोट दाखवत राणे म्हणाले.
" नाही साहेब. तो जरा बुटका आणी जाडा होता."
" गाडीचा तुम्ही घेतलेला नंबर काय होता?"
" BMY 2792 साहेब"
" समीर ही गाडी तुझी आहे? "
" हो. दाखवु का?"
" चला. " समीरने गॅरेजमधील मर्क दाखवली. जाधव दोन्दोनदा नंबर चेक करत होते.
" साहेब ती फीयाट टॅक्सी होती"
" काय समीर काय चावटपणा आहे?"
" कसला चावटपणा साहेब? तुम्हीच मला त्रास देताय. तो सुद्धा माझाच चहा पिउन. RTO मधुन तुम्ही
गाडीच्या मालकाचे नाव काढलेत, त्याच वेळेसच गाडी मॉडेल पण काढले असते तर तुमचा आणी माझा वेळ वाया गेला नसता. बर काय भानगड आहे? "
" छान म्हणजे भानगडी तु कर आणी आम्हाला विचार?"
" तरी?"
" जशच्या ऑफीसमधे काल चोरी झाली"
" मग काय गेले"
" भुरटा चोर असावा. कारण तिजोरीतुन दहा बारा हजार गेले."
" आणी त्याकरता तुम्ही मधे पडलात?"
" तुझे नाव आले म्हणुन मला इन्व्हॉल्व व्हावे लागले."
" पण मी इतकी भुरटी चोरी करायला जाइन का?"
" समीर तु कधी काय करशील ते कळणे अवघद आहे"
"राणे आणी ती टॅक्सी शोधा. उगिचच माला बदनाम करतोय."
" मला खात्री आहे की त्या टॅक्सीचे आत्तापर्यंत स्पेअर्स झाले असणार.. चल निघतो आम्ही. "
--२६--

राणे गेल्यावर समीर बागेतच विचार करत बसला. तेवढ्यात कांचनचा फोन आला.
" समीर, बाळा ही मुर्ती तुला कुठे सापडली ? "
" अशीच भंगारात. "
" मला तरी जागा दाखव. अजुन मुर्ती सापडता आहेत का ते बघतॊ."
" म्हणजे ?"
" तु दिलेली मुर्ती नवव्या शतकातली असुन तीची कींमत सहज एक कोटीवर आहे. मुख्य म्हणजे इंडोनेसियातील देवळातुन व बाली, बुदुर व पुर्वकला संग्राहालयातुन गेल्या काही वर्षात कितेक मुर्तींची तस्करी झाली आहे. तु ज्या अडीच फुट मुर्तीचा उल्लेख केलास ती मुर्तीही त्या यादीत आहे. तीची कींमत सहज ७० कोटीवर जाइल."
" Oh! I See "
" काय दिसले तुला ? मला तर काही दिसत नाही. आणी तुझे काम म्हणजे सर्व लफड्याचीच. ह्या मुर्तीकरता ईंटरपोलची नोटीस आहे"
" सोप आहे. आठ दिवस जाउदेत. नंतर तुझा संशय तु वरिष्ठांकडे बोलुन दाखव. व त्यांच्या सल्ल्यप्रमाणे कर. "
" अरे पण तु बाराच्या भावात जाशीलना. तुझ्यामागे ससेमीरा लागेल ना ?"
" कांचन ..जरा देणार्याचे नाव पत्ता बघ. प्रत्येक वेळेला मी नवीन ओळख वापरतो. उलट तुलाच छान प्रसिद्धी मिळेल. "
कांचनचा फोन बंद करुन समीर विचारात पडला. कॊड्याचे काही भाग जुळत होते पण शहाच्या खुनाचे धागेदोरे कुठेच सापडत नव्हते. कुणालशी बोलुन त्याने तारीच्या खटल्याविषयी विचारुन घेतले. दुसऱ्याच दिवशी पुढची तारीख होती.
शेवटची जबाब तारीचाच होता. निकम फारशा उत्साहात नव्हते. नाव पत्ता असे जुजबी प्रश्न विचार्ल्यावर त्यांनी सुरुवात केली.
" तु तेथे गेला होतास."
" होय साहेब "
" का गेला होतास ?"
"मेरी ला त्या हलकटाने फ्लॅटवर नेल्याचे कळले म्हणुन "
" म्हणजे तु रागात होतास ?"
" हो"
" रागाच्या भरात तु शाहाचा खुन केलास. "
" नाही साहेब "
" का. मेरीनेच खुन केला ?"
" माहीत नाही साहेब"
" तु तीथे पोचल्यावर काय झाले ?"
" मी कार थांबताना पाहीली आणी मीनीटभरातच मेरीला कारमधुन उतरुन लिफ्टकडे जाताना पाहीले"
"त्या वेळेला शहा जिवंत होते"
" माहीत नाही साहेब. "
" मग पुढे काय झाले ?"
" मी. मेरीच्या मागे जाईपऱ्यंत ती वर निघुन गेली. मीही तीच्या पाठोपाठ गेलो. "
" वर सोनल मॅडम बघुन मी जरा हादरलो होतो, पण मेरी दिसताच माझा ताबा सुटला. "
" मग तु काय केलेस ?"
" एक कानफाटात लावुन दिली साहेब."
" मग सोनल मॅडमनी आम्हाला आतल्या खोलीत जायला सांगीतले. शहासमोर उगीच तमाशा नको म्हणल्या"
" मग?"
" काही नाही साहेब.मी मेरीला नको नको ते बोललो. शिव्या घातल्या आणी तेथुन खाली गेलो. "
" आणी मग त्याच भरात तु खुन केलास"
"नाही साहेब. मी खाली आलो तर शाहाच्या गाडीची काच उघडी होती. मी खरतर त्याला शिव्या घालायलाच गाडीकडे गेलो. पण त्याचा कुणीतरी गेम केला होता. "
" तुच केलास ना?"
"नाही साहेब."
"बर ते रिव्हॉल्वर काय त्याने तुला मरता मरता दिले?"
"नाही. ते कारजवळच पडले होते. ते मी उचलुन घेतले"
"तारी तु खोटे बोलत आहेस. तु शहाशी भांडलास. त्याने पिस्तुल तुझ्यावर रोखले. तु ते हिसकावुन घेतलेस आणी त्याच पिस्तुलाने शहाला चार गोळ्या घालुन खलास केलेस."
"नाही साहेब.पण ज्याने केले ना त्याने सर्व पोरींवर फार उपकार केले "
" your witness"
जेम्सने तपासणीस नकार दिला.
" जेम्स बचावातरफे तुम्हाला काही पुरावे सादर करायचे आहेत. ?"
" नाही. "
" ठीक आहे. उद्या arguments व्हायला काही हरकत नाही"
--२८--
तस पाहीले तर खटल्यातला दम केव्हाच निघुन गेला होता. कदमांनी सर्व भर परिस्थीतीजन्य पुराव्यावरच दिला.
" मिलॉर्ड. आरोपी हा चार्जशीटर आहे. त्याच्यावर पुर्वीचे खटले आहेत. त्याच्या मेरीला घेउन शहा गेल्यामुळे चिडुन त्याने त्या दोघांचा पाठलाग केला. संधी साधुन शहाचा खुन केला. खुनाचे हत्यार तसेच रक्ताने माखलेले कपडे त्याच्याच घरात सापडले. रिव्हॉल्वर वर तसेच गाडीच्या दारावर त्याच्या हाताचे ठसेही मिळाले आहेत. हे सर्व पुरावे त्याच्यावर आरोप सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. आरोपी ला ३०२ खाली शिक्षा व्हावी"
जेम्सचा बचाव जास्त शास्त्रशुद्ध होता.
" मिलॉर्ड. खुनाला मोटिव्ह असायला लागतो, शस्त्र असावे लागते आणी संधी असावी लागते.
मोटीव्हचा प्रश्नच नाही. हत्यार ही होते. आता राहीला प्रश्न संधीचा.
आरोपीला खुन करायची संधी दोन वेळेला होती. एकतर गेल्यागेल्या किंवा परत येताना.
गुरख्याच्या नोंदिनुसार आरोपी शहानंतर पाचच मिनिटात तेथे पोहचला व इतर साक्षीनुसार मेरीच्या पाठोपाठच वर गेला.
तसेच फोन कंपनीच्या रेकॉर्डवरुन शहाचा शेवटचा कॉल ११/१२ मिनीटे चालु होता.
म्हणजेच तारी वर गेला तेव्हा शहा जिवंत होता.
तारीचे व मेरीची बोलाचाली १५/२० मिनीटे झाली.
शहाचा कॉल संपल्यावर तो मेरीकरता लगेचच वर आला असता.
पण तो आला नाही कारण त्याचा त्या दरम्यान तारी वर असतानाच खुन झाला होता.
खाली थांबुन तो कुठलाही दुसरा फोन करत नव्हता कींवा कुणाशीही गप्पा मारत नव्हता. निदान तसा कुठलाही पुरावा आपल्यासमोर नाही.
आरोपीला निर्दोषी सोडावे अशी माझी विनंती आहे."
खटल्याचा निकाल लागुन तारी सुटला. त्याचप्रमाणे पोलीसांवर ताशेरेही ओढले गेले. मेरीचा आनंद तीच्या चेहऱ्यावर दिसत होता.
समीरला कोडे काही सुटत नव्हते. तारीलाच एकदा गाठावे असा त्याने विचार केला. कुणालशीही तो ती गोष्ट बोलला.
पण कोडे इतक्या चटकन सुटायचे नव्ह्ते. दुसऱ्या दिवशी तारीकडे दोघांनी जयचे असे ठरवले. समीर व कुणाल दोघेही बातमीदार म्हणुनच जाणार होते.
एका अगदी साध्या गाडीतुन दोघेही सकाळी सातलाच नालादोपारा पोहोचले. समीरने पत्ता शोधायचे नाटक केले.
दोघेही चाळीशी पोहोचले तेंव्हा सात वाजुन गेले होते. चाळीत लगबग सुरु झाली होती. खोलीपाशी पोचुन दोघांनीही दार वाजवले. बराच वेळ झाला तरी आतुन कसलाच आवज नव्हता. दार लोटलेलेच होते. दार ढकलुन आत पोहोचले. आत दारुचा दर्प सुटला होता. साफ न केल्यामुळे इतरही असंख्य वास सुटले होते.
पलंगावर तारी पडला होता. जमीनीवर भेळेचे कागद, गाजराचे तुकडे, अर्धा भरलेला दारुचा ग्लास होता. तारीचा श्वास धापा टाकल्यासारखा होता व चेहराही वेदनेत पिळवटलेला होता. त्याला बोलताही येत नव्हते.
कुणालने अम्बुलन्सला आणी समीरने राणेंना फोन केला. लोकांच्या मदतीने तारीला खाली आणुन त्यांनी जवळच्या सुश्रुत हॉस्पीटलला नेले. समीर मागेच थांबला आणी कुणाल दवाखान्यात गेला. आता बरीच गर्दी जमली होती. समीरने कुणालचा कॅमेरा ठेवुन घेतला होता. तो बातमीदार आहे असे सांगीतल्यावर त्याच्याभोवती गर्दी जमा झाली होती.
" काल तारी सुटुन आला, तेंव्हापासुन पीतच होता. " एक टपोरी
" पहील्यांदा दुकानात आणी मग एक पोरीबरोबर घरात. "
" पोरीबरोबर? " समीरने कान टवकारले.
" हो ना.. फारच छमकछल्लु होती. भाड्यावर आणली असावी " दुसरा
" कोण होती?"
" करीना होती. काय राव अशा पोरी काय नावगाव सांगुन येणार आहेत का?"
तेवढ्यात कुणालचा फोन आला
" समीर आम्ही इथे दवाखान्यात पोहोचलो आहे. पण इथे तारीला DOA ( death on arrival ) घोषीत केले आहे. बिचारा रस्त्यातच मेला "
" ठीक आहे. मी राणेंना कळवतो आ0णी त्यांना आपली स्टेट्मेंटस घ्यायला घरीच बोलावतॊ "
--२९--
समीरच्या घरी दोघेही असंख्य विषयांवर गप्पा मारत बसले.
संध्याकाळी राणे आले ते वैतागुनच.
" काय राणे ? आम्हाला दिवसभर बसायला लावले ?"
" साल्यांनो! तुम्ही मुडद्यांचे ढीग उभे करा. आम्ही घाम गाळत बसतो. आणी तुम्ही येथे एसीत बीयर ढोसत बसा. "
" राणॆ!! तुम्हाला बीयर हवी असली तर तसे सांगा "
" ते जाउदेत.”
“बघा ! मिळतीय तर घ्या”
“ समीर तुम्ही जरा मला काय झाले ते सांगाल का?"
"सांगण्यासारखे तसे काही नाही.”
“मग तुम्ही दोघे काय तारीशी पत्ते खेळायला गेला होता?
“तो सुटला तेंव्हा त्याच्याशी बोलावे म्हणुन आम्ही दोघे त्याच्या घरी गेलो होतो.”
“मग”
“तेथे तो बेशुद्धावस्थेतच सापडला. त्याला आम्ही तातडीने दवाखान्यात नेले आणी तुम्हालाही फोन केला. "
"एवढेच!"
" हो अजुन म्हणजे रात्री कुणीतरी पोरगी आली होती असे शेजारचे म्हणत होते.”
“मेरी का?”
“नाही. त्यांच्या भाषेत फारच छमकछल्लु होती "
" डोक्याला तापच आहे झाल!. "
" का काय झाल "
" एकतर हा मृत्यु नैसर्गिक नाही”
“पण आम्ही गेलो तेंव्हा तारी शुद्धीत होत. कुणी मारले असते तर त्याने निश्चीतच काही ईशारा केला असता”
“अरे !. विषप्रयोग झाला आहे.”
“कसले”
“कुठले विष अजुन कळले नाही. त्याच्या रुममधील सर्व खाण्याच्या वस्तु, पिण्याच्या वस्तु प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत"
" पण तुमच्याकडे केस कशी ?"
"शहाशी संबधीत आहे म्हणुन. पण त्याचाच अजुन पत्ता लागत नाही तर हे नव लचांड "
" या खुनांचा संबंध निश्चीतच जशची आहे.”
“कशावरुन”
“शहाचा खुन का झाला आपल्याला माहीत नाही. त्याचा आरोप तारीवर होता पण त्यातुन तो निर्दोष सुटला”
“त्याने खुन केला नाही हे तर माझे पहील्यापासुनच मत होते “
“हो पण तारीला असे काहीतरी त्या दिवशी दिसले असणार. पण दुर्देवाने त्याचा अर्थ त्याला लावता आला नाही”
“हो पण त्याकरता त्याचा खुन होइल ?”
“ राणे माझ्यापेक्षा तुम्ही क्राइम जास्त पाहीला आहेत.”
“बर तुझ्या काही कल्पना?”
“ तुम्ही त्या गणपतीची काही चॊकशी केलीत का ?"
" इतकी भुते पाठीमागे लागल्यावर देवासाठी इथे वेळ कुणाला आहे?"
" पण राणे माझी मनोदेवता सांगत आहे, की तो गणपतीच आपल्याला शेवटी रस्ता दाखवेल. "
--३०--
नंतरचे आठ दहा दिवस तसे आळसातच गेले.
एका सकाळीच राणेंचा फोन आला.
“अरे फोरेन्सिक ने तारीचा मृत्यु विषप्रयोगाने झाल्याचेच सांगीतले”
“त्याला फोरेन्सिक कशाला पाहीजे? कुठले विष होते”
“विष तसे रेअरच होते.”
“कुठले”
“पहील्यांदाच ऐकले. सिक्युटॉक्झीन प्रकारातले होते”
“कशात होते? दारुत ?”
“दारुत तरी त्या विषाचा अंश नव्हता,”
“मग”
“पण त्याच्याकडे खायला असलेल्या गाजरात मात्र त्याचा प्रचंड अंश होता.”
“काय सांगताय ? “
“गाजरात हे विष कसे आले हे मात्र कुणी सांगु शकत नव्हते. कारण काही गाजराच्या तुकड्यात ते अजीबात नव्हते तर काही तुकडे थबथबले होते.”
“त्यात काय ईंजेक्ट केले असेल”
“बाहेरुन कुठल्याही प्रकारे असे विष गाजरात घालणे अशक्यच होते.”
“कॊम्लीकेशन्स जास्तच वाढत आहेत.”
“ फोरेन्सिकच्या माहीती प्रमाणे पोटात गेल्यावर फार फार तर एखादा तास माणुस जगतो”
“एकतर त्याने गाजरे घेतली तेथुन तरी विष आले किंवा त्या छ्मकछ्ल्लुने तरी आणुन दिले”
“ बरे शहाच्या खुनाबद्दल काही नवे जुने ?”
“काही नाही”
“अरे आता तुला म्हणुन सांगतो. कुणाल, सोनल, याकुब, माखानी सर्वांच्या पाठीमागे आमचे खबरे आहेत, पण गेल्या कित्येक दिवसात घर /ऑफीस अशाच ह्यांच्या फेर्या चालु आहेत”
“ कुणाल / सोनल च्या पण “
“हो ना.. फार फारतर दोघे कुठल्यातरी हॉटेलात गप्पा मारत बसतात”
“ माझ्या मागचा खबर्या काय म्हणतो”
“समीर आमच्याकडे वाया घालवायला माणस नाहीत. “
“ राणे तुम्ही गणपतीचे काय केलेत?”
“अरे काय तु माजे डोके उठवले आहेस?”
“राणे ! गणपतीबाप्पा तुम्हाला सद्बुद्धी देवो”
“हम्म..”
राणेंचा फोन होताच समीरने कांचनला फोन केला.
“काय खबरबात?”
“अरे येत्या १२ ता. ला पत्रकार परिषद बोलावली आहे साहेबांनी . बडी बडी धेंडे बोलावली आहेत. सी एम , होम सगळ्यांनाच बोलावले आहे. ते कुणी येणार नाहीत, पण प्रोटोकॉल असतो ना?”
“कांचन एक काम कर”
“बोला”
“तु म्हणाला होतास ना या गणपती करता इंटरपोलची नोटीस आहे”
“हो”
“मग जरा राणॆ, DCP क्राइम ना फोन करुन बातमी दे. पुढे मागे उपयोग होइल”
“तुझ काहीतरी लफड दिसतय”
“छे छे उलट माझे नाव पण कुठे घेउ नकोस”
“अवघड आहे. कारण माझ्या बॉसचा इगो दुखावला जाइल”
“मग त्याला फोन करायला सांग”
“तो एक नंबरचा भित्रा आहे”
“मग”
“तु राणेंनाच बॉसना फोन करायला सांग. बॉस शेवटी मलाच बोलायला लावेल”
“अरे वा! समीरचा मित्र शोभतोस तर”
--३०--

राणे साहेब , समीर बोलतोय”
“बोला. कुठे आहे आता मुडदा”
“राणे.मी तुम्हाला क्लु देतोय”
“कशाबद्द्ल?”
“गणपतीबद्द्ल”
“अरे देवा! तुझ्या डोक्यातुन हे खुळ कधी जाणार?”
“राणे तुम्हाला प्रमोशन नको झालेले दिसते. अहो जरा ASI च्या डायरेक्टरला फोन करुन गणपती बद्दल विचारा. इंटरपोल ची नोटीस आहे त्याबद्दल”
“तुला कोणी सांगीतले?”
“मला कर्णपिशाच्च वश आहेत”
“बर चल दे नंबर”
“राणे तुमच्या नेट्वर्क वरुन होउ देत फोन. त्यांनी कसला कार्यक्रम आखलाय?”
“थांब. मी तुलाही लुप्मधे ठेवतो. गावडे जरा ASI च्या डायरेक्टर घ्या आपल्या फोनवर”
“सहाय स्पिकींग”
“राणॆ. DCP Crime”
“Yes Rane. What I can I do for you?”
“It is regarding what you have not done, which is an offence” राणेंचा पोलीसी हिसका
“I do not understand”
“Look Sahay” राणेही आता एकेरीवर आले “ You have called CM and other dignitaries for some Ganesha function”
“Yes”
“Sahay , there is Interpol notice for that article and you are aware of it. You should have intimated us “
“ DCP Rane, this matter is looked by Mr Kanchan, I will transfer it to him”
“Kanchan here”
“कांचन , समीरने फोन करायला सांगीतला होता” राणेंचा एक प्रयत्न
“समीर कोण समीर?” शेरास सव्वाशेर “ आणी हा फोन तर सहाय कडुन ट्रान्स्फर झालाय”
“अरे त्या गणपतीची काय भानगड आहे?”
“राणेसाहेब तुम्ही जरा आमच्या ऑफीसला या. ंअणजे प्रत्यक्ष बोलता येइल आणी काही दाखवीता येल”
“बर. तासाभरात येतोच”
“काय समीर , येणार काय?”
“ नाही तुम्हीच जाउन या”
समीरनेही या गोष्टीकडे जरा दुर्लक्षच केली होते.
शहाच्या खुनाच्या तपासातही काही प्रगती नव्हती.
दहा दिवसांनी मात्र मीडीयाला नव खाद्य मिळाले. ASI मधील संचालकांनी पत्रीकार परीषद बोलावुन इंडोनेसियातुन चोरी झालेला गणपती ASI च्या प्रगत तंत्रज्ञानाने व त्यांच्या बुद्धीमतेमुळे कसा सापडला ते सांगीतले.
परीषदेला इंडोनेसीयन राजदुत, दोन तीन मंत्री , इंटरपोलचे अधीकारी असे उपस्थीत होतेच. अर्थातच पोलीस तपास सुरु आहे असे सांगुन त्यांनी तो गणपती त्यांच्याकडे कसा आला, हे सांगण्याचे मात्र कॊशल्याने टाळले.
त्या नंतर काही दिवस इंडोनेसिया, त्याचे पर्यटन, त्याची हिंदु संस्कृती , तेथील देवळे ह्यावर रकानेच्या रकाने छापले. मीडीयात अचानक नवीन तज्ञ उगवले आणी काही दिवस तरी खाद्य मिळाले.
पोलीसांच्या दृष्टीने निराशाच झाली. ज्या माणसाने तो गणपती तेथे दिला होता त्याला शोधायचे सर्व प्रयत्न निष्फ्ळ ठरले. एकतर त्याचा पत्ता हॉटेलचा होता. त्याने ओळख्पत्र म्हणुम नाय्जेरीयन पासपोर्टची प्रत दिली होती आणी फी रुपयातच भरली होती. तेथील सिक्युरिटी कॅमेरा मधे एक अस्पष्ट निग्रो दिसणाऱ्या माणसाचा फोटो आला होता. यातुन त्याचा शोध घेणे पोलिईसांनाच काय पण इंटरपोललाही अशक्य होते. म्हणजे सर्व तपास झाले पण त्याचे उत्तर सगळ्यांनाच माहीती होते.
नाही म्हणायला राणेंना समीरचा संशय आला होता पण त्याच्याकडुन उत्तर मिळणे त्या नायजेरीयन माणसाच्या शोधापेक्षा अवघड आहे हे ते जाणुन होते. तरी सुद्धा ते संध्याकाळी लालमहालवर पोहोचलेच. समीर त्यच्या अभ्यासीकेत कॉम्पुटरवर बसला होता आणी उत्तेजीत दिसत होता.
" या राणे ! कमाल आहे.म्हणजे तुम्हाला वास लागला तर. "
" कसला वास. मी तुला त्या गणपतीबद्दल विचारयाला आलो होतो. "
" सापडला तुम्हाला? "
"वात्रटपणा करू नकोस. तु पेपर वाचत नाहीस असे दिसते."
" तो होय. तो तर छोटासा आहे. मी जश मधे पाहीलेला अडीच फुट होता."
" तुझा ASI गणपतीत काय हात आहे?"
" काही नाही. राणे माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. ऎवढा कोटीतला ऐवज मी सोडीन का ?"
" हो. आवळा देउन कोहळा काढण्यात तु पटाइत आहेस"
" जाउद्या हो. मी आता तुम्हाला कोहळाच देतो. तारीचा मृत्युच कारण सिक्युटॉक्झीन होते हे तुम्हाला
आठवतच असेल. "
" हो"
" मी आत्ता जरा गुगलवर सिक्युटॉक्झीन आणी इंडोनेसिया यावर सर्च करत होतो तर मला water hemloc च्या झाडाचा संदर्भ मिळाला. त्याची मुळ थेट गाजरासारखी दिसतात."
" काय म्हणतोस ? "
" मला वाटते तुम्ही प्रयोगशालेतले ते तुकडे एखाद्या वनस्पतीतज्ञाकडुन तपासुन घ्या. "
" त्याने काय होइल?"
" जर तेच झाड असले तर हा अनैसर्गिक मृत्यु नसुन खुनच होता असे सिद्ध होइल."
" कसे?"
"कारण ते झाड अमेरीकेत, युरोपमधे कीवा इंडोनेसीयात सापडते. त्यामुळे गाजराबरोबर आपल्याइथे ते विकण्याची शक्यता शुन्य आहे. अर्थातच ते कुणितरी खुनाच्या उद्देशानेच ठेवले असावे."
" माय गॉड "
" अस झाल . तर तुमचा भाव खात्यात निष्णात तपास अधीकारी म्हणुन वाढेल"
राणेंनी एकदा नजर बारीक करून समीरकडे पाहीले आणी फोनवरुन तावडेंना सुचना द्यायला सुरुवात केली.
" समीर. थॅंक्स! आता तुला काय पाहीजे.?"
" राणे मी तुम्हाला कोहळा देत आहे पण मला आवळा सुद्धा नको आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का?"
" काय?"
" खुनी फसला आहे. कारण ज्याने हा झाडाचे मुळ ठेवले त्याला तारीच्या आवडीनिवडी माहीती असल्या पाहीजेत"
"म्हणजे काय?"
" तो दारु पिताना गाजर निश्चित खाणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला बरीच माहीती असणार आणी त्याचा इंपोर्ट्चा व्यवसाय असणार "
" oh! "
" मला तरी असे वाटते की शहाच्या आणी तारीच्या खुनाचा जशच्या व्यवसायाविषयी संबंध आहे. तुम्ही त्याच्या मागे लागलात तर बरे होइल."
"अवघड आहे. कारण वरचे सर्व जरी खरे असले तरी जश च्या मागे लागण्यासारखे त्यात काही नाही"
" खर आहे. मलाच काहीतरी शोध घेतला पाहीजे. पण राणे हे सत्र इथेच थांबेल असे वाटत नाही"
--३१--
राणे गेल्यावर कुणाल आणी समीर बोलत होते.
" कुणाल, ह्या जश मधे काहीतरी पाणी मुरतेय"
" मलाही तसच वाटतय. "
" शहा आणी तारी दोघेही जशशी संबंधीत होते. मी तुला सांगीतलेला जशच्या रीसेप्शनचा गणपती थेट त्या इंडोनेसियन गणपतीसारखाच होता. " हे सांगताना त्याने तो छोटा गणपतीही जशची संबधीत होता हे सांगण्याचे टाळले.
" पण ह्या दोन्ही गुन्ह्याची कारणे कळत नाहीत."
" कुणाल , कारणे कळली की खुनी सापडेलच. अजुन बघ गाजराअसारखी वनस्पती भारतातली नाही. जशचा ही परदेशाशी भरपुर व्यापार आहे. "
" पण सर्व व्यवहार तर पारदर्शक आहे. जश मधे यार्न येते ते चीन, इजिप्त, इंडोनेसिया या देशातुन. फॅक्टरीमधील फ़ॅब्रीक जगभर एक्स्पोर्ट होते. "
" तुझी त्या सोनलशी खास दोस्ती आहे ना? तीचा काही उपयोग होइल का? "
" छे ! ती तर एकदम गरीब मुलगी आहे"
" हो पण त्या माखांनीची पीए आहे ना. तीला तर सगळ्या भानगडी माहीतीच असतील. "
" विचार करण्यासारखे आहे "
"एक काम करना. संध्याकाळी तु तीला जेवायलाच घेउन ये ना"
" बघतो विचारुन"
" विचारतोस कसला. सांग. "
तेवढ्यात त्याला राणेंचा फोन आला.
" संमीर. अरे तुझा अंदाज खरा ठरला. ते गाजर नसुन विषारी वनस्पतीचे मुळच होते. आता तारीचा खुन झाला हे निश्चीत. "
"मग तुमचा भाव वधारला असेल. "
" हो ना. तो परब माझ्यावर दात ठेवुनच होता. तारीचा मृत्यु ही त्याला मला डीवचायला आयतीच संधी मिळाली होती. "
"पुढे काय ? "
" तोच तर मोठा प्रश्न आहे. मला असा संशय आहे की ह्यात कुठे तरी जशचा संबंध आहे. पण कुठेच काही धागादोरा मिळत नाही. "
" राणे अस म्हणतात की एखादी गोष्ट जर लपवायची असेल तर ती उघड्यावर ठेवावी, कुणालाही सापडत नाही. "
" अरे पण दोन्ही खुन इतक्या सफाइने केले आहेत की काहीच धागा दोरा सापडत नाही. शहाचा खुन त्याच्या इमारतीच्या आवारात झाला. शस्त्रही त्याचेच होते. त्याला कुणी शत्रु नव्हते. त्याच्या घराच्या झडतीत काही पॉर्न सोडता काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्याच्या घरात कुठेही चोर कप्पा चोर खण नव्हता. त्याची तिजोरीलाच कील्ली होती आणी आत पैसे, शेअर्स व इतर कागदपत्रे होती. थोडक्यात कुणावर नाव घ्यावे असे काही नव्हते. "
" खर आहे"
" बर तो तारी सापडला, त्याचे हाताचे ठसे सापडले. त्याच्याकडे खुनी हत्यार सापडले. त्याच्या जागेत कपडे सापडले. वरवर पाहता तोच शहाचा खुनी असल्याचा भास झाला. पण तो असणे शक्यच नव्हते. "
" तुम्हाला पुर्वीपासुनच तसे वाटतच होते "
" आणी गम्मत म्हणजे त्याला कुणीही ह्या प्रकरणात अड्कवले नव्हते. त्याचा तोच अडकत गेला. खुनी फक्त हत्यार कारपाशीच सोडुन गेला. "
" आतातर तारीचाही खुन झाला. "
" हो ना. ह्या दोन खुनात काहीतरी दुवा आहे. पण काय तो लक्षात येत नाही. तारीला शहाच्या खुनाबद्दल काही माहीती होती म्हणुन त्याचा खुन झाला म्हणावे तर तो काहीतरी बोलला असता. त्याने काहीतरी जबाबात क्लु दिला असता."
" तारीला मेरीबद्दल फोन कुणी केला कळले का ? "
" फोन कोहीनुर मधल्याच पे फोन वरुन केला होता. कुणी केला होता ते मात्र कळले नाही "
"ती व्यक्तीतर खुनी नसेल ?"
" हो पण त्या व्यक्तीला खुन करायला इमारतीत तर यावे लागेल. आम्ही फोनच्या वेळेपासुनचे डोअर रजीस्टर चेक केले. त्यात असलेली प्रत्येक एंट्री तपासली. कुणाबद्दल्ही संशय घ्यायला जागा नव्हती. "
" बापरे. पोलिस एवढे काम करतात माहीत नव्हते. "
" बर त्या तारीचा खुन तर इतक्या बेमालुमपणे झालाय. एकुलता एक आधार म्हणजे कुणी छमकछल्लो रात्री तीथे आली होती. तीचा शोध घ्यायचा आम्ही बराच प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी संगीतलेल्या वर्णनाच्या शेकडो पोरी आजुबाजुला धंदा करताना सापडतील"
" त्या दिवशी मेरी कुठे होती "
" ती ही आई बरोबर दवाखान्यात होती. आणी तीला तारीचा खुन करायचे कारणच नव्ह्ते. तो सुटावा म्हणुन तीने केवढे प्रयत्न केले. ह्या केसेस माज्याकडेच का आल्या ते कळत नाही "
--३२--
समीरच्या मनात काहीतरी कल्पना घोळत होती.
" राणे एवढे निराश होउ नका. शिकार आहे पण मीळत नाही म्हणल्यावर शिकारी काय करतॊ ?"
" समीर असा कोड्यात बोलु नकोस "
" शिकारी शेळी बांधतो. शिकारी रान उठवतो. आपणही तसा प्रयत्न करुन बघुया "
" काय करायचा विचार आहे तुझा ? "
" सोप आहे. आपल्या दोघांना जश विषयी संशय आहे. पेटवुन देउ रान "
" काय करायच ते सांग "
" हे बघा हा कुणाल आहे त्याच्याकडुन एक्स्क्लुजीव्ह म्हणुन काही सुचक बातम्या छापुन आणु. तुम्ही चॊकशीच्या निमित्ताने जशच्या ऑफीसमधे आणी फॅक्टरीत चकरा मारायला लागा. "
" अरे पण उगीचच चकरा मारु? "
" अहो तुम्ही कशाला जाता. माखानीलाच तुमच्या ऑफीसमधे बोलवा. फॅक्टरी कुणाला तरी पाठवा. थोडक्यात जशवर प्रेशर आणायला सुरुवात करु. "
" काय उपयोग आहे?"
" अहो आजपर्यंत आपल्या हातात काहीही क्लु नाही. जशच्यावर प्रेशर आल्यावर खुनी काहीतरी चुक करेल "
" आणी तो गप्पच बसला तर?"
" तर मात्र तो फारच हुशार आहे. पण माणसाचा इगो त्याला गप्प बसु देत नाही. "
"ok..let's try"
" अजुन मला एक करावसे वाटते. तुम्ही जरा जोर लावुन इंडोनेसियातुन चोरीला गेलेल्या सर्व वस्तुंचे
वर्णन आणी फोटो पब्लिश करायची व्यवस्था करा. आणी कुठल्यातरी मीडीयावाल्याला बाइट द्या. बघा कसा प्रभाव पडतो ते. "
" मला कमीशनर साहेबांना विश्वासात घेउन त्यांनाच सांगायला लागेल"
" मी ही कुणाल व सोनलला जेवायला बोललो आहे. त्यावेळेस जरा सोनलला काही हींटस देतो. आणी माझ्या पद्धतीने तपास करतो. "
"झाल. म्हणजे माझ्या मागे तु काहीतरी नवीन लचांड मागे लावणार."
--३३--
राणे गेल्यावर समीरला माखानीच्या सॅटेलाइट फोन वरुन डाउनलोड केलेल्या डाटाची आठवण झाली. आज तो डाटा सर्व तपासण्याचे त्याने ठरवले.
तानाजीला सांगुन त्याने स्टडीमधेच सॅंडवीच आणी बीयर मागवली आणी आपण घरात नाही असा निरोप ठेवला.
त्याने पहिल्यांदा पर्चेस आणी सेल्स तारखेनुसार जुळवण्याचा प्रयत्न केला. पण तसा काही धागादोरा सापडायला तयार नव्हता. सर्व डाटा तपासुनही कुठे पैसा लपवलेल्याच्या खुणा नव्हत्या. नाही म्हणायला थोडीफार कॅशची जुळवाजुळव होती. पण ती प्रमाणाबाहेर नव्हती.
सर्व माहीतीत कुठलीही माहीती उपलब्ध नव्हती. तशा पार्टीज मोजक्याच होत्या आणी सगळ्याच लिमीटेड कंपनी दिसत होत्या. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या विषयी जास्त माहीती मिळवता आली असती. चार पाच तास घालवुमही हाताला काहीच लागले नव्हते. एक आळस देउन तो उठणार तोच तानाजी डोकावला.
" कुणालसाहेब आणी कुणी पोरगी आली आहे. त्यांना कटवु का बसवु ? "
" बसव. बागेतच बसव आणी मी फ्रेश हौन आलोच असे सांग"
थोड्या वेळाने तो वॉश घेउन बागेत गेला, तेंव्हा कुणाल व सोनल गप्पा मारत होते. म्हणजे सोनल गप्पा मारत होती आणी कुणाल तीच्याकडे पहात बसला होता.
" काय रिपोर्टर. काय नवीन ब्रेकींग न्युज ?"
’ आत्ता तरी काही नाही. तसा मला खबरने ह्या दोन खुनांकरता सोडलेच आहे"
" मी ते नाही विचारत. मी तुमच्या दोघांबद्धल बोलतोय. "
कुणालची तारांबळ उडाली. सोनल त्या मानाने कुल होती.
" समीर अजुन तरी तस काही नाही " सोनल
" बर काय अजुन खबर ? " समीर
" सगळीकडे कस शांत आहे. शहाच्या खुनाचा पत्ता नाही आणी आता तर तारीही मेला " कुणाल
" कुणाल तुझ्याकरता एक न्युज आहे. तारीचा खुनच झाला आहे आणी खुनाचे कारणही सापडले आहे "
" काय सांगता काय? "
" हो . डिटेल्स राणेंनाच विचार कारण त्यांचा आत्ताच फोन आला होता. बघ तुला ते एक्सक्लुझिव्ह देतात का?
" हो लगेच " कुणालने राणेसाहेबांचा नंबर फिरवला.
" राणेसाहेब . कुणाल बोलतोय. "
"बोल"
"तुम्ही मला काही खास बातम्यांतुन बाजुला ठेवताय का ? "
" तु समीर कडे बसलेला दिसतोस. "
"हो का ? "
" अरे मला ही आत्ताच बातमी मिळाली. ती मी समीरशिवाय अजुन कुणालाच सांगीतली नाही. "
" मी बातमी छापु का ? "
" छाप पण माझे नाव न घेता. आणी कूठल्याही डीटेल्स न देता "
" डिटेल्स द्यायला माझ्याकडे आहेत काय ? "
"ठीक आहे. बहुतेक एक दोन दिवसात कमीशनर साहेब पत्रकार परीषद घेतील त्याला ये. तारीच्या बातमीत पोलीसांच्या सुत्रांकडुन कळले असे कुठेही उल्लेखही नको. तुझा अंदाज म्हणून बातंमी छाप. खुन कसा झाला ह्याचे फारतर अंदाज बांध "
" थॅंक यु साहेब. "
समीरने लगेच खबरला फोन लावुन एक मोघम बातमी द्यायला सांगीतली.
" हेड्लाइन द्या " तारीचा खुनच आणी तो सुद्धा विषबाधेने.
त्यात जरा तीखट मीठ लावा.
खाद्याच्या पदार्थात विष कसे मिसळतात आणी ती कशी अपाय करतात ती माहीति द्या.
आणी मग ती तारीच्या खाण्यात किंवा पिण्यात कशी गेली नसावीत ते सांगा.
थोडक्यात बातमी कमी पण रकाने भरा. आपल्या मीडीया चॅनलावरही ब्रेकींग न्युज द्या.
वाटल्यास तीन चार विष तज्ञांना बोलवा.
काहीतरी रोखठोक चर्चा करा. थोडक्यात जरा पोलीस खात जाग होइल असा माहोल तयार करा. "
"कुणाल. तुम्ही लोक खरच राईचा पर्वत करु शकता " सोनल
" समीर खुन कोणत्या विषाने झाला? " कुणाल
"मला. काही कल्पना नाही. तु राणेंनाच का नाही विचारलेस? "
" ते सांगण थोड कठीणच दिसत आहे. बर ते जाउ देत. पण हा खुन कोणी केला असेल.?" कुणाल
" खुनी फार हुशार आहे. त्याने काहीही माग ठेवला नाही. "
" विषप्रयोग झाला असेल तर ती व्यक्ती तारीच्या ऒळखीचीच असणार. पण तारी सुटल्यावर थेट घरीच आला होता "
" सुटल्यावर त्याचा ऑफीसला फोन आला होता. मीच त्याच्याशी बोलले. तो जरी सुटला असला तरी त्याची गुन्ह्याची पार्श्वभुमी समजल्यामुळे जशमधे तो आता राहु शकणार नाही. म्हणजे माखाणी साहेबांनीच तसा निर्णय घेतला आहे. त्याचे राहीलेले पैसे त्याच्या अकांउट्ला जमा केले आहेत. " सोनल
" बिचारी मेरी. आता निदान तारीला काही आगापीछा नाही तर त्याचे उरले सुरलेले मेरीला मिळायची काहीतरी व्यवस्था झाली तर चांगले" समीर
“ ते अवघडच आहे. तारीने काही व्यवस्था केली असेल असे वाटत नाही. बघुया जश मधुन तीला काही मदत देता येते का” सोनल
--३४--

गप्पा चालुच होत्या. तेवढ्यात तानाजी मेरीला घेउन आला.
मेरी पुर्ण भेदरलेली होती. सोनलला पाहील्यावर तर ती जास्तच अस्वस्थ झाली.
तीच्या हातात वर्तमानपत्र दिसत होते.
“मेरी बस . मी तुझी मॅडम ऑफीसमधे. अशी का घाबरली आहेस?”
समीर ने तीची ओळख करायला सुरुवात केली. “ मॅडम तर तुला माहीतीच आहेत. आणी हा कुणाल कोहली”
“माहीती आहे साहेब. शहा साहेबांचा खुन झाला तेंव्हा होते तीथे”
“अरे हो की. पण तुला काय झाले? आइची तब्येत तर ठीक आहे ना?”
“आई ठीक आहे. पण तुम्ही हे वर्तमान पत्र बघीतलेत का?”
“आपण सर्वच जेउन घेउ आणी मग सावकाश बघु. मेरी तुही जेवुन घे. उगाच नाही नाही म्हणू नकोस”
सोनल “ मी आणी मीनलरोज रात्री एकत्र जेवतो”
“मग तीलाही बोलावुन घे. आणी जेवणाचे काय?”
“आमची कुक ८.३० / ९ पर्यंत येते आणी गरमागरम मेनु देते. रात्री ती आमच्या इथेच झोपते आणी सकाळी ब्रेकफास्ट देउनच जाते.”
“wonderfull”
“तिला थोड्यावेळाने फोन करुन सांगेन”
सोनल बराच वेळ फोन लावत होती.
“मीनलफोन उचलत नाही”
“ती ऑफीसातच असेल. तीथे फोन कर. कीतीवाजता जाते?”
“साइट असेल तर केंव्हाही. आज ती ८ लाच बाहेर पडली आणी मी १० च्या आसपास”
शेवटी एकदाचा फोन लागला.
फोनवर बोलत असताना सोनल पांढरी फटक पडली आणी धाडकन खुर्चीवर बसली
मेरीने तिला पाणी पाजले. समीरने बोलती केले.
“काय झाल?”
“मीनलआज ऑफीसला गेलीच नाही.”
“हात्तीच्या. फील्डवर गेली असेल”
“नाही. सकाळी तीला ९:३० ला client कडे जायचे होते. तीची असिस्टंट तीची वाट बघुन एकटीच गेली.ऑफीसने दिवसभरात २०/२५ तरी फोन केले पण कुणाचेच लागले नाहीत.”
समीर विचारात पडला
“बर मी राणेंना बोलावतॊ. तो पर्यंत आपण जेवुन घेउ: “
“नको मला नाही स्वस्थ जेवता येणार. मी घरी जाते” सोनल
“ठीक आहे. कुणाल तु सोनल ला घेउन पुढे जा. तीच्याकडेच जेवण कर. आम्ही येतोच .”
“आणी सोनल धीर धर. मोबाइल वरुन माणसाला शोधायच तंत्र बरेच पुढारलेले आहे”
दोघेही गेले. समीर विचारातच पडला होता. मेरीचा त्याला विसरच पडला होता.
ती पण भांबाउन गप्पच होती.
राणे आल्यावरच समीर तंद्रीतुन बाहेर आला.
“काय समीर? आणी ही मेरी ईथे काय करतीय?”
“मलाही माहीत नाही. पण प्रथम जेवुन घेउ.”
जेवता जेवता समीरने मीनलकथा सांगीतली. राणंना त्याचा फारसा सिरीयसनेस जाणवला नाही. समीर एवढा गंभीर का हे ही त्यांना समजेना.
“राणे काहीतरी आपल्या डोळ्यासमोर आहे. पण आपल्याला दिसत नाही. बर मेरी तु का आली होतीस ?”
“साहेब हा पेपर पाहीलात का?”
“बर मग?”
“साहेब असाच गणपती मी तारीला दिला होता”
“काय?” राणे
“होय . मी समीरसाहेबांना सांगीतले पण होते”
“तरीच समीरला गणपती बद्दल एवढी उत्सुकता होती”
“तस समजा. “ समीर. राणेंना अंदरकी बात कुठे माहीती होती?
“पण काय ग मेरी तु बोलताना हाच गणपती असे न म्हणता असाच म्हणलीस.?” राणे
“ साहेब हा गणपतीची कीम्मत कोटीत आहे. मला सापडलेला गणपती केरात होता”
“केरात?”
“होय साहेब”
“कुठे?”
“जश मधे पॅकीम्गच्या”
“राणे मेरीला जाउद्यात. पण जरा police escort देउन पाठवा. काही दिवस लक्ष ही ठेवा”
“ठिक आहे.”
“आणी हो त्या कुणाल आणी सोनललाही संरक्षण द्या”
तेवढ्यात समीरचा फोन वाजला.
कुणाल घाबरत बोलत होता.
“समीर इथे या.”
“काय झाले?”
“सोनलचे घर पार अस्ताव्यस्त केले आहे. फोनच्या वायर्स कट केल्या आहेत.”
“तुझ्याकडे रिव्हॉल्वर आहे ना?”
“हो.”
“आम्ही येतोच. आम्ही आल्याशिवाय कुणालाही आत येउ देउ नकोस”
--३५--

नंतरच्या हालचाली फारच चटाचट झाल्या.

राणेंनी कंट्रोलला फोन करुन २ स्कॊड कार सोनलच्या घरी पाठवायला सांगीतल्या.

समीरने तानाजीला गाडी काढायला सांगीतली

लालमहलची सिक्युरीटी त्याने चालु केली. लालमहल आता अभेद्य झाला होता.

राणे व समीर मागे बसल्यावर तानाजीने गाडी चालु केली. समीरचे विचार त्याला लगेचच कळत असत.

“राणे. मला काहीस धुसर चित्र दिसत आहे पण ..”

“तुला चित्र तरी दिसत आहे, पण मला तर काळाकुट्ट अंधार”

“राणे! फोनची वायर कापणे जरा विचीत्रच वाटते”

“बर्याच गुन्ह्यात असे होते”

“राणे गेल्या ५/६ वर्षात अशा किती केसेस झाल्या?”

“हम्म्म”

“आजकाल लॅंड लाइन कोण वापरत? अगदी शेंबडे पोराच्या हातात सुद्धा मोबाईल असतो”

“खर आहे”

“राणे ,खुनी अतीशय हुशार आहे, निर्दय आहे आणी तो कमीत कमी हालचाली करतो”

“म्हणजे?”

“शहाचा खुन झाला, पण झाला शहाच्या हत्याराने आणी ते सुद्धा खुन्याने हत्यार तीथेच टाकले”

“मला नाही कळले.”

“राणे खुन्याने तपासाचे सर्व मार्गच बंद केले होते”

“खर आहे”

“तारी स्वत:हुन त्यात अडकत गेला. पण त्याचे सोयर सुतक खुन्याला नव्हते”

“??”

“तारी अट्केत गेला आणी त्याचे मरण पुढे ढकलले गेले”

“पण त्याला का मारले?”

“शहाला का मारले , ते तरी आपल्याला कुठे माहीत आहे?”

तेवढ्यात राणेंना फोन आला. फोन झाल्यावर राणे जास्तच गंभीर झाले.”

“समीर मीनलने शेवटचा फोन वापरला सकाळी ८:३० ला. ऑफीसला केला होता.”

“कशाबद्दल?”

“त्या नंबर वर फोन करुन बघीतले तर थोडासा उशीर होइल म्हणुन तीने फोन केला होता.”

“आता फोन कुठे आहे?”

“फोन बंद आहे. IMI वरुन शोधायला १/२ दिवस लागतील”

“राणे, खुनी कुठलीही गोष्ट चुकुन करत नाही”

“तुला काय म्हणायचय?”

“तारीचा खुन सुद्धा बेमालुम झाला. मग टेलीफोनची वायर तोडायचे काय कारण?”

“समजत नाही”

समीर विचारात गढुन गेला.

थोड्याच वेळेत बंगल्यापाशी गाडी येउन थांबली

स्कॉड गाड्या आल्या होत्या

बंगल्याचे आवार बरेच मोठे होते आणी फारच वाइट स्थीतीत होते.

मोठी विहीर होती पण शेवाळे साठले होते. कारंजाची स्थीतीही फारशी वेगळी नव्हती.

झाडे अस्ताव्यस्त वाढली होती. वेली एकमेकात गुंतल्या होत्या.

दारातच कुणाल घाबरुन उभा होता.

राणे , समीर आत गेले. १०/१२ पोलीस आत पहाणी करत होते.

आत तर सर्व व्यवस्थीत दिसत होते.

“कुणाल, अरे सर्व तर व्यवस्थी दिसतय “

“आम्ही आलो तर मुख्य दार नुसतेच लोटले होते. पण सोनल तीच्या खोलीत गेली आणी जोरात ओरडली.

मी धावरच गेलो तर सर्व वस्तु अस्ताव्यस्त झाल्या होत्या”

“मग मी सोनलला शांत केले “

“मगनतीची खोली बाहेरुन बंद केली”

“कुणाल तीच्या खोलीतले फर्नीच्रर, म्हणजे बेड तपासलेले वाटत होते का?” समीर

“खर सांगु का. मी इतर खोल्या बघत होतो. मीनलची खोली, इतर बेड रुम्स आणी किचन विस्कट्लेले होते”

“पोलीस केव्हा आले?”

“आम्ही आल्यावर १५ मि आले. त्यांनी डॉग स्कॉड व फोरेन्सिक्ला बोलावले आहे”

“आणी त्या बाई?”

“आम्ही आल्यावर त्या बाईही आल्या पण शेवटी पोलीसांच्या सल्ल्याने बाहेरुनच मागवले आहेत. पोलीसांनाही बराच वेळ लागेल अस दिसतय. त्यांच्या करताही मागवले आहे”

“आणी सोनल कुठे आहे? किचन मागे त्या बाईंकरता खोली आहे. तीथे पडली आहे. बाई तिच्याजवळच आहेत.”

राणे पोलीसांशी बोलायला गेले. DCP Crime जातीने आहेत हे बघीतल्यामुळे कामे जोरात सुरु झाली होती.

डॉग स्कॉड ची कुत्री हि भांबावल्या सारखी होती.

“काय पाटील? काय झाले?” राणेंनी हॅंडलरला विचारले.

“जो आला होता. तो हुशार दिसतोय.”

“म्हणजे?”

“किचनमधे तो जिरेपुड , मिरपुड शोधत होता. ती सापड्ल्यावर ओ निघुन गेला.”

“त्याचा काय फायदा?” कुणाल

“अरे त्यामुळे कुत्रे गोंधळतात” समीर

“कुणाल , सोनलला घेउन ये. तीला काही प्रश्न विचारयालाच लागतील.”

“राणे साहेब . उद्या सकाळी नाही का विचारता येणार ? ती फारच गळली आहे”

तेवढ्यात मावशी धावत धावत आल्या.

“साहेब, बाईंना आत्ता फोन आला आहे आणी त्या घाबरुन तुम्हाला बोलावत आहेत.”

तीघेही घाइघाइने आत गेले.

सोनलचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणी ती फोनवर तु कोण आहेस विचारत होती

कुणालने तीच्या हातुन हळूच फोन काढुन घेतला. सोनल तशीच बसुन होती

“सोनल काय झाले?” राणे

सोनल शांतच.

“सोनल काय फोन होता ?” राणे

सोनल किंचाळयाला लागली. कुणाल तीच्या जवळ गेला.

कुणालच्या कुशीत शिरुन ती रडत रड्त म्हणाली

“ कुणाल..फोनवरुन तो म्हणाला आज सामानाची वाट लावली आहे, उद्या तुझी पाळी”

राणेंनी फोन घेतला “ कुणाल तु जरा सोनलला शांत करुन बाहेर आण. मावशी जरा तुम्ही आमच्याकरता कॉफी टाका आणी समीर जरा बाहेर चल”

राणेंनी सर्वांना बाजुला काढुन कुणाल आणी सोनलला एकटे सोडले होते.

फोन बघुन त्यांनी कंट्रोलला त्यातील शेवटचा नंबर देउन माहीती काढायला सांगीतली.

मावशीनी कॉफी आणली. कुणाल व सोनल बाहेर आले होते.

कॉफी पोटात गेल्यावर सोनल जरा सुधारली होती.

नकळत सोनलच्या कपात समीरने ५ मिग्रा व्हॅलीयम टाकले होते.

पोलीस जेवुन निघायच्या तयारीत होते. सोनलचा जवाब दुसर्या दिवशी घ्यायचे ठरले.

तशी सोनलही झोपाळु झालीच होती.

मावशीनी सोनलची बेडरुम साफ केली होती.

“मावशी तुम्ही आज जरा सोनलच्या खोलीतच झोपा. आणी हो दार आतुन लावुन घ्या” समीर

भुक गेलीच होती पण कुणालने थोडे खाल्ले.

समीरच्या गाडीतल्या राखीव कोट्यातुन तानाजीने बीअर आणली

“कुणाल! तु ही झोप आता”

“ झोप लागण थोड अवघडच आहे”

“बर कुणाल तुझ्यातला बातमीदार काय म्हण्तोय?” समीर

“जेम्स म्हणाला त्याच्यावर मी विचार करतोय”

“काय?”

“खुनाला ह्त्यार, संधी आणी कारण लागते”

“दोन्ही खुनात ह्त्यार आहे” राणे

“खुन झाल्यामुळे संधी ही खुन्याला मिळाळी आहे” कुणाल

“पण मोटीव्ह कळत नाही” राणे

“शहाच्या खुनामुळे माखानीचा फायदा आहे, पण तारीच्यात त्याला काय इंटरेस्ट?” कुणाल

“तारीने त्या दिवशी नकळत काही पाहीले असावे” राणे

“My God ! म्हणजे त्या दिवशी सोनलनेही पाहीले असावे?” कुणाल

तेवढ्यात राणेंचा फोन वाजला

“समीर , सोनलला आत्ता आलेला फोन बोरीवली इस्ट मधुनच होता. मी जरा पोलिस एस्कॉर्ट मागवतो.”

“नको राणेसाहेब. पण फोन नंबर कुणाचा होता?”

“याकुब. पण त्यात काही अर्थ नाही. कारण त्याच्या नावावरच जश ग्रुपचे फोन रगिस्टर आहेत.”

“म्हणजे शहाला आलेला फोन ही?”

“हो तोही एक ग्रुप मधलाच होता. पण तुम्हाला पोलीस का नकोत ?”

“राणे. खुनी जर याच एरीयात असला तर पोलीस बघीतल्यावर तो रिस्क घेणार नाही”

“ठीक आहे. तु आणी तानाजी असताना मला काही काळजी नाही. मी निघतो”

राणे निघुन गेल्यावर कुणाल आणी समीर दिवाणखान्यात बसले.

सर्वत्र शांतता पसरली होती.

--३६-
रात्र तशी शांततेतच गेली.
सकाळी सोनल बरीच फ़्रेश दिसत होती.
बाईंना बरोबर घेउन सोनलने घर आवरले. माखानीना फोन करुन झालेली हकीकात सांगीतली.
थोड्यावेळाने पोलिस जबाब घेण्यास आले.
“मॅडम घरातले काय गेले ते सांगु शकल काय?”
“जायला घरात काय आहे ? सर्व वस्तु तर जागच्याजागीच आहेत.”
“पण मग आलेले काय बघत होते?”
“काही कल्पना नाही. कारण मी किंवा मीनल काही जोखमीचे घराय ठेवत नव्हतो”
“ ह्याचा शहांच्या खुनाशी किंवा तारीच्या खुनांशी काही संबध असावा का?”
“तुम्हाला काय म्हणायचे आहे?”
“बाई. आत्तापर्यंतच्या सर्व घटना जश संबधी घडलेल्या आहेत. तुमचा आणी जशचा संबध आहेच”
“आरे देवा ! पण मीनलच काय? तीचा अजुनही पत्ता नाही आणी तीचा जश्ची काही संबध ही नाही.”
“खरे आहे. पण जो पर्यंत आम्हाला खुनाचे खरे कारण कळत नाही , तो पर्यंत आम्हाला सर्व दिशांनी तपास करणेच भाग आहे.”
सहीचे सोपस्कार होउन पोलीस निघुन गेले आणी याकुब आला.
त्याच्या पाठोपाठ राणे ही आलेच.
“समीर, पोलीस जायची मी वाट बघत होतो. मी असताना त्यांना उगाचच प्रेशर आले असते” राणे
“खर आहे?”
“हे कोण” याकुबकडे वळुन राणेंनी विचारले
“मी याकुब. याकुब सय्यद” याकुब टिपीकल उंच धडधाकट प्राणी होता.
त्याच्या उच्चारात मार्दव असले तरी माणुस कणखर असावा हे जाणवत होते.
“याकुब तु कसाकाय आलास?”
“माखानीच येणार होते. पण शहा गेल्यापासुन त्यांच्या पाठीमागे फारच कामे लागली आहेत.”
“पण इत्के दिवस तुला पाहील्याच आठवत नाही”
“कामाकरता दुबैतच महीनाभर होतो”
“बर याकुब तुला काही विचाराचय”
“विचाराना”
“तुला माहीतीच असेल की शहांचा फोन झाला तेंव्हा आलेला मोबाईल नंबर तुझ्याच नावावर होता.”
“हो. मग.”
“काल सोनल ला आलेला धमकीचा मोबाईल नंबरही तुझ्याच नावावर होत”
“हे माहीत नव्हते””
“तुझ्यावर संशय नाही. पण हे ग्रुप फोन्स आहेत तरी किती?”
“पन्नास एक तरी आहेत”
“पण तुझ्या लक्शात आहे हे नंबर कुणाकडे असतात?”
“कस शक्य आहे? पण तुम्ही नंबर सांगीतलेत तर माझ्या सेक्रेटरीला विचारुन सांगतो.”
राणेंनी त्याला दोन्ही नंबर दिले.
“साहेब , मी तुम्हाला माझ्या सेक्रेटरीचा नंबर देतो. तुम्हीच विचारा”
राणेंनी फोन लावला
“जश. मि याकुब्स ऑफीस”
“बाइ हे दोन नंबर याकुब यांच्या नावावर आहेत. पण ते कोण वापरत आहे ते सांगु शकाल काय?”
“आपण कोण बोलताय साहेब?”
“DCP Crime राणे”
“होल्ड करा हं जरा”
याकुबचा फोन वाजला. तो हसतच हो म्हणाला.
“सॉरी हं तुम्हाला होल्ड करायला लावल्यबद्दल. ते फोन्स आमच्या फ़्री पुल मधले आहेत”
“म्हणजे?”
“ते कुणाला अलॉट केलेले नाहीत. कुणीही ते घेउन वापरु शकतो. आत्ता ते कुणाकडे असतील सांगणे अवघाडच आहे. तरी पण मी आपल्याला लवकरात लवकर फोन करुन कळवतेच. आपला नंबर माझ्या पॅनेल्वर आलाच आहे. आणखी काही मदत करु शकते?”
“नाही. धन्यवाद”
“याकुब तुमची सेक्रेटरी सुपर आहे”
“का हो?”
“मला माहीती देण्यापुर्वी तीने तुमची परवानगी घेतली. “
“हो”
“आणी तुम्ही नाही म्हणाला असता तर?”
“ती माहीती मिळत नाही म्हणली असती”
“बर हे नंबर फ़्री पुल मधले आहेत”
“My god !! हा प्रकार बंदच करायला पाहीजे. अवघड आहे सांगणे”
थोड्यावेळाने याकुब जाण्यास निघाला.
“सोनल मॅडम, माखानी सरांच म्हणण आहे की तुम्ही कुठेतरी गावाला जाउन यावे. मी ही तसेच सजेस्ट करीन”
“नको. मीनलचा पत्ता लागे पर्यंत मला काही सुचायचे नाही. आणी हो याकुब ती मेरी आहे पॅकींग मधे , तिला ऑफीसमधलच काम दे आणी बघ काही मदत करता येतीय का?”
“बर. पण मला अस वाटत की तुम्ही काही दिवस तरी बाहेर रहावे”
“सोनल तुम्ही बाहेर जाव हे उत्तम” राणे
“पण कुठे जाणार? आणी आता तर मला कुठेही जायची भीतीच वाटतीय.”
“कुठल्या तरी मैत्रीणीला घेउन जा”
सोनल रडायलाच लागली.
“माझी खरी खुरी मैत्रीण मीनलच होती हो. काय झाल असेल तीच?”
“ सोनल माझ्या कडे अलीबाग कीवा कर्जत जवळ अशी फार्म हाउसेस आहेत. सर्व सोयी आहेत. टीथे जाउन रहा”
“good idea” राणे
“नाही नाही मी एकटी राहुच शकत नाही.”
“मावशी येतील की”
“नाही साहेब मला घरच बघायला दिवसा जावच लागत”
“सोनल एक काम कर. तु आणी कुणाल जाउन रहा. बरोबर तानाजीला ही देतो. मोठी फार्महाउसेस आहेत. कसलीच अडचण होणार नाही” समीर
कुणालचे डोळे चकाकत होते.
“पण..” सोनल
“पण बिण जाउदेत. कुठे जाणार सांगा अलीबाग का कर्जत?”
“अलीबाग” सोनल
“ठीक आहे. तु बॅग भर आणी माझ्याबरोबर चल. कुणाल तु घरी जाउन तुझे सामान घेउन ये.” समीर.
“बर”
“राणे साहेब तुम्ही बंगला सील करा”
“समीर पण किती दिवस?” सोनल
“बघुया! किती दिवसात राणे साहेबांच्या हाताला काय लागते?”
“अवघड आहे”
“का?”
“मला हा बंगला सोडुन जायचे जीवावर येतय”
“जा तर ! बघु २/३ दिवसानी”
सगळी आवराआवर करुन सगळेच बाहेर पडले.
--३७--
समीर आणी सोनल लाल महल ला तर कुणाल त्याच्या घरी.
२/३ तासांनी सोनल, कुणाल व तानाजी बाहेर पडले व अलीबागला संध्याकाळी पोहोचले.
बंगला अक्षी किनार्याजवळ होता. CRZ लागु होण्याच्या अगोदरचा असल्याने बीचला लागुनच होता.
दोघांना दोन खोल्या देउन तानाजी भाजी बाजार आणायला गेला. मेड बाकीच्या तयारीला लागली होती.
बंगल्याच्या दिवाण खाब्याच्या २ बाजुला दोघांच्या रुम्स होत्या.
२न्ही रुम्स तसेच दिवाणखान्यालाही मोठ्या फ्रेंच विंडोज होत्या व त्या बीचवरच उघडत होत्या.
सोनल तणतणतच मधल्या खोलीत आली.
“कुणाल!! कुणाल माझी बॅग आलीय का तुझ्या सामानात ?”
“ नाही बा”
“मग काय झाले?”
“कसली होती”
“पर्स आणी वॅनिटी आहे पण कपड्यांचिच बॅग मिसींग आहे”
“कशाला हवेत कपडे राहा तशीच”
“कु..णा..ल चावट्पणा बस झाला”
“तानाजी परत आल्यावर बघु गाडीत राहीली आहे का?”
अर्थातच गाडीत बॅग नव्हती.
तानाजीला बरोबर घेउन दोघे गावात गेली आणी तीन ड्रेस घेउन आले. ड्रेस एकाच स्टाईलचे होते आणी मोठ्या फुलांची डिझाइन्चे होते.
सोनलने नाकच मुरडली होती पण दुसरा काही इलाज नव्हता.
--३८--
दुसरा दिवस उजाडला तो पावसाळी हवा घेउनच.
तानाजीही कामानिमीत्त मुंबईला गेला होता. तो संध्याकाळीच येणार होता.
सोनलने त्याला दहा वेळेला बॅग आणण्याबाद्दल बजावले होते.
बंगल्यात एक छोटी वॅगन आर होती. ती तानाजीने दोघांना कुठे जायचे असले तर तयार ठेवली होती.
सोनल आणी कुणाल दोघेही आळसावुन समुद्राकडे पहात बसुन होते.
अचानक कुणालचा फोन वाजला. फोनवर समीर होता.
“कुणाल ! कसा चाललाय रोमान्स?”
“छान चालला आहे,. पण तु कशाला फोन केलास?”
“अरे तारीचा कुणी लांबचा नातेवाइक खोली आवरायला आणी सामान घेउन जायला आला होता”
“मग?”
“त्याने मेरीच्या नावावर एक पाकीट ठेवले होते. त्याने ते जशमधे पत्ता विचारुन पोस्ट केल ते तीला आज मिळाल”
“मग मला फोन का केलास ?”
“अरे त्यात मेरीच्या नावाने एक चेक होता आणी तुझ्या नावाने अजुन एक पाकीट आहे. “
“पण तारीचा आणी माझा एवढा परिचय कुठे होता?”
“माहीत नाही. पण तु वर्तमान बातमीदार आहेस हे त्याला माहीत असणार.”
“OK”
“तुम्ही कोठे आहात हे मी अजुन तीला सांगीतले नाही. काय करु”
“तुच ठरव”
“मेरी माझ्यासमोरच बसली आहे. तीलाच फोन देतो.”
“कुणाल साहेब. मला तुम्हाला भेटायचे आहे. “
“पुढच्या आठवड्यात भेटु”
“नाही साहेब. तुम्हालाच समजेल असे काहीतरी तारीने लिहिले असेल. त्याचा खुनी सापडेपर्यंत मला झोप
लागणार नाही”
“मेरी..”
“नाही साहेब . नाही म्हणु नका.”
“तु पाकीट उघडुन मला वाचुन दाखव”
“नाही साहेब. ते तुमच्या नावावर आहे, तुम्हीच उघडायला पाहीजे. मला कळावे असे वाटत असते तर तारीने असे बंद पाकीट ठेवलेच नसते.”
“बर बघु. समीरला दे”
“समीर काय करायचे?”
“अरे ती ऐकतच नाही. मला सुद्धा पाकीट द्यायची तीची तयारी नाही”
“मग काय?”
“काही नाही तुझा पत्ता देतो तीला. ती मांडव्याला यॆइल. तु बघ जमल तर कर पिकप तीला.
“बर”
कुणालने फोन ठेवुन दिला.
सोनलने त्याच्याकडे प्रश्नार्थ चेहरा करुन पाहीले.
“ काही नाही ग. मेरीला तारीने एक पत्र दिले आहे, त्यात माझ्या नावाचे एक एन्व्हलप आहे”
“मग?”
“ते घेउन ती इथे येतीय. चल जाउ तीला पिक अप करायला”
“कुणाल माझा कुठे जायचा मुड नाही”
“चल ग ! बाहेर गेल्यावर येईल मुड “
“नको . आणी बाहेरची हवा बघ ! केंव्हाही पाउस कोसळेल”
“ठीक आहे. मी निघतो थोड्या वेळाने”
मांडव्याला फोन करुन हॉवर १ वा येते ह्याची त्याने खात्री केली. अजुन २/३ तास तरी वेळ होता.
समुद्राकडे बघत तो झोपी गेला.
उठला तर १२:३० वाजुन गेले होते आणी बाहेर पाउसही सुरु झाला होता.
सोनलच्या खोलीत डोकावले तर ती बेड वर मस्त झोपी गेली होती.
घाइघाइने तो बाहेर आला.
गाडी सुरु करताना त्याच्या लक्षात आले की बंगल्याची मुख्य दरवाजाची किल्ली आतच राहीली आहे आणी दरवाजा लॅच झाला आहे.
सोनल दाराकडेच तोंड करुन झोपली होती आणी तीला उठवायचे त्याच्या जीवावर आले होते.
त्यातुन बदाबदा पाउसही सुरु झाला होता.
गाडी स्टार्ट करुन तो निघाला.
--३९--
मेरी गेल्यावर समीर विचार करत बसला होता. काहीतरी महत्वाचे विसरले आहे अशी जाणीव होत होती.
त्याने राणेंना फोन लावला
“राणे साहेब ! जरा मला अस्वस्थ झाल्यासारखे वाटते”
“मग”
“आज मेरी आली होती आणी माझ्या ईच्छेविरुद्ध मी तीला अलीबागला पाठवले आहे”
“तुम्ही जरा पोलींसांचे हॉवर काढता का, तानाजी आत्ता येइलच त्याला घेउन मी गेट वेला येतो”
“अरे समीर अस अचानक”
“राणे माझी मनोदेवता मला कधी दगा देत नाही. कृपया नाही म्हणु नका”
“बर २ ला निघु. अलिबागला ३ वा पोहोचु”
--४०--
समीर १ च्या सुमारास मांडवा जेट्टीवर पोहोचला. हवेमुळे हॉवरला उशीर झाला होता.
पावसाचा जोर ही वाढला होता.
एक तास असाच गेला.
अडिच च्या सुमारास त्याला कळले की काही कारणानी हॉवर लेट झाले आहे आणी ते ५ ला येणार आहे”
वैतागुन त्याने एक शिवी हासडली आणी यु टर्न करुन गाडी मागे वळवली.
बंगल्यावर पोचेपर्यंत पावसाने त्याची पाठ सोडली नव्हती.
गाडी त्याने शक्यतो बंगल्या जवळच पार्क केली.
धावत धावत जाउन त्याने बेल वाजवली.
बर्याच वेळ बेल वाजवुनही दार उघडले नाही म्हणल्यावर त्याने सोनलला शिव्या घातल्या.
त्याला तेवढ्यात आठवले की त्याने जाताना बेड रुमचे दार लावुन घेतले होते आणी सोनलला पावसाच्या आवाजात बेल ऐकु गेली नसेल.
बंगल्याच्या बाजुने कुणाल मागच्या बाजुला निघाला.
फ्रेंच विंडोतुन त्याला टकटक करता आली असती.
सोनलच्या बेडरुम बाहेर तो पोहोचला
तेंव्हा फुला फुलांचा ड्रेस घातलेली सोनल दाराकडे तोंड करुन झोपलेलीच होती.
फक्त तिच्या पाठीत कीचन मधला सुरा भोसकला होता
आणी गादी वाळलेल्या रक्ताने लाल काळी झाली होती
कुणाल हतबुद्ध्च झाला.
बातमीदार असुनही एवढा जवळचा पर्सनल अनुभव त्याला नव्हता.
थोडा सावरल्यावर त्याने समीरला फोन लावला.
“समीर !”
“काय ?”
“समीर ! समीर “
“अरे माझ नाव मला माहीत आहे. पुढे बोलशील का नाही”
“सोनल..सोनल..”
“काय झाल सोनलला?”
“समीर.. सोनलचा खुन झाला आहे”
“काय? कधी? “
“गेल्या दोन तासात कधीतरी” कुणालने गेल्या दोन तासातील घडामोडी सांगीतल्या.
“मी तीथे पोहोचतो आहे. राणे पण माझ्या बरोबरच आहेत, बोल त्यांच्याशी”
समीरने राणेंना थोड्क्यात परिस्थीतीची कल्पना दिली.
“कुणाल , राणे बोलतोय”
“??”
“हे बघ. तुला धक्का बसण स्वाभाविक आहे. तु अजुन आत जाउ नकोस. गाडीतच बसुन रहा आम्ही येइपर्यंत.”
“बर”
राणेंनी समीरला कल्पना दिली.
“समीर त्या गोड पोरीचा अस व्हायला नको होत रे.”
“राणे जे झाले ते झाले. पण अजुनही माझ्या डोक्यातुन तीच्या बंगल्यातील फोनच्या कापलेल्या वायर्स
आणी तीचा न विस्कटलेला दिवाणखाना”
“समीर तुझ्या डोक्यात काय खुळ निघतील कोण जाणे”
राणेंनी अलीबाग पोलीसांना फोन लावला
“राणे DCP Crime Mumbai”
“ बोला साहेब. मी PSI जाधव”
“अरे समीर पटेलांचा एक बंगला आहे. अक्षी बीचजवळ”
“माहीती आहे. अधुन मधुन आमच लक्ष असत”
“तीथे एक बॉडी आहे. गेल्या दोन तासात खुन झाला आहे”
“अरे बापरे”
“जाधव स्टेशन डायरीत नोंद कर आणी मांडवा जेट्टीवर मला घ्यायला ये”
“आलोच”
जाधव बरोबर २ पोलीसांना घेउन आला आणी सर्व वरात बंगल्यावर पोहोचली.
त्यांना पाहुन कुणाल पुढे आला. त्याची स्थीती फारच वाईट होती.
“जाधव आम्ही सगळे आत येत नाही. उगीच ठशांचा घोळ नको”
“बरोबर आहे”
“तानाजी त्यांना किल्ली दे. आपण बाहेर गाडीतच बसुया.”
“साहेब आपण जरा येथेच थांबा. डेथ झाली असेल तर बॉडी आयडेन्टीफाय करायला कुणीतरी लागेल”
“कुणाल. तु थांब”
“नको. मला पाहावणार नाही”
“तानाजी तु सोनलला ओळखतोस. तु जा” समीर
जाधव आत गेले व डेथ कन्फर्म करुनच आले.
तानाजी आत गेला. त्याच वेळेला पोलीसांची गाडी आली आणी इ. माने खाली उतरले.
आपल्या हद्दीत खुन घडतो आणी आपल्याला न कळवता आपला स्टाफ जातो म्हणुम ते जरा कावलेच होते.
त्यातुन राणे मुफ्तीमधे होते. माने तीघांना बघुन जास्तच वैतागले.
“कायरे काय करताय?”
“मी समीर पटेल. हा बंगला माझा आहे. हा कुणाल बातमीदार आहे आणी हे राणे माझे मीत्र आहेत”
तेवढ्यात जाधव आणी तानाजी बाहेर आले. मान्यांना पाहुन जाधवांनी त्यांना एक सॅल्युट ठोकला.
“तानाजी काय झाले” तानाजी काहीतरी सांगायला अधीर झाला होता.
“साहेब. प्रेत सोनल मॅडमचे नाही”
“काय?” तीघ एका सुरात
“साहेब बॉडी मेरीची आहे”
“राणे साहेब. चला तातडीने चला. आपल्याला अजुन एक जीव वाचवता येइल” समीर
“कुठे निघालात? जाधव सगळ्यांना आत घे रे. साले आपल्या हद्दीत प्रेत टाकुन पळुन जातायत” मानेंना राग काढायला संधी मिळाली.
“कशावरुन आत घेणार? “ राणे
“मला काही कारणाची जरुर नाही”
“अस कुठल्या पोलीस मॅन्युअल्मधे लिहिले आहे”
“भडव्या! तु मला शिकवतोस” माने राणेंच्या अंगावर धाउनच गेले.
राणेंनी त्यांना सह्ज पकडले.
“जाधव, ह्या तुमच्या इ ला जरा अटक करा आणी टाका लॉकअप्मधे”
जाधव आनंदाने पुढे झाले “ माने साहेब हे DCP राणे. Mumbai crime
मानेंना जाधवांनी तातडीने बाजुला नेले.
चॊघे जण जेट्टीकडे निघाले.
“राणे ! आपल्याला हॉवर घेउन मुरबाड मधे चेणला पोलीस जेट्टी आहे. तिथे न्यायची परवानगी काढा”
“हो. खुनी कोठे गेला असेल ह्याची मला कल्पना आहे. आपल्याला तातडीने सोनलच्या बंगल्यावर जायला पाहीजे”
“काय?”
“हो निदान एक तरी जीव आपल्याला वाचवता येइल. आणी त्या याकुबला पण तिकडे बोलवा. येत नसला तर भडव्याला उचलुन आणा”
’”बर”
“आणी चेण पसुन आपल्याला तातडीने बोरीवलीला पोहोचले पाहीजे. आपल्याकडे किती वेळ आहे माहीत नाही”
“आत्ता मी वायरलेस करतो आणी चेण पासुन VVIP escort सांगतो. तीथपर्यंत रस्ता क्लीअर ठेवायला सांगतो”
“वा! आणी उद्या कुणी बोंबलले म्हणजे?”
“तीथे पोहोचल्यावर Thank you for participating in Mock drill म्हणायचे. थोडीशी शाबासकी द्यायची की झाले”
“राणे तुस्सी ग्रेट हो”
हॉवर सुरु झाले तरी समीर अस्वस्थ होता,
“समीर पोहोचु आता. तो कुणाल तर काही समजायच्या बाहेर गेला आहे”
“राणे फोनचे तोडलेले कनेक्शन आणी स्वच्छ दिवाणखाना माझ्या लवकर लक्षात आला असता तर बिचार्या मेरीचे प्राण वाचले असते”
समीर विचारात गढुन गेला होता.
राणे.नी सर्व व्यवस्था केली होती. तसेच जास्तीचे पोलीसही बोरीवलीला बोलावले होते.
बंगल्याजवळ येताच राणे.नी ताफ्याला बायबाय केले.
“राणे. पोलीसांना वेढा घालायला सांगा. आतुन, जमीनीतुन बाहेरुन कोणीही आले तरी shoot at sight चा हुकुम द्या. नंतर चॊकशांचे बघु. आणी याकुबला आल्यावर आत आणा”
राणेंनी पोलीसांना सुचना दिल्या.
तीन जवान, समीर, राणे, कुणाल, तानाजी सर्वच दारापाशी पोहोचले.
सर्वजण सशस्त्र होते.
राणेंचा बेलवर जाणारा हात समीरने आडवला
“राणे दरवाजा फोडा”
दरवाजा फोडताच समीर सोडुन सर्व थबकले.
हॉल मधला गालीचा बाजुला सरकला होता. आणी तेथे खाली जाण्यासाठी विवर होते.
समीर व त्याच्यापाठोपाठ सर्वच विवरात उतरले.
खाली मोठे बेसमेंट होते. पुरातत्व खात्याच्या दृष्टीने तीथे खजीनाच होता.
बांधुन ठेवलेल्या कैदी मुलीला खुनी भरवत होता.
“राणे हा घ्या तुमचा खुनी..सोनल..arrest her. She is dangerous”
“???”
“आणी कैदी आहे मीनल”
“समीर हे काय प्रकरण आहे” राणे
“मला तर विश्वासच बसत नाही” कुणाल
नजरेने जर जाळता आले असते तर सोनलच्या नजरेने आत्तापर्यंत समीरचा राखेचा ढीग झाला असता
“कुणाल प्रेम आंधळे असते. राणे मला जेवढ कळल तेवढ सांगतो. गाळलेल्या जागा भरायला बरीच लोक आहेत”
“बोल”
“सोनल अतीशय हुशार , पाताळ्यंत्री आणी पुर्णपणे निर्दयी आहे. त्याचप्रमाणे संधीचा फायदा उठवीण्यात पटाइत आहे”
“नुसते अंदाज बांधुन काय उपयोग. पण समीर तु कहाणी रचण्यात प्रवीण दिसतोस” सोनल
“कंपनीच्या धंद्यात एवढा फायदा कसा ह्याचा मी विचार करत होतो. वरवर दिसायला तर सगळ ठीक दीसत होते. जेवढे यार्न होते तेवढेच प्रोसेस होत आणी बाहेर जात होते. अर्थात नुसत्या या धंद्यात एवढा फायदा अवघडच होता. पण कागदावर तर तसे दिसतच होते. माझी ट्युब जरा उशीराच पेटली. मी आकडे बघत होतो , पण चुकीचे. ज्यावेळेस मी यार्न आणी फॅब्रिकचे रेटस बघायला लागलो, तेव्हा लक्शात आले की रेटस फुगवलेले आहेत, मी इतर उत्पादकांकडुन आकडे मिळवले , तेंव्हा माझी खात्री पटली की जैश मधे काही अवैध चालु आहे. हा १ ला धक्का कारण DGFT ने रेट्स चेक केले तर लगेच लक्शात येईल. अगोदर लक्षात आले नाही कारण जशने सरकारकडे कुठलाही बेनीफीट क्लेम केला नाही”
“पण हा जशचा प्रश्न आहे”
“हो पण आता आपण शहांच्या खुनाकडे वळु. शहांना काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला होता. त्यात नुकताच दुबैहुन आलेल्या बातमीत भलताच माल असल्याचा इमेल चुकुन त्यंच्याकडे आला होता. त्यांनी चुकीच्या माल आलेल्याचे रीपोर्ट मागवले. त्यात त्यांना मुर्तीचे फोटो आले. ते पाहुन शहा चक्रावले. मी शहांच्या फ्लॅट मधे ते बघीतले आहेत”
राणेंनी एकदा विचारपुर्वक समीरकडे पाहीले.
“शहांना माखीजाचा संशय आला. त्यांनी काहीतरी कारण काढुन माखानीला बोलावले. दुर्देवाने त्यांनी सोनलला पाठवले. शहांचे मरण शेवटी त्यांच्या स्त्री लंपटपणामुळे झाले. स्त्री उप्भोगण्यापुर्वी तीला खुश करण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे त्यांना घरी जायला उशीर झाला. सोनल लवकरच पोहोचली. तीला तेथे जश्च्या फोल्डरमधे फोटो दिसले. त्याच बरोबर गनही. तारी वर आल्यामुळे तीला संधी मिळाली. त्या दोघांना आत ढकलुन ती खाली गेली. शहांचा फोन संपत होता. सोनलला पाहुन त्यांनी काच खाली केली. सोनलने शहांना संधी न देताच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रुमालात पिस्तुल धरल्यामुळे व अगोदरच ठसे पुसल्यामुळे तीचे ठसे त्यावर नव्हते. वडीलांनी नेव्हीत असल्याने तीला शस्त्रांचे शिक्षण दिले होते. मग तीने एक चतुर मुव्ह केली. तीने शस्त्र तीथेच सोडले आणी ती फ्लॅट मधे परतली. कुणालाच तीचा संशय आला नाही. शहा जीवंत नाहीत हे माहीती असुनही तीने मिस कॉल दिले. भोळ्या मेरीचा तीच्यावर विश्वास बसला.”
“समीर तुम्ही गोष्टी फार सुंदर लिहाल” सोनल
“हो मी आत्ता कथाच लिहीत आहे पण सत्यकथा. हे सर्व माझे अंदाज असले तरी तु भरपुर पुरावे सोडले आहेत. सोनलचा हेतु तारीला अडकवण्याचा नव्हता. तारी स्वत:च त्यात अडकत गेला. पण तो सुटल्यावर त्याला जीवंत ठेवणे धोकादायक होते. खटल्या दरम्यान तीने तारीच्या सवयी जाणुन घेतल्या आणी तो सुटला त्या दिवशी एका मराठी येत नसलेल्या बाइला दारु व गाजरे घेउन पाठवले. ती बाइनेही दारु व गाजरे घ्रेतली असती तर सोनल विरुद्ध एक पुरावा कमी झाला असता.”
“सोनलने धंदा तर व्यवस्थीत उभारला होता. इंडोनेशीयन माफीया तीला तीथे मुर्ती पुरवत. तीथल्या कंपन्या त्या कॊशल्याने यार्न स्पिंडल मधे लपवत. आणी तोच माल फ़ॅब्रिक्मधुन जगभर जातो. आपण आता आहोत तो न विकलेल स्टॉक आहे. सर्व धंदा बॅंकेतर्फे होत असल्याने कोणी संशय ही घेतल्या नाहीत. सोनल स्वत: सी ए आहे. इंडोनेशीयन कंपन्याची जर चॊकशी केली तर त्यात बहुतेक ठीकाणी सुन ली उर्फ सोनलचा सहभाग असेल. तीच्याकडे सिंगापुरीयन पासपोर्ट आहे सुन ली नावाने आणी तेथे व्यवस्थीत आयडेन्टीटी केली आहे” सुन ली नाव ऐकल्यावर सोनलचा चेहरा उतरला होता.
“पण हे कस सिद्ध कस करणार? आणी तु तीचीच माहीती का गोळा केलीस? “ राणे
“मी या प्रकरणातल्या सर्वांचीच माहीती गोळा करत होतो. आणी सुन ली च्या पासपोर्ट वरचा ठसा सोनल्च्या ठशाशी जुळ्वुन बघा.”
“ नंतर मीनल नाहीशी झाली. कारण फारच सोप होत. काही विसरल्यामुळे मीनल अर्ध्या वाटेतुन परतली. त्याच वेळेस सोनल तीच्या तळघरात आली होती. मीनलचे कुतुहल जागृत झाले. लहानपणी कधीतरी लपंडाव खेळलेले तीला आठवत होते. पण नंतर सोनलने फार अडगळ झाल्यामुळे बंद केल्याचेही तीला आठवले. आजच सोनलला काय झाल म्हणुन ती खाली गेली. तीने सर्व खजीना बघीतला आणी तीला पेपर मधल्या बातम्या आठवल्या. काही कळायच्या आतच सोनलने तीच्या डोक्यावर प्रहार केला आणी तीला बंदीवान केले. बहीणीच्या मायेमुळे तीचा खुन सोनलला करवला नाही. सोनलचे मोबाइल तीने काधुन घेतला आणी त्यातली सिम फेकुन दिली. बाहेर येउन तीने रुम्समधे अदलाबदल केली आणी चोरीचे नेपथ्थ्य तयार केले. बाहेर पडल्यावर तीच्या लक्षात आले की तळघरात टेलीफोनचे एक कनेक्शन आहे. त्यामुळे तीने फोनच्या वायर कापुन टाकल्या. ठीक दिवाणखाना आणी फोन कट होणे हे पहील्या दिवसापासुन मला खटकत होते. त्यानंतर पुल सिम वरुन स्वत:ला फोन करणे आणी आपल्याला धमक्या आल्यचे दाखवुन सहानुभुती मिळवणे हे तर तीच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ होता, माझा हा अंदाज असला तरी मीनल शुद्धीवर आल्यावर ती जबानी दिल. आणी आत्त तीच्या पर्समधे बघीतलीत तर तुम्हाला पुल सिम मिळतील”
तेवढ्यात याकुबला घेउन पोलीस आले.
“याकुब , आता आम्हाला सर्व कळले आहे. तुच सुत्रधार असल्याची कबुली सोनलने दिली आहे”
“हलकट साली.”
“ आणी तुझे नाव याकुब नसुन अब्दुल गनी आहे. Rane arrest him and take him outside”
“राणे कोणीतरी आतल असल्याशिवाय सोनलला हा उद्योग शक्यच नव्हता. त्यामुळे तीने याकुब ला हाताशी धरला. सोनलच्या ब्लॅकमेल मुळे तो तीच्या प्रमाणे वागत होता. शिवाय सेक्स चे गाजर ही होतेच. राणे इराक मधे गनी वर कुठले वॉरंट आहे ते बघा. याकुबला बोलता करा. वाटल्यास त्याला माफीचा साक्षीदार करा पण ह्या हडळीला सोडु नका. तारीला अंदाज आला होता पण ओलेत्या मेरीला घरात घेउन, कपडे देउन तीचा खुन करणे ही थंडपणाची सीमा झालि. बिचारी हॉवर परवड्णार नाही म्हणुन बसने तीथे पोहोचली होती."
“सोनल त्या टेलीफोनची तोड्लेली वायर तुझ्या फासाची दोरी ठरणार आहे”
तानाजीला घेउन तो बाहेर पडला. सर्व गोष्टींचा त्याला विसर पडला होता.
मनाशीच तो तळ्घरातील वस्तुंची किम्मत आणी त्याच्यावरची १०% finders fee किती होइल याचा विचार केला होता.
शिवाय तो गणपती तर त्याच्याकडेच होता,
राणेंना होवो अथवा न होवो, बोगोरबुदुरचा गणपती त्याला प्रसन्न झाला होता”
--लेखन सीमा -----

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

मस्त लिहिलेय. फक्त सोनलसारख्या पोलिस तपासातील एका महत्त्वाच्या व्यक्तीला संरक्षणाकरता असं अलिबागला पाठवतील हे पटत नाही.

पुर्वी एकदा वाचली होती मी ही कथा पण क्रमशः भागांमध्ये, तुम्ही ती एकसलग टाकल्यामुळे पुन्हा वाचायला खूप मस्त वाटली....

सस्पेन्स कथा वाचायला नेहमीच आवडतात...त्यात अशा कथा वाचायला मिळाल्या की, बातच और...

आवडली कथा ..सलग दिल्यामुळे बुफे जेवण जेवतोय असं वाटलं...

असो, पु.ले.शु.

याआधीही वाचली होती. पण सलग वाचताना मजा आली. आतापर्यंत ३ वेळा वाचुन झाली. पण प्रत्येक वेळी आवडली.

आवडली.

एकसलग वाचली. आवडली. रहस्यकथांमधे सर्वात निरागस वाटणारे पात्र शेवटी खूनी निघते हे सूत्र अनेक ठिकाणी पाहिल्याने थोडा फार अंदाज आला होता. पण हे सगळं जमवून कसं आणलं असेल ही उत्सुकता शेवटपर्यंत छान टिकून राहिली.
हा लेखनदोष आहे असे अजिबात म्हणणे नाही, तर अनेक रहस्यकथा वाचल्याने अंदाज आला. कृ.गै.न. Happy
पु.ले.शु.

रहस्यकथांमधे सर्वात निरागस वाटणारे पात्र शेवटी खूनी निघते हे सूत्र अनेक ठिकाणी पाहिल्याने थोडा फार अंदाज आला होता. << मला मेरी वाटली होती.
अकत्र वाचायला मस्त वाट्ल.

मी सलग ३ दिवस(फ्री time मध्ये) हि गोष्ट वाचत आहे ...आज संपली ...खूपच भारी ......यावर एपिसोड होऊ शकतो..... तिसरा डोळा Happy

Katha ekdum jabardast ahe.. awadli.. pan kathechya manane pratisad khupch kamiahet

Pages