Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संदिप पाठक जेव्हा शिवा ला
संदिप पाठक जेव्हा शिवा ला मारायला जातो , तर शिवा आधिच मेलाय हे त्यालाजेव्हा कळंत, त्याचंही पुढे काही दाखवलं नाहिये. कोणी मारलं शिवाला ह प्रश्न नाही पड्ला त्या कोणाला.
त्या कोणाला' म्हणजे कोणाला? अ
त्या कोणाला' म्हणजे कोणाला? अ.सा. च्या वरची माणसं म्हणत असाल तर ती कोण आहेत हे प्रेक्षकांना माहित नाही अजुन. सो त्यांना प्रश्न पडला असेल तरी आपल्याला कळणार नाही.
मला ते जरा विचित्रच वाटलं.
मला ते जरा विचित्रच वाटलं. इतकी माणसं रोज बघणाऱ्या माणसाला एक रँडम 2 वर्षांपूर्वी येऊन गेलेला माणूस बरा नीट आठवतोय? >> त्याचं कारण कळेलच की आता.. preview मध्ये ते दाखवणार थोडीच आहेत.. कदाचित स रा आणि सातव ची काहीतरी बाचाबाची झालेली असेल किंवा स रा ने त्या counterवाल्याकडेच काही चौकशी केलेली असेल किंवा त्याची हालचाल संशयास्पद वाटलेली असेल..
आज शनिवारचा एपि नसतो का?
आज शनिवारचा एपि नसतो का?
नाही. सोम ते शुक्र असते ही
नाही. सोम ते शुक्र असते ही सिरीयल.
पहिली दोन पाने वाचून व आवडती
पहिली दोन पाने वाचून व आवडती मुक्ता बर्वे असल्याने गेल्या ४-५ दिवसात सगळे भाग पाहिले. मस्त मालिका. मुक्ता बर्वे अती सुंदर नाही, तसे दाखवायच्या भानगडीत पण पडले नाहीत (तेच इतर बायांबद्दल पण सांगता येइल), त्यामुळे तिच्या (व बाकी बायकांच्या पण) भन्नाट अभिनयाकडे लक्ष जाते आहे व भराभर उलगडत जाणार्या कथेमधे खुप रुची निर्माण होतीये. फक्त आता रागिणीबाईंना दुसरा विग , रूप घे म्हणुन सांगा बरं. ....
झेलमचा 'आबा' वाला मुद्दा भारी. झेलम, लय हुषार आहेस. सातवची बायको मदत करेल असे वाटते तरी आहे.
ते २-३ भाग, ज्यात रागिणी सातवला दवाखाण्यात जाऊन एकदाची मारते ते भाग जबरदस्त ताण पैदा करणारे होते. गुडेसायबांनी भारी काम केलंय.
गुडेसायबांनी म्हणजे कोणी???
गुडेसायबांनी म्हणजे कोणी???
दिग्दर्शक.
दिग्दर्शक.
मुडे आहेत ते गुडे नाहीत.
मुडे आहेत ते गुडे नाहीत.
करेक्ट सुनिधी. रागिणीने आता
करेक्ट सुनिधी. रागिणीने आता परत तो विग घालुन बाहेर पडू नये कधीच. आता विग बदलावा.
मुडे.... चष्मा लावावा लागणार
मुडे.... चष्मा लावावा लागणार लांबचा आता मला.
(No subject)
या मालिकेचा कपडेपट सांभाळणारी
या मालिकेची वेषभूषाकार एक कुणीतरी तरूण मुलगी आहे. नुकतीच तिची एक छोटीशी मुलाखत वाचनात आली. (मराठीच आहे; नाव आठवेना.)
त्यात तिने म्हटलं होतं, की या मालिकेच्या कपडेपटाची कलर-स्कीम इंग्लिश आहे. म्हणजे, कलाकारांच्या वेषभूषेकडे प्रेक्षकांचं मुद्दाम वेगळं लक्ष जात नाही. वेषभूषा कथानकात, कलाकारांच्या वावरात पूर्णपणे ब्लेन्ड होते.
आशिष च्या फोटोमुळे रागिणी
आशिष च्या फोटोमुळे रागिणी पोलिसांच्या नजरेत येणार. तिला तिच्या चेहऱ्याने नर्स व सातवची मुलगी ओळखते. तिने घरात हरवलेल्या कानातल्यातले 1, विग, पिस्तुल ठेवलेय. पिस्तुल चदूदादानी दिले म्हणू शकेल, पण बाकीचे काय? कानातले तर पुरावा आहे सरळ सरळ.
अगं पण साधना.. हे सगळं
अगं पण साधना.. हे सगळं होण्यासाठी आशिषचा फोटो काहीतरी खास काँटेक्स्ट मध्ये पोलिसांसमोर येणं गरजेचं आहे. नाहीतर पोलीस असे तो एकच फोटो बघून काही त्याची माहिती काढत बसतील असं वाटत नाही. पोलिसांना त्याची माहिती वगैरे काढून रागिणी पर्यंत पोचायला बराच वेळ आणि एफर्ट्स घालावे लागतील असं दिसतंय. कारण एकतर त्या घटनेला 2 वर्ष होऊन गेली. शिवाय रागिणी ने घर बदललंय असं वर कोणीतरी म्हटलंय.
कदाचित अल्बम मधले सगळे मेलेले आहेत एवढी माहितीच त्या मेव्हण्याला दुसऱ्या ट्रॅकवर तपास करायला भाग पाडेल. ते फोटो, आज बहीण दाखवेल ती सीडी या गोष्टींमुळे तो आशिष एके आशिष असा तपास करून रागिणीपर्यंत पोचण्यापेक्षा हे सगळं गौडबंगाल काय आहे आणि आपल्या बहिणीचा नवरा यात नक्की किती इन्व्हॉल्व्ह होता, या रॅकेटमधली इतर लोकं कुठे आहेत याचा शोध घेण्याच्या मागे लागेल (सुज्ञ असेल तर). शिवाय ह्या रॅकेटच्या काहीतरी आपापसातील वादामुळेच सातवचा खून झाला असेल असं वाटणं अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे खून करणाऱ्या बाईने सुपारी घेऊन सातवला मारलं आणि यामागचे खरे चेहरे वेगळेच आहेत आणि त्यांना शोधलं की आपोआप सातवचे खुनी सापडतील असं त्याला वाटणं साहजिक आहे. त्यामुळे आता तो रागिणीला शोधत बसण्यापेक्षा सातवच्या (खऱ्या) धंद्यांचा शोध घेईल. (असं आपलं मला वाटतंय).
टेक्निकली यामुळे रागिणीला पुरेसा वेळ मिळेल स्वतःचा समांतर तपास चालू ठेवायला. तो करत असताना चुका करून आपल्या हृदयाचे ठोके थांबवायला. उत्कंठा वाढवत न्यायला. नाहीतर मालिका 3 महिने कशी चालणार?
या मालिकेची वेषभूषाकार एक
या मालिकेची वेषभूषाकार एक कुणीतरी तरूण मुलगी आहे. नुकतीच तिची एक छोटीशी मुलाखत वाचनात आली. (मराठीच आहे; नाव आठवेना.)>>>वेशभूषाकार आणि कपडेपट वाली सायली सोमण मला वाटतंय लोकसत्ता च्या व्हिवा मध्ये आलेली ...
पियू बरोबर... पण इतक्या
पियू बरोबर... पण इतक्या फोटोत आशिषचा फोटो ओळखला गेला त्यामुळे कदाचित तिथून सुरवात होईल.
पण तू म्हणतेस तसे होणे मालिका पुढे सुरू राहण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. रागिणी जर आताच आत गेली तर आशिष का गेला हे पोलीस शोधून काढतील (जर तसे प्रेशर आले नाही तरच, करण बाबू मेला तेव्हा पोलीस मुद्दाम दुर्लक्स करताना दाखवलेत, याचे कारण एकतर पैसे नाहीतर वरून प्रेशर) आणि मग रुद्रम नावाचे व त्याला गुंडाळलेल्या मंगळसूत्राचे काय असे होईल.
पियू +१. दुसर्या
पियू +१. दुसर्या परिच्छदेतल्या दुसर्या लाइनीसाठी..
एकुण त्या सातवाच्या बायकोच्या
एकुण त्या सातवाच्या बायकोच्या हाती लागलेल्या सिड्या व त्यावरची तिची अचंबित झालेली रिअॅक्शन बघुन मला चाइल्ड पोर्नचा संशय येतो आहे. तेच आशिष ला कळले असावे.
का.पो. पॉइंट आहे !!
का.पो. पॉइंट आहे !!
का कुणास ठाऊक पण मलाही रागिणी
का कुणास ठाऊक पण मलाही रागिणी च्या आईचा संशय येतोय, मेन म्हणजे ती अक्सिडंट च्या वेळेस नव्हती तब्येत बरी नाही असं सांगून आशिष च्या कार्यक्रमाला आली नव्हती ती.
का कुणास ठाऊक पण मलाही रागिणी
का कुणास ठाऊक पण मलाही रागिणी च्या आईचा संशय येतोय, मेन म्हणजे ती अक्सिडंट च्या वेळेस नव्हती तब्येत बरी नाही असं सांगून आशिष च्या कार्यक्रमाला आली नव्हती ती. ---+1
रुद्रम सारखी एकदम वेगवान
रुद्रम सारखी एकदम वेगवान कथानक असणारी , अभिनयात एकसे एक दिग्गज कलाकार असणारी ,सारख पुढे काय होणार याची उत्सुकता ,थ्रिलर आणि मालिका सुरू होण्यापूर्वीच लिमिटेड भागाची आहे याची माहिती करून देणारे पाहून आता झी मराठी वरच्या पाणी ओतणाऱ्या,अभिनयात आणि कल्पनेत दारिद्रयता असणाऱ्या,वर्षानुवर्षे बाळंतपण करणाऱ्या,अगदी संपत आली की सगळं सोयीस्कररित्या गुंडाळणाऱ्या, तेच तेच रटाळ असणाऱ्या मालिका (मुख्यतः खुकखु,मानबा आणि आता तुजीरं पण) आता मला नजरेसमोरही नको वाटायला लागल्यात...म्हणजे कधी काळी मी या मालिका कशा काय पाहत होते आता याचचं आश्चर्य वाटायला लागलयं मला...
का कुणास ठाऊक पण मलाही रागिणी
का कुणास ठाऊक पण मलाही रागिणी च्या आईचा संशय येतोय, मेन म्हणजे ती अक्सिडंट च्या वेळेस नव्हती तब्येत बरी नाही असं सांगून आशिष च्या कार्यक्रमाला आली नव्हती ती.
अगदी बरोबर मला काल हाच विचार येत होता मी सग़ळे भाग एकदम पाहीले.
बाकि बरेच वर्षांनी चांगल्या कलाकारांचा चांगला अभिनय करू दिला आहे.
कोण हा मुडे? ज्याच्यासाठी एव्हढे मोठे कलाकार काम करायला तयार झाले.
स्टोरीसाठी तयार झाले असावेत.
स्टोरीसाठी तयार झाले असावेत.
बाकि बरेच वर्षांनी चांगल्या
बाकि बरेच वर्षांनी चांगल्या कलाकारांचा चांगला अभिनय करू दिला आहे.>>>>>>> +१
भिती फक्त एवढीच आहे की ज्याच्यासाठी हे एवढं सत्र चालु आहे ते रहस्य फुसका बार असु नये. म्हणजे रागिणीच्या नवर्याला जे काही कळलं ते.
भिती फक्त एवढीच आहे की
भिती फक्त एवढीच आहे की ज्याच्यासाठी हे एवढं सत्र चालु आहे ते रहस्य फुसका बार असु नये. म्हणजे रागिणीच्या नवर्याला जे काही कळलं ते.+१११ पण नसेल कदाचित कारण काळे धंदे काहीतरी असणारच आहेत फक्त कुठले? ड्रग्ज संबंधात का चाईल्ड पॉर्न का आणखी काही एवढाच प्रश्न असावा
नटूकाकी च्या लेटेस्ट
नटूकाकी च्या लेटेस्ट प्रतिसादाशी सहमत.
अ सा च्या बायकोला त्याच्या
अ सा च्या बायकोला त्याच्या काळ्या धंद्यांची माहिती होत आहे त्या सीडी बघून. कधीतरी रागिणीला पण ह्या गोष्टींची माहिती होईलच. मग ह्या दोघी एकत्र होऊन ह्या रॅकेटचा छडा लावतील. अ सा नी रागिणीच्या मंगळसूत्राला मारलं तर रागिणीनी अ सा ला म्हणजेच त्याच्या बायकोच्या मंगळसूत्राला. असा काही संदर्भ असेल का?
हम्म, शुगोल मुद्दा चांगला आहे
हम्म, शुगोल मुद्दा चांगला आहे.
सिडी मला वाटते त्याच्या हाफीसात पण सापडलीय. बघू काय निघते ते. पण सातव सध्या तरी गेम करणारा हस्तक वाटतोय. शिवाकरवी गेम करणारा. त्याच्या वरती जे आहेत त्यांच्याकडे सातव हा एकच ऑप्शन नाहीय. संदीप पाठकलाही ते बाळगून आहेत. कीर्तिकरांची ऑर्डर निघाल्याचे सातवला नुसते कळले, ओर्डर execute करायचे काम त्याला दिले नव्हते. सातवचा एकूण रॅकेटमध्ये किती सहभाग आहे ते कळेल आता. सध्या जेवढा दिसतोय त्यावरून तसल्या सीडीज त्याच्याकडे असणे जस्टीफय होत नाही असे मला वाटते. सिडी बाळगून कोणाला ब्लॅकमेल किंवा स्वतःला सेफ ठेवायचे असेल तर गोष्ट वेगळी.
Pages