गणेशोत्सव आला की मायबोलीचे उपक्रम जाहीर होतात हे आमच्या पाल्याला आता व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे लगेचच विचारणा झाली आणि सॅलड आवडत असल्याने ह्या पाककृतीवर पटकन एकमत झाले. मूळ कृती जेमी ऑलिव्हरची आहे. त्यात थोडे फेरफार करून आमच्या घरी हे सॅलड नेहमीच बनत असते. आज मैत्रेयीने ते बनवले आहे. फोटो काढून इथे अपलोड करण्याचे आणि सर्व स्टेप्स लिहिण्याचा आग्रह केल्याने पूर्ण पाककृती लिहिण्याचे काम मी केले आहे
लागणारा वेळ- १/२ तास
लागणारे जिन्नस-
१. राईस शेप्ड पास्ता
२. टोमॅटो, मला काल बेबी टोमॅटोज मिळाल्याने ते घातले आहेत. साधे टोमॅटो घालायचे असल्यास आतील बिया काढून छोटे तुकडे करून घ्यावेत.
३. बेल पेपर्स ( हव्या त्या रंगात) छोटे तुकडे करून
४. मक्याचे दाणे, इथे वापरलेले कॅन्ड आहेत, फ्रेश वापरायचे असल्यास थोडे वाफवून घ्यावेत.
५. काकडी, बारीक चिरून
६. फेटा चीज, छोटे क्यूब्सच विकत आणले होते, तुकडे करून सुद्धा वापरता येतील.
सॅलड ड्रेसिंगसाठी-
१. १ लसूण पाकळी, मोठी असल्यास १ पुरते, लहान असल्यास २-३ चालतील.
२. राईस व्हिनेगर, साधे व्हिनेगरसुद्धा चालेल- १टी.स्पून
३. ऑलिव्ह ऑईल- ३टी स्पून.
४. मीठ
५. मिरेपूड
क्रमवार पाककृती-
१. भरपूर पाण्यात पास्ता उकळून घ्यावा, पास्ता शिजत आला की त्यात लसूण पाकळी घालून शिजवावी.
२. पास्ता ड्रेन करून त्यावर थोडे ऑईल घालून ठेवावे.
३. सर्व भाज्या कापून घ्याव्यात.
४. एका खलबत्त्यात लसूण, व्हिनेगर, ऑलिव्ह ऑईल, मीठ, मिरेपूड घालून एकसंध सॅलड ड्रेसिंग बनवून घ्यावे.
५. पास्त्यात भाज्या आणि सॅलड ड्रेसिंग घालून सर्व करावे.
६. हे सॅलड थंड सुद्धा छान लागते.
अधिक टीपा- इटालियन हर्ब्स आवडीनुसार वापरता येतील, इथे वापरलेले नाहीत.
प्रेझेंटेशन एकदम भारी .
प्रेझेंटेशन एकदम भारी . शाब्बास !
मस्त दिसतंय...
मस्त दिसतंय...
Wow!! मस्तच!! कलरफुल!
Wow!! मस्तच!! कलरफुल!
हा ऑर्झो पास्ता ना?
अरे मस्त झालंय हे! सुंदर
अरे मस्त झालंय हे! सुंदर प्रेझेन्टेशन!!
मस्त.
मस्त.
मस्त!
मस्त!
मस्तच जमलाय, शाब्बास मैत्रेयी
मस्तच जमलाय, शाब्बास मैत्रेयी!
भारी प्रेझेंटेशन! मस्तच
भारी प्रेझेंटेशन! मस्तच दिसतंय.
खूप सुंदर .. शाब्बास मैत्रेयी
खूप सुंदर .. शाब्बास मैत्रेयी !
अरे भारी मस्त. डोळयात बदाम.
अरे भारी मस्त. डोळयात बदाम.
मस्त आहे प्रेझेंटेशन !
मस्त आहे प्रेझेंटेशन !
वा छान दिसतय,, सॅलड..
वा छान दिसतय,, सॅलड..
एकदम मस्त!
एकदम मस्त!
भारी प्रेझेंटेशन! मस्तच
भारी प्रेझेंटेशन! मस्तच दिसतंय.
कसलं सुन्दर दिसतंय
कसलं सुन्दर दिसतंय
शाबास मैत्रेयी
भारी प्रेझेंटेशन! मुलीला पण
भारी प्रेझेंटेशन! मुलीला पण आवडले, करुन बघणार....
पास्ता कशात भरला आहे? कोबी किंवा लेटुस वाटत नाही...
मस्त
मस्त
कृती मस्त. प्रेझेंटेशन तर
कृती मस्त. प्रेझेंटेशन तर खूपच भारी.
मस्त! काय छान डेकोरेशन आहे!
मस्त! काय छान डेकोरेशन आहे!
मस्त!!! सजावट खुपच मनमोहक.
मस्त!!! सजावट खुपच मनमोहक.
वा सुंदर. सजावट सुंदरच आहे.
वा सुंदर. सजावट सुंदरच आहे.
धन्यवाद.
धन्यवाद!
सर्व्ह करण्यासाठी चिकोरी नावाच्या सॅलडचे पान वापरले आहे. चिकोरी असे दिसते, त्याची एक एक पाने काढता येतात आणि ती पाने बर्यापैकी कडक असतात. सॅलड त्या पानासकटच खायचे , फिंगरफूड म्हणून.
भन्नाट!!
भन्नाट!!
मस्त !!
मस्त !!
व्वा! मस्त दिसतय सॅलड!
व्वा! मस्त दिसतय सॅलड!
व्वा! मस्त दिसतय सॅलड!
व्वा! मस्त दिसतय सॅलड!
तयार सॅलड सुंदर दिसते आहे.
तयार सॅलड सुंदर दिसते आहे.
वॉव काय सही दिसतेय, कडक !
वॉव काय सही दिसतेय, कडक !
(No subject)
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक