खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो राखेचा मधला सर्वात लहान भाऊ आहे. >>> ओके तरीच त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता.

केतकी चितळे >>> ही कोण आहे? आधी कशात होती का?

केतकी चितळे आधी महागुरुंच्या डान्सच्या प्रोग्रॅम मध्ये ( एका पेक्षा एक ) पहिल्या पाच मध्ये आली होती . पण पाचव्या क्रमांकावर ती बाद झाली. त्यानंतर तिला अभिनयाची संधी मिळाली आणि ती मालिकांमध्ये काम करत होती याच्या आधी ती " इथेच टाका तंबू " मध्ये होती . या नवीन मालिकेत तिचा नायक साईंकीत कामतआहे . त्याला चांगला मोठा रोल मिळून गेला आणि झी टीव्हीवरच्या मालिकेत . झी टीव्ही वरती काम मिळाल कि बरेच लोक ओळखायला पण लागतात Happy

आज काय झाले. साडेअकराचा रिपीट आज दाखवला नाही. आईवडिलांची अतिशय वाईट प्रतिमा झीवाले दाखवताहेत. दोघानांही ईशा म्हणजे ट्रम्पकार्ड वाटते. मधे त्या गॅरीनेही मुलाच्या वहीतला होमवर्क खोडून टाकला आणि मुलाला खोटे पाडले. अभिज्ञाची नवीन मराठी वेबसीरीज सुरू झाली आहे तूनळीवर मूव्हींग आऊट नावाची. तिचे कपडे आणि संवाद बरेच बोल्ड दाखवले आहेत.

भरत , तसे बोलणे त्या व्यक्तिरेखेचे सटल बेअरिंग आहे :p
मो काँस्मो आणि मॉड असल्यामुळे अशी धेडगुजरी भधा वापरते,
राजन ऑर्थोडॉक्स असल्याने व्याकरण शुद्ध भाषा वापरतो.
टीप:- वरील पोस्ट उगीचच आहे, मी ही सिरीयल पाहत नाही,
राजन आल्यावर तर एकही भाग पहिला नाहीये

नटूकाकी Lol
16 ला संपणार आहे ही मालिका.

काही अंदाज, राजन कुणाकडून आहे? >> Lol
इथे राजनच काय पण कुठलं पात्रं कधी कुणाकडून वागेल ते सान्गता येत नाही.
कुरूडी तो 'मधली मम्मा' वाली पोस्ट भारी होती Rofl

१६ का म्हणून सगळी पात्र विचित्र विचित्र वागत आहेत, एवढे दिवस दाखवायला काहीतरी तर पाहीजे म्हणून असेल.

सध्या मा बाईंच क्लिनिक बंद आहे का ? वि आणि आत्या च ठीक आहे , स्टाफ आहे त्यांच्याकडे.

जर ईशा ही वि ची मुलगी नाहीये हे सिद्ध झालयं तर मग मोनिकाला पैसे मिळण्याचा प्रश्न येतोच कुठे ? हे साधं लॉजिक दळवींना कळू नये ?

ते मुलीसाठी पैसे देताहेत. पैसे दिले तरंच मो डायव्होर्स आणि इचा ताबा देणार.
पण यात आजोबांनी घातलेली अट मोडली जातेय. किंवा ते लॉकरमधले पैसे न देता स्वतःकडचे देत असतील.

किंवा ते लॉकरमधले पैसे न देता स्वतःकडचे देत असतील. >> मलाही असच वाटतय. मो पासुन त्या बाळाची आणि स्वतःची सुटका जास्त महत्वाची वाटत असेल

एक शेंडा बुडुख नसलेली सिरीयल आणि झी वर चाललीये ... काय पातळी आहे याची ... आईवडील मुलीचा सौदा करतायत काय image आपण पाहतोय आणि ते मूर्ख लोक दाखवतायत .... आणि त्यावर चर्चा काय आणि धागे काय आणि काय काय

काल ह्यातली छोटी चला हवा येऊ द्या मधे आलेली. तिला मानसी आणि मोनिका आवडतात. मोनिका जास्त आवडते, ती जास्त लाड करते तिचे. म्हणजे अभिज्ञा जास्त लाडकी आहे तिची.

इथे राजनच काय पण कुठलं पात्रं कधी कुणाकडून वागेल ते सान्गता येत नाही. >> हो ना, संवाद ही बर्याचदा mis-leading असतात...
१६ का म्हणून सगळी पात्र विचित्र विचित्र वागत आहेत, एवढे दिवस दाखवायला काहीतरी तर पाहीजे म्हणून असेल. >> वेळ्काढूपणा धडधडीत दिसतोय...

काल ह्यातली छोटी चला हवा येऊ द्या मधे आलेली.
>>> कसली गोड शांताबाई झाली होती... मस्त गाणं म्हटले तिने तितले सॉंग...

डॉक्टर्स, वकील यांना कामं असतात, हे यांच्या गावीही नाही. ते तर असोच. पण मोनिकाने इतके वर्ष इतका नालायकपणा करुनही मानसीला तिची काळजी वाटते, याला मेलो मेलो मेलो ड्रामा म्हणावं नाही तर काय?

अरे तो राजन हिचा माल घ्युन पलून गेला ना? कुथे? आनि ही हातावर हात धरून बसून र्हैली?
हि मोबाईल न घेता उतरली होती का गादीतून? पोलिसाना फोन का नै केला? अशावेली बरोबर यन्ची अक्कल शेन्खायला जाते.

Pages