खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

र्म्ड शंभर टक्के मनकी बात.
कशाला कशाचा पाय्पोस नाहीये. विक्रांत डोक्यात जातो. मानसी ऑलरेडी डोक्यात गेलीये. दळवी कुटुंबिय महानतेच्या वेगळ्याच लेवलवर आहेत.

तर काय! ती मुलं अगदीच बंडल आहेत...आणि बनियन वर काय दाखवतात!! अगदीच बेकार दिसतं ते!
आणि नवा काका पण बंडल.....!!
दळवींकडे लोक ऑप्शनली रहातात - बोलतात....

कालचा एपि बालिशपणाच्या उच्च लेवल वरचा होता.
मोनिकाचं इशाला घाबरवणं पोरकट होतं. ती बावळट मुलं तिला एकटीला ठेउन घरात गेली आणी तेवढ्या वेळात इशा गायब.
आणि दळवीज नुसते बसुन अगबाई अरेच्या करतात. कुणी आजुबाजुला शोधाशोध करत नाही. फक्त पोलिस कंप्लेन्ट करतात.
मानसीचा इशा हरवली आहे हे कळल्यावरचा अभिनय धक्कादेयक होता. आणि इश परत आल्यावरचाही. Happy
आणि माधव साइंटीस्ट्ला इशा लगेच भेटते.

करेक्ट सस्मित Happy
आपली मुलगी हरवलीये आणि या बयाच्या डोळ्यांतून एक अश्रू नाही आला... फक्त तोंड अस-कस करत होती...मी तर पहातच राहिले Uhoh ,
खरच किती तो बालिशपणा ती बावळट मुलं...तीला एकटीला सोडून आत कशी जाऊ शकतात Angry

दक्षिणा......... एकदम योग्य निर्णय...बघायची सोडण्याचा...!!!
कालचा भाग तर एकदम भंगार होता.. ईशा व त्या निबर - जून पोरांच्या खेळाखेळातच सिरीयल संपविली. आणि मॉनिका त्यांना लॉक करुन बाहेर निघून जाते...? खलनायिकेची क्रूरता दाखविण्यात किती ते कल्पना दारिद्र्य!!

आणि मोनिका हल्ली कुठल्याही कलर ची साडी (उदा फिक्की आकाशी) व त्यावर कुठल्याही ऑड कलरचे चेक्स चे ब्लाउज ( उदा लाल) घालून फिरते! काय बेक्कार फॅशन सेंस! आणि तिला बघून मुलं ( व नानूमामा) फिदी फिदी हासत होती......मागून तिच्या....!!! अतिशय बालीश व सुमार मालीका.......!!!!!!!!!!!

मोनिका हल्ली कुठल्याही कलर ची साडी (उदा फिक्की आकाशी) व त्यावर कुठल्याही ऑड कलरचे चेक्स चे ब्लाउज ( उदा लाल) घालून फिरते! काय बेक्कार फॅशन सेंस!>>
असं आहे होय. मी मध्येच कधीतरी बघितली तेव्हा ती बुद्धीबळाच्या पटासारखं ब्लाऊज आणि पुर्ण पांढरी साडी नेसलेली होती. मला वाटलेलं विक्र्या गेला का काय... पण मी चौकशी केली नाही. नायतर साबा हौशेने सगळंच मागची पुढची स्टोरी पुढ्यात बसवून सांगायला लागतात. Uhoh

निधी....... Rofl
इतक्यात तिची ( व आपलीही) सुटका नाय...........................

>>>> दळवी कुटुंबिय महानतेच्या वेगळ्याच लेवलवर आहेत. <<<< Lol
त्याही पेक्षा लेखकू अन दिग्दर्शकू महाशयांचा सत्कार करावा या महानतेच्या वेगळ्याच लेवल बद्दल असे मला वाटते आहे.

>>>> मी शेवटचा एपिसोड बघणार आहे फक्त... <<<< वाट बघा..... वर्ष सहामहिने, कदाचित जास्तही...

लेखक , कलाकार सगळेच भरकटले आहेत. काल अग्गबाई सीन मधे नव्हत्या तरी उगाचं उल्लेख केला २-३ वेळा. तो काका अगदीचं भावनाविरहीत चेहरा करतो. भंगार मालिका. मा न बा कॉमेडी तरी आहे मधे मधे, इथे तर सगळाचं उजेड.

हो ना... तसंही चांगले कलाकार सोडूनच गेले वाटतं मालिकेचा रागरंग बघून... उषा नाडकर्णी, संजय मोने, लोकेश गुप्ते ,शर्वरी... आता फक्त भयाण मेंगळी हिरविण आणि भकास कॉन्स्टिपेटेड हिरो... आता गुंडाळा म्हणावं सगळ्या कळ्या ....

उषा नाडकर्णी, संजय मोने, >>> हे दोघे कधी गेले... मध्यंतरी पाहील्याचे आठवते त्यांना. त्यांची रीप्लेसमेंट कोण आहे

आहेत का ते... मला तरी प्रोमो मध्ये दिसले नाहीत हल्ली... संजय मोने सुरवातीला दिसले पण आजी नाही दिसल्या... बहुतेक आता डायरेक्ट शेवटीच दिसतील..

आणि मोनिका हल्ली कुठल्याही कलर ची साडी (उदा फिक्की आकाशी) व त्यावर कुठल्याही ऑड कलरचे चेक्स चे ब्लाउज ( उदा लाल) घालून फिरते! काय बेक्कार फॅशन सेंस! >>>> मी ही सिरियल पहात नाही, पण येता जाता किंवा सर्फ करताना मोनिका दिसली तर मी आवर्जुन तिच्या साड्या आणि ब्लाउज पहाते. एक दोन कॉम्बिनेशन्स तर मुद्दाम कॉपी करण्यासाठी लक्षात ठेवली आहेत. तिच्या पुर्वीच्या ऑर्डिनरी आणि नो क्लास सलवार कुर्त्यांपिक्षा आताच्या साड्या आणि लुक मस्त आहे. इन फॅक्ट आताच्या तिच्या साड्या पाहिल्यावरच तिच्या बुटिकचं फेबु पेज शोधायला गेले मी.

वा...आणि म्हणे ही भोपळी लहान मुलांची डॉक्टर आहे...इशाच्या प्रश्नांना पण व्यवस्थित टॅकल करू शकत नाही... हीच गोंधळलेली हरवलेली असते कायम... कॉन्फिडन्स तडफ नाही...

इथल्या अभिनयाच्या वाळवंटात इशू च काय ती ओऍसिस आहे . तीच ह्या मोठयांपेक्षा छान acting करतेय>>> खरच खूप गोड आहे ती.

येस.....! मला तेच कळेना...की हिला असा का तेलकट मेकप केलाय...... ! ती स्वतः आरशात पहात नाही का मेकप नंतर? आणि विक्र्या ला बाबा व हिला मम्मा......! ऑड नाही का वाटत कुणाला.....?
गीता काकी भयाण आहे, बेकार अनुनासिक स्वर, सुमार चेहेरा व कळकट बेअरिंग........ ! अग्गबाई बोअर झाल्या.... आजी आजोबांना तर रामराम केलाय, मॉनिका उगीचच रंगबाजी करत्ये....सगळे का हिला एव्हढे दबतात कोण जाणे! ....आणि सई ला नस्ते फुटेज.... किती बुटकी आहे ती!
ऑल स्क्रॅप!
:रागः

आणि विक्र्या ला बाबा व हिला मम्मा >>> विक्याला ती विक्रांत काका म्हणते ना Uhoh

अग्गबाई बोअर झाल्या >>> काल आवडल्या. मो ला चहा नाही करुन दिला Proud

कालच्या भागात फक्त इशा, विक्र्या, सई, मम्मा आणि ती दोन गाढव पोरं... आणि इत्तीसे खुशी, इत्तीसी हसी

बास... एक-दोन वाक्यात आटोपेल असा भाग होता कालचा...

हो ना.....!
Angry
लेखकाची कल्पना शक्ती खुटलीए!
ऑफ ऑल पर्सन्स, ईशाच्या खांद्यावर लोंबकळून चालवताहेत सिरीयल !
आणि ती दोन मूर्ख, लठ्ठ पोरं.............. त्यांची नाकात बोलणारी आई ...मोकळं वागतोय , हळू हळु खुलतोय असं दाखविण्या साठी (अयशस्वी!) प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा विक्र्या, केसांचं डालं ठेवून फिरणारी दिशाहीन मानसी.................अरे राम राम......................

Pages