आपल्या परंपरेला जागून माबो ने आपली ह्या वर्षीची पाकृ स्पर्धा ही कठीणच ठेवली आहे. साखर, गूळ, मिल्कमेड वैगेरे काही ही न वापरता गोड पदार्थ बनवणे खूपच कठीण आहे. खूप विचार करून ही माझी गाडी खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स यापुढे जात नव्हती. तरी ही हा मी केलेला पदार्थ कसा वाटतोय ते सांगा.
साहित्य:
आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. )
काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध
केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, दाणे,
थोडा सुका मेवा आणि वासासाठी वेलची पावडर.
कृती
आटवलेल्या दुधात वाटलेला खजूर आणि मध मिक्स करून घ्यावे. वेलची पावडर घालावी.
एका उभ्या ग्लासात प्रथम फळांचे तुकडे , खजुराचे तुकडे परत फळांचे तुकडे असं लेअरिंग करावं. नंतर हळुवारपणे आटवलेलं दूध त्यावर घालावं.
वरून थोडा सुका मेवा, डाळिंबाचे दाणे सजावटी साठी घालावेत.
आपले हेल्दी फ्रुट डेझर्ट तयार आहे. सगळ्याना द्या आणि तूम्ही पण खा.
हा फोटो
अधिक टीपा
तसं ह्यात फार इनोव्हेटिव्ह असं काही नाहीये, गोडीसाठी वापरलेला खजूर आणि मध हेच वैशिष्ट्य आहे ह्याच. डाएट पाळणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. अशा प्रकारे आपण खीर आणि बासुंदी ही करू शकतो.
फार काटेकोरपणे फळं नाही घेतली तरी नक्कीच चालेल. आपल्या आवडीची फळं वापरता येतील . पण नैसर्गिक गोडी असणारी फळं वापरावीत.
साखर न घालता ही ह्याची चव छानच लागत होती. मधाचा स्वाद चव खुलवत होता.
पोळी पुरी बरोबर जेवणात ही हे गोड म्हणून करता येईल.
उपासाच्या दिवशी हे खाल्लं तर पोट दिवसभर गार राहील.
मिल्कमेड किंवा डेअरी मिल्क पावडर वापरून दूध आटवायचा वेळ वाचवू शकता. इथे चालणार नव्हतं आणि आटवलेल्या दुधाची चव निश्चितच कैक पटीने छान असते.
फळांचीच सजावट केली आहे.
भारी रेसीपी. सजावटही मस्तच!
भारी रेसीपी. सजावटही मस्तच!
योकु थँक्स पहिल्या वहिल्या
योकु थँक्स पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी.
मस्त दिसतय. खावसं वाटतय लगेच.
मस्त दिसतय. खावसं वाटतय लगेच.
भारी आहे रेसिपी आणि सोपी पण
भारी आहे रेसिपी आणि सोपी पण आहे प्रयत्न करायला हरकत नाही एकदा
रबडी वापरली तर जरा घट्ट
रबडी वापरली तर जरा घट्ट असल्यानी मस्त लेअर्स दिसतील.
भारी !
भारी !
मस्त दिसतोय प्रकार
मस्त दिसतोय प्रकार
एकदम खत्रा दिसते आहे !!
एकदम खत्रा दिसते आहे !!
तोंपासु!
तोंपासु!
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
मस्त आहे फ्रूट रबडी.
मस्त आहे फ्रूट रबडी.
जबरदस्त.
जबरदस्त.
मस्तच.
मस्तच.
Mast vaatatey
Mast vaatatey
Mast vaatatey
Mast vaatatey
पाककृती व सजावट सुरेख!
पाककृती व सजावट सुरेख!
छान दिसतंय!
छान दिसतंय!
slurrrrrrrrp.....
slurrrrrrrrp.....
धन्यवाद सगळ्याना मनापासून .
धन्यवाद सगळ्याना मनापासून .
योकु, बरोबर आहे, अजून घट्ट केलं असत दूध तर चांगले लेअर्स दिसले असते.
मस्त दिसतंय!!!!
मस्त दिसतंय!!!!
मस्त दिसतंय!!!!
मस्त दिसतंय!!!!
मस्त दिसतयं!
मस्त दिसतयं!
मस्त
मस्त
मस्त् सजावट् आकर्षक
मस्त् सजावट् आकर्षक
हेमाताई मला ते दोन्ही ग्लास
हेमाताई मला ते दोन्ही ग्लास हवेत. एकदम तोपासु झाल.
मस्त! सुंदर सजावट.
मस्त! सुंदर सजावट.
ममो , मस्त .
ममो , मस्त .
मला असले दूधाचे प्रकार आवडत नाहीत . पण जे काही आहे ते मस्त आहे .
खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स या व्यतिरिक्त काहीतरी
अह्हा! फोटो काय मस्त आहेत.
अह्हा! फोटो काय मस्त आहेत. ममो मस्त पाकृ.
व्वा! छान दिसतोय हा प्रकार.
व्वा! छान दिसतोय हा प्रकार. सजावटही सुंदर.
हेमाताई मला ते दोन्ही ग्लास हवेत. >>>>>>>>जागू एकच घे. वजन वाढेल. एक मला दे.
खुपच सुंदर ममो..
खुपच सुंदर ममो..
खाली केलेली सजावट पहिले मला ट्रे वरची डिझाईन वाटलेली.. खुप मस्त..
Pages