आपल्या परंपरेला जागून माबो ने आपली ह्या वर्षीची पाकृ स्पर्धा ही कठीणच ठेवली आहे. साखर, गूळ, मिल्कमेड वैगेरे काही ही न वापरता गोड पदार्थ बनवणे खूपच कठीण आहे. खूप विचार करून ही माझी गाडी खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स यापुढे जात नव्हती. तरी ही हा मी केलेला पदार्थ कसा वाटतोय ते सांगा.
साहित्य:
आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. )
काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध
केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, दाणे,
थोडा सुका मेवा आणि वासासाठी वेलची पावडर.
कृती
आटवलेल्या दुधात वाटलेला खजूर आणि मध मिक्स करून घ्यावे. वेलची पावडर घालावी.
एका उभ्या ग्लासात प्रथम फळांचे तुकडे , खजुराचे तुकडे परत फळांचे तुकडे असं लेअरिंग करावं. नंतर हळुवारपणे आटवलेलं दूध त्यावर घालावं.
वरून थोडा सुका मेवा, डाळिंबाचे दाणे सजावटी साठी घालावेत.
आपले हेल्दी फ्रुट डेझर्ट तयार आहे. सगळ्याना द्या आणि तूम्ही पण खा.
हा फोटो
अधिक टीपा
तसं ह्यात फार इनोव्हेटिव्ह असं काही नाहीये, गोडीसाठी वापरलेला खजूर आणि मध हेच वैशिष्ट्य आहे ह्याच. डाएट पाळणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. अशा प्रकारे आपण खीर आणि बासुंदी ही करू शकतो.
फार काटेकोरपणे फळं नाही घेतली तरी नक्कीच चालेल. आपल्या आवडीची फळं वापरता येतील . पण नैसर्गिक गोडी असणारी फळं वापरावीत.
साखर न घालता ही ह्याची चव छानच लागत होती. मधाचा स्वाद चव खुलवत होता.
पोळी पुरी बरोबर जेवणात ही हे गोड म्हणून करता येईल.
उपासाच्या दिवशी हे खाल्लं तर पोट दिवसभर गार राहील.
मिल्कमेड किंवा डेअरी मिल्क पावडर वापरून दूध आटवायचा वेळ वाचवू शकता. इथे चालणार नव्हतं आणि आटवलेल्या दुधाची चव निश्चितच कैक पटीने छान असते.
फळांचीच सजावट केली आहे.
धन्यवाद रेसिपी आवडली म्हणून.
धन्यवाद रेसिपी आवडली म्हणून.
हेमाताई मला ते दोन्ही ग्लास हवेत. एकदम तोपासु झाल. >> हो जागू नक्की .
जागू एकच घे. वजन वाढेल. Lol एक मला दे. Happy >> शोभा (स्मित)
स्वस्ति, हो ग खजूर रोल्स किंवा लाडू याशिवाय मला ही काही सुचत नव्हतं. ह्यासाठी मला ही खूप विचार करावा लागला . कल्पना आवडली थँक्स.
खाली केलेली सजावट पहिले मला ट्रे वरची डिझाईन वाटलेली.. खुप मस्त.. >> टीना खूप खूप थँक्स .
मनिमोहोर,
मनिमोहोर,
मस्त दिसत आहे पा. क्रु.
कल्पना छान सुचली आहे.
पाकृ आणि सजावट दोन्ही मस्त!
पाकृ आणि सजावट दोन्ही मस्त!
मस्त! एकदम फाईव्हईस्टार
मस्त! एकदम फाईव्हईस्टार दिसतेय
टिना +१
टिना +१
ममो, मला नेहमी उपवासाला बिना मिठाचं काय खावं हा प्रश्न पडतो.. तू सोडवलास.. थँक्स
यम्मी!! मस्त दिसतंय...
यम्मी!! मस्त दिसतंय...
जबरदस्त दिसतंय डेझर्ट! माझं
जबरदस्त दिसतंय डेझर्ट!
धन्यवाद सगळ्याना .
धन्यवाद सगळ्याना .
सजावट आवडली खूप छान वाटतय .
ह्यावेळी मी किवी ची फुलं करायची असं योजल होतं . आत्तापर्यंत कधी केली नव्हती आणि ह्या वेळेस फळं असल्याने रेसिपी मध्ये ते संयुक्तिक पण होतं . मी आदल्या दिवशीच सगळं आणलं होतं . दुसऱ्या दिवशी मस्त पैकी लक्ष देऊन किवी कट केलं आणि ओपन केलं तर आत हिरवा रंग नाहीं . फिक्कट पिवळ्या रंगाच निघालं आतून .मला किवी हिरवच माहीत होतं पण अश्या रंगाचं पण असतं असं फळवाला म्हणाला नंतर.
मी थोडीशी नाराजच झाले तो रंग बघून . पण यजमान म्हणाले , " काही काळजी करू नको , मी तुला दुसरी आणून देतो ". मंगळवारच्या भर पावसात त्यांनी मला दुसरी नवीन किवी ची फळं आणून दिली . मग मी ती पुन्हा कार्व्ह केली . आणि तीच दिसतायत फोटोत. सो त्याना थँक्स खूप खूप.
जबरदस्त डेझर्ट..
जबरदस्त डेझर्ट..
सजावटही मोहक झाली आहे.
सजावटही मोहक झाली आहे.
भारी डेझर्ट। आणि किवीचं
भारी डेझर्ट। आणि किवीचं कार्व्हिंगही मस्त
मस्त
मस्त
जबरदस्त! ट्रेवरील सजावटही खास
जबरदस्त! ट्रेवरील सजावटही खास दिसतेय. दूध आटवल्यामुळेही गोडी वाढते.
मस्त
मस्त
सोपी आणि हेल्दी रेसिपी !
सोपी आणि हेल्दी रेसिपी !
(No subject)
धन्यवाद संयोजक .
धन्यवाद संयोजक .
भरपूर प्रवेशिका येऊन स्पर्धा झाली असती तर जास्त मजा आली असती . पण ठीकच आहे .
तरी ही या निमित्ताने विचार करण्यात , पाकृ करण्यात वैगरे माझा वेळ छानच गेला .
Pages