गणपती बाप्पा मोरया!
मायबोली गणेशोत्सव २०१७ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - पयलं नमन - देवळांची प्रकाशचित्रे.
देवाचे अस्तित्व चराचरामधे व्यापून राहिलंय हे कितीही खरं असलं तरी देवळांमधे किंवा मंदिरांमधे गेल्यावर मिळणारी मन:शांती निराळीच! काहींना तिथलं मांगल्यं भावतं तर काहींना शांती, कोणी तिथे इतिहास शोधतो तर कोणाला वास्तुरचना भावते. देवाचं हे घर प्रत्येकाला आपल्या नजरेतून वेगळं भासतं आणि प्रत्येक जण त्याला आपल्या मनामधे, आठवणींमधे स्वत:ला हवं त्या प्रमाणे साठवून घेतो. जगातलं प्रत्येक देऊळ हे असंच सुंदर आहे याची आम्हाला खात्री आहे. तेंव्हा तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या आणि तुम्ही साठवलेल्या देवळांच्या प्रकाशचित्रांचा सगळ्यांनाच आस्वाद घेऊ द्या.. काय?
अनेकार्थाने सुंदर असलेल्या देवळांची प्रकाशचित्रे सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली देवळांची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.
११.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
हवाईयन देवाचे मंदिर
हवाईयन देवाचे मंदिर
सुवर्णमंदिर (आग्रा)
सुवर्णमंदिर (आग्रा)
मिनेआपोलिस चे सर्व देवांचे
मिनेआपोलिस चे सर्व देवांचे एकत्र मंदीर
महेश्वरच्या अहिल्या फोर्ट
महेश्वरच्या अहिल्या फोर्ट मधील मन्दिर
सुवर्णमंदिर आग्र्याला पण आहे
सुवर्णमंदिर आग्र्याला पण आहे का?
यावर्षीचा पहिला पाऊस २०१७-०५
यावर्षीचा पहिला पाऊस २०१७-०५-३१
धुके /ढगातलं भिमाशंकर - सकाळी साडेसहाला॥
BAPS Shri Swaminarayan Mandir
BAPS Shri Swaminarayan Mandir, Chino Hills, California
न्यूजर्सीमधल्या अक्शरधाम
न्यूजर्सीमधल्या अक्शरधाम मंदिराचे प्रवेशद्वार. मंदिर अजून बांधणे सुरु आहे.
मस्त छायाचित्र.
मस्त छायाचित्र.
नेहमी जोरात पळणारा छायाचित्रांचा झब्बू का मंदावलाय?
कारण फोटो सगळे लॅपटॉपवर आणि
कारण फोटो सगळे लॅपटॉपवर आणि आम्ही मोबाईलवर..... लॅपटॉप उघडायचा कंटाळा
कनकालेश्वर मंदीर,बीड
कनकालेश्वर मंदीर,बीड
संगमेश्वर सासवड
संगमेश्वर सासवड
देवगडच्या प्रसिद्ध दिरबा
देवगडच्या प्रसिद्ध दिरबा देवी मंदिराचा सभामंडप
सांगलीचे गणपती मंदिर
सांगलीचे गणपती मंदिर
सर्वच फोटो मस्त. सांगलीच्या
सर्वच फोटो मस्त. सांगलीच्या मंदिराचे अजून फोटो असतील तर येऊ द्यात.
चतुशृंगी, सोमेश्वर, अष्ट विनायक, वज्रेश्वरी , कोल्हापूरची अंबाबाई, सिद्धि विनायक अशा सगळ्या आपल्या आवडत्या देवळांचे फोटो टाका पटापट मंडळी .
(No subject)
सांगली गणपती मंदिर प्रवेशद्वार
अमरनाथ गुफा
अमरनाथ गुफा
पडमनाभ मंदिर , तिरुवनंतपुरम
पद्मनाभ मंदिर , तिरुवनंतपुरम
(No subject)
ज्ञानेश्वरी मंदीर, नेवासे
गणपती मंदीर,जालना
गणपती मंदीर,जालना
शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदीर
शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदीर अँटवर्प बेल्जियम
भुलेश्वर, यवत.
भुलेश्वर, यवत.
गणपतीपुळे मंदीर
वेळणेश्वर मंदीर
(No subject)
सारीच मंदिरे व त्यांची
सारीच मंदिरे व त्यांची चित्रे आवडली
मनीमोहोर वेळणेश्वर कुठे आहे ?
कोकणात गुहागर जवळ. शंकराच
कोकणात गुहागर जवळ. शंकराच मंदिर आहे . खूप कोकणस्थांच कुलदैवत आहे वेळणेश्वर. आमच पण तेच आहे. आमचं आडनाव ह्या वरुनच पडलं असेल असं वाटत.
फार सुंदर आहे ते ठिकाण. आणि गुरु़जींकडे प्रसादाच्या जेवणात अतिश्य सुंदर मोदक असतात ते वेगळच
कोल्हापूरचे अंबामाता मंदिर
कोल्हापूरचे अंबामाता मंदिर.
https://get.google.com/albumarchive/106450631900580625713/album/AF1QipPE...
श्री समर्थ मंदीर,जांब समर्थ
श्री समर्थ मंदीर,जांब समर्थ
संयोजक,नवीन विषय कधी येणार?
संयोजक,नवीन विषय कधी येणार?
ज्योतिबा, कोल्हापुर.
ज्योतिबा, कोल्हापुर.
Pages