खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
अवनी तुम्ही जवळ आहात
अवनी तुम्ही जवळ आहात
जवळपास rake च.... पण त्याचे पाच अक्षरी नाव
अजून एक क्ल्यू:
अजून एक क्ल्यू:
त्याच्या नावात अजुन एक हत्यार दडलेले आहे
शिंकाळ
शिंकाळ
विळाकोयता?
विळाकोयता?
दडलेले हत्यार फावडे आहे का?
दडलेले हत्यार फावडे आहे का?
पागल करते हा धागा लोकाईला...
पागल करते हा धागा लोकाईला... बबौ!
काटा चमचा
काटा चमचा
नाही .....
नाही .....
ओके..... अजुन एक क्ल्यू देतो
पहिली दोन अक्षरे एक आडनाव.... नंतरची तीन अक्षरे एक हत्यार
वैभवविळा
वैभवविळा
कंगवा काय , शिंकाळ काय,
कंगवा काय , शिंकाळ काय, काटाचमचा काय?
बागकाम वाचल नाही का मंडळी?
काटेदंताळे........हा आपला
काटेदंताळे........हा आपला काहीही गेस हं
आता मी
आता मी
काळेफावडे
गोरेकोयता
चालू करणार आहे
काटेफावडे
काटेफावडे
अवनी तुम्ही फारच जवळ आहात
अवनी तुम्ही फारच जवळ आहात
तुम्ही द्या पुढचा क्ल्यू
उत्तर आहे काटेकुदळ
दंताळे बरोबर वाटते आहे, पण हे
दंताळे बरोबर वाटते आहे, पण हे त्याचेच पाच अक्षर दुसरे नाव असेल
ओह धन्यवाद !
ओह धन्यवाद !
हे घ्या कोडं......जी बात तुझ्यात आहे ती त्याच्यात नाही
स्व एका च वेळच्या आपल्या
स्व एका च वेळच्या आपल्या पोस्टी असो
आरसा
आरसा
आरसा नाही
आरसा नाही
थोडी करेक्शन .....जी बात तुझ्यात आहे ती तिच्यात नाही.
प्रेशर कुकर
प्रेशर कुकर
तसबीर
तसबीर
तसबीर बरोबर
तसबीर बरोबर
दोन अक्षरी. रोजच्या गरजेची
दोन अक्षरी. रोजच्या गरजेची वस्तू. हिंदी बोलीभाषेतील अर्थ लावला तर काहितरी भलतंच होतं.
सगळे गाठोड्यात गुंडाळले गेले
सगळे गाठोड्यात गुंडाळले गेले का? दीड तास झाला.
दुसर्या शिफ्टची मंडळी येतील आता.
दोन अक्षरी. रोजच्या गरजेची
दोन अक्षरी. रोजच्या गरजेची वस्तू. हिंदी बोलीभाषेतील अर्थ लावला तर काहितरी भलतंच होतं.>>>> उत्तर लिहा की कुणीतरी!
क्ल्यू द्या क्ल्यू
क्ल्यू द्या क्ल्यू
कधीतरी चटकाही बसतो.
कधीतरी चटकाही बसतो.
सुट्टा / सुट्टे का? हिंदीत
सुट्टा / सुट्टे का? हिंदीत सिगारेट? बाकी काही नजरेसमोर येत नाही..... ब्रश-पेस्ट पासून लिस्ट चेक केली...
नाही.
नाही.
गर्मी
गर्मी
Pages