खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:05

खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळद

पुजेत माझा मान, माझ्या डोक्यावर शेंडीवाला मांडुन बसतो ठाण - ३
(अय्या जुळलं :हाहा:)

उखळ?
की पदार्थाचं नाव अपेक्षित आहे...? Uhoh

उखळ

उखळ
योकु बरोबर!

पदार्थाच नाव अपेक्षित नव्हत..कशा मधे तो पदार्थ केला जातो अस होतं ते..

पडशी

पडशी

कसले भन्नाट पळताहेत दोन्ही धागे! एक बंद करा म्हणावं संयोजकांना. लई धावपळ होईल १० दिवसाचे १० धागे आलेत तर. अर्थात वेमांना एखादवेळेस चाकारणारणानं कारण माबो ट्रॅफिक राहातो त्याकारणारणानं सर्वरवर Wink

मी नसेल तर बाप्पांची पूजा अशक्य.

चांगल्या प्रतीच्या धातूपासून मला तयार करतात.
दुसर्‍यात काहीतरी स्निग्ध पदार्थ वापरावा लागतो
१: XX - XXXX
२: XXXX

पळी पंचपात्री
निरांजन

किती शब्द देतोस एका वेळेला!

Pages