मला आधार कार्ड, त्यासाठी करावी लागणारी अंमलजबावणी किंवा त्याच्या मागील पायाभुत सुविधा यांबद्दल काहीही माहिती नाही.
या लेखाचा उद्देश ती माहिती करुन घेऊन माझ्या ज्ञानात भर टाकणे असा आहे.
या लेखाचा उद्देश कोणत्याही योजनेवर किंवा कोणत्याही सरकारवर टीका करणे, आरोप करणे, जाब विचारणे किंवा चुकीची माहिती पसरविणे असा नाही याची नोंद घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
युनीक आयडेंटीफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडीया अर्थात आधार कार्ड तत्कालीन काँग्रेस सरकारने २८ जानेवारी २००९ रोजी लागु केले.
या अंतर्गत एक युनिक १२ अंकी क्रमांक प्रत्येक सबस्क्राइबरला देण्यात येतो. याच्या अनेक हेतुंपैकी एक हेतु असा होता की सर्व सरकारी अनुदाने विना भ्रष्टाचार / लिकेज न होता अंतीम लाभार्थीपर्यंत पोहोचावीत.
परंतु,
याच आधार अंतर्गत नागरीकांचा बायोमेट्रीक डेटा ही घेण्याते येत आहे. यात, डोळे, बोटांचे ठसे ई. चा समावेश आहे.
हा डेटा सरकारचा आजवरचा कारभार बघता, त्यांना नीट सुरक्षीतरित्या सांभाळता येणार आहे किंवा कसे, त्यासाठी नक्की काय उपाययोजन केली, याबाबत काही माहिती मिळत नाही.
ही माहिती सरकार स्वत:च दुरुपयोग करण्यापासुन व इतर वाईट हेतु असलेल्या व्यक्ती / संस्थांच्या हातात पडण्यापासुन कसे थांबवणार या बाबतीत काहीही ठोस नियम नव्हते / नाहीत.
त्यात, आत्ताच सद्ध्याच्या भाजप प्रणीत सरकारने, हे बील "मनी बील" या कॅटॅगरीखाली आणुन ज्या पद्धतीने राज्यसभेचा विरोध व त्यांच्या सुचना सरसकट रितीने डावलुन पास करवुन घेतले आहे, ते अतिशय संशयास्पद आहे.
अमेरीका, युरोपात तेथील आंतरजाल व दुरध्वनी सर्विलियंसचा कसा दुरुपयोग केला गेला हे तर आपणास माहिती असेलच.
(आमचे आशास्थान) मा. एडवर्डजी स्नोडेनसाहेबांमुळे आपल्याला हे सर्व अधिकृतपणे अस्तित्वात आहे याची खबर मिळाली.
असाच गैर्वापर, भारतात होणार नाही याची कसलीही ठोस यंत्रण अस्तित्वात नाही.
राज्यसभेने ज्या सुचना केल्या त्यातील एक अशी होती की एखाद्याला यातुन बाहेर पडण्याचा व तसे केल्यानंतर त्याचा सर्व डेटा पुसुन टाकण्याचा पर्याय असावा. जो धुडकावुन लावण्यात आलेला आहे, इतर अनेक सुचनांसोबत.
असे व्हायला नको होते. सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते.
तसेच याआधीच कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आधार कार्ड बंधणकारक करु शकत नाही, कारण आधार कार्ड नाही म्हणुन एखाद्याल सरकार सेवा नाकारु शकत नाही.
आधीच पॅन कार्डासारख्या योजना अस्तित्वात असताना त्यांना आणखी मजबुत बनवुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुनही ते साध्य करता येणार आहे ज्यासाठी आधार कार्ड हवे असे सांगितले जात आहे.
तरी यावर योग्य चर्चा व आपण सरकारला विनंती करुन काही बदल घडवुन आणु शकतो का या वर चर्चा व्हावी.
Shocking: Aadhaar cards have more details than any US surveillance
http://www.businessinsider.in/Shocking-Aadhaar-cards-have-more-details-t...
India's billion-member biometric database raises privacy fears
http://www.reuters.com/article/us-india-biometrics-idUSKCN0WI14E
Aadhaar more intrusive than US surveillance exposed by Snowden, say privacy advocates
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/aadhaar-mor...
----------------------------------------------------------------
Your 10-Point Cheat Sheet On Aadhaar Bill Passed By Lok Sabha
http://www.ndtv.com/cheat-sheet/your-10-point-cheat-sheet-on-aadhaar-bil...
Aadhar Bill passed in Lok Sabha, Opposition fears ‘surveillance’
http://indianexpress.com/article/india/india-news-india/aadhar-card-uid-...
LS passes Aadhar Bill, rejects RS recommendations: All you need to know about the law
http://www.firstpost.com/politics/aadhaar-number-is-not-proof-of-indian-...
१ ऑक्टोबर नंतर कुणाचे
१ ऑक्टोबर नंतर कुणाचे वैकुंठाचे बुकींग झाले असेल / होणार असेल, तर कृपया थांबा.
आधी तुमचे आधार कार्ड काढा व मगच वैकुंठाच्या प्रवासाला निघा.
असे आपले शासन म्हणतेय -
If you didn't have Aadhaar when you died, you need to come back to life, get Aadhaar, then die again.
Aadhaar Number Mandatory For Registration Of Death From October 1
https://www.outlookindia.com/website/story/aadhaar-number-mandatory-for-...
The Hindu Utsav Samiti (HUS)
The Hindu Utsav Samiti (HUS) put forward its demand at a peace committee meeting called by the district administration ahead of the festival.
Use Aadhaar to check entry of non-Hindus at garbas: Hindu body
http://indianexpress.com/article/india/use-aadhaar-to-check-entry-of-non...
सार्वजनिक शौचालय ही एकच जागा
सार्वजनिक शौचालय ही एकच जागा बाकी राहीली आहे.. तिचापण समाविष्ट करण्याचे सुचवतो.
आधार ला विरोध करणारे आता सर्वत्र आधार आधार करत आहे ...
सार्वजनिक शौचालय ही एकच जागा
सार्वजनिक शौचालय ही एकच जागा बाकी राहीली आहे.. तिचापण समाविष्ट करण्याचे सुचवतो.>>> सॉरी पण ह्याची अंमलबजावणी सुरु झाली तर काय असा एक विचार डोक्यात आला नि हसु आले.
बाकी आता फोन आधार ला लिंक करा, पॅन पण लिंक करा, परीक्षांचे फॉर्म भरताना पण आधार, गॅझेट मधे नाव बदलताना पण आधार्,,एकुण सगळ्याच ठिकाणी आधार. एवढ्या डेट्याच काय करणार ह्याचा अंधार च आहे.
मुलीनी लग्न केल्यानंतर पण आधारवर नाव बदलणे आले.अजुन एका कार्ड ची भर.
Aadhar card Ani pancard koni
Aadhar card Ani pancard koni Link karave??saglyana avshyak ahe ka??
@ Amupari, हो, सर्वांनाच
@ Amupari, हो, सर्वांनाच आवश्यक आहे. कारण काही जणांनी एकापेक्षा जास्त PAN कार्ड बनवली आहेत व त्याआधारे ते करचोरी करत आहेत. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे एकाच PAN कार्ड ठेवून बाकीचे रद्द करायचे आहेत. त्यामुळे हे कसे करावे? तर आधार कार्ड आणि PAN कार्ड लिंक करून. कारण एकाच व्यक्तीचे २-३ आधार कार्ड बनणे शक्य नाही. कारण त्यामध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांमधील iris यांच्या प्रतिमा घेतल्या जातात ज्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या (unique) असतात. त्यामुळे समजा मी मुंबईतून एक आधार कार्ड बनवले आणि मग दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊन तेथे पुन्हा आधार कार्ड बनवायचा प्रयत्न केला तर माझे बोटांचे ठसे, डोळ्यांमधील iris हे सर्व्हर मधील आधीच्या ठश्यांशी जुळणार व पुन्हा नोंदणी होणारच नाही. त्यामुळे एका व्यक्तीचे एक आणि एकाच आधार कार्ड बनू शकते. आणि एका आधार कार्डला एकाच PAN कार्ड लिंक होणार आहे. म्हणजे २-३ PAN कार्ड असणारी व्यक्ती आपल्याकडील कोणतेतरी एकाच PAN कार्ड लिंक करू शकते. काही काळाने लिंक न केलेली PAN कार्ड्स बाद केली जाणार आहेत. जर आपण आपले आधार कार्ड आणि PAN कार्ड लिंक केले नाही तर तेही बाद होऊ शकते.
आता प्रत्येक व्यक्तीचे एकाच PAN कार्ड असल्यामुळे पुढे त्याला सर्व आर्थिक व्यवहार त्या एकाच PAN कार्डने करावे लागतील व त्याच्या सर्व उत्पन्न स्त्रोतांची माहिती सरकारला मिळून योग्य तो प्राप्तीकर (आयकर) वसूल करता येईल.
विक्षिप्त मुलगा छान माहिती...
विक्षिप्त मुलगा छान माहिती...
कारण काही जणांनी एकापेक्षा
कारण काही जणांनी एकापेक्षा जास्त PAN कार्ड बनवली आहेत व त्याआधारे ते करचोरी करत आहेत. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे एकाच PAN कार्ड ठेवून बाकीचे रद्द करायचे आहेत.
कारण एकाच व्यक्तीचे २-३ आधार कार्ड बनणे शक्य नाही. कारण त्यामध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांमधील iris यांच्या प्रतिमा घेतल्या जातात ज्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या (unique) असतात.
आता प्रत्येक व्यक्तीचे एकाच PAN कार्ड असल्यामुळे पुढे त्याला सर्व आर्थिक व्यवहार त्या एकाच PAN कार्डने करावे लागतील व त्याच्या सर्व उत्पन्न स्त्रोतांची माहिती सरकारला मिळून योग्य तो प्राप्तीकर (आयकर) वसूल करता येईल.
>>
१. हे सगळॅ थेट पॅन कार्डातच का केले नाही? तसे करण्यात काय अडचणी होत्या. शेवटी कार्डच तर बनवायचे होते ना? मग हा सगळा डेटा घेऊन तो पॅन कार्डातच टाकता आला असता की? व अगदी याच कारणांमुळे तिथेही एकच पॅन कार्ड राहिले असते?
२. जर हे सगळे पॅन कार्डात करणे शक्य नव्हते तर आधार कार्डाचे बिल, मनी बिल सदरामधे घेऊन मग का पास केले गेले?
३. अर्थीक विधेयकांतर्गतच हे करायचे होते तर मग मुळ पॅन कार्डातच का नाही केले? पॅन कार्ड व कर आर्थीक विधेयकात येत नाही का?
हे सर्व सरकारलाच करुन हवे आहे
हे सर्व सरकारलाच करुन हवे आहे तर नागरिकांच्या खिशातून कशाला पैसे काढतायत. पोलिओ डोस सारखे घरोघरी फिरुन आधार कार्ड, पॅन कार्ड फुकटात काढून दिले पाहिजेत.
पोलिओ डोस सारखे घरोघरी फिरुन
पोलिओ डोस सारखे घरोघरी फिरुन आधार कार्ड, पॅन कार्ड फुकटात काढून दिले पाहिजेत. >>>>>
सॉरी, पण अगदी राहवलंच नाही. डोळ्यांसमोर चित्र उभं राहीलं...
(No subject)
Right to Privacy a
Right to Privacy a Fundamental Right, Says Supreme Court in Unanimous Verdict
https://thewire.in/170303/supreme-court-aadhaar-right-to-privacy/
A nine-judge bench of the Supreme Court has ruled that Indians enjoy a fundamental right to privacy, that it is intrinsic to life and liberty and thus comes under Article 21 of the Indian constitution.
In declaring privacy to be a fundamental right, the Supreme Court has overruled verdicts given in the M.P. Sharma case in 1958 and the Kharak Singh case in 1961, both of which said that the right to privacy is not protected under the Indian constitution.
The petitioners, former Karnataka high court judge Justice K.S. Puttaswamy and others, had contended that the biometric data and iris scan that was being collected for issuing Aadhaar cards violated the citizen’s fundamental right to privacy as their personal data was not being protected and was vulnerable to exposure and misuse.
http://economictimes
http://economictimes.indiatimes.com/wealth/personal-finance-news/around-...
आधार येण्याआधीपासून डुप्लिकट pan शोधून रद्द करायचं काम चालू आहे. आधार बायोमेट्रिक असल्याने ते यूनिक असायला हवं( ते नाही का असं वरची बातमी वाचून वाटलं) .
आमच्या भागात मतदान ओळखपत्र घरोघर जाऊन करून दिलेली. त्यामुळे अगदी घरोघर नाही , तरी गल्लोगल्ली जाऊन आधार कँप लावणं अशक्य नाही. त्याला नेट सुविधा लागेल. अगदी सुरुवातीला शाळांत, बँकांत असे कँप लागले होते..
तरी गल्लोगल्ली जाऊन आधार कँप
तरी गल्लोगल्ली जाऊन आधार कँप लावणं अशक्य नाही. >>> +१
पॅन कार्ड साठी पणसुरुवातीला असे कँप घेऊन लॉट मधे पॅन कार्ड करुन दिली होती.
Pan card साठी? मीतरी नाही
Pan card साठी? मीतरी नाही ऐकलं..सुरुवातीला म्हणजे कधी? आधी आयकर विभाग स्वतः pan card इश्यू करी. मग १५-१६ वर्षांपूर्वी हे काम आउटसोर्स केले गेले. पण त्या संस्थेने camp लावले नाहीत. आता आणखी एक संस्थासुद्धा हे काम करते.
चला ऐकदाची ह्या आधार कार्डची
चला ऐकदाची ह्या आधार कार्डची सक्ती काढुन टाकली.
आता फंडामेंटल राईट्स खाली आधार कार्ड साठी लागणार्या बायोमेट्री माहीती देण्याचा नकाराधिकार आता नागरीकांना मिळालेला आहे. ह्या माहिती शिवाय आधार कार्ड देता येत नाही. जर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्डशी लिंक करता येणार नाही. पुढे पॅन कार्डची सक्ती सुद्धा काढुन टाकणे अपरीहार्य होईल.
आता नागरीकांना मोकळा श्वास घेता येईल !!
आधार व पँन कार्ड खाली किती
आधार व पँन कार्ड खाली किती कॅटेगरीज होतील !
१ ) पुर्ण बायोमेट्रीक माहीती सकट आधार कार्ड
२) पुर्ण बायोमेट्रीक माहीती शिवाय आधार कार्ड
३) आधार कार्ड नसलेले
४) पुर्ण बायोमेट्रीक माहीती सकट आधार कार्ड लिंक्ड पॅन कार्ड.
५) पुर्ण बायोमेट्रीक माहीती शिवाय आधार कार्ड लिंक्ड पॅन कार्ड.
६) पॅन कार्ड नसलेले
७) आधार व पॅन कार्ड नसलेले
अजुन तसे झालेले नाही. पण
अजुन तसे झालेले नाही. पण लवकरच ते व्हायला हवे.
Aadhaar-PAN linkage to continue: UIDAI CEO Ajay Bhushan Pandey
Thursday's Supreme Court "judgement has not said anything about the Aadhaar Act so the Aadhaar Act is a valid Act passed by the Parliament (and) is the law of the land," UIDAI CEO Ajay Bhushan said.
http://indianexpress.com/article/india/aadhaar-pan-linkage-to-continue-u...
http://www.indiatimes.com
http://www.indiatimes.com/news/india/thousands-of-original-aadhaar-cards...
Thousands Of Original Aadhaar Cards, Official Documents Found Mysteriously Dumped Near Alwar
The UIDAI has slapped notices
The UIDAI has slapped notices on Bharti Airtel and Airtel Payments Bank over its retailers allegedly opening payments bank accounts without taking "informed consent" of customers who go for Aadhaar-based mobile SIM verification.
The UIDAI in the notices stated that it has come to know that "Airtel retailers are allegedly opening Airtel payments Bank account at the time of performing Aadhaar e-KYC verification without informing the purpose of e-KYC and also without taking informed consent of the customer".
http://www.deccanchronicle.com/business/economy/210917/uidai-slaps-notic...
एअरटेल मधून फार मेसेजेस येत
एअरटेल मधून फार मेसेजेस येत आहेत आधार अपडेट करा म्हणून.. करावे की नाही?
आधारसाठी कोणी माबोकरणीने
आधारसाठी कोणी माबोकरणीने स्वतहचे नाव्, नवर्याचं नाव, लग्नापुर्वीचं आडनाव व शेवटी सासरचं आडनाव ह्या पॅटर्नमध्ये फॉर्म भरला होता का आणि असल्यास त्या पद्धतीने आधार कार्ड करु शकलात का? मला असे आधार कार्ड देण्यास नकार मिळाला म्हणून विचारत आहे..
आता कोणाला फोन लावला की
आता कोणाला फोन लावला की कनेक्ट व्हायच्या आधी जवळच्या मोबाईल केंद्रावर जाऊन आधार वेरिफिकेशन करुन घ्या असा ऑटोमेटेड व्हॉइस मेसेज येतोय. मजा म्हणजे माझे सर्व फोन नंबर हे आधारकार्ड देऊन घेतलेले आहेत. आता परत जाऊन तेच काम का करायचे हा मला प्रश्न पडलाय. कुणी म्हणेल की माझा नंबर मीच वापरतोय का हे कन्फर्म करत असतील. पण कशासाठी हा द्राविडी प्राणायम?
जेव्हा अतिरेकी आणि समाजकंटक मोबाईलचा गैरवापर करतात हे लक्षात आले तेव्हापासूनच हे गैरवापर रोखण्यासाठी नंबर देतांना बरेच प्रोटोकॉल, नियम निघाले. त्यानुसार कागदपत्रांशिवाय सिमकार्ड सहज मिळणे दुरापास्त झाले. (असे समजूया). एवढे स्ट्रिक्ट आहे की नंबर सुरु होण्याआधी वेरिफिकेशन कॉल येतो, आधीतर माणसे घरी येऊन तपासून जायची. म्हणजे मोबाईलच्या सुरक्षेशी संबंधित बरेच नियम आधीच अस्तित्वात आहेत. याचा अर्थ 'तुमच्या ग्राहकाला ओळखा' ही अट पूर्ण होऊनच नंबर मिळत आहेत गेले दहा वर्ष तरी.
मग आता हा आधार लिन्क करण्याचा काय फंडा आहे? काय गरज आहे? गरज असेल तर आधीच्या पद्धती दोषपूर्ण आहेत असे समजायचे का? दोषपूर्ण असतील तर मग दोषींवर कारवाई करायचे सोडून सामान्यांच्या खनपटीला बसण्याचा काय प्रकार आहे?
सरकारला इतकीच खाज आली असेल प्रत्येकाचा इ-केवायसी पूर्ण करुन घ्यायची तर माझे स्पष्ट म्हणणे आहे की प्रत्येक ग्राहकाच्या घरी स्वतः जाऊन ही प्रोसेस पूर्ण करुन घ्या तुमच्या खर्चाने. आमच्या मागे भुनभुन लावून सतावू नका.....
यापुढे जाऊन मी माझ्यापुरता निर्णय घेतला आहे की जर माझ्या घरी येऊन काय ती प्रक्रिया पूर्ण करणार नसतील तर मी कुठेही मोबाईल केंद्राफिंद्रात जाणार नाही. मोबाईल नंबर बंद झाला तरी चालेल.
अजून एक मजा म्हणजे जिओ चे नंबर आधार, केवायसी पूर्ण करुन, अंगठ्याचे स्कॅन घेऊनच मिळाले आहेत. त्यांनाही परत केवायसी पूर्ण करा म्हणून मेसेजेस येत आहेत. काय हरामखोरपणा आहे हा?
#सविनयकायदेभंग
अगोदर आधार लिंक केले असेल तर
अगोदर आधार लिंक केले असेल तर काहीही गरज नाही. तुम्ही आज लिंक करून आलात तरीही हे मेसेज येतच राहणार. आधार लिंकिंगचे काम किती जोरात चालू आहे ह्याचा शो ऑफ आहे हा सगळा.
अगोदर आधार लिंक केले असेल तर
अगोदर आधार लिंक केले असेल तर काहीही गरज नाही. तुम्ही आज लिंक करून आलात तरीही हे मेसेज येतच राहणार
>> मार्मिक, खासकरुन जिओ बद्दल आक्षेप आहे. मान्य आहे की काही कंपन्यांचे फोन नंबर्स हे कस्टमरला इशू करुन कदाचित १० वर्षे झाली असतील, तेव्हा त्यांचे परत वेरिफिकेशन करणे समजू ही शकतो. पण जिओ तर आत्ता मागच्या वर्षीच आले. तेही आधार व अंगठे स्कॅन करुनच सिम मिळालेत, तरीही असे मेसेज येत असतील तर ह्यामागे काहीतरी गडबड आहे असे वाटते. एवढी बंडलबाजी समजण्याच्या पलिकडे आहे.
मीही तेच म्हणतोय, जुने नंबर
मीही तेच म्हणतोय, जुने नंबर आधार लिंक केले तरी असे मेसेज येतच राहतात, मग ती कंपनी कोणतीही असो. वरून आदेशच तसे आले असणार. लोकांना आधार लिंक किती जोरात चालू आहे हे बिंबवायचे प्रयत्न चालू आहेत. सरकारी यंत्रणा अशा जाहिराती करता वापरली तर लोकं आता विश्वास ठेवत नाहीत. त्याकरता ही शक्कल लढवली आहे.
Owner of Aadhaar enrolment
Owner of Aadhaar enrolment agency arrested
http://www.thehindu.com/news/cities/bangalore/owner-of-aadhaar-enrolment...
अगोदर आधार लिंक केले असेल तर
अगोदर आधार लिंक केले असेल तर काहीही गरज नाही. तुम्ही आज लिंक करून आलात तरीही हे मेसेज येतच राहणार...
लोकांना आधार लिंक किती जोरात चालू आहे हे बिंबवायचे प्रयत्न चालू आहेत......
दुसऱ्या बाजूने या गोष्टीचा विचार करता, या मोबाईल कंपन्या 'आधार व्हेरिफिकेशन करा' असा मेसेज त्यांच्या सर्वच ग्राहकांना पाठवत असाव्यात. वर आणखी आपण चिडू नये म्हणून खाली एक प्रेमळ (!) विनंती केलेली असेल, 'Kindly ignore this message if you have done already'
(मला तरी आत्तापर्यंत संदेश न आल्याने अनुभव नाही)
आधार कार्डाच्या नावाने बोंब
आधार कार्डाच्या नावाने बोंब ठोकणार्यांसाठी...
बोंब ठोकणारे ते भाजपे हो,
बोंब ठोकणारे ते भाजपे हो, ज्या कारणासाठी काँग्रेस ने आधार आणले त्याच कारणांसाठी योग्य वापर होऊन पैसे वाचले ना? आधार हे सरकारी लाभ मिळणाऱ्यांसाठी आहे, तोच त्याचा मूळ उद्देश.
Pages