ब्लू व्हेल गेम ही रशियात उगम पावली आहे. त्यात टीनेजर मुलग्यांना विशेष करून टार्गेट केले जाते. एक एक चॅलेंजेस दिली जातात . ह्यात शरीरावर ब्लेडने कापणे सेल्फ हार्म व अशी चॅलेंजेस वाढत वाढत जाउन शेवटी खेळणार्या मुलाला आत्महत्या करायला उद्युक्त केले जाते. ते फायनल चॅलेंज. गेल्या महिन्यात मध्यप्रदेश, मुंबई, केरळ इथून आठवी नववी दहावीतील मुलग्यांच्या आत्महत्या काही प्रमाणा त ह्या गेम मुळे झाल्या आहेत असे लक्षात आले आहे व पोलीस तपास चालू आहे.
भारत सरकारने आता ही गेम बॅन केली आहे व सर्व मेजर वेब साइट्स ना त्या लिंक ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. हे एक चांगले पाउल आहे अश्राम व इमंप्रेशनेबल टीनेजर मुलग्यांच्या आत्महत्या वाचतील. जवळ पास ह्या वयाची मुले असल्यास त्यांना विश्वासात घेउन मोबाईल वर गेम आहे का ते बघा व त्याला न रागवता समुपदेशन करा
शाळेत समुपदेशन उपलब्ध नसेल तर तज्ञाकडे न्या. वागण्यावर लक्ष ठेवा फारसे एकटे सोडू नका. मुलगा डिप्रे स्ड आहे असे वाटल्यास त्याच्याशी ताबडतोब संवाद साधा .
हाता वर जे कट करायला सांगतात त्याची फाय नल आकृती व्हेल सारखी येते.
ह्या आड निड्या वयात असे काहीतरी साहस करावे असे मुलांना फार वाट्ते. ह्या गेम मुळे युरोपात ऑल रेडी १५० परेन्त मृत्यू /आत्महत्या झालेल्या आहेत. मुलांची प्रायव्हसी जपताना सुद्धा या बाबतीत पेरेंट ल इन्ट्रवेन्शन गरजेचे आहे.
अनुमोदन. १०० टक्के सहमत आहे.
अनुमोदन. १०० टक्के सहमत आहे.
असा काय गेम आहे हा? तसेच मुले
असा काय गेम आहे हा? तसेच मुले आत्महत्या करेपर्यंत आजुबाजुच्या कोणालाच कसे काही जाणवले नाही?
माझी पोष्ट जी मे ११ तारखेला
माझी पोष्ट जी मे ११ तारखेला वॉट्स अॅप च्या धाग्यावर टाकली होती
______________________________
सध्या वॉट्स.अपवर फिरत असलेला.मेसेज जो ईथे शेअर करावासा वाटतो
कितपत खरा आहे माहित नाही पण एका मुलाच्या सुसाईडची बातमी मटामध्ये वाचली होती.
______________________
तुमच्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांकडे ११ ते१९ वयोगटातील मुले जास्त इंटरनेट वापरत असतील तर त्यांना सावध करा..
Facebook.. Whatapp.. वर Blue Whale Game नावाची कोणी request केली तर accept करू नका..
कारण या Game मध्ये एकूण ५० task असतात.. शेवटच्या task मध्ये suicide करायचे असते..
पण तेव्हा तुम्ही सोडायचा विचार कराल तेव्हा hacker तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मारण्याची धमकी देतो..
एकदा का तुम्ही Game चालू केला की hacker तुमचा मोबाईल hack करतो त्यामुळे game बंद करता येत नाही..
५० task पूर्ण कराव्याच लागतात..
हा game Russia मध्ये बनला आहे..
या game मुळे रशिया मध्ये आत्ता पर्यंत १३० तर जगा मध्ये २५० जणांनी sucide केले आहे..
हा game भारता मध्ये ही launch झाला आहे..!!
त्यामुळे
!!!सावध राहा!!!
या game मूळे मुंबई मध्ये ही एका १४ वर्षा च्या मुलाने sucide केले आहे..!
फक्त वाचू नका.. कृपया खूप शेअर करा..
Submitted by VB on 11 August, 2017 - 23:01
___________________________________
परवा कुणीतरी वॉट्सॅपवर
परवा कुणीतरी वॉट्सॅपवर व्हिडीओ टाकला होता. भारतातला नव्हता पण जमिनीवर मुलगा/मुलगी आडवी पडलेली होती. काही लोकं कॅमेरे घेऊन बिल्डींगच्या वर फोकस करत होती. तिथून कुणीतरी उडी मारायच्या तयारीत होतं आणि व्हिडीओमध्ये मारलेली दिसली सुद्धा.
लोकांकडे व्हिडीओ शूट करायचा वेळ होता पण वरुन उडी मारलेल्याला थांबवायला वेळ नव्हता?
हा मी सकाळ वर वाचक या नावाने
हा मी सकाळ वर वाचक या नावाने लिहीलेला प्रतीसाद
विषय खूप ग्रिम आहे.
================================================================================================
'ब्लु व्हेल' हा निव्वळ गेम नाही जो अँड्रॉइड स्टोअर मधून ब्लॉक केला की प्रश्न मिटला
ब्लु व्हेल ही समाजातली प्रेताच्या टाळू वरील लोणी खाणारी अशी जात आहे जी सोशल मीडियावरून डिप्रेशन किंवा कमकुवत मने हेरून त्यांना इन्व्हाईट करते. अनेक वेगवेगळ्या व्हॉटसप ग्रुप वरून सिक्रेटली या गोष्टी होतात.
मुलांना 'मी मेल्यावर जगाला माझी किंमत कळेल' वाली जी एक भावना असते त्याचा खरंच त्यांना मरायला प्रवृत्त करायला वापर केला जातो.'थ्रिल' म्हणून किंवा 'जगाला माझी पर्वा नाही' या भावनेतून टीनेजर्स अशी चॅलेंज स्वीकारतात.एकदा स्वीकारल्यावर परत फिरल्यास कुटुंबाची माहिती हॅक केलेली आहे तुम्हाला त्रास देऊ अश्या धमक्या दिल्या जातात.स्वतःला जखम कापून काही लिहून फोटो पाठवणे वगैरे अघोरी टास्क असतात.एक प्रकारे दहशतवादी ग्रुप्स तरुण मनांना धर्मवेडे बनून माणसं मारायला ब्रेन वॉश करतात तसा हा प्रकार असतो.50 दिवसाच्या चॅलेंज मध्ये शेवटचा आठवडा मुलाचा बाहेरच्यांशी संपर्क तो स्वतःच्या इच्छेने तोडतो आणि 50 व्या दिवशी ब्लु व्हेल बनतो, म्हणजेच क्युरेटर ने दिलेल्या दिवशी आणि वेळी जीवन संपवतो.
निव्वळ गेम ब्लॉक करणे याने हे थांबणार नाहीये कारण मूळ कारभार सिक्रेट व्हॉटसप आणि फेसबुक ग्रुप्स ने चालतो.
काय करू शकता:
आपल्या मुलांच्या वागणुकीकडे लक्ष ठेवा(एक मित्र म्हणून, सी आय डी पोलीस स्टाइल मध्ये नाही)
एखाद्या शाळेत ऍडमिशन न मिळणे, एखाद्या युनिट टेस्ट मध्ये स्कोअर घसरणे म्हणजे पूर्ण आयुष्य वाया जाणे नाही हे स्वतःच्या वागणुकीतून पटवत राहा
प्रत्येक आईबाप मुलाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत.पण मुलाला बाहेर एक दोन जिवलग(नुसते फेसबुक इंस्टाग्राम लाईक्स पुरते नसलेले) मित्र आहेत का हे बघा.त्यांच्याशी चांगला संपर्क, ओळख जमेल तशी ठेवा
मूल खोलीचं दार बराच वेळ बंद करून काय करतंय याकडे लक्ष ठेवा.ओपन डोअर कल्चर स्वतः आणि मुलांना सवय लावा.(सारखे नाक खुपसत न राहता)
मूल मोबाईल वरून घरी कोणाशीच बोलत नाही, तितक्या साठी बाहेर जातं असं असल्यास थोडे सावध व्हा.
अचानक फुल स्लीव्ह चे कपडे चालू करणे किंवा घरात बर्म्युडा घालणे बंद अश्या स्टेप लक्षात आल्यास कॅज्युअली विचारा.
मुळात एक चांगलं आनंदी वातावरण शाळेत आणि घरात ठेवा.मुलाला शाळेत बुलीइंग चा त्रास आहे का यावर थोडे लक्ष ठेवा.आपल्याला तश्या हिंट मिळत असतात.
'कोल्ड टर्की' म्हणजे आता तुझा फोन बंद टीव्ही बंद नेट बंद लॅपटॉप बंद असे एकदम करू नका.त्या पेक्षा मूल आपल्याशी शेअर करेल यावर भर द्या.
सोशल मीडिया वर लिहिणे, दहशतवादी साईट, स्पॅमवेअर, फिशिंग साईट यातले धोके समजावून द्या.विशिष्ठ वयात पॉर्न साईट बघाव्या वाटणे चुकीचे नाही हे सांगा पण या साईट वर असलेले धोकेही समजावून द्या.सोशल मीडियावर परमिशन्स आणि ऍक्सेस पब्लिक न ठेवता नीट रिस्ट्रिक्ट कसा करायचा शिकवा.अनोळखी व्यक्तींशी अती माहिती शेअर करणे किंवा इंटरनेट किंवा डेटिंग साईट ओळखी वर एखाद्याला भेटणे यातले धोके प्रिकोशन्स समजावून द्या
बेड्या घालण्या पेक्षा पोर इंफॉर्मड डिसीजन्स घेईल या योग्यतेचे बनवा.
(हे सर्व सल्ला या सुरात नसून काय काय करता येईल थिंकिंग अलाउड सुरात लीहीले आहे.मलाही मूल आहे.वेळ कोणाही मुलावर येऊ शकते.पालकांची चूक म्हणून जज करण्यापेक्षा काय करता येऊ शकतं याचा विचार जास्त महत्वाचा.)
================================================================================================
उपयुक्त धागा...
उपयुक्त धागा...
व्हॉट्स अॅप वर वाचलेलं याबद्दल..वाचुनच सुन्न झालेली...
Law & order SVU मध्ये एक भाग
Law & order SVU मध्ये एक भाग झाला ह्यावर.
मी अनु छान पोस्ट.
मी अनु छान पोस्ट.
पण मला अजूनही एक कोडं नीट उलगडलं नाही ते म्हणजे, मोबाईल हॅक होतो आणि गेम मध्येच बंद करता येत नाही म्हणजे नक्की होतं काय?
आणि हा गेम म्हणजे शेवटी तुम्ही आत्महत्या करायची म्हणजे तुम्ही जिंकलात. असं असेल तर एखाद्या कमकुवत नसणार्या व्यक्तिने सुद्धा हा गेम खेळला तर तो शेवटी आत्महत्या करणारच ना? म्हणजे एकूणात फक्त कमकुवत लोकांना मारणे हा हेतू नसून, जास्तीत जास्त लोकांना मारणे हा हेतू दिसतोय या गेम चा.
https://www.higgypop.com/news
https://www.higgypop.com/news/blue-whale-challenge/#comments
http://gadgets.ndtv.com/social-networking/features/blue-whale-challenge-...
(वाचणार्या कोणालाही: ही माहिती म्हणजे कोणत्याही प्रकारची जाहीरात/प्रमोशन्/प्रलोभन नाही.'एकदा शोधून क्लिक करुन खेळून पाहुया' वाल्या गमती करण्यासारखा/पैजा लावण्यासारखा हा प्रकार नाही.फोन चा डाटा/पैसे/कॉन्टक्ट्स्/जीव्/सायबर सेल कडून ट्रॅकिंग यापैकी एक किंवा अधिक गोष्टी होऊ शकतात.विष कसं असतं याची चांगली माहिती घ्यायला ते खाऊन बघू नका.)
एक नवीन केस..
एक नवीन केस..
https://in.news.yahoo.com/blue-whale-challenge-allegedly-claims-20054229...
मी_अनु ह्यांचा प्रतिसाद आवडला
मी_अनु ह्यांचा प्रतिसाद आवडला. आपल्या पाल्याची काळजी घेणे हेच केवळ आपल्या हातात आहे.
मुलांना सावध करायला म्हणून
मुलांना सावध करायला म्हणून सुद्धा ह्या गेमचे नाव सांगायला नको. एखादी गोष्ट करु नको असं सांगितलं की नक्की काय करायचे नाही ते तपासून बघण्याकडे कल असतो.
बाकी गंमत म्हणून त्यांचं multi media device (जर वेगळं असेल तर) आपण हातात घेऊन बघू शकतो कोणकोणते गेम्स खेळतात.
मी अनु चे पोस्ट चांगले आहे.
मी अनु चे पोस्ट चांगले आहे.
मध्यंतरी इथे १३ रीझन्स व्हाय नावाची नेटफ्लिक्स सिरीज अशीच वादात सापडली होती.
ती बघून काही टीन्स नी आत्महत्या केल्या. त्यानंतर इथल्या शाळांनी पालकांना सावध करणार्या ईमेल्स पाठवल्या तेव्हा आम्हाला अशी काही सीरीज आहे ते समजले. मी मुलीला विचारलं तर तिने आणि तिच्या मैत्रिणींनी ती कध्धीच पाहिली असे सांगितले!
जागरुक पालक असतील तर असे प्रकार रोखणे सहज शक्य आहे. आपल्या पाल्याकडे नुस्ते लक्ष हवे इतकेच नव्हे तर पाल्यामधे एकूण पॉझिटिविटी , सेल्फ रिस्पेक्ट , सेल्फ एस्टीम निर्माण करणे हे पालकांचे काम आहे.
मी अनु, लिंक वाचली
मी अनु, लिंक वाचली
भयंकर आहे सगळं..
पण आता तो गेम डेव्हलप केलेला माणूस अटक झालाय ना? मग हा गेम अजूनही सुरू आहे?
बरं झाले बॅन केले.
बरं झाले बॅन केले.
पण ही कदाचित सुरुवातही असेल अश्या गेम्सची..
आपण आपल्या पोरांना जपणे हाच सर्वोत्तम उपाय..
धाग्याबद्दल धन्यवाद..
प्रत्येक आईबापाला या गेम बद्दल समजायला हवे.
त्यानिमित्ताने ओवरऑलच काळजी घेतली जाईल. मुलांच्या निरोगी शरीरासाठी आपण बरेच काही करतो. थोडे निरोगी मनासाठीही केले जाईल..
वाईट गोष्टी पटकन कॅच होतात,
वाईट गोष्टी पटकन कॅच होतात, अतीशय श्रद्धेने त्या लॉजिक च्या फॉलोवर्स कडून पुढे नेल्या जातात.
फक्त वाईट आयडिया द्यायची खोटि, लगेच जगभरात त्याचा प्रसार होतो.
चांगल्या गोष्टीना पब्लिक आणि मिडिया टि आर पी कमी आणि श्रम जास्त त्यामुळे चांगल्या गोष्टी अगदी कमी पसरतात.
हा व असे गेम्स बॅन केलेच
हा व असे गेम्स बॅन केलेच पाहिजेत. पण या गेममुळे आणखी एक धोका दिसत आहे. जर हा असा गेम मुलांच्या विचारप्रक्रियेवर घाला घालुन त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करु शकत असेल तर तो इतरांच्या हत्येलादेखिल सहजपणे प्रवृत्त करु शकेल. अतिरेकी विचरसरणीच्या संघटना याचा गैरफायदा घेऊन समजविघातक गोष्टी घडवु शकतात
thirteen reasons why आणि end
thirteen reasons why आणि end of watch हि पुस्तकं आठवली.
बादवे एक दुजे के लिये चित्रपटानंतर आत्महत्या करणाऱ्या प्रेमींची लाट आलेली, डर चित्रपटानंतर छातीवर ब्लेडने नाव कोरणाऱ्यांची आणि साथिया चित्रपटानंतर लग्न करून आपापल्या घरी राहणाऱ्यांची, कभी अलविदा ना केहनानंतर विबासं कर्णऱ्याची... हे आपलं असाच आठवलं....
समयोचित आणि जनजागृती करणारा
समयोचित आणि जनजागृती करणारा लेख,
अमा आणि मी_अनु, धन्यवाद!
अनु, चांगली पोस्ट
अनु, चांगली पोस्ट
मी-अनु ,
मी-अनु ,
तुमच्या आत्तापर्यंतच्या happy गो लकी प्रतिमेशी (चांगल्या अर्थाने) विसंगत असले तरी सगळे छान प्रतिसाद
धागा वर काढला आहे. वाड्या
धागा वर काढला आहे. वाड्या वरच्या चर्चेच्या अनु शंगाने.
असा गेम मुलांच्या
असा गेम मुलांच्या विचारप्रक्रियेवर घाला घालुन त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करु शकत असेल तर तो इतरांच्या हत्येलादेखिल सहजपणे प्रवृत्त करु शकेल. अतिरेकी विचरसरणीच्या संघटना याचा गैरफायदा घेऊन समजविघातक गोष्टी घडवु शकतात >>
सोशल मिडिया माध्यमं येण्यापूर्वीपासून अनेक शतकं ब्रेनवॉशिंग चालू आहे .. वेगवेगळ्या प्रकारचं , वेगवेगळ्या ग्रूप्स कडून . आणि त्याला फक्त टीनेजर्स नाही तर चांगली 70 - 100 वय वर्षं वयोगटातील माणसं बळी पडलेली दिसतात . फक्त त्यांचं वय जास्त आहे म्हणून ते त्यांचं साधकबाधक विचारातून आलेलं मत आहे असं मानायचं का .. 100 हिंसेच्या घटनांतून जेव्हा 1 वेगळ्या धर्माच्या व्यक्तीने केलेल्या हिंसेची घटना जेव्हा फ्रंट पेजवर मोठ्या अक्षरात छापतात , उरलेल्या 98 कडे दुर्लक्ष आणि 1 कुठेतरी छोट्या कोपऱ्यात , असं वर्षानुवर्ष चालवलं जातं ... ते बघून , जुनी जुनी प्रकरणं सतत उकरून काढून तापलेली ठेवली जातात , अमुक सिनेमा बघाच असा आग्रह पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती स्वतः जातीने करते .. आणि चांगले उच्चशिक्षित लोक त्याला सहजरीत्या स्वतःचे विचार म्हणून छाती ठोकून सांगतात , जन्मभर मनात तिरस्कार, पूर्वग्रह बाळगूनच जगतात आणि मरतात .. हे त्यांना ब्रेनवॉशिंग वगैरे वाटत नाही .
आणखी वेगळ्या प्रकारचं ब्रेनवॉशिंग - अफगाणिस्तानच्या एका बाजारपेठेचा एक व्हिडिओ पाहिला नुकताच , नावाला कुठे एखादी बाई काही भाजी / पदार्थ विकताना दिसली नाही . पुरुष हसतखेळत मजेत होते .. एकाची प्रामाणिक कमेंट - सामाजिक आरोग्यासाठी म्हणजे अनैतिक संबंध होऊ नयेत म्हणून स्त्रियांनी आपले व्यवहार वेगळे केलेलेच चांगले , त्यांनी जरूर शिकावं , बिझनेस करायचा तर बिझनेस करावा , जॉब करावा ... फक्त स्त्रियांसोबत ... तरच सामाजिक आरोग्य टिकून राहील . अशा कमेंटला तुम्ही उत्तर देऊ शकता पण त्यांचे ठाम विचार बदलू शकत नाही तेव्हा ते व्यर्थ श्रम होतात बाकी काही नाही ...
जग फार अवाढव्य आहे , अनंत व्यवहार या छोट्याशा ग्रहावर चालू आहेत , त्यामानाने आपली शक्ती फारच मर्यादित आहे ... चिमणीने समुद्र चोचीने रिकामी करायला जाण्यासारखं .. बघावं , जे काही आपल्या इवल्या ताकतीत होण्यासारखं आहे तेवढं करावं ... जसं या ब्लू व्हेलच्या बाबतीत जनजागृतीने निश्चितच फरक पडेल , बाकीच्या प्रकारांमध्येही पडेलच .. समाजसुधारकांनी तेच केलं आहे ... ज्योतिबा , सावित्रीबाई , राजा राममोहन रॉय , शाहू महाराज ... म्हटलं तर अल्पशक्ती मनुष्यच पण किती मोठं कार्य केलं .. असे ईश्वरी बळ प्राप्त असलेले लोक आणखी निर्माण होतील आणि सध्या काळीकुट्ट वाटणारी परिस्थितीही बदलतील , अनेकजण काम करत आहेत .. आपल्याच्याने होईल तेवढा खारीचा वाटा आपणही उचलावा .
हा भयंकर अमानवी गेम काढणार्
हा भयंकर अमानवी गेम काढणार्या व्यक्तीलाच शिक्षा व्हायला हवी. फ्रीडम ऑफ स्पीच अन कृती अन यंव न ट्यंव तोवरच जोवर दुसर्याला हानी पोचत नाही.