Submitted by कुमार१ on 5 August, 2017 - 02:23
लठ्ठपणा ही ही सध्या जगभर भेडसावणारी समस्या आहे. त्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर सतत संशोधन होत असते. अलीकडे एक मजेदार संशोधन वाचले. काही स्थूल व्यक्तींना अति गोड खाण्याची सवय असते. त्याची काही कारणे आहेत त्यात अजून एकाची आता भर पडली आहे.
आपल्या जिभेवर निरनिराळ्या चवींचे ज्ञान देणाऱ्या ‘चव-कलिका’ (taste buds) असतात. काही स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्याला तृप्ती आणि आनंदाची भावना होते. पण जर त्या कलिका मंद असतील तर ती भावना लवकर होतच नाही. त्यामुळे अशी व्यक्ती ही प्रमाणाबाहेर गोड खाऊ लागते. परिणामी वजन वाढत जाते.
अशा व्यक्तीच्या बाबतीत तिचा हा ‘खादाडपणा’ हा या कारणामुळे तिच्या अनिच्छेने होतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशा लोकांनी काय करावं?
अशा लोकांनी काय करावं?
आपली 'गोडाची चव' गेलेली आहे
आपली 'गोडाची चव' गेलेली आहे असे समजून ते जाणीवपूर्वक कमी खावे. तसेही गोड न खाणे त्यांना फायद्याचेच.
<<<< आपल्या जिभेवर
<<<< आपल्या जिभेवर निरनिराळ्या चवींचे ज्ञान देणाऱ्या ‘चव-कलिका’ (taste buds) असतात. काही स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. >>>>>>
जिभेवर वेगवेगळ्या कारणाने कोटींग जमलेल असत आणी त्यामुळे तोंडाची चव जाणे , पदार्थांची चव न कळणे असे प्रकार घडतात !
जिभेच्या व वासाच्या सेंसेशन ने तोंडात लाळ तयार होते. लाळ तयार होणे ही पचनाची पहीली पायरी आहे अस म्हंटल जात. जर ही पायरी व्यवस्थीत पार पाडली गेली नाही तर पचन व्यवस्थीत होत नाही.
ह्या समस्येवर आपल्या जेव़णाच्या पद्धतीत काही खास पदार्थ घातले गेलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची ही मुद्दाम जेवणात घेतली जातात. नुसत्या लोणाच्याच्या आठवणीने तोंडात लाळ तयार होते. जर जिभेवर पांढरा लेयर दिसत असेल तर लोणच्याची फोड, आमसुल किंवा नुस्ता लिंबु तोंडात घोळाल्याने जिभ स्वच्छ होते असा अनुभव आहे.
त्यामुळे गोडधोडाच्या जेवणात, लोणची, चटण्या, तिखट अवश्य असत, काही लोक लोणच्यांना तेलकट असतात त्यात कॅलॉस्ट्रोल आहे अश्या कारणा खाली दुर सारतात, पण त्यामुळे किती तोटा होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.
जिभेवर वेगवेगळ्या कारणाने
जिभेवर वेगवेगळ्या कारणाने कोटींग जमलेल असत आणी त्यामुळे तोंडाची चव जाणे , पदार्थांची चव न कळणे असे प्रकार घडतात ! >>>> हा प्रकार तोंडाचे आरोग्य नीट न राखल्याने होतो
आणि
स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. >> याचे कारण पूर्ण वेगळे आहे. ते जनुकांशी संबंधित असू शकेल. अधिक संशोधन चालू आहे.
तेव्हा, वरील दोन्हीची गल्लत नको
कुमार१ ,
कुमार१ ,
लक्षात आणल्याबद्दल धन्यवाद !
Self restriction व्यतिरीक्त काही उपाय आहे का ?
नाही, तोच उपाय महत्वाचा .
नाही, तोच उपाय महत्वाचा .
नवीन माहिती मिळाली. चव कलिका
नवीन माहिती मिळाली. चव कलिका हा मराठी शब्द देखील नव्याने समजला.
चव कलिका - टेस्ट बड्स चं
चव कलिका - टेस्ट बड्स चं भाषांतर आहे ते.
रुचि कलिका हा शालेय पुस्तकात
रुचि कलिका हा शालेय पुस्तकात वापरलेला शब्द आहे.
रुचिज्ञान कलिका असा आठवतोय
रुचिज्ञान कलिका असा आठवतोय
जाऊद्या, आपण मराठीत त्याला
जाऊद्या, आपण मराठीत त्याला 'चवकळी' म्हणूया .☺
'चवकळी'!!! वा:!! मस्तं!!
'चवकळी'!!! वा:!! मस्तं!!
मला सिंजी यांचा खालील लेख आठवला
https://www.maayboli.com/node/62039
सचिन, तो लेख वाचला. चांगला
सचिन, तो लेख वाचला. चांगला आहे.
आभार
डॉक्टर, काही दिवसांपूर्वी
संपादित
र आ,
र आ,
मेथीसारख्या वनस्पतिजन्य उपचारांबाबत माझा कोणत्याही अभ्यास वा अनुभव नाही.
संबंधित तज्ञ तुम्हाला सल्ला देऊ शकतील.
उत्तम आरोग्य शुभेच्छा !
एक दोन महिन्या पूर्वी मला
एक दोन महिन्या पूर्वी मला विचित्र अनुभव आला होता.म्हणजे अन्न गिळताना शेवटच्या क्षणी त्याची कडू लागायचो.
.
पहिल्या वेळी वाटले राई जास्त पडली असेल फोडणीत,पण तसे काही नव्हते.
मी खूप लक्ष देवून अन्न बघितले तर गिळताना कडू चव जाणवत होती.
दोनतीन दिवसांनी तो प्रकार आपोआप बंद झाला.
विचित्र आहे खरा !
विचित्र आहे खरा !
विचित्र आहे पण खरा अनुभव आहे
विचित्र आहे पण खरा अनुभव आहे.कहर म्हणजे गोड पदार्थ पण गिळताना कडवट लागायचे.
मी प्रयोग म्हणून गोड पण खावून बघितले.
खरेच विचित्र अनुभव होता.
न्न गिळताना शेवटच्या क्षणी
न्न गिळताना शेवटच्या क्षणी त्याची कडू लागायचो. >> हेमंत तेंव्हा अॅसिडिटी वाढली होती का पहा.. मला पित्त खुप वाढलेले असेल तर असा अनुभव येतो. कडूपित्त.. आम्लपित्त नाही.
मला पण तीच शंका आहे
मला पण तीच शंका आहे