बाजरीच्या पीठाचे गोड दिवे

Submitted by मनीमोहोर on 27 July, 2017 - 15:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आषाढ अमावस्या ही हल्ली जास्त करून श्रावण महिन्याची पूर्व संध्या म्हणून 'गटारी' या नावाने ओळखली जाते पण हीला खरं तर 'दिव्यांची अमावस्या' असं म्हटलं जातं . ह्या दिवशी दिव्यांची पूजा करतात . आषाढातला धुवाधार पाऊस, भर दिवसा भरून आलेली काळोखी, अपुरा प्रकाश अशा वातावरणात दीप पूजन करण्याची , दिव्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा खरोखरच कौतुकास्पद आहे . ह्या दिवशीचा नैवेद्य ही 'दिवे' हाच असतो . दरवर्षी मी कणकेचे दिवे करते पण ह्या वर्षी घरच्या बाजरीचं ताजं पीठ घरात होतं म्हणून बाजरीचे केले . ते चवीला खूपच सुंदर झाले होते म्हणून कृती लिहीत आहे . कृती खूपच सोपी आहे .

साहित्य : बाजरीचं पीठ एक वाटी , गूळ बारीक चिरून एक वाटी पेक्षा थोडा कमी , तेल एक चमचा, चिमूटभर मीठ, आणि दूध

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका बोल मध्ये दूध सोडून इतर सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यावेत . नंतर त्यात दूध मिसळून आपण पोळ्याना भिजवतो तसे पीठ भिजवावे . नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्यांना फोटोत दाखवल्या प्रमाणे दिव्याचा आकार द्यावा . चाळणीला तेलाचा हात लावून त्यात हे सर्व दिवे ठेवावेत आणि कुकर ची शिट्टी काढून दहा ते पंधरा मिनिटं वाफवावेत . बाजरीचे गोड दिवे तयार आहेत.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार प्रत्येकी
अधिक टिपा: 

१ ) पीठ भिजवायला दूधच वापरावे. पाणी नको. दुधाने खुसखुशीत आणि हलके होतात. पीठ जुनं असेल, विरी गेलेली असेल तर दूध थोडं गरम करुन घ्यावे .
2) दिवे करताना पिठाची गोळी अंगठ्याने दाबुन तिला उभट खोलगट आकार द्यावा आणि मग त्याच आकारात मोठी करावी म्हणजे दिवे सुंदर आकाराचे होतात . पसरट होत नाहीत .
3) हे अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट होतात . गूळ आणि बाजरीची एकत्रित चव फारच छान लागते .
4) खाताना ह्यावर तूप घेतले तर चव अजून खुलते .
5) मुलांना डब्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी हा एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे .
6) कोणी पाव्हणे येणार असतील तर गोड म्हणून ही हे करता येतील .
7) मी कडेला घातलेली मुरड ऐच्छिक आहे , जमत नसेल तर नाही घातली तरी चालेल .
8) ग्लूटेन फ्री डाएट साठी हे नक्कीच चालतील .

हा फोटो
IMG_20170723_125213.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो,
दरवर्षी घरी कणकेचे दिवे बनतात. त्यात भरपूर तुप घालुन खातो. आता हा प्रकार करून बघायला सांगतो. खाल्यावर रिप्लाय देईन.

माझी आई कणकेचे दिवे गूळ घालून करते दिवेआवस म्हणतात आमच्याकडे.

ते असे बनवते, आणि किचनमध्ये, वगैरे लावते.
http://4.bp.blogspot.com/-ooUOCYSJ5uA/VBqYemAYYeI/AAAAAAAAET4/y5S_Efzey4...

ऋन्मेष, chinnu, जिज्ञासा, पाथफाईंडर,दीपा जोशी, आ. रा.रा. , झंपी, अदिती धन्यवाद प्रतिसादासाठी .

यात दही भरून खायला मस्त लागते. >> हे माहीत नव्हते आम्ही तुपच घेतो. दही ट्राय करून बघितले पाहिजे .

झंपी, अदिती तसा तर आकार बदलल्याने चवीत काही फरक पडणार नाही . अगदी छोट्या छोट्या टिक्की ही करता येतील पण दीप पूजनाचा प्रसाद म्हणून आकार दिव्याचा करत असतील .

झंपी लिंक मधले दिवे पण सुंदरच दिसतायत .

दिव्याच शेप करण्यामागे काही कारण आहे का?>> तयार दिव्यावर साजुक तुप घातले तर होल्ड व्यवस्थित होवुन आत पर्यत मुरेल, चव चान्गली लागेल... फोटो आणि क्रुती छान! हे दिवे मामाकडे खाल्ल्याचे आठवते. घरी ही पध्हत नाही, लक्ष्मिपुजन का पाडव्याला सकाळी असे कणकेचे दिवे करुन आइ घरातल्या पुरषा मन्डळिना ओवाळायची हे आठवतय.

मस्तच ! आमच्या कडे कणकेचे असे दिवे व्हायचे. बाजरीचे मात्र आजी स्वतः भरड दळून नुसते दिवे करायची मग खाताना त्यावर गूळ आणि दूध घ्यायचो. Happy

ऋ , बाजरीचे दिवे पेटले तर पेटले नाहीतर पोटात टाकले .>> सही आहे हे .
प्राजक्ता , बरोबर आहे तुझा मुद्दा .
धनि वरून दूध गूळ घ्यायची आयडिया पण मस्त आहे .
आवडी प्रमाणे गोड करता येईल प्रत्येकाला . आजी घरी दळायची .. मस्त .
बाबू , गोड कमी वाटलं तर गूळ / साखर घालता येईल . प्रश्न आहे तो चांगला स्वच्छ ठिकाणचा रस मिळण्याचा . रसाच्या इथे गोडीमुळे माशा असतातच .
पद्मावती थँक्स .
सगळ्यांच्या दिव्यां च्या आठवणी मस्त .

खूपच सुंदर दिसतायत दिवे. घरात बाजरी पीठ नाहीये पण असेल तेव्हा करून बघेन नक्की. लहान मुलांना आवडेल खास असं वाटतंय.

https://www.facebook.com/705601569/posts/10158472039556570/

आज फेसबुक वर सर्फ करताना हे मिळालं. एकदा नेट वर लिहिलं आपण की अक्षरशः कृष्णापर्णमस्तु ! किती साम्य आहे लिखाणात , निदान उल्लेख तरी करायचा होता नावाचा

ममो, मासिकामधला असेल तर मार्मिकला एक पत्र लिहा आणि त्यांना सांगा तसे. नुसतेच नेट वरचे नाही दिसत छापिल गोष्ट दिसते आहे.

ममो, मासिकामधला असेल तर मार्मिकला एक पत्र लिहा आणि त्यांना सांगा तसे. नुसतेच नेट वरचे नाही दिसत छापिल गोष्ट दिसते आहे. >> लिहू म्हणताय का , धन्यवाद धनि, बरोबरे ,मार्मिक ला लिहून ठेवते तरी ...

हे असे लोक आहेत म्हणून गेंडासंवर्धन करावे लागत नाही फार भारतात. लै च गेंड्याची कातडी लागते असले प्रकार करायला.... मी काय म्हणते चान्स आहे मुन्नाभाई व्हायचा... मार्मिकला सांगण्यापेक्षा जरा तो दिव्याच्या मुरडचा फोटो डकव तिच्या फेबु पोस्टखाली - "हे राहिले, घे!!" Wink Lol

खरंच संतापजनक!
दिवे छान आहेत, हे सांगायचं राहीलं बघ ह्या चिडाचिडीत
सी Lol

थॅंक्यु सगळ्यांना. तिच्या वॉल वर माबो ची लिंक डकवली आणि लिहिलं मला निदान विचारायचं तरी होतंस. इथल्या जाईने तिथे निषेध ही नोंदवला लगेच. मी तिला थॅंक्यु लिहिणार ही होते पण पाच मिनिटात लिंक डिलीट केली गेली असं वाटतंय. अर्थात खरंच डिलीट केलीय की मलाच ब्लॉक केलंय ते माहीत नाही. आता तर तिची profile ही दिसत नाहीये मला. असो. जाई स्पेशल थॅंक्यु तुला.

तुम्ही सगळयांनी सांगितलंत म्हणून सुचलं मला तिथे लिहायचं नाहीतर मी काही केलं नसतं. पण उपयोग झाला म्हणून छान वाटतय.

आता मार्मिक ला ही लिहिते दोन दिवसांत.

प्रोफाईल दिसते आहे तिची पण लेख काढून टाकला आहे. योग्य पहिली पायरी. त्या पब्लिश्ड ऑथर (प्रस्थापित लेखिका) असाव्यात. त्यांनी आपणहून मार्मिकला कळवले नि लेख विथड्रॉ केला तर अधिक साजरं.

Pages