भाऊचे "डन किर्क" सिनेमाचे अफलातून परीक्षण

Submitted by सखा. on 29 July, 2017 - 23:34

मी: काय भाऊ इंग्रजी शिनेमा पहिला म्हणे?
भाऊ: हौ ना राव!
मी: काय नाव?
भाऊ: डंका तीर्थ
मी: अब्बा
भाऊ: हौ
मी: काय स्टोरी?
भाऊ: एक सैनिक असते लै चाब्रा दाखवले त्याला
मी: कामून चाब्रा म्हणते तेला?
भाऊ: बाकीचे सैनिक लायनीत घरी जायला उभे तर ह्यो पठ्ठा आयडियाने जवा तवा बँकेतल्या लाईनी सारखं शॉर्टकट मारायला बघतो
मी: मंग?
भाऊ: येते मंग ते जवा तवा अडचणीत ... पण नशीब बघा .. वाचतेच ते मरता मरता...
मी: असं अजून काय दाखवले?
भाऊ: अन एक पायलट बाबा अख्खा सिनेमा आकाशात कोलांट्या मारीत दुसऱ्या विमानावर गोळ्या धडा धडा मारते...
मी: अरे बापरे मग?
भाऊ: मग काय शेवटी पेट्रोल संपतंय विमानातलं
मी: आं?
भाऊ: हौ .. जुन्या काळातला सिनेमा है... टाक्या छोट्या व्हत्या विमानाच्या तेव्हा...
मी: हो ते पण आहेच भाऊ अजून काय होते सिनेमात
भाऊ: बाकी काहीच नाही हेच आलटून पालटून दाखवले दोन तास.
मी: दिगदर्शकाला काही संदेश
भाऊ- मला एव्हढेच म्हणायचे आहे .. बॉम्ब गोळ्याचे आवाज जरा कमी ठेवा ..एखादे आयटम सॉंग टाका... आन आता एव्हढा खर्च केलाच आहे तर त्या म्हाताऱ्या बोटवाल्या च्या बोटीत एखादी चांगली हॉट आयटम ठेवा .Dunkirk.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

डंका तीर्थ.. Biggrin

मस्त. पण लवकर संपवलत. जरा अजून मोठं परिक्षण हवं होतं. अचानक संपल्यासारखं झालं.