Submitted by जव्हेरगंज on 19 May, 2016 - 02:26
लय जोरात पिकल्यात आंबं
मी चाखुन बघतोय थांबं
या पावसाच्या रानात
सखे तु होशील चिंब
या केळीचा उनाड बांबू
पपईला देतोय टेकू
या पपईचा मधाळ रस
सखे तु दे मला चाखू
हा डाळींबाचा दाणा
लालभडक आणि छान
पाहुन या डोळ्यांनी
झालोय मी बेभान
या राना शिवारात
लय जोपासल्याती झाडं
या कसलेल्या बाहुंनी
त्यांचा केलाय लाडं
ही झाडं फुलं पानं
ही हवाही झालीय धुंद
या हिरव्या झाडखाली
सखे तु होशील चिंब
लय जोरात पिकल्यात आंबं
मी चाखुन बघतोय थांबं
या पावसाच्या रानात
सखे तु होशील चिंब
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंबं उच्चार वाचून कोल्हापूर
आंबं उच्चार वाचून कोल्हापूर आठवलं
दादा कोंडकेंची आठवण आली.
दादा कोंडकेंची आठवण आली.
दादा कोंडकेंची आठवण आली.
दादा कोंडकेंची आठवण आली. +१
ते असते तर त्यांनी नक्की हे गाणं त्यांच्या सिनेमात घेतलं असतं.
दादा कोंडकेंची आठवण आली.
दादा कोंडकेंची आठवण आली. +१
ते असते तर त्यांनी नक्की हे गाणं त्यांच्या सिनेमात घेतलं असतं. >>>>> +१
दादा कोंडकेंची आठवण आली.
दादा कोंडकेंची आठवण आली.
ते असते तर त्यांनी नक्की हे गाणं त्यांच्या सिनेमात घेतलं असतं. >> नक्की
दादा कोंडकेंची आठवण आली. +१
दादा कोंडकेंची आठवण आली. +१
ते असते तर त्यांनी नक्की हे गाणं त्यांच्या सिनेमात घेतलं असतं. >>>>> +१११
लय भारी. आंब्याचे खरे पारखी
लय भारी. आंब्याचे खरे पारखी आहात