Submitted by र।हुल on 20 July, 2017 - 12:54
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥धृ॥
शब्दांचे मौक्तिक चोहिकडे विखरावे..
लेखणीमधुनी भावतरंगांचे भरते यावे ॥१॥
या शब्दलतिकांची ऐसी गुंफण व्हावी
वितानी सप्तरंगांची देखणी माला मिरवावी
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥२॥
ह्या काव्यसुमनांची ऐसी उधळण व्हावी
तृण पातांवरी जलबिंदूंची शिंपण व्हावी
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥३॥
या स्वैर विचारांचे ऐसे बंधन व्हावे
रंगीन छटांचे काव्यखंड निर्माण व्हावे
या शब्दप्रपाता असला बहर यावा
निर्झर तो उंचावरूनी धबाबा कोसळावा ॥४॥
―₹!हुल /२०.०७.१७
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह, छान...
वाह, छान...
वाह उस्ताद
वाह उस्ताद
व्वा! अप्रतिम!
व्वा! अप्रतिम!
छान...
छान...
शिवाजी सांगळे सरजी, च्रप्स,
शिवाजी सांगळे सरजी, च्रप्स, सायु, समाधानी प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार...
छान ....
छान ....
दुसरे कडवे " विणताना " म्हणावयाचे का ?
धन्यवाद सर..
धन्यवाद सर..
हो गुंफण– गुंफणे/विणणे ह्या अर्थानं वापरलेला शब्द..
पहील्या कडव्यात, शब्द आहेत..
दुसर्या कडव्यात,शब्दलतिकांची गुंफण- ओळींची निर्मिती..
तिसर्या मध्ये पुर्ण काव्य तयार होणे तर शेवटच्यात मनातील विचारांना अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त होण्याची अपेक्षा...
राहुल ,
राहुल ,
छान विवेचन ! धन्यवाद . मला काहीतरी शिकायला मिळाले . आपण " विताना " असे लिहिले होते म्हणून . कृपया गैरसमज नसवा .
सर, वितान-आकाश म्हणून विताना
सर, वितान-आकाश म्हणून विताना-आकाशी किंवा आकाशात ह्या अर्थानं केलेला शब्दप्रयोग..
गैरसमज नाहीच.. उलट काही चुकलं असेल तर नक्की लक्षात आणून देत जा..
चि.राहुल,तुझ्या शब्दप्रपातास
नवकवी राहुल,तुझ्या शब्दप्रपातास मनापासून खळाळत्या शुभेच्छा!
वाचत रहा,अनुभवत रहा,लिहीत रहा!
ओल साठून साठून
ऱ्हदयाच्या कपारीत
थेंब झरता झरता
व्हावा झरा प्रवाहीत
झरे मिळता झऱ्याला
पाणी वाहो खळाळत
उमटावे गोड बोल
रानी-वनी अंबरात
सांज केशरी ढळता
चमकावा चांदण्यात
चांंद दुधाने नहावा
शुभ्र शब्दांचा प्रपात!
—सत्यजित
राहुल मस्तय शब्दप्रपात.
राहुल मस्तय शब्दप्रपात.
धन्यवाद सत्यजितजी..
धन्यवाद सत्यजितजी..
धन्यवाद अक्षय
Mast Rahul!!!!
Mast Rahul!!!!
धन्स dabbu..
धन्स dabbu..
मस्त राहुल छान लिहिलेय
मस्त राहुल छान लिहिलेय
सत्यजित जि खुप छान
धन्यवाद पंडितजी!!!
धन्यवाद पंडितजी!!!
सुंदर!!!
सुंदर!!!
विभाग्रज, प्रतिसादाबद्दल
विभाग्रज, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
वा! वितान म्हणजे आकाश हे
वा! वितान म्हणजे आकाश हे माहित नव्हतं. तरी, आकाशीच्या समानार्थी 'वितानी' असा होणार नाही का? आकाशास/आकाशाला - ह्या अर्थी आकाशा किंवा 'विताना' समजू शकतो, पण तसा अर्थ अभिप्रेत नसावा.
काव्याचा धबधबा अप्रतिम ......
काव्याचा धबधबा अप्रतिम ........
प्रतिसादाबद्दल मनापासून
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद शंतनु आणि ललिताताई
Submitted by शंतनू on 25 July, 2017 - 17:41
वा! वितान म्हणजे आकाश हे माहित नव्हतं. तरी, आकाशीच्या समानार्थी 'वितानी' असा होणार नाही का? आकाशास/आकाशाला - ह्या अर्थी आकाशा किंवा 'विताना' समजू शकतो, पण तसा अर्थ अभिप्रेत नसावा. >>>
वितानी-आकाशी होऊही शकेल...
इंद्रधनुष्य आकाशात मिरवतो म्हणून 'विताना' हा शब्द 'आकाशात' ह्याच अर्थाने वापरलेला..त्यामुळे 'आकाशास' किंवा 'आकाशाला' हे अभिप्रेत नाहीच..
'विताना' हा शब्द 'आकाशात'
'विताना' हा शब्द 'आकाशात' ह्याच अर्थाने वापरलेला >>>
"आकाशात" ही सप्तमी विभक्ती आहे, ज्याचे समानार्थी आकाशी/वितानी/वितानात असे होतील (अॅझ्यूमिंग आकाश=वितान). आकाशास ही चतुर्थी विभक्ती आहे, ज्याचे समानार्थी आकाशा/विताना/आकाशाला/वितानाला असे होतील. तसं बघावं तर कवितेत व्याकरण हे इतकं काटेकोरपणे पाळलं जातं असं नाही, पण जिथे विभक्तीच बदलते तिथे तर शब्दाचा अर्थच बदलतो - मग वाचकाला नीट अर्थबोध होत नाही, म्हणून हे विचारलं. असो. भा. पो.
वितान या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, तर बर्याच ठिकाणी 'चादर' असा अर्थ सापडतो. कदाचित 'आकाशरूपी चादर' अशी डबल-काव्यात्मक उपमा या कवितेत वापरली असावी (जसे संत कबीर त्यांच्या दोह्यांमध्ये चादर = शरीर असे वापरतात)! भारी!
शंतनु, छान प्रतिसाद..कवितेत
शंतनु, छान प्रतिसाद..कवितेत व्याकरण ही पाळायला हवं हा आग्रह धरलांत..मी व्याकरणाचा विचार न करता केलेली रचना..त्यामुळे गल्लत झाली..हरकत नाही चुक सुधारता येईल. धन्यवाद!
बाकी वितान म्हणजे छत, आच्छादन, पसारा. आकाश /शून्य ह्या अर्थानं हा शब्द ज्ञानेश्वरी मध्ये वापरला गेला..मग मी तीथून तो डोळे झाकून अलगद उचलला...
satyajitji, rahul mastaach...
satyajitji, rahul mastaach....
धन्स..
धन्स..
सुंदर!
सुंदर!
छान रचना राहुल आणि
छान रचना राहुल आणि
मस्त चर्चा आणि आमच्या ज्ञानात भर
म्हणून धन्यवाद शंतनु
धन्यवाद प्रणय,अंबज्ञजी!
धन्यवाद प्रणय,अंबज्ञजी!