डोळे भरून गेले

Submitted by शिवाजी उमाजी on 20 July, 2017 - 01:10

डोळे भरून गेले

येथून नेमके का वारे फिरून गेले
सारे कसे निखारे येथे विझून गेले

कष्टात जिंकलेल्या सार्‍याच वैभवाला
डावात खेळतांना का ते हरून गेले?

युद्धात हारले जे जाता समीप जेत्या
उन्माद प्यायलेले हत्या करून गेले

नेत्रात भाव त्याच्या व्याकूळ गोठलेले
कोणास देख कष्टी डोळे भरून गेले

गाथा जरी बुडाली कुंभाड ते रचूनी
सच्चे अभंग त्यांचे सारे तरून गेले

© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान .. Happy
कुंभाड म्हणजे काय असतं????

कुंभाड असा शब्दच नाहिये'>> मराठीत हा शब्द 'कुंभाड रचले' म्हणून सर्वत्र वापरला जातो.
उलट तुमचं ते कुभाण्ड कधी कुठे वाचनात आलेलं नाहिये.

छान..
'कुंभाड रचणे' ऐकून आहे..

मी सुद्धा 'कुंभाड' असाच शब्द ऐकून आहे, असो, अनन्त यात्रीजी, रान पाखरूजी, शशांक पुरंदरेजी व राहुलजी आपणां सर्वांचे आभार...

Back to top