डोळे भरून गेले
Submitted by शिवाजी उमाजी on 20 July, 2017 - 01:10
डोळे भरून गेले
येथून नेमके का वारे फिरून गेले
सारे कसे निखारे येथे विझून गेले
कष्टात जिंकलेल्या सार्याच वैभवाला
डावात खेळतांना का ते हरून गेले?
युद्धात हारले जे जाता समीप जेत्या
उन्माद प्यायलेले हत्या करून गेले
नेत्रात भाव त्याच्या व्याकूळ गोठलेले
कोणास देख कष्टी डोळे भरून गेले
गाथा जरी बुडाली कुंभाड ते रचूनी
सच्चे अभंग त्यांचे सारे तरून गेले
© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589
विषय:
शब्दखुणा: