सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !
हे योग्य आहे की अयोग्य?
यातून सरकारला उत्पन्न नक्कीच मिळेल. मात्र लोकं जुगाराच्या आहारी जातील का?
यातून काळ्या धण्द्याला चाप बसेल की आणखी राजरोसपणे गैर धंदे होतील?
दारूने जशी कुटुंब उध्वस्त केली तशी भिती यात नाही का?
ईतर देशांत हे चालतही असेल पण भारताचे समाजजीवन पाहता हे ईथे योग्य ठरेल की अयोग्य?
माणूस जुगारात कसा वाहावत जातो याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जर हे अधिकृत झाले तर आजवर ज्या कॉलेजच्या पोरांचा हे आवाक्यात नव्हते ते देखील याच्या नादी लागू शकतात का?
क्रिकेटसारख्या खेळातील मॅच फिक्सिंग बोकाळेल की कमी होईल?
साराच पैश्यांचा बाजार होईल का?
सविस्तर बातमी ईथे वाचा -
http://abpmajha.abplive.in/sports/govt-looking-for-make-online-betting-l...
निवडक मुद्दे -
ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी आता शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबत अनेकांशी चर्चाही सुरु केली आहे.
क्रीडा मंत्रालय ब्रिटनमधील अधिकृत आणि कायदेशीर ऑनलाईन बेटिंगसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. इंग्लंडशी याबाबत सामंजस्य करार करण्याचीही शक्यता आहे.
भारतात सध्या बेटिंगचं अनधिकृत मार्केट अंदाजे 9.6 लाख कोटींचं आहे. यामध्ये स्थानिक बूकी आणि अनधिकृत वेबसाईट्सचा समावेश आहे.
अधिकृत बेटिंगवर जो कर लावला जाईल. तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकार याबाबत गांभार्याने विचार करत आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.
एवीतेवी लोकं स्वतःला हानिकारक
एवीतेवी लोकं स्वतःला हानिकारक गोष्टी करतात, सरकारला उत्पन्न तरी मिळेल. एखादी गोष्ट कायदेशीर असली की आपोआप त्यातील बेकायदेशीर मुद्दे संपुष्टात यायला मदत होते.
बाकी, सरकार नावडण्यासाठी मायबोलीवर तरी कारणांची गरज नाही. काँग्रेसचे नाही आणि बीजेपीचे आघाडी नाही तर बहुमतातले सरकार आहे इतका शूळ पुरेसा आहे.
सिरियसली ? भाजपने केले म्हणून
सिरियसली ? भाजपने केले म्हणून बेटींग लीगल असण बरोबर ?
मला वाटल इथे अस काही भाजपने केलच नाही वगैरे समर्थन असेल . पण मुद्दा काहीही असो , समर्थक बरोबर अन विरोधक चूक म्हणणारच का ?
मुद्द्याला काहीच महत्व नाही का ? नोटबंदी चा उद्देश चांगला होता वा जीएसटी चांगली आहे हे म्हणणे वेगळे अन बेटींग लिगलाईज करणे वेगळे वाटत नाही का ?
मी भाजप विरोधक नाही (असलोच तर ५१% समर्थक च आहे)हे शेवटी सांगाव लागत आजकाल हेच मोठ दुर्दैव आहे.
आमच्या शेजारच्या एकाने
आमच्या शेजारच्या एकाने बेटींगमध्ये एका तासात पन्नास लाख गमावले, चोविस तासात त्याला त्याचा दोन कोटींचा बंगला स्वस्तात विकायची वेळ आली कारण बुकी'ज खनपटीला गन लावून बसले होते. हाक ना बोंब. चाळीस वर्षात कुटूंबाने कमावलेली संपत्ती क्षणात सोडून रस्त्यावर यावे लागले.... मज्जा मज्जा!
अशा मूर्खांचे खूप सारे पैसे मला मिळोत... म्हणून बेटींग कायदेशीर करा, ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडून पैसा ज्यांची लायकी आहे त्यांच्याकडे भराभर जाओ..... चला, लायसन्सींग सुरु झाले की अवश्य कळवा....
क्रिकेटसारख्या खेळातील मॅच
क्रिकेटसारख्या खेळातील मॅच फिक्सिंग बोकाळेल की कमी होईल?
>>
क्रिकेटमध्ये पूर्वी बेटिंग होत होते, पूर्वी म्हणजे अझर वगैरेच्या काळात.
आता विराट, जाडेजाच्या युगात भारतात तरी क्रिकेटवर बेटिंग होत नसावे. झाले तरी मॅच फिक्सिंग होत नसावे. होना?
हे चुकीचे विधान आहे. दारूच्या
हे चुकीचे विधान आहे. दारूच्या व्यसनाईतकेच लॉटरीचे व्यसन भयानक आहे. अनेक कुटुंबे यात बरबाद होतात. असंख्य उदाहरणे पाहीली आहेत.
मी स्वतः एका डॉक्टरसाठी लॉटरी खेळलो आहे (पैसे डॉ.चे), डोकं लावून पैसे लावल्यास चांगला फायदा होतो. बरेच सोनार लॉटरीत पैसे गुंतवतात व नफा कमावतात. लॉटरीतून गब्बर झालेली हजारो लोकं मी बघितली आहेत.
आधार कार्ड व ई- पॉस वापरून लॉटरीवर नियंत्रण ठेवता येईल.
<<<< अशा मूर्खांचे खूप सारे
<<<< अशा मूर्खांचे खूप सारे पैसे मला मिळोत. >>>>>>>
तुम्हाला का मिळावेत ?
ज्याने ५० लाख गमवले त्याने ५० लाख मिळवण्यासाठी ५० लाखाची बोली लावलेली होती.
तुमची तयारी आहे ?
काकानी १५ लाख दिले की मी
काकानी १५ लाख दिले की मी बेटिंग करणार
हा धागा लिहून लेखकाला असे
हा धागा लिहून लेखकाला असे सान्गायचे आहे काय कि आपल्या देशात कोणीही बेटीन्ग करत नाही वर लिहिल्याप्रमाणे अनधिक्रुत बेटीन्ग बन्द करणे हे शक्य झालेले नाही मग सरकारने अधिक्रुतपणे बेटिन्ग सुरु केले तर त्यात काय चूक आहे.
तुम्हाला का मिळावेत ?
तुम्हाला का मिळावेत ?
ज्याने ५० लाख गमवले त्याने ५० लाख मिळवण्यासाठी ५० लाखाची बोली लावलेली होती.
तुमची तयारी आहे ?
-०-
असे वाटत आहे की बेटींगबद्दल कोचिंग क्लासेस ही जबरदस्त चालतील.
पात्रता किमान पहिली-दुसरी इयत्ता पास असायला हवीच मात्र.
सिरियसली ? भाजपने केले म्हणून
सिरियसली ? भाजपने केले म्हणून बेटींग लीगल असण बरोबर ?
केदार, असं कोण म्हणतंय? बेटिंग आज लीगल नाही पण प्रचंड प्रमाणात चालू आहे. लीगल केलं तर सरकारला कर मिळेल आणि पेपर ट्रेल, मनी ट्रेल तयार होतील. आज अनेक प्रगत देशांत हे बेटिंग लीगल आहे. दुसरं म्हणजे बेटिंग लीगल करण्याची चर्चा कितीतरी वर्षं सुरु आहे. या काही लिंक्स बघा-
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2503916/Banning-p...
http://www.espncricinfo.com/india/content/story/475479.html
दोन्ही लिंक्स मोदी सरकार यायच्या आधीच्या काळातील आहेत.
क्रिकेट, निवडणूका, सिनेमे
क्रिकेट, निवडणूका, सिनेमे ह्या गोष्टींवर बेटिंग असू नये, जिथे त्या गोष्टींचे आऊटकम ईन्फ्लूएंस करण्यासाठी कारण मिळते आणि ज्यावर बेटिंग केले आहे त्या गोष्टीच्या मेन स्पिरिटला धक्का पोहोचू शकतो. खेळावर बेटिंग हा परस्परसंबंध बेटिंगवर खेळ असा होणार नाही ह्याची गॅरंटी देता येत नाही.
पण लोकांची बेटिंगची हौस भागवण्यासाठी कसिनो, ऑनलाईन बेटिंग, कमर्शिअल वेगास टाईप्स बॉक्सिंग मॅचेस, लॉटरी ई, मार्ग नक्कीच ऊपलब्धं असावेत आणि तेही मुबलक प्रमाणात.
वेगास/नेटिव ईंडियन अश्या धर्तीवर प्रतिकुल हवामान, सुविधांचा अभाव, प्रगतीयोजनांचा अभाव अश्या राज्यात भरपूर टॅक्स लाऊन नवीन शहरे तयार करता येवू शकते जे फक्तं तिथल्या लोकांनाच रोजगार ऊपलब्धं करून देऊ शकेल. अशी दोन-तीन शहरे सोडून ईतर देशात ईतरत्रं अशा कॅसिनोजना सक्तं मनाई असावी.
पण लोकांची बेटिंगची हौस
पण लोकांची बेटिंगची हौस भागवण्यासाठी कसिनो, ऑनलाईन बेटिंग, कमर्शिअल वेगास टाईप्स बॉक्सिंग मॅचेस, लॉटरी ई, मार्ग नक्कीच ऊपलब्धं असावेत आणि तेही मुबलक प्रमाणात.
सहमत. कष्टाने पैसा कमवून वेगास सारख्या कॅसिनोत पैसा आणि शरिरातील उफाळणार्या हार्मोन्सचे फवारे उडवण्याचे स्वप्न बाळगून आहे.
तुम्हीच इचार करा की जरा!
तुम्हीच इचार करा की जरा!
.>>>>>
नानाकळा, हरलो.
केला विचार, नाही सुचत.
आता तुम्हीच सांगा कोणते 95 टक्के व्यवसाय समाजाप्रती कळकळ लक्षात घेता बंद झाले पाहिजेत.
जर या निर्णयाशी सरकार भाजपचे
जर या निर्णयाशी सरकार भाजपचे आहे की काँग्रेसचे याचा फारसा संबंध नसेल तर कोणी उगाच ईथे राजकारण आणू नये. मूळ विषय म्हणजे बेटींगचे फायदे तोटे बाजूला राहतात.
हरलात? ओके नो प्रॉब्लेम...
हरलात? ओके नो प्रॉब्लेम...
आता अशा व्यवसायांची, उत्पादनांची, सेवांची यादी बनवा ज्यांच्याशिवाय माणसाचे काही म्हणजे काहीच अडत नाही. जीवंत राहण्यासाठी त्या गोष्टींची काही एक गरज नाही.
लास वेगास वगैरे शहरांची
लास वेगास वगैरे शहरांची उदाहरणे देणे अत्यण्त चुकीचे आहे. एकतर तिथे जगभरातले जुगारी काही वेळासाठी येतात. जवळचे पैसे संपले की निघून जातात. यातून त्यांना परकीय चलनही मिळत असावे. मात्र आपल्याकडे आपल्याच लोकांना भिकेला लाऊन पैसा कमावला जाईल. किण्बहुना स्वकीय असो वा परकीय, कोणालातरी असे देशोधडीला लावून कोणी पैसे कमावत असेल तर तो माझ्यासाठी हरामाचा पैसा झाला. अश्या पैश्यावर सरकार टॅक्स कमावणार म्हणजे तो टॅक्सही हरामाचा झाला. उद्या त्या पैश्यातून सरकार मला आणि माझ्या पोरांना काही सवलत देत असेल तर मी त्या विनम्रपणे लाथाडू ईच्छितो
नानाकळा
नानाकळा
हरलो म्हणालो तरी मलाच यादी बनवायला सांगत आहात.
तुम्ही मला फक्त ते 95 टक्के व्यवसाय सांगा.
लास वेगास वगैरे शहरांची
लास वेगास वगैरे शहरांची उदाहरणे देणे अत्यण्त चुकीचे आहे. एकतर तिथे जगभरातले जुगारी काही वेळासाठी येतात. जवळचे पैसे संपले की निघून जातात. यातून त्यांना परकीय चलनही मिळत असावे. मात्र आपल्याकडे आपल्याच लोकांना भिकेला लाऊन पैसा कमावला जाईल. >> तुमचीच सोयीस्कर अॅझम्पशन्स आणि तुमचेच फ्लॉड क्नक्लूजन्स .....चालू द्या...
हा धागा लिहून लेखकाला असे
हा धागा लिहून लेखकाला असे सान्गायचे आहे काय कि आपल्या देशात कोणीही बेटीन्ग करत नाही वर लिहिल्याप्रमाणे अनधिक्रुत बेटीन्ग बन्द करणे हे शक्य झालेले नाही मग सरकारने अधिक्रुतपणे बेटिन्ग सुरु केले तर त्यात काय चूक आहे.
>>>>>
आपल्या देशात सुपारी घेऊन माणसांना मारण्याचाही एक धण्दा आहे. चालूच राहणार. जर तो लीगल करून सरकारने पैसे कमावले तर चालेल का?
> तुमचीच सोयीस्कर अॅझम्पशन्स
> तुमचीच सोयीस्कर अॅझम्पशन्स आणि तुमचेच फ्लॉड क्नक्लूजन्स
>>>>
पुर्ण पोस्ट का नाही कोट केली
९५ टक्के व्यवसाय कोणते हे
९५ टक्के व्यवसाय कोणते हे माहित करुन घ्यायचे गरज कोणाला आहे? तुम्हाला... मग तुम्हीच करायची ती उस्तवार. सिम्पल..
पुर्ण पोस्ट का नाही कोट केली
पुर्ण पोस्ट का नाही कोट केली Happy >> माझी तुमच्या पहिल्या दोन ओळीतंच पुरेशी करमणूक झाली कामाचा कंटाळा आला की पुढच्या दोन ओळी वाचून मग त्या कोट करीन.. गॉड प्रॉमिस.
तुम्हाला तुम्हीच केलेला विनोद पुन्हा का ऐकायचा आहे पण?
अश्या पैश्यावर सरकार टॅक्स
अश्या पैश्यावर सरकार टॅक्स कमावणार म्हणजे तो टॅक्सही हरामाचा झाला. उद्या त्या पैश्यातून सरकार मला आणि माझ्या पोरांना काही सवलत देत असेल तर मी त्या विनम्रपणे लाथाडू ईच्छितो
कोणत्या सवलती अपेक्षीत आहेत ? आतापर्यंत कधी अशा सवलती नाकारल्या आहेत तुम्ही?
हायझेनबर्ग, पुढच्या
हायझेनबर्ग, पुढच्या पोस्टमध्ये मी जुगारातून कमावलेल्या पैश्याला हरामाचा म्हटलेले कदाचित आपल्याला पटले तरी असावे किंवा रुचले तरी नसावे. नक्की काय ते क्लीअर केले तर तसे पुढे चर्चा करता येईल.
बाकी अन्नाची नासाडी केल्यावर जसा एखाद्याचा जीव तुटतो तसे कोणी जुगारात पैश्याची नासाडी केल्यावर माझा तुटतो. कारण त्याच पैश्यातून त्याच्या बायकापोरांचे अन्न येणार असते.
नानाकळा, तुम्ही एखादे विधान
नानाकळा, तुम्ही एखादे विधान करता. आणि मग ते सिद्ध करायला सांगितल्यास वा संदर्भ मागितल्यास तुमचे तुम्हीच शोधा असे म्हणता.
हे आपण आताच नाही तर ईतर धाग्यांवरही केले आहेत. भारतीय संघावर सरसकट मॅच फिक्सिंगचा आरोप असो वा सारेच स्टार कलाकार केवळ प्रसिद्धीसाठी समाजकार्य करतात असा आरोप असो. किंवा हे आजचे 95 टक्के व्यवसायांवर उडवलेले शिंतोडे असोत..
मूळात आपल्या या विधानांचा पिच्छा पुरवताना माझा हेतू हाच असतो की आपली विधानांना कसा आधार नाहीये हे सिद्ध करणे. आपण उत्तर न देऊनही तेच सिद्ध करता आणि मग मी थांबतो... तर आताही थांबतो
हायझेनबर्ग, पुढच्या
हायझेनबर्ग, पुढच्या पोस्टमध्ये मी जुगारातून कमावलेल्या पैश्याला हरामाचा म्हटलेले कदाचित आपल्याला पटले तरी असावे किंवा रुचले तरी नसावे. नक्की काय ते क्लीअर केले तर तसे पुढे चर्चा करता येईल. >>>अहो मी चर्चाच करत होतो तुम्ही मध्येच जोक सांगून पुटे दुख्स्तोवर हसवता मग कशी चर्चा करणार.
आता बघा बरं खालच्या वाक्यात तुम्ही परत किती मोठा विनोद केला.
बाकी अन्नाची नासाडी केल्यावर जसा एखाद्याचा जीव तुटतो तसे कोणी जुगारात पैश्याची नासाडी केल्यावर माझा तुटतो.>> अन्नाची नासाडी आणिपैशाची नासाडी सारखी कशी हो. एकाने नासवलेले पैसे दुसरा, तिसरा, चौथा, खाऊ शकतो पण अन्नाचे तसे नसते. अन्नं नाशवंत असले तरी पैसा नाशवंत नसतो तो कोणीही कधीही कितीही खाऊ शकतो. डोक्याचेही तसेच असते कोणी कितीही कधीही आणि कितीही खाऊ शकतो.
कारण त्याच पैश्यातून त्याच्या बायकापोरांचे अन्न येणार असते. >> अहो, तुम्हाला कदाचित माहित नसेल जसे सगळे दारू पिणारे अट्टल दारूडे नसतात ते खूप लांब, निरोगी आणि यशस्वी आयुष्य जगतात तसे बेटिंग करणारेही अट्टल जुगारी नसतात तेही लांब्,निरोगी आणि यशस्वी आयुष्य जगतात. किती खेळायचे आणि कुठे थांबायचे ह्याचे ज्ञान त्यांना असू शकते ह्या शक्यतेचा किंचित विचार तुम्ही करू शकत असल्यास पुढची चर्चा होऊ शकते. पुन्हा विनोद केलात तर मग माझे पोट हसून फुटून जाईल आज
दारू, बेटिंग ह्या मेन्स ओन्ली गोष्टी आहेत असा तुमचा गैरसमज झाला आहे असे मला का वाटते आहे?. पोरांचे बाप आणि बायकांचे नवरे बेटिंग करतात दारू पितात तसे बापांची पोरे आणि नवर्यांच्या बायकाही दारू आणि बेटिंग करू शकतात.
एकाने नासवलेले पैसे दुसरा,
एकाने नासवलेले पैसे दुसरा, तिसरा, चौथा, खाऊ शकतो पण
>>>>>
पण त्याने पहिल्याचे पोट भरू शकत नाही ! तो उपाशीच राहतो. त्याच्यावर अवलंबून असलेले उपाशीच राहतात.
किती खेळायचे आणि कुठे
किती खेळायचे आणि कुठे थांबायचे ह्याचे ज्ञान त्यांना असू शकते ह्या शक्यतेचा किंचित विचार तुम्ही करू शकत असल्यास पुढची चर्चा होऊ शकते.
>>>>>>
कंडीशन्स अप्लाय... किती त्या शक्यता.
जर प्रत्येकाला ठरवून मोजून मापून आदर्श जगता आले तर तोड दो हे पोलिस चौकीया और उखाड फेको ये कटघरे.. कश्याचीच गरज पडणार नाही. चित्रपटांमधील पॉर्न अश्लीलता यावरही सेन्सॉर लावायची गरजच काय? कुठेही नियम आणि कायदे बनवून लोकांना शिस्त लावायची गरजच काय.. किती हा अविश्वास जनतेवर? ते राहतील ना आपले आपण मर्यादेत.
बाकी तुमच्या पुढच्या
बाकी तुमच्या पुढच्या पोस्टमध्ये तुम्ही दारू आणि जुगार या दोन गोष्टींना एका गटात का बसवले आहे हे सांगू शकाल का?
मी एखादे विधान करतो ते माझ्या
मी एखादे विधान करतो ते माझ्या अनुभवावर, आकलनावर, अभ्यासावर, निरिक्षणावर आधारित असते. तो एक क्लू असतो, सार असतो. माझी विधाने साधार पटवून देत बसलो इथे, तर आयुष्य पुरायचे नाही मला.. मला गरजही नाही. (---हे तुमच्याशी संबंधित नाही--- उदा. वीसलाखाच्या ट्रकवरुन काही 'टवळे' मला हिणवत असतात. पण जेव्हा त्यांना 'वीस लाख कॅश माझ्या अकाउंटमध्ये टाका आणि मग वीस-वीस लाख कॅश घेऊन फिरणारे ट्रक दाखवतो' असे आव्हान देतो तेव्हा ते पार्श्वभागाला पाय लावून पळतांना दिसतात. साधी वीस लाखाची औकात नाही, त्यामुळेच तेवढी समज नाही आणि मग मला हिणवत बसतात )
त्यामुळे ज्याला माझे विधान खोटे वाटत असेल त्याने ते सिद्ध करावे नै तो टांग मारुन पुढे जावे... शिम्पल...
माझे विधान खोटे आहे हे सिद्ध करयल इतका जीवाचा आटापिटा करायचा असेल तर.... उत्तरं स्वतःच शोधणे बरे पडेल...!
---------------------------
--- आता हे तुमच्याशी संबंधित-------------- >> काय की प्रश्न विचारणे लै सोपे असते, उत्तरे शोधणे कठीण असं तुमच्याबाबतीत दिसून येत आहे वारंवार... तेव्हा ओनस माझ्यावर नाही, तुमच्यावर आहे मिस्टर! ते पण खूप सोपं आहे. तुम्हीही माणूसच आहात -म्हणजे मला असं वाटतं- तुमच्याही गरजा माणसांच्याच आहेत, तेव्हा नसल्या तरी जगता येईल अशा सामानांची सेवांची यादी करा... तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल. मिळालेही असेल पण हार कबूल करायची तुमची मानसिकता मला तरी आजवर दिसली नाही.
Pages