सरकार ऑनलाईन बेटींग अधिकृत करणार !
हे योग्य आहे की अयोग्य?
यातून सरकारला उत्पन्न नक्कीच मिळेल. मात्र लोकं जुगाराच्या आहारी जातील का?
यातून काळ्या धण्द्याला चाप बसेल की आणखी राजरोसपणे गैर धंदे होतील?
दारूने जशी कुटुंब उध्वस्त केली तशी भिती यात नाही का?
ईतर देशांत हे चालतही असेल पण भारताचे समाजजीवन पाहता हे ईथे योग्य ठरेल की अयोग्य?
माणूस जुगारात कसा वाहावत जातो याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. जर हे अधिकृत झाले तर आजवर ज्या कॉलेजच्या पोरांचा हे आवाक्यात नव्हते ते देखील याच्या नादी लागू शकतात का?
क्रिकेटसारख्या खेळातील मॅच फिक्सिंग बोकाळेल की कमी होईल?
साराच पैश्यांचा बाजार होईल का?
सविस्तर बातमी ईथे वाचा -
http://abpmajha.abplive.in/sports/govt-looking-for-make-online-betting-l...
निवडक मुद्दे -
ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्यासाठी आता शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाने याबाबत अनेकांशी चर्चाही सुरु केली आहे.
क्रीडा मंत्रालय ब्रिटनमधील अधिकृत आणि कायदेशीर ऑनलाईन बेटिंगसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. इंग्लंडशी याबाबत सामंजस्य करार करण्याचीही शक्यता आहे.
भारतात सध्या बेटिंगचं अनधिकृत मार्केट अंदाजे 9.6 लाख कोटींचं आहे. यामध्ये स्थानिक बूकी आणि अनधिकृत वेबसाईट्सचा समावेश आहे.
अधिकृत बेटिंगवर जो कर लावला जाईल. तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकार याबाबत गांभार्याने विचार करत आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.
जर प्रत्येकाला ठरवून मोजून
जर प्रत्येकाला ठरवून मोजून मापून आदर्श जगता आले तर तोड दो हे पोलिस चौकीया और उखाड फेको ये कटघरे.. कश्याचीच गरज पडणार नाही. चित्रपटांमधील पॉर्न अश्लीलता यावरही सेन्सॉर लावायची गरजच काय? कुठेही नियम आणि कायदे बनवून लोकांना शिस्त लावायची गरजच काय.. किती हा अविश्वास जनतेवर? ते राहतील ना आपले आपण मर्यादेत. >> हो बरोबर आहे असतात काही जे वाहवत जातात ज्यांना आपण व्यसनी म्हणतो.
फार दुरचे कशाला ईथलेच मायबोलीचे ऊदाहरण घ्या ना. मायबोलीने धाग्यांची संख्या आणि विषयांतली निर्बुद्धता ह्यावर काही सेंसॉर केलेले नाही पण हजारोंतला एखादा असतोच जो वहावत जातो त्याला धाग्यांचे आणि त्यांच्या निर्बुद्धतेचे व्यसनच लागते पण म्हणून मायबोलीवर धागेच काढू नका असा नियम आणायचा का? नाही. तो निर्णय मायबोलीकरांच्या शहाणपणावर सोडून दिला आहे. जिथे हजारो जण जबाबदारीने शहाण्यासारखे वागतात तिथे ऊडदामाजी दगडधोंडे असणारंच, त्याचे काय मोठे.
तुम्ही म्हणत आहात तसे असतो एखाद दुसरा कुटुंबाला रस्त्यावर आणणारा. अश्यांना ईग्नोर करायचे असते. व्य्कतिगत नाही तर एक ऊदाहरण म्हणून लिहिले आहे कृपया गैरसमज नसावा.
तुम्हाला आवडत नाही म्हणून बंद करायचे मग त्या न्यायाने शाकाहार्यांना आवडत नाही म्हणून मांसाहार सुद्धा बंद करायला हवा. बोला आहे का तयारी?
तसेच आहे बेटिंग आणि दारूचे पण... जसे दिवाळीच्या मुहुर्तावर खेळणारे सगळेच देशोधडीला लागत नाहीत त्यांची बायकापोरे रस्त्यावर येत नाहीत, ऑफिस पार्टीमध्ये एक दोन पेग घेणारा दारू पिऊन रस्त्यावर लोळत नाही.
तसे एखादा गटारात लोळत असेल, कामधंदे सोडून सट्टाच खेळत असेल तर त्याला ईग्नोर करायचे... एवढे सोपे आहे.
आपले विधान -
आपले विधान -
कळकळ? समाजाविषयी? तसे खरेच असेल तर 95 टक्के व्यवसाय बंद करावे लागतील
आपले उत्तर / स्पष्टीकरण -
तेव्हा नसल्या तरी जगता येईल अशा सामानांची सेवांची यादी करा... तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.
>>>>
आता मला फक्त एवढेच सांगा, जर मी अर्थ लावण्यात चुकत नसेल तर तुम्हाला असे म्हणायचे आहे का ज्या वस्तू नसल्या तरी जगता येते अश्या 95 टक्के वस्तूंचे व्यवसाय समाजाच्या कळक्ळीपोटी बंद व्हावेत.
म्हणजे आपल्याला मोबाईल, बाईक, क्रिकेट, चित्रपट, पुस्तके, खेळ या शिवाय जगता येऊ शकते म्हणून हे सर्वही आधी बंद झाले पाहिजे.. मगच जुगाराकडे बोट दाखवा
जसे दिवाळीच्या मुहुर्तावर
जसे दिवाळीच्या मुहुर्तावर खेळणारे सगळेच देशोधडीला लागत नाहीत त्यांची बायकापोरे रस्त्यावर येत नाही ऑफिस पार्टीमध्ये एक दोन पेग घेणारा दारू पिऊन रस्त्यावर लोळत नाही.
>>>>>
तुम्हाला नक्की असे वाटते की सरकार दिवाळीच्या दिवशी जुगार खेळणारयांची सोय करते आहे?
दारूला पुन्हा तुम्ही जुगाराच्या गटात का घेत आहात हे सांगितले नाही.
तुम्हाला आवडत नाही म्हणून बंद
तुम्हाला आवडत नाही म्हणून बंद करायचे मग त्या न्यायाने शाकाहार्यांना आवडत नाही म्हणून मांसाहार सुद्धा बंद करायला हवा. बोला आहे का तयारी?
>>>
चहा आवडणारया कोणाला कॉफी आवडत नाही तर बंद करा..
फूटबॉल आवडणारया कोणाला क्रिकेट आवडत नाही तर बंद करा..
या पठडीतले हे शाकाहार माण्साहार उदाहरण आहे..
याची तुलना जुगाराशी होऊ शकते?
हा खरेच माझ्या आवडीचा प्रश्न आहे?
तुम्ही बहुतेक माझा जुगारावरचा लेख वाचला नसावा, नंतर शोधून लिण्क देतो.. निदान एवढे तरी क्लीअर होईल की हा माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न म्हणून विरोध करत नाहीये
बेटिंग अधिकृत करणे हा उत्तम
बेटिंग अधिकृत करणे हा उत्तम निर्णय आहे. याने नियम तयार करून कोण बेटिंग करू शकतं कोण नाही (वयाची अट), कुठे करू शकतं, कसं करू शकतं/ कसं करू शकत नाही इ. प्रकारे त्यावर नियंत्रण ठेवता येईल. शासनाचे विविध क्षेत्रात नियमन (रेग्युलेशन) करणे हे महत्त्वाचे कार्य याने शक्य होईल. हे वाईट म्हणून हे नको अशी बाळबोध टीका हो राहील सुरुवातीला, पण होईल रेग्युलराईज़.
हे बीजेपीला करणेच शक्य होते, कॉंग्रेसने केले असते तर त्याच्या विरुद्ध रान उठवून आमच्या संस्कृतीवर आणि ब्ला ब्ला गोंधळ उडवून दिला असता बीजेपीने. आता त्यांचे समर्थक काही बोलणार नाहीत आणि सुखनैव बील पार पडेल.
जसं गन लॉ, एलजीबीटी बद्दल काही ठोस करायचं असेल तर ते ट्रंप करू शकतो (ट्रंप १४० अक्षरं बोलण्याशिवाय काही करू शकतो यावरच विश्वास नाही पण ते असो) कारण डेमचा पाठींबा आहेच, आणि रिपचं मन वळवून ट्रंपला करणे सहज शक्य आहे.
टिपिकली लिबरल लोक याला पाठींबा देतात आणि कॉन्झर्वेटीव्ह विरोध करतात, मायबोलीवरच्या समर्थकांमध्ये उलट बघायला मिळतंय.
बाकी मायबोलीवर धागे काढणे आणि
बाकी मायबोलीवर धागे काढणे आणि जुगार खेळणे याला एकाच गटात घेतले हे रोचक वाटले. बरं दारू पिणेही त्याच गटाअ आहे
तुम्हाला नक्की असे वाटते की
तुम्हाला नक्की असे वाटते की सरकार दिवाळीच्या दिवशी जुगार खेळणारयांची सोय करते आहे? >> हो मग. आता सरकारने कॅलेंडर छापण्यावर बंदी आणली, दिवाळीला सुटीच दिली नाही, दिवाळी साजरी करणार्यांवर खटले भरून तुरुंगात टाकले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पैसेच छापले नाहीत तर म्हणू बुवा सरकार जुगार खेळणार्यांची अशी काही सोयच करत नाही.
दारूचेही तसेच आहे... सरकारनेच किंगफिशर सारख्या दारू बनवणार्या कंपनीला कर्जे मिळवून दिली होती असे म्हणतात मग आपण कसे म्हणणार सरकार दारू पिणार्यांची सोय करत नाही.
बाकी मायबोलीवर धागे काढणे आणि
बाकी मायबोलीवर धागे काढणे आणि जुगार खेळणे याला एकाच गटात घेतले हे रोचक वाटले. >> व्यसन हो व्यसन... मग जुगाराचे किंवा धाग्यांचें, बुद्धीवादाचे किंवा निर्बुद्धतेचे, चहाचे किंवा दारूचे व्हेजचे किंवा नॉनव्हेजचे.. शाहरूखचे किंवा स्वप्निलचे.. एकता कपूरच्या सिरियलचे किंवा पॉर्नचे... कुठलेही व्य्सन वाईटंच.
सगळीच व्यसनं एकाच गटात मोडतात.
हायझेनबर्ग, आज फार्मात एकदम..
हायझेनबर्ग, आज फार्मात एकदम... ?
हाब ज्जेबात. ;D
हाब ज्जेबात.
साला दोन पेग पिऊन बसलो होतो,
साला दोन पेग पिऊन बसलो होतो, हे प्रतिसाद वाचले नशाच उतरून राहिली ...
फार्मात वगैरे काही नाही हो.
फार्मात वगैरे काही नाही हो.
थोडा वेळ आहे आज तर मी एकदम सिरियसली पहिला प्रतिसाद लिहिला होता पण ऋन्मेषभाऊ विनोदीच प्रतिक्रिया लिहित आहेत मगापासून मग म्हंटलं आज गंभीर बोलण्याचा त्यांचा काही मूड दिसत नाही तर आपणही पडत्या फळाची आज्ञा मानून बघूयात थोडं विनोदी लिहायला जमतंय का?
शाहरूखचे किंवा स्वप्निलचे..
शाहरूखचे किंवा स्वप्निलचे..
>>>>
आणि लोकं म्हणतात धाग्यावर शाहरूख मी आणतो
सत्य तर हे आहे की लोकांना शाहरूखशिवाय करमत नाही.. बीकॉज यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट कॅन नॉट इग्नोर हिम....
असो...
जुगाराचे आणि दारूचे समर्थन करायचा सर्वात सोपा आणि प्रचलित असलेला मार्ग म्हणजे यांना घेऊन विनोद थट्टामस्करी करा.. दारूवर यासाठीच ईतके असंख्य विनोद बनतात आणि असे भासवले जाते की दारू म्हणजे कुठलाही घातक द्रवपदार्थ नाहीये ..
पण फॅक्ट हे आहे की त्याने सत्य बदलत नाही..
तेच ईथे जुगारालाही लागू..
अर्थात, मला मान्य आहे की प्रत्येकाची तत्वे वेगळी असतात आणि मी माझी तत्वे कोणावर लादू शकत नाही..
पण मी ती सोडणारही नाही..
कारण बहुसंख्य लोकं ज्या गोष्टीचे समर्थन करतात ती बरोबरच असली पाहिजे किंवा चालवूनच घेतली पाहिजे असे गरजेचे नाही. प्रवाह नेहमी उताराच्या दिशेनेच वाहतो. तेच त्याच्या सोयीचे असते.
आपल्या देशात सुपारी घेऊन
आपल्या देशात सुपारी घेऊन माणसांना मारण्याचाही एक धण्दा आहे. चालूच राहणार. जर तो लीगल करून सरकारने पैसे कमावले तर चालेल का?
या तुमच्या विधानाचा अर्थ असा घ्यायचा की एखाद्याचा खुन करणे आणि बेटिन्ग हे सम आहेत. येथे एक विसरताय की खुनात एकाचा जीव जातो तो परत मिळवता येत नाही पण बेटिन्ग पासुन वाचवता येते. असो करत रहा अशी बेजाबदार विधाने.
एखाद्याचा खुन करणे आणि
एखाद्याचा खुन करणे आणि बेटिन्ग हे सम आहेत. येथे एक विसरताय की ....
>>>>
जगातल्या कुठल्याही दोन गोष्टी एक समान नसतात. आपण त्यांची तुलना कोणत्या निकषावर करतोय यावर त्यातील साम्य आणि फरक अवलंबून असतो. माझ्या उदाहरणात जो मुद्दा माण्डायचा होता त्यानुसार मी साम्य दाखवले. तुम्ही वेगळे निकष लावत फरक दाखवत आहात ईतकेच.
असो,
तरी ईथे लोकं दारू पिणे आणि जुगार खेळणे हे एकाच गटात घेत आहेत यातच समाधान
पण बेटिन्ग पासुन वाचवता येते.
पण बेटिन्ग पासुन वाचवता येते...
>>>>
हे वाक्य मला फार ईण्टरेस्टींग वाटले..
बेटींग पासून वाचवता येते... म्ह्णजे बेटींग एक अशी गोष्ट आहे की त्यापासून लोकांना वाचवायची गरज आहे..
पण कोण वाचवणार... ईथे तर मायबाप सरकारच लोकांन जुगार खेळायला प्रोत्साहन देतेय.
चला ऑफिस आले. नंतर बोलूया. पण
चला ऑफिस आले. नंतर बोलूया. पण ईथे चर्चा बेसिक कन्सेप्ट पासून सुरू करणे गरजेचे आहे असे वाटते.
जुगार काय असतो, लोकांना त्याचा नाद कसा लागतो यापासून चर्चेची गरज आहे.
मला कोणी ईथे सांगेल का?
जुगाराचे लोकांना आकर्षण का असते? किंवा नेमके कश्याचे आकर्षण त्यांना जुगाराकडे ओढते?
ऋन्मेष यांना अनुमोदन
ऋन्मेष यांना अनुमोदन
जुगाराचे लोकांना आकर्षण का असते? किंवा नेमके कश्याचे आकर्षण त्यांना जुगाराकडे ओढते? >>>> पैसा हे एक प्रमुख कारण
पैशाचे आकर्षण असणे हा गुन्हा
पैशाचे आकर्षण असणे हा गुन्हा आहे का?
पैशाचे आकर्षण असणे हा गुन्हा
पैशाचे आकर्षण असणे हा गुन्हा आहे का? >> नाहि पण जबाबदारी न सांभाळता तो अवैध मार्गावर खर्च करणे हा गुन्हा
सरकारने जुगार अधिकृत केल्यावर
सरकारने जुगार अधिकृत केल्यावर पैसा उडवायला हरकत नसावी.
सरकारने जुगार अधिकृत केल्यावर
सरकारने जुगार अधिकृत केल्यावर पैसा उडवायला हरकत नसावी.>> काळ्या घोंगड्यावर पांढर पांघरुण अशातला प्रकार आहे
इथे ८२ झाले, १०० होतील लवकरच
इथे ८२ झाले, १०० होतील लवकरच
तिकडे तांबाटे ३३ वरच अडकले आहेत. त्याचा विचार करा लोकहो!
पैशाचे आकर्षण असणे हा गुन्हा
पैशाचे आकर्षण असणे हा गुन्हा आहे का? >>
>>>
नक्कीच नाही. पण त्या प्रश्नाचे उत्तर निव्वळ पैसा नाहीये. तर झटपट पैसा, शॉर्टकटमध्ये मिळालेला पैसा, कमी वेळात आणि कमी परीश्रमात मिळालेला पैसा...
एकीकडे तुम्ही मेक ईन ईंडियाचा नारा देऊन लोकांना उद्योगधंद्यात उतरत आपल्या देशात उत्पादन करायला आवाहन करायचे.
दुसरीकडे त्यांनाच हा झटपट पैसा कमवायचा मार्ग दाखवायचा.
मला स्वस्त मिळ्तात म्हणुन
मला स्वस्त मिळ्तात म्हणुन नाहि लिहिलं
एकीकडे तुम्ही मेक ईन ईंडियाचा
एकीकडे तुम्ही मेक ईन ईंडियाचा नारा देऊन लोकांना उद्योगधंद्यात उतरत आपल्या देशात उत्पादन करायला आवाहन करायचे.
दुसरीकडे त्यांनाच हा झटपट पैसा कमवायचा मार्ग दाखवायचा.
>>
ते प्रत्येकाच्या खात्यात "झटपट" १५ लाख रुपये येणार होते त्याचे काय झाले
अमीतव प्रतीसाद आवडला
अमीतव प्रतीसाद आवडला
हाब - बेटींगच्या धाग्यावर बॅटींग जोरात
राहूल १२३ - ते 'झटपट १५ लाख' येतील का नाही यावर बेटींग खेळून मिळवायचे १५ काय ५० लाख हाकानाका
झटपट पैसा, शॉर्टकटमध्ये
झटपट पैसा, शॉर्टकटमध्ये मिळालेला पैसा, कमी वेळात आणि कमी परीश्रमात मिळालेला पैसा...
>>> असा पैसा वाईट असतो हे कुणी सांगितले...?
एकूण पैशाबद्दलच्या अशा खुळचट कल्पना मध्यमवर्गियांना मध्यमवर्गियच बनवून ठेवतात पिढ्यांपिढ्या...
तर झटपट पैसा, शॉर्टकटमध्ये
तर झटपट पैसा, शॉर्टकटमध्ये मिळालेला पैसा, कमी वेळात आणि कमी परीश्रमात मिळालेला पैसा...
अच्छा ! म्हणजे तुमची पोटदुखी बेटिंगमधून कमी वेळात आणि कमी परीश्रमात झटपट पैसा मिळतो ही आहे,. बेटिंगवर एखाद्याचे आर्थिक नुकसान होते हा मुद्दा दिखाऊ होता तर? स्वतःचा पैसा अधिकृतपणे गुंतवूण कमी वेळात नफा कमावला तर त्या आक्षेप घेण्यासारखे काय आहे?
जुगार काय असतो, लोकांना
जुगार काय असतो, लोकांना त्याचा नाद कसा लागतो यापासून चर्चेची गरज आहे. >> बिझनेस, फिल्म, क्रिकेट, नोकरी सारखेच जुगार पोटापाण्यासाठी पैसे कमावण्याचे साधन आहे ..... तुम्हाला का रोज नोकरीला जाण्याचा वाईट नाद लागला ह्याची चर्चा आधी झाली पाहिजे?
एक सोपे ऊदाहरण देतो, समजा तुम्ही वडिलांकडून १लाख रुपये घेवून तुमच्या शिक्षणा वर लावले, मग कॉलेज बंक करून, कमीत कमी अभ्यास करून लाखातले ८० हजार वाया घालवले, मग पास होण्यासाठी क्लासेस लावून अजून ५० हजार लावले, वर जाण्या येण्याच्या खर्चाला, चहा पाण्याला, बिडी सिगरेटला, शाहरूख स्व्पनिल ला अजून २० हजार लावले, गर्लफ्रेंडवर अजून ३० हजार लावले अशी चार पाच वर्षानंतर अंदाजे ५ लाख लावल्यानंतर डिग्री मिळाली, मग मह्त्प्रयासाने नोकरी मिळाली आणि तुम्ही वर्षाला कसे बसे १-२ लाख रुपये कमवू लागलात.
ह्या ऊलट एखाद्या जुगार्याने वडिलांकडून १ लाख रुपये घेवून एका दिवसात १ का ५ करत ५ लाख केले तर सांगा बरं हुशार कोण ठरला?
पास होऊ की नाही, झालो तर डिग्री मिळेल की नाही, मिळाली तर नोकरी मिळेल की नाही, मिळाली तर टिकेल की नाही, टिकली तर खर्च भागेल की नाही, भागला तर सेविंग होईल की नाही एवढे सगळे ऑड्स असतांनाही तुम्ही शिक्षणावर पैसे लावले मग आता सांगा बरं बेटिंग कोण करतंय?
जुगार/बेटिंग मध्ये मॅथेमॅटिकल फॉर्म्युला वापरून आपले ऑड्स तरी माहित करून घेता येतात पण ह्या तुमच्या आंधळ्या बेटिंगचे काय?
Pages