दिल्लीतल्या खाण्याच्या जागा

Submitted by webmaster on 20 April, 2009 - 00:12

दिल्लीतल्या खाण्याच्या जागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिफेन्स कॉलनीतील स्वागत फार आवडते. चेट्टिनाड, मंगलोरीयन, चायनीज, गोवन, कोकणी जबरदस्त व्हरायटी! आणि प्रत्येक डिश ऑथेंटिक म्हणावी अशी. पहिल्या मजल्यावरील कॅप्टन मराठी आहे त्यामुळे बरेचदा स्पेशल अटेंशन मिळाले आहे :). तंदूर प्रॉन्स, तंगडी कबाब, केरळी अप्पम, प्रॉन्स गस्सी एकदम फेवरीट. बार पण मस्तच!

अरे वा. धन्यवाद अमेय. जायला पाहिजे कधीतरी.

बाकी गोवा सदनामध्ये जेवण केलंय का? तिथलं जेवण पण छान असतं असं ऐकलंय.

गोवा सदनमध्ये नाही गेलो, ते बहुतेक लोदी गार्डनजवळ आहे ना? एक चाणक्यपुरीत गोवा निवासही आहे असं ऐकलंय पण रिपोर्ट चांगला नाही.
आन्ध्रा भवन, तामिळनाडू भवन दोघांचीही उपहारगृहे मस्त जेवण देतात पण गर्दीने बेजार व्हायला होते.

गोवा सदन नाही मग, मी म्हणतेय ते चाणक्यपुरीमधलं गोवा निवासच. मी मागे तिथे फक्त कॉफी प्यायले होते. पण तिथेच उतरलेल्या माबोकर मैत्रिणीने जेवण छान असल्याचं संगितलं होतं. तिथला अ‍ॅम्बियंस छान आहे. सुरेख इमारत आणि सुंदर पेंटीग्ज आहेत सुबोध केरकर यांच्या.

आंध्रा भवनमध्ये बर्‍याचदा जेवलेय. गर्दी फारच असते. तिथलं सुकं चिकन खूप मस्त असतं.

जुन्या महाराष्ट्र सदनातलं जेवण भयानक आहे. नव्यामध्ये चांगलं आहे असं ऐकलं होतं गणपतीच्या वेळी. पण अजून जाणं नाही झालंय.

नवे महारष्ट्र सदन..... तिथले जेवण जेवून वर काही पैसे देऊ केले तरी जाऊ नका... किम्बहुना महाराष्ट्र सदना समोरून जाताना महा. सदना कडे पाहू देखील नका.
अत्यंत भिकार एवढा एकच शब्द !

त्याचे व्यवस्थापन रेल्वेची केटरिंग व्यवस्था पाहनार्‍या आय आर सी टी सी ला आउट सोअर्स केली आहे. त्यामुळे रेल्वेत जे आणि जसे पदार्थ मिळतात तस्सेच तिथे. बिसलेरी वाटर म्हणून चक्क रेल नीरचे पाणी. वाट पहायला अर्धा एक तास वेळ असेल तर वाट पहात बसण्यात एक आनन्द आहे. ड्रिंकिंग वाट्रची मोठी बाटली १५ रु. व छोटी १० रु. साहजिकच मोठ्या बाटल्या संपलेल्या असतात आणि २ छोट्या घ्या. म्हणजे १५ ऐवजी २० द्या १ लिटरला !

रॉहू, हे नवं नाहीये. खरंतर भारतात कुठेही महाराष्ट्र सदन्/भवन आणि एमटीडीसी यांचं जेवण खाण्यायोग्य असेल तर त्याची सेन्सेशनल बातमी होईल अशीच अवस्था आहे.

Pages