दिल्लीतल्या खाण्याच्या जागा

Submitted by webmaster on 20 April, 2009 - 00:12

दिल्लीतल्या खाण्याच्या जागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली हाटमध्ये साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात. बटाटेवडा पण ओके. बाकी थालपीठ, भाकरी, झुणका वैगरे तिथे खावं वाटलं नाही. कोकम सरबत मिळतं तिथे, ते मात्र ब्येस्ट.
नैवेद्यम बर्‍याच ठिकाणी आहे, साउथ इंडियन जेवण, काही आउटलेटस मध्ये पुपो पण असते.
मी सांगितलेल्या बाई साकेत अन डीएलेफ गुडगाव ह्या भागात पाठवतात पुपो.
साउथ इंडीयनसाठी आमच्या भागात बालाजी म्हणुन आहे, पण त्याचे अजुन कुठे ब्रँच आहे की नाही माहित नाही. बाकी आंध्राभवन मधले जेवण छान असते. व्हेज थाली मस्त आहे तिथली.. सोबत मेतकुटाचा भाऊ शोभेल असा एक पदार्थ आतो, त्याला माझ्या मैत्रिणी अन दिल्लीतले बरेच जण गनपावडर म्हणतात.
नॉन व्हेज खात असाल तर तिथली चिकन चेट्टिनाड ही डीश खाच. जेवण झाल्यावर मस्त पान वैगरे मिळतं.
गुजराथी थाळीसाठी राजधानी, कॅनॉट प्लेस अन गुडगावमध्ये आहे.. बहुतेक नोयडा मध्ये पण असेल. चांगलं जेवण अन चांगली सर्विस... अशीच एक सुरुची नावाची जागा आहे करोलबागमध्ये, तिथे गुजराथी अन राजस्थानी जेवण मिळतं... एक्दम छान चव..
याव्यतिरिक्त रात्री बेरात्री उशिरा जेवायचं असेल तर पंडारा रोड चांगली जागा आहे. कढी चावल / राजमा चावल साठी कॅनॉट प्लेसवर रोडवर काके का ढाबा टाइपच्या एक्-दोन जागा आहेत. त्या पण चांगल्या...
आणी हो बिट्टु की टीक्की खाल्ली आहे ना?
लिहिता लिहिता सगळी आवडणारी ठिकाणं आठवली..

अल्पना राजधानी नोएडात आहे. ग्रेट इंडिया प्लेस मधे. बाकी तेथे बर्यापैकी होटेल्स आहेत. महाराष्ट्र सदन मधे जेवण कसे असते?

मंदार

मी चार्-पाच वर्षापुर्वी एकदा तिकडे खाल्ले होते... अंडाकरी...ती बरी होती...बाकी इथे रहायला आल्यापासुन तिकडे जाणं झालं नाही. गेल्या आठवड्यात तिथे कसलातरी मेळावा होता बहुतेक.. बरेचसे स्टॉल्स होते... माझा दीर पुरणपोळी घेवुन आला होता तिथुन....
ग्रेट इंडिया प्लेसममध्ये एकदा गेलो होतो...:)

मंदार GIP मधे यात्रा नावाचे राजधानी सारखेच एक हॉटेल आहे.
अल्पना सुरुची मधे मी जेवलो आहे. बहुतेक राजस्थानी थाली घेतली होती. चांगले आहे. Happy
कालच दिल्ली हाट मधे गेलो होतो. महाराष्ट्र स्टॉल वर कोकम सरबत घेतले पण पांचट होते त्या मानाने कोकम सोडा चांगला होता.
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

दिल्ली हाट कुठे आहे. तेथे कसे जायचे. पण येथे खाण्याची ठिकाणे एकगठ्ठा नाहीत जंगली महाराज रोड सारखी. नोएडातर एकदम बेकार आहे. shanky आपण दिल्लीत असता का?

मंदार

मंदार, मी त्या तुमच्या आवडत्या नॉयडा मधे असतो Wink
तुम्ही कुठे असता?
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

दिल्ली हाट दक्षिण दिल्लीत आहे... आयएनए मार्केटजवळ.. साउथ एक्स च्या जवळ... तिथे कायमस्वरुपी मेळावा आहे...वेगवेगळ्या राज्यातले स्टॉल्स आहेत ( कपडे, विविध प्रकारच्या हस्तकला.. शोभेच्या वस्तु आणि बहुतेक सगळ्या राज्यांचे खाण्याचे स्टॉल्स).. तिथेच एक महाराष्ट्राचा पण स्टॉल आहे. पिठलं-भाकरी, झुणका भाकरी, पुरणपोळी, थालपीठ, साबुदाणा वडा, बटाटेवडा, भेळ, कोकम सरबत वैगरे पदार्थ मिळतात. एकदा तिथे सोलकढी पण मिळाली होती..
खाण्याची एकगठ्ठा ठि़काणं आहेत ना... कॅनॉट प्लेस वर बरीच रेस्टॉरंट्स (थोडीशी महागडी) आहेत, तिथेच रस्त्याच्या एका बाजुला रोडसाइड ढाबा टाइप कढी-चावल, राजमा चावल, छोले कुलचे वैगरे मिळणारी स्वस्त ठिकाणंही आहेत.
साउथ एक्समध्ये, डिफेन्स कॉलनीमध्ये पण भरपुर महागडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण देणारी रेस्टॉरंट्स आहेत.
मागे लिहिल्या प्रमाणे इंडिया गेटजवळचं पंडारा रोड हे पण एक प्रसिद्ध ठिकाण.. इथे छोट्याश्या जागेत ४-५ रेस्टॉरंट्स आहेत. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही जागा रात्री ११ नंतर पण उघडी असते.. या पंडारा रोडवर पार्कींगला जागा मिळत नाही. पार्कींगच्या समोरच रस्त्यावर एक कबाबचा स्टॉल आहे.. खुप छान कबाब मिळतात.. गाड्यांची गर्दी असते याच्याकडे पॅक करुन घेवुन जायला.
अजुन माझ्या माहितीतल्या जागा म्हणजे प्रितमपुरा मार्केट (पश्चिम दिल्ली), चांदनी चौक, आय आय टी समोर ( जेएनयु परिसर).. वैगरे.. तसे दिल्लीत प्रत्येक मार्केटमध्ये खाण्या-पिण्यासाठी मार्केटच्या आकाराप्रमाणे जागा असतातच.. त्यामुळे करोलबाग, लाजपतनगर मेन मार्केट, सरोजनीनगर मार्केट, कमलानगर मार्केट, इस्ट पटेलनगर मार्केट, राजेंद्रनगर मार्केट, रजौरी गार्डन या ठिकाणी पण बर्‍यापै़की रेस्टॉरंट्स वैगरे आहेत. अजुनही ठि़काणच्या मार्केटस मध्ये अश्या जागा असतिल.. मी ज्या ज्या ठिकाणी गेलेय तिथलीच नावं लिहिलित (अपवाद चांदनी चौकचा. इथली पराठेंवाली गली अन गोलगप्पे फक्त ऐकुन माहित)
शँकी, मंदार कधी करोलबाग, सीपी वैगरे भागात येणार असाल तर सांगा.. माझे घर तिथुन बर्‍यापैकी जवळ आहे.. Happy

साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात.<<< बटाटेवड्याबरोबर खोबर्‍याची देत असतील मग ? Happy

मिलिंदा सही पकड्या.. Happy
काल मी पण सा.वडा घेतला पण त्या बरोबरच्या हिरव्या चटणीला हात पण नाही लावला (बहुतेक पुदिना वाली असावी...) मात्र भेळे मध्ये मस्तपैकी कैरी घालुन दिली.. Happy
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

अच्छा म्हणजे जी अ‍ॅव्हेलेबल आहे ती चटणी द्यायची सा.वड्याबरोबर अशी पद्धत आहे का तिथली.. Proud मला बरी नेमकी दोन्ही वेळेला लसणाची चटणी आली.. Sad

शन्की, मी से. ५० नोएडात रहातो. कंपनी से. १२७ ला आहे. मोबाइल ९८७१४०४५२०.

परवा एका नव्या रेस्टॉरंटचा शोध लागला... वसंतकुंजमध्ये.खासियत का काहीतरी नाव होतं. भावानी जेवण मागवलं होतं तिथुन.. हॉटेल ग्रँडमध्ये कामाला असलेल्या जोडप्याने सुरु केलय म्हणे.. नवरा तिथे कुक होता अन बायको व्यवस्थापनामध्ये होती बहुतेक.. छोटसं आहे..यांच वैशिष्ट्य म्हणजे सिझनल भाज्या मिळतात, बर्‍यापैकी घरगुती चव.. (अर्थात उत्तर भारतिय घरगुती).. आम्ही बैंगन और मिर्च का सालन, करेले भरवाँ, कुरकुरी भिंडी का रायता अन चक्क लौकी मसाला (दुधी भोपळ्याची भाजी) खाल्लं.. सोबत स्टार्टर्समध्ये अफगाणी चिकन.... सगळे पदार्थ ए-वन..

चांदनी चौकातली साजुक तुपातली जिलबी तर अप्रतिमच!
दिल्ली हाट मधे पावभाजी छान मिळते...! आणि मला आठवते आम्ही आय आय टी कॅम्पस मधील कॅन्टीन ला जायचो ...थंडीच्या दिवसात तिथे मिळणारे अंडाकरी, सरसो दा साग अन मक्के दी रोटी...आहाहा! तेही रिझनेबल रेट मधे! करोलबाग मधे बिकानेरवाल्याकडे मिळणारे पनिर पकोडे एकदा तरी चाखावेच असे...!

बाकी दिल्लीमधे खाण्यापिण्याची एकंदरीत चंगळच असते...क्वालिटी अन क्वांटीटी दोन्ही मस्त! चौकाचौकात मिळणारे छोले भटुरे असो नाहीतर चाउमेन! छोलेभटुरे सिटीमधे खाण्यापेक्षा गुडगाव रोडवरील ढाब्यांवर खावे!

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

चांदणी चौका वरुन आठवले..

तिथे करिम हॉटेल्स प्रा लि म्हणुन एक प्रसिद्ध हॉटेल आहे. हिंदुस्थान चे शेवटचे बादशाह, बहादुरशाह जफर ह्यांचा खानसाम्या चे वंशज हे हॉटेल चालवतात! चांदणी चौकातील स्वच्छता वादातीत असली तरी, हे हॉटेल साफ सुथरे आहे. जामा मशिदीला वळसा घालुण पायी किंवा सायकल रिक्षा ने जावे लागते. टॅक्शी/ रिक्षा नेण्याचा रस्ता दिसला नाही!

सुंदर जेवण, अन बर्यापैकी अदबशीर वेटर. बहुतांश वेळेस परदेशी लोक असतात.

गोल मार्केट, संसदे जवळ, एक लस्सी चे दुकाण आहे. नाव आठवत नाही. पण जबरी लस्सी द्यायचा! एक मोट्ठे गाडगे/मडके भरुण लस्सी! एकच प्याला अन गपच झाला असे करुन टाकतो! Happy

हॉटेल सरवण भवन, म्हणुन कॅनॉट प्लेस ला एक मस्त हॉटेल आहे. गर्दी खुप असते.

(बाकी दिल्ल्लीत जेवणाला फार त्रास झाला)

हो मी दिल्लीतच आहे.

हा धागा वर आला म्हणून लिहिते. सध्या कॅनॉट प्लेसजवळ पुरानी दिल्ली के खाने नावाचा फुड फेस्टिवल चालू आहे. चांदनी चौक, पुरानी दिल्ली भागातले प्रसिद्ध पदार्थ (मूळ दुकानातलेच) तिथे मिळताहेत.

wow.... mastach... mala aawadel ha food festival attend karayla. ... exactly kuthe aani kiti diwas aahe te sangu shakal ka? delhi madhil jast mahiti nahi aahe mala.... aani alpana aapan kay karta? kiti warsh aahat ithe?

gurgaon madhe tar saglyat best mhande street food ! Gurgaon madhe anek dhabe aahet. tithele aalu-pyaz paratha, gobi paratha, anda paratha ekdam best. open dhabyawar garam garam parathe ntyawar butter taklela.... nakki try kara. aani baki tar malls aahetach.

प्राजक्ता, ढाब्यावर खायला जरा भितीच वाटते.

व्हेपर - एम जी रोड
पायरेट्स - एम जी रोड
पंजाबी बाय नेचर - सायबर सिटी
कासाब्लॅन्का - डबल ट्री - गोल्फ कोर्स रोड

कासाब्लँका मध्ये गेलेय एकदा. छान वाटलं. पंजाबी बाय नेचर बहूतेक रजौरी गार्डनमध्ये पण आहे. तिथे पण गेले होते.
@ आशुतोष, माझ्या घरी यायचं राहिलंय. Happy

सायबर सिटीतल्या पंजाबी बाय नेचरला भेट देणं जरुरी आहे, तु कधी आलीस गुरगावला तर फोन कर.
अल्पना, नक्की येइन.

@ ashutosh... tumhi sangitleli thikane nakki try karen. Alpana thanks for the details.... aajach samptoy festival mhanje jana kathin aahe pan tari try karen, pan tumha saglyanshi bolun khup bara watla. kiti diwas delhi gurgaon madhe marathi lok bhetatayt ka te baghat hote.... Thanks again.

परवा एका नव्या ठिकाणाहून जेवण मागवलं होतं. फुडी नाइट्स म्हणून जागा आहे कॅनॉट प्लेसला. आख्ख्या दिल्लीमध्ये होम डिलिव्हरी देतात संध्याकाळी ७ ते पहाटे ६ वाजेपर्यंत. जास्त अंतर असेल तर डिलिव्हरी चार्जेस घेतात. जेवण मस्त होतं. तंगडी कबाब आणि मेथी मलाई चिकन मागवलं होतं. दोन्ही पदार्थ मस्त आणि पोर्शन हाइझपण जास्त होता.
http://www.foodynight.com/ ही त्यांची वेबसाइट.

Pages