सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
नि.ग. च्या ३२ व्या भागाचा
नि.ग. च्या ३२ व्या भागाचा शुभारंभ.

शोभा मनोगत खुप आवडल तुझ. मोगर्याच्या अक्षरातील फोटोही सुंदर.
हा भाग संस्कृतीत आला आहे चुकुन. तो आता घरची बाग मधे कसा टाकायचा?
अरे वा... नविन भाग आला.....
अरे वा... नविन भाग आला.....
अभिनंदन....
शोभा.... छान मनोगत....
शोभा, मस्तच लिहिलं आहेस मनोगत
शोभा, मस्तच लिहिलं आहेस मनोगत.
नवीन भागासाठी खूप खूप शुभेच्छा !
वर्षा ऋतूत हा भाग नवनवीन माहिती, फोटो, गप्पा आणि चेष्टामस्करी यांनी खूप बहरू दे .
ह्या सदाफुली सारखाच नवीन भाग
ह्या सदाफुली सारखाच नवीन भाग ही सदा फुलू दे
अभिनंदन!
अभिनंदन!
शोभा, मस्तच लिहिलं आहेस मनोगत
शोभा, मस्तच लिहिलं आहेस मनोगत.
नवीन भागासाठी खूप खूप शुभेच्छा ! >>>+999
हे माझ्याकडून
हे माझ्याकडून

(No subject)
अरे व्वा.. नविन भाग आला..
अरे व्वा.. नविन भाग आला..

मला फोटो दिसेना पण
सर्वांनी टाकलेले फोटो अप्रतिम
काल एका बागेत ferya मारत
काल एका बागेत ferya मारत असताना हे महाशय दिसले.sampoorn fulaanni gachch bharalele.
James kadambatarula bamdhuni Zola ,vagaire kavi kalpana asavi.Karan mee ji don zade pahili ti saralsot hoti.barakulyasha fandya hotya.kiti ha nisarg apalyapudhe najrane pesh karato .pan tyasathi dole ughade asave lagàtat hech khare.
Thanks to .ata zade baghatana vegali najar milalyasarakhe vatate.
फोटो खास नाही.पण कल्पना येण्यासाठी हा फोटो.


देवकी, फोटो सुंदर आणि पोस्ट
देवकी, फोटो सुंदर आणि पोस्ट ही सुंदर .
देवकी, फोटो सुंदर आणि पोस्ट
म्हणून हे फुलं तुला माझ्याकडून भेट
मस्त भेट आहे.पांढर्या
मस्त भेट आहे.पांढर्या रंगाच्या पार्श्वभूमीवर naरिंगी रंगाचे पराग किती उठून दिसताहेत.
शोभा, मस्तच लिहिलं आहेस मनोगत
शोभा, मस्तच लिहिलं आहेस मनोगत. पण मला फोटो दिसत नाहीत
अरे व्वा! आला का नविन धागा!
अरे व्वा! आला का नविन धागा!
शोभा मनोगत छान!
जागु, पारिजातकाचे फोटो खुपच सुरेख..
ईतरही फोटो छानच
मलाही फोटो दिसत नाहीत.
मलाही फोटो दिसत नाहीत.
पांढर्या रंगाच्या
पांढर्या रंगाच्या पार्श्वभूमीवर नारिंगी रंगाचे पराग किती उठून दिसताहेत>>> हो ना अगदी शा॑त वाटत आहे डोळ्या॑ना.
नवीन भागाच्या हार्दिक
नवीन भागाच्या हार्दिक शुभेच्छा!

हा भाग संस्कृतीत आला आहे चुकुन. तो आता घरची बाग मधे कसा टाकायचा?>>>>>>.. माझे सदस्यत्व>>>>>>>>>लेखन>>>>>>..नि.ग . भाग ३२ >>>>>>>..संपादन >>>>>>>>>Groups audience >>>>>>..घरची बाग>>>>>>.. सेव्ह!
सुंदर गजरा गुलबक्षीचा.
सुंदर गजरा गुलबक्षीचा.
(No subject)
कीबोर्ड ख्र्ब ल्य्,त्य्मुळे
.
देवकी छान फोटो.
देवकी छान फोटो.
दोन्ही झाडं काय हातात हात गुंफून, कमान करून उभी आहेत का?
कीबोर्ड ख्र्ब ल्य
कीबोर्ड ख्र्ब ल्य
शोभा, गुलबक्षीची वेणी मस्त .
शोभा, गुलबक्षीची वेणी मस्त .
देवकी, फोटो छान .
माझ्या घराच्या जायच्यायायच्या
माझ्या घराच्या जायच्यायायच्या वाटेवर फुललेलया बहाव्याचे फोटो काढत असताना एकजण म्हणाला क़ी त्या zaadaanche पण फोटो काढा.बघा कुठले zaad मूळचे आहे.अक्षरशः सुमारे ६ फूट अंतरावर ही दोन zaade शेजारी आहेत.पण मधल्या एका फांदीने दोन्ही जोडली आहेत.
समोरुन पाहिले तर H असा आकार दिसतो.कुठल्याही zaadaavar कलमाची निशाणी नाही.बरे रस्तयावरची
zaade ,कोण कलम करणार? निसर्गाचा चमत्कार हेच खरे.
त्या माणसाने दाखवले नसते तर आजही मला कळले नसते.
मस्त माहिती देवकी।।।
मस्त माहिती देवकी।।।
मस्तच फोटो देवकी..
मस्तच फोटो देवकी..
अक्षरशः जोडून आहे ती फांदी.. भारीच..
आताशा zaaDANCHI छुपी कत्तल
आताशा zaaDANCHI छुपी कत्तल चालू आहे आमच्याकडे.बहाव्याची २ zaade गायब zaaleeत.अशावेळी असे आगळे दृष्य पुसून जाईल म्हणून भीती वाटते.
अरेरे
अरेरे
आमच्या गावी फुललेली गुलाबाची
आमच्या गावी फुललेली गुलाबाची फुले....

Pages