नमस्कार!
जिएस्टी बद्दल सध्या वातावारण तप्त आहे. वेगवेगळे मेसेजेस फिरत आहेत. कुठलाही बदल स्विकारणे व तो अमलात आणणे हे अवघड असते. त्यातही भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये असे 'अमुलाग्र' बदल घडताना एक मोठे मंथन होणार यात शंका नाही.
जिएस्टी योग्य का अयोग्य, राजकीय का आर्थिक, दिशादर्शक का दिशाहीन... असले अनेक वाद संवाद सुरू असताना या सर्वाच्या पार्श्वभूमीवर हे एक अतीशय सुंदर ऊदाहरण आपल्या बरोबर शेयर करावेसे वाटले म्हणून हा ऊपद्व्याप.
" आपण नेहेमीच हा विचार करतो की देशाने मला काय दिलं... माझ्यासाठी काय केलं..? पण आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार अधिक योग्य आहे व गरजेचा आहे.. जर प्रत्येकाने असा विचार केला तर खूप काही चांगलं घडू शकतं.."
हे शब्द आहेत या खालील बातमी मधील हॉटेल 'विनय' चे मालक श्री अनिल टेंबे यांचे.
गेले ७५ वर्षे अस्सल मराठी ऊपहारगृहाची परंपरा यशस्वीपणे चालवणार्या श्री टेंबे, त्यांचे सहकारी व हॉटेल ने घालून दिलेल्या या ऊदाहरणाबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत करावे तितके थोडे आहे. आजच्या जगात कस्टमर वा ग्राहका ला फायदा करून देण्याचा द्रुष्टीकोन ठेवणारे व्यापारी तसे खूपच कमी आहेत, त्यासाठी 'विनय' चे मन:पूर्वक अभिनंदन.
हे असेही होऊ शकते.
https://khabar.ndtv.com/news/mumbai/this-hotel-becomes-first-in-mumbai-t...
[श्री अनिल टेंबे म्हणजे 'बाबा' हे माझे सासरे आहेत.. हे माझे भाग्यच.]
ता.कः ही पोस्ट 'विनय' हॉटेल चे मार्केटींग म्हणून नव्हे तर मराठी व्यापार्याच्या सचोटीने धंदा करण्याचे कौतूक आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा व शेयर देखिल करा. एन्डिटीव्ही चा वार्ताहर नाश्ता करण्यासाठी सहज हॉटेल ला गेला असताना असे नविन रेट कार्ड बघून व कमी आलेले बिल बघून चक्रावला व त्याची बातमी झाली, ईतकच. बातमी ची मराठी लिंक सापडली तर ईथे अपलोड करेन.
छान बातमी योग .
छान बातमी योग .![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काही ठराविक प्रतिक्रिया येणारच होत्या त्या गृहितच धरायच्या असतात .
<< आजकाल वाईट (भ्रष्टाचार, फसवणुक, लबाडी इ.) बातम्यांचं प्रमाण कमी होउन अशा तर्हेच्या चांगला बातम्या कानावर येत असल्याने लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसणं कठीण आहे. त्यांची मनोवस्था ओळखुन त्यांना सावरायला थोडा वेळ द्या... >>
छान बातमी आहे, शीर्षक
छान बातमी आहे, शीर्षक वाचलेले, पण आत शिरायचे राहिलेले. कारण राजकारणी चर्चेचा धागा आहे असे वाटलेले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी वाद एका बाजूला, मेनूकार्ड आवडले. कधी जाणे झाले त्या भागात तर नक्की भेट देईन
>>मेनूकार्ड आवडले. कधी जाणे
>>मेनूकार्ड आवडले. कधी जाणे झाले त्या भागात तर नक्की भेट देईन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मेनू पण छान आहे .. नक्की जा!
>>कारण राजकारणी चर्चेचा धागा आहे असे वाटलेले..
हा तुमचाच दोष आहे!
नाही हो, माझा दोष नाही. हल्ली
नाही हो, माझा दोष नाही. हल्ली सरकारच्या प्रत्येक धोरणावर दोन टोकाच्या मतांचा नुसता उच्छाद असतो. जीएसटीने वाढलेल्या किंमती आणि जीएसटीने कमी झालेल्य किंमती, बघावे तिथे याच पोस्टी फिरत होत्या. आणि ते फिरवण्यामागे बहुतांश लोकांचा हेतू काही माहीती देणे नसून कसे हे सरकार कसे चांगले वा वाईट आहे हेच दर्शवणे असायचा. बाकी माझी बरीचशी मायबोलीगिरी टू जी नेटवर्क मोबाईलवर होत असल्याने सारेच धागे वेळच्यावेळी बघणे अवघड जाते ईतकेच. ..
असो, गिरगाव विभागाबाबत आणि तेथील जुन्या मुंबईकराबाबत असेही माझे मत चांगले असल्याने काही खरे खोटे करायची गरज मला वाटत नाही. नक्की भेट देईन..
छान बातमी आहे योग. गिरगावात
छान बातमी आहे योग. गिरगावात गेल्यावर जमल्यास भेट देईन.
राज +१
धन्यवाद योग इथे दिल्याबद्दल.
धन्यवाद योग इथे दिल्याबद्दल. श्री. टेंबे यांना शुभेच्छा!!
चिनुक्षा, बातमीबद्दल एक अवाक्षरही न बोलता फक्त ते कसे पहिले उपहारगृह नाही म्हणाला हे गंमतशीर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कापो, चिनूक्स स्थितप्रज्ञ आहे
कापो, चिनूक्स स्थितप्रज्ञ आहे.
आणि त्याची माहिती खरी असते.
साधना ते मला माहित आहे. त्यात
साधना ते मला माहित आहे. त्यात काही वादच नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.loksatta.com
http://www.loksatta.com/arthasatta-news/gst-restaurants-hotels-eateries-...
छान बातमी.
छान बातमी.
सर्वांचे आभार! गिरगावात गेलात
सर्वांचे आभार! गिरगावात गेलात तर 'विनय' ला नक्की भेट द्या.
भाग्यच.]
भाग्यच.]
ता.कः ही पोस्ट 'विनय' हॉटेल चे मार्केटींग म्हणून नव्हे तर मराठी व्यापार्याच्या सचोटीने धंदा करण्याचे कौतूक आहे.
<<
शेवटच्या पोस्टच्या संदर्भाने धाग्यातील हे आवडले.
एक मराठी हॉटेलवाला सचोटीने
एक मराठी हॉटेलवाला सचोटीने वागला तर त्याने अख्खे मराठी व्यापारी प्रामाणिक कसे सिद्ध होतात ?
मुळात , ही घटना अपवाद आहे म्हणूनच तर बातमी झाली .
Pages