एखाद्यावर विश्वास टाकताना ....

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 July, 2017 - 02:04

एखाद्यावर विश्वास टाकताना .... तुम्ही काय बघता, कसा विचार करता?
किंवा याऊलट,
एखाद्याचा विश्वास तुम्ही कसा संपादन करता? एखादी गोष्ट त्याला कशी पटवून देता?

मागे एक मेसेज वाचण्यात आलेला,
एखाद्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला तुम्ही कितीही पटवून द्या, त्यांचा विश्वास बसतच नाही, तर ते पटवून देणे व्यर्थ आहे.
त्याऊलट ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, त्यांना काही पटवून द्यायची गरजच भासत नाही.
थोडक्यात स्वत:ला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका.

पण प्रॅक्टीकली हे अशक्य आहे. कारण एक वौश्विक सत्य हे देखील आहे की या जगात नेहमी खरे बोलणारा आणि कधीही खोटे न बोलणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. प्रत्येक जण आयुष्यात एकदा वा अनेकदा सोयीने खोटे बोलतोच. आणि हे सर्वांनाच माहीत असते. त्यामुळे ईथे प्रत्येक जण आपली विश्वासार्हता जपायला धडपडत असतो.

हे सारे सुचायचे तात्कालिक कारण, माझा फ्रिजचा धागा -
तिथे दोन गोष्टी या विश्वास अविश्वासाच्या कोर्टात हजर झाल्या.
1) एक माझी गर्लफ्रेंड जी गेले चार वर्षे माझ्या आयुष्यात आहे.
2) दुसरा माझा नवा फ्रिज जो मी चार दिवसांपूर्वी घेतला

चर्चेत मला प्रामुख्याने 3 गट आढळले.

1) याला गर्लफ्रेंडही नाही आणि याने फ्रिजही नाही घेतला - टोटल अविश्वास

2) याची गर्लफ्रेंडही आहे आणि याने नवीन फ्रिजही घेतला - टोटल विश्वास

3) याला गर्लफ्रेंड वगैरे काही नाहीये. पण याने फ्रिज मात्र जरूर घेतला - अर्ध विश्वास

यावर माझी काही निरीक्षणे,

1) ज्यांनी वरील दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवला. त्यांनी तो विश्वास तिथे नोंदवला आणि पुढे गेले.

2) ज्यांनी अविश्वास दाखवला. त्यांनी तो अविश्वास तिथे नोंदवला. पण पुढे न जाता वादप्रतिवाद करत तिथेच रेंगाळले.

3) ज्यांनी दोन्ही गोष्टींवर विश्वास दाखवला ते माझ्या सर्वच गोष्टींवर विश्वास टाकतात किंवा ज्यांनी अविश्वास दाखवला ते माझ्या सर्वच गोष्टींवर अविश्वास दाखवतात असे म्हणने कायच्या काय होईल. त्यामुळे हे या उदाहरणाला लागू नसले तरी माणूस प्रेमात वा द्वेषात आंधळा होतो असे म्हणतात. कारण तो समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास वा अविश्वास दाखवतो.
तर अश्या केसेसना आपण या धाग्यातून वगळूया.
जो विश्वास वा अविश्वास तर्काच्या कसोटीवर पारखून दाखवला जातो त्याबद्दलच ईथे चर्चा करूया.
उदाहरणार्थ, वरच्या केसमध्ये क्रमांक 3 चा गट ज्यांनी गर्लफ्रेंडवर विश्वास दाखवला मात्र फ्रिजवर नाही त्यांनी दोन्ही बाबी नक्कीच तर्काच्या कसोटीवर परखल्या असतील. याचा अर्थ दोन्ही गोष्टींवर विश्वास वा अविश्वास दाखवणारयांनी तसे केले नसावे असे म्हणायचे नाहीये.

तर धाग्याचा विषयच हा आहे की तुम्ही एखाद्याच्या एका गोष्टीवर विश्वास टाकताना तो कसा टाकता?
त्या व्यक्तीबद्दलचे आपले आधीचे मत, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, आपले ज्ञान वापरून तर्काची कसोटी, उलट तपासणी, वगैरे वगैरे..

तर याचाच उलट प्रश्न हा आहे की एखाद्याला विश्वास पटवून देताना तुम्ही तो कसा पटवून देता?
हा प्रश्न किंवा हे दोन्ही प्रश्न सोशलसाईटवर आपली उत्तरे आणि निकष बदलू शकतात. कारण ईथे प्रत्यक्ष व्यक्तीला आपण पाहिले नसते. पण तरीही येथील दिर्घ वावरानंतर काही मते बनवली असतात.
तेव्हा तुमची विचार प्रक्रिया नेमकी कशी काम करते?

तळटीप - धागा माझ्या फ्रिजच्या उदाहरणावरून सुचला तरी त्यावर ईथे पुन्हा तीच चर्चा नकोय, त्यासाठी तो धागा खुला आहे. ईथे आपण सर्वांनाच या विश्वास अविश्वासाच्या कसोटीवर उतरावे लागले असणारच. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने. तर त्यानुसार जनरल चर्चा अपेक्षित आहे. आपले स्वताचे अनुभव वाचायला आवडतील पण याची त्याची नावे घेऊन वाद टाळावेत ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी, त्यपेक्षा मला भेटायला ये..

ऋन्मेष, आजकाल तुझ्यात पुर्वी सारखा राम राहिला नाहीये.... फॅन क्लबातुन नाव मागे घ्यावं लागणार बहुदा

मायबोलीवर अनेक चांगले उपक्रम हे माबोकर एकमेकांवर असलेल्या विश्वासानेच यशस्वी करून दाखवतात. इथे अनेकांना (मलाही) अडचणीच्या वेळी योग्य मदत/सल्ला मिळाला आहे. अनेकांना मित्र मैत्रिणी आणि काहींना आयुष्याचे जोडीदार देखिल मायबोलीवर मिळाले आहेत.
पण जेव्हा तुझ्या सारख्या आयडी वेड पांघरून पेडगावला जात त्या विश्वासाची खिल्ली उडवू पाहतो तेव्हा माझा संताप होतो. There's a limit to everything. तुझ्या सारख्या ढोंगी माणसापायी मायबोलीची विश्वासार्हता कमी होऊ नये असे मनापासून वाटते म्हणून इथे लिहिले.
बाकी एखाद्याच्या खाजगी जागेचा (पक्षी: मायबोलीचा) किती गैरफायदा घ्यावा याला काही मर्यादा आहेत. त्या पाळ म्हणजे झालं!

ऋन्मेष ह्यांच्या फसवेगिरीला डिफेंड करणं बघून, वेळोवेळी ते जिचा ऊल्लेख करतात, प्रत्येक विषयात कारण नसतांना घेवून येतात तिचा मायबोली आयडी च्र्प्स असेल की सस्मित ह्यावर पोष्टी दर पोष्टी माझा गोंधळ वाढत आहे.

च्रप्स, सस्मित .. मला हे करायची आजिबात ईच्छा नाहीये कृपया तुम्हाला काही म्हणायचे असल्यास ऋन्मेष ह्यांच्या समर्थनार्थ म्हणू शकता.
मी जोवर तुमच्याशी बोलत नाहीये तोवर माझ्या आयडीवर ताशेरे ओढायची गरज नाही. शब्द दुधारी तलवार आहेत.

मला सध्या तरी मायबोलीवर ह्या फसवेगिरी ला सोडून काहीही लिहायचे नाहीये. समजून घ्याल अशी अपेक्षा करते.

मायबोलीवर अनेक चांगले उपक्रम हे माबोकर एकमेकांवर असलेल्या विश्वासानेच यशस्वी करून दाखवतात. इथे अनेकांना (मलाही) अडचणीच्या वेळी योग्य मदत/सल्ला मिळाला आहे. अनेकांना मित्र मैत्रिणी आणि काहींना आयुष्याचे जोडीदार देखिल मायबोलीवर मिळाले आहेत.
>>>>
मायबोलीवरच का, फेसबूक आणि ऑर्कुटवर सुद्धा अशी नाती जुळतात. सोशलसाईट याचसाठी असतात. त्या माणसाचे एकटेपणा दूर करते.

रीया, खरे तर मला या गोष्टीचे कौतुक वाटते की कोणीतरी आपल्याच लेवलच्या एका व्यक्तीबाबत फॅन हा शब्द वापरते. मी शाहरूखचा वा सचिनचा फॅन आहे हे बोलणे सोपे असते, सारेच बोलतात. पण हे सर्वांनाच नाही जमत. मला सिरीअसली अश्यांचे कौतुक वाटते Happy

काहींना आयुष्याचे जोडीदार देखिल मायबोलीवर मिळाले आहेत. >>>

@जिज्ञासा, व्वा!!!!!!! भारी विषय दिलांत..एक स्टोरी नक्की धन्यवाद Happy

राहुल, माझे स्वतःचे प्रेमप्रकरण सोशलसाईटवर जुळले आहे. फक्त ती स्टोरी मी लिहिली तर ती सत्यकथा असूनही तिच्यावर सतरा शंका उपस्थित केल्या जातील ईतकेच. हो, पण ती गोष्ट वेगळी की त्यातही एक मजाच असेल Happy

@ जिज्ञासा, तुमची आणि माझी जगण्याची स्टाईल आणि तत्वे भिन्न आहेत. तुम्हाला माझी पटो न पटो ते तुमचे मत आहे, त्या मताचा आदर आहे. पण तितकाच आदर मला माझ्या विचारांचा आणि जीवनशैलीचाही आहे. त्यामुळे बदलत नाही ईतकेच Happy

फक्त ती स्टोरी मी लिहिली तर ती सत्यकथा असूनही तिच्यावर सतरा शंका उपस्थित केल्या जातील ईतकेच. >>>
इंटरेस्टिंग! ठिक आहे तुम्ही नका लिहू, मी लिहील! भेटूया का एकदा? Happy

अरे सर्व जण भेटूया का एकदा म्हणून मला सतवू नका रे.. कधी कधी वाटते उगाच या मनुष्याच्या जन्माला आलो, देवाच्या पोटी जन्म घेतला असता तर लोकांनी हा भेटत नाही हे स्विकारले असते Happy

असो, पर्मनंट गर्लफ्रेंडच नाही पण ईतरही बरीच नाती सोशलसाईटवर मिळाली आहेत. ते सारे नावासह लिहिणे योग्य वाटत नाही. पण आजही माझे सारे सक्रिय व्हॉटसपग्रूप जिथे मी पडीक असतो ते नेटफ्रेंडसचेच आहेत. जेव्हा कोणी सोशलसाईटला आभासी जग बोलते तेव्हा मला खरेच हसायला येते की हे लोकं कोणत्या शतकात राहतात

तुझ्या सो.मि. वर भेटलेल्या पर्मनंट गर्लफ्रेंड ला तरी तुझी खरी आयडेंटीटी माहित आहे ना?
थापा वाटाव्या अश्या प्रकारे तु तुझी पर्सनल ईन्फॉर्मेशन वापरत अस्तोस परत वर वेळ आलीतर ते खोट होत अस म्हणुन मोकळा होतोस. म्हणुन लोक अविश्वास दाखवत अस्तील. नाहीतर कोणाला काहीही पडलेल नसत. कितीतरी आयडीज स्वतःची काहीही ओळख न देता वर्षानुवर्ष आहेत मायबोली वर.

मस्त विषय निवडला आहेस.
इथे ज्या कमेंट लिहीतो आहेस, त्या वाचून तू खरंच एक फेक आयडी आहेस हे सिद्ध होतेय.

टाईमपास किती करावा याला पण मर्यादा असते.

जिज्ञासा यांच्या पोस्टला अनुमोदन.

तुमचा माझ्यावर विश्वास नाही. जेव्हा बसेल तेव्हा ऋन्मेष तुम्हाला भेटला म्हणूनच समजा. आता तुम्ही फक्त खरे खोटे काय आहे हे जाणून घ्यायच्या उत्सुकतेपोटी भेटत आहात, ऋन्मेषला भेटायची उत्सुकता तुम्हाला नाही. मग मी खरेच वेळात वेळ काढून तुम्हाला भेटावे का? >>>>

@ जिज्ञासा, पुन्हा माझा पॉईंट तोच राहिला, जर एखाद्या व्यक्तीला केवळ खरे खोटे करण्यासाठीच मला भेटायचे आहे आणि बाकी मला भेटावे
अशी ना उत्सुकता आहे ना मला भेटून त्याला आनंद होणार आहे तर मी माझ्या आयुष्यातला वेळ खर्च करत त्या व्यक्तीला भेटावे का?
यावर तुम्ही किंवा मी सोडून ईथे ईतरांची मते वाचायलाही आवडतील
>>>

अरे सर्व जण भेटूया का एकदा म्हणून मला सतवू नका रे.. कधी कधी वाटते उगाच या मनुष्याच्या जन्माला आलो, देवाच्या पोटी जन्म घेतला असता तर लोकांनी हा भेटत नाही हे स्विकारले असते >>>

ऋ, तुम्ही शब्दांचा खेळ करण्यात माहीर आहात. थापा मारणं, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणं यात पटाईत आहात. आपली गफ्रे खरी असो वा काल्पनिक, आपण फ्रिज घेतला/न घेतला, आपली मुंबई सारख्या महानगरात तिन घरं आहेत/नाहीत, आपण मुंबईबाहेर लग्नानंतर राहण्यासाठी सदनिका बघता आहात/नाहीत, आपण इलेक्ट्रिकल/मैकेनिकल इंजिनियर आहात, एका एमेनसीत काम करता आहात, आपण फेक आयडी आहात/नाहीत...
तर.....
मला ह्या कुठल्याही गोष्टींशी काहीही घेणं नाही..
आपल्या, वर मी उल्लेख केलेल्या ह्या सर्व गोष्टी आपल्या मायबोलीवर असणाऱ्या खुप सार्या सदस्यांसाठी कॉमन असणार/आहेत.. येथील हजारो जण एमेनसीज मध्ये काम करताहेत. गफ्रे ही मिरवताहेत. अशाच बाकीच्या सगळ्या गोष्टींबाबत म्हणता येईल. तरी हे सगळं (खरंखोटं काहीही असो) असं येथे सोशल साईट वर मिरवत नाहीत.आपलं वेगळेपण नेमकं येथेच आहे. आपण स्वतः ला हवं तसं येथे व्यक्त करताहात. साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधता, तो एंजॉय करता आणि नेमकी हिच गोष्ट आपल्याला इतरांपासून वेगळी ठरवते.
आपण नेमके आहात कसे? आपली व्यक्तीरेखा जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आपल्या या असं वागण्यामागचं मोटीव काय? हे बघायचं आहे.. भेटल्यानंतर आनंद नक्कीच होईल.. किंबहुना तो होतच असतो. बोला भेटायचं का? वाटलंच तर ३००-४०० किमी प्रवास करून आपण यावं नाहीतर मी येतो. काय ते सांगा.. उगाच शब्दांचा खेळ आता माझ्या बोलण्यावर करू नका. आहे का माझ्यावर आपला विश्वास?

राहुल, आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद Happy
पण माफ करा एवढ्या चटकन मी कोणावर विश्वास नाही टाकत

प्रत्येक विषयात कारण नसतांना घेवून येतात तिचा मायबोली आयडी च्र्प्स असेल की सस्मित ह्यावर पोष्टी दर पोष्टी माझा गोंधळ वाढत आहे.>>>>>>>>>>
का बिनकामाचा गोंधळ वाढवून घेताय्?सोडुन द्या झालं.

Submitted by हुप्पाहुय्या on 7 July, 2017 - 23:03

च्रप्स, सस्मित .. मला हे करायची आजिबात ईच्छा नाहीये कृपया तुम्हाला काही म्हणायचे असल्यास ऋन्मेष ह्यांच्या समर्थनार्थ म्हणू शकता.>>>>>>>>>>
मी कुणाच्याही समर्थनार्थ काही लिहित नाहीये. पण एखाद्यच्या पर्सनल आयुष्यात इतकी ढवळाढवळ तेही आंतरजालावरच्या व्यक्तीच्या म्हणजे टू मच. तो खोटं बोलत असे, थापा मारत असेल. खोटारडा असेल. वेडा असेल. नैतर फसवा असेल.
तो कुणीही असेल. ऋन्मेष किंवा सस्मित. कुणीही.
तो काही लिहितोय त्याचा स्वतःला किती त्रास करुन घ्यायचा हे आपल्याला स्वतःला चांगलं कळतं असं मला वाटतं. त्याचे लेख त्याचे प्रतिसाद इग्नोर करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नक्कीच आहे. तो कधीही आपल्याला पर्सनली काही बोलत नाही. आपल्याबद्दल कमेंट करत नाहीये किंवा हे मी लिहिलंय तुम्ही वाचलंच पाहिजे असंही काही नाहीये. मग पब्लिक काय विचार करुन त्याच्याशी एवढं पर्सनल होतं? हा फोटो टाक, तो फोटो टाक, घरं किती? गफ्रेबद्दल नको त्या कमेंट. त्याची अक्कल काढणं. तुम्हीच जास्त ईंटरेस्ट घेताय त्याच्या लिखाणात आणि त्याच्या पर्सनल आयुष्य्तही.

मी जोवर तुमच्याशी बोलत नाहीये तोवर माझ्या आयडीवर ताशेरे ओढायची गरज नाही. >>>>>>>>> तुमच्यावर ताशेरे ओढलेले नाहीयेत. डोन्ट बी सो सिरीयस.
शब्द दुधारी तलवार आहेत.>>>>>>>>>> इथे तुम्ही माझ्याबद्दल दुधारी तलवारीसारखे शब्द वापरले तरी, आपण एकमेकांना ओळखत नाही आणि तुम्ही माझ्या जवळचे कुणी नाहीत तर ते शब्द किती सिरीयसली घ्यायचे ते मला ठाउक आहे. मी सुद्धा त्या तश्या शब्दांना तसंच प्रत्युत्तर देईन आणि विसरुन जाईन. तुमच्या प्रत्येक पोस्ट्ला खरं खोटं करत बसणार नाही. तेवढा वेळही नाही माझ्याकडे आणि असला तरी तुम्ही माझ्यासाठी तेवढे महत्वाचे नाही आहात.

मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे तु भेट. नाही भेटत मग मला तुझ्यावर विश्वास नाही ठेवता येणार. तु खोटारडा आहेस. सिरीयसली? आर यु दॅट मच सिरीयस अबाउट हिम? तो खोटारडा आहे तर असेल की मग तुम्हाला का त्याची पडलीये. खरंच हसु येतं.

मला सध्या तरी मायबोलीवर ह्या फसवेगिरी ला सोडून काहीही लिहायचे नाहीये. समजून घ्याल अशी अपेक्षा करते.>>>>>>>>>>>>
तुम्ही फसवेगिरीबद्दल लिहा नैतर माझी जीएस्टी टीव्ही, फ्रीज, ओव्हन खरेदी बद्दल लिहा. Happy मला काही फरक पडत नाही. मी वाचेन. आवडलं तर तशी कमेंट करेन किंवा नाही अवडलं तर तसं लिहिन किंवा लिहिणार नाही. आंतरजाल आणि त्यावरचा एखादा आयडी माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे माझ्यापुरतं मला चांगलं ठाउक आहे.

ऋन्मेष, लोक लैच पॅनिक होऊ लागलेत बघ तुला भेटण्यासाठी. वविला जा ह्या वेळी. सपरीवार Happy
आणि ते माठाचं झाकण फ्रीजवर ठेउन काय साध्य केलंस ते काय मला कळलं नाही.

रीये, ऋन्मेषने जेव्हा कुमार सानु कोण असा प्रश्न विचारला ना तेव्हाच मी त्याच्या फॅनक्लाबातुन बाहेर पडले. Lol

एकीकडे ऋम्हणजे कोणाचा तरी ड्यू आयडी किंवा इकडे प्रतिसादांत असलेले काही म्हणजे ऋ चेच ड्यू आयडी असे उलट सुलट तर्क काढून ह्यउप्पर त्याला ववि ला ये म्हणजे प्रत्यक्ष पाहता येईल हे आव्हान काही समजले नाही. जर तो स्वता ड्यू असेल तर भलत्याच ओरिजिनल आयडी ने तिकडे आला किंवा त्याच्या इतर ड्यू आयडीने (संदर्भ - काही इतरत्र असलेले प्रतिसाद ) जर तिकडे वावरला तर प्रत्यक्ष तुमच्या ग्रुप फोटोत आला तरी कसे काय ओळखणार की हाच ऋ म्हणून Wink असा एक प्रश्न पडलाय

@कु.ॠ...
मैं कहां खराब हूँ, मैं तो लाजवाब हूँ। मैं यह मनवाना चाहता हूं।

अरे धागा काय लोकं बोलताहेत काय...

आणि ते माठाचं झाकण फ्रीजवर ठेउन काय साध्य केलंस ते काय मला कळलं नाही.
>>>>>>

मनोरंजन Happy
माझे एकट्याचे नाही तर तिथे उपस्थित सर्वांचेच.
त्याफोटोनंतर खरेच काही मजेशीर पोस्ट आल्या धाग्यावर.

सायुरी Happy
बोले तो, मी चांगलाच ओळखून आहे त्याला ..

रूनमेश भाऊ ( अससुमिंग हे तुमचे खरे नाव नाही) , तुमच्या ओरिजिनल नावाने एक आयडी बनव , ववी ला जाऊन ये,
तुला कोणी ओळखणार नाही, पण तू सगळ्यांना भेटशील...
रूनमेश कसा त्रास देतो याच्यावर टॉपिक काढ, जिगरी मित्र बनून येशील. आणि तुला कळेल पण कोण आयडी कोण आहे...

Pages